नास्तिकता दिवसांच्या शुभेच्छांच्या निमीत्ताने
मुलतः अज्ञेय (अॅग्नॉस्टिक) राहून दर क्षणास विविध विचारधारांच्या दृश्टीकोणातून विचार करण्याचा अधिकार राखून ठेवणारा अशी स्वतःची लांबलचक व्याख्या करणारा असल्यामुळे आस्तिकांसोबतच नास्तिकांनासुद्धा (टिकेप्रमाणेच) मनापासून शुभेच्छाही देत असतो तशा या २३ मार्च २०१९ या जागतिक नास्तिकता दिवसाच्या नास्तिकांना हार्दीक शुभेच्छा.
( जे माझे लेखन प्रथमच वाचताहेत त्यांच्यासाठी मी सर्वधर्मीय आस्तिकता आणि नास्तिकता यांच्या चांगल्या बाजू आणि मर्यादा दोन्हीचीही या पुर्वी वेळोवेळी दखल घेऊन झालेली आहे. तुम्ही अमुक बाजूने च का तमूक बाजून का नाह्ही या विषयावर स्वतःचे डोक्यास त्रास देऊनये )
नमनाला घडाभर
या वर्षीच्या जागतिक नास्तिकता दिवसाचा विशेष म्हणजे स्वतःला नास्तिक म्हणवून घेणार्या पुर्वाश्रमीच्या मुस्लीमांचा वाढलेला सहभाग. गेल्या काही वर्षात मुस्लिम बहुसंख्य देशातून युरोमेरीकेत पोहोचलेल्या किंवा स्वतःच्या देशातील जाचक धार्मीक बंधनांना नाकारून युरोमेरीकेत पळून आलेल्या पुर्वाश्रमीच्या मुस्लीम आणि आता स्वतःस नास्तिक म्हणवणार्यांची संख्या वाढलेली असली तरीही युरोमेरीकेत शांततेच्या धर्माच्या प्रवर्तकांचेच प्राबल्य युरोमेरीकेत इतपत वाढत चालले आहे कि तेथिल भाषणस्वांत्र्य धाब्यावर बसवून प्रत्यक्ष जिवनातील तसेच अगदी आंतरजालावरील सोशल मिडियातही (पुर्वाश्रमीच्या मुस्लीम) नास्तिकांचे भाषण स्वातंत्र्यावर #इस्लामोफोबीयाच्या दाव्या आडून ही गळचेपी करण्यात अधून मधून बर्या पैकी यश येताना दिसते.
हे नास्तिक (पुर्वाश्रमीचे मुस्लीम) मुस्लीम समाजावर टिका न करता (मुस्लविसमाज विरोधी कट्टरता न बाळगता) केवळ शांततेच्या धर्माच्या विचारधारा प्रवर्तक आणि पुस्तकातील उणिवांवर आणि त्यांचे नकारात्मक प्रभाव या बाबत टिका करण्या बाबत सहसा सजग असतात. त्यांच्या कडून होणार्या टिकेला वंशवाद किंवा इतर धर्मीय द्वेषाचा संबंध असण्याचीही शक्यता नसते.
धार्मिक विचारधारेतील उणिवांचा विचारपूर्क निर्देश म्हणजे अनाठायी भिती असा अर्थ घेतला जाऊ शकत नाही . त्यामुळे बहुतेक सर्व नास्तिक (पुर्वाश्रमीचे मुस्लीम धरून) इस्लामोफोबीया हा शब्द प्रयोग नाकारू इच्छितात अर्थात मुस्लिम समाजातील जागरूकतेस साहाय्य करावे पण सर्व सामान्य मुस्लिमांचे स्टिरियोटाइपिंग करून त्यांच्याबद्द्ल अनाठायी गैरसमज मनात ठेऊन निरपराध व्यक्तींना समुहद्वेषास सामोरे जाऊ लागू नये अशी त्यांची रास्त अपेक्षा असते.
आपल्याकडे भारतात शांततेच्या धर्मातील विचारधारेवर अभ्यासपूर्ण टिकेचा अभाव आहे दुसरीकडे सर्व सामान्य मुस्लिमांचे स्टिरियोटाइपिंग करून त्यांच्याबद्द्ल अनाठायी गैरसमज मनात ठेऊन निरपराध व्यक्तींना समुहद्वेषास सामोरे जावे लागताना दिसते. (इतरही बाजूच्या निरपराध व्यक्तींना समुहद्वेषास सामोरे जावे लागताना दिसते) तसे न करता नास्तिकांच्या नास्तिकतेबद्दल द्वेष न बाळगता नास्तिकांच्या टिकेस जागा ठेऊन आत्मपरीक्षणाचीसंधी म्हणून बघणे संबंधीत सुयोग्य् असू शकणार्या सुधारणा स्विकारणे सामाजिक विकासास सहाय्य्कारी असू शकावे ..
वेगळ्या प्रतिमांचे मुस्लिम या मालिकेत काही नास्तिक (पुर्वाश्रमीचे मुस्लीम ) यांचा परिचय करून देण्याचा मनोदय जुनाच आहे. नास्तिकता दिवसाच्या निमित्ताने जमल्याबघावे असा विचार आहे. माझा लॅपटॉप स्पीड कमी झालाय तरीही जमल्यास बघतो.
एक निर्भिड नास्तिक हमीद दलवाई मुस्लीम स्त्रीयांच्या मोर्चाचे नेतृत्व करताना
या बाजूने नास्तिकांची यादी मोठी आहे सर्वांची नावेही देऊन होणार नाहीत प्रातिनिधीक म्हणून कलानिधी श्रीराम लागू
एक निर्भिड नास्तिक हमीद दलवाई मुस्लीम स्त्रीयांच्या मोर्चाचे नेतृत्व करताना
या बाजूने नास्तिकांची यादी मोठी आहे सर्वांची नावेही देऊन होणार नाहीत प्रातिनिधीक म्हणून कलानिधी श्रीराम लागू वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
मुस्लिम फंडामेंटलिस्ट -
१) विवीध देशातील गेल्या
शुभेच्छांचा स्वीकार
अनेक आभार
शांततेचा धर्म?
या धाग्यात शीर्षासनास वेळ निरर्थक
शुभेच्छांचा स्वीकार करतो.
तुमच्या शुभेच्छा स्विकारू
माझे थोडे
माझि व्यक्तिगत ढोबळ (जराशी
नास्तिकता दिवस २०२०च्या