यात्रा
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मिपा शशक स्पर्धेने प्रेरित होऊन मी देखील काही खरडलय.
" पप्पा आज नक्की यात्रेला जायचं ना? आज शेवटचा दिवस."
"हो बेटा. आज नक्की"
"ताई, बाबा आज हो म्हणाले, तू काय घेणार? मी ढोल घेईन बाजूच्या बाळ्याने घेतलाय ना तसा"
"बाळ्या, आज आम्ही यात्रेला जाणार"
"आजी तू पण येशील ना?"
"नाही रे, मला चालवत नाही"
"बरं, तुझ्यासाठी पण काहीतरी आणीन"
घडाळ्यात रात्रीचे दहा वाजलेले.
"घे आज पण आला तुझा बाप ढोसून, झोप नाहीतर आज बी दिल तो फटके." - आई.
आजीची सहानुभूतीची नजर चोरून त्याने चादर तोंडावर ओढली.
प्रतिक्रिया
रोज मरे... Sins of Father
खरंच
खरंच
खरंच
पण भारी आहे
खरडवहीत जावू दे का?
कथाबीज अजून फुलवता येईल. शशक