नास्तिकता दिवसांच्या शुभेच्छांच्या निमीत्ताने

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
23 Mar 2019 - 1:36 pm

मुलतः अज्ञेय (अ‍ॅग्नॉस्टिक) राहून दर क्षणास विविध विचारधारांच्या दृश्टीकोणातून विचार करण्याचा अधिकार राखून ठेवणारा अशी स्वतःची लांबलचक व्याख्या करणारा असल्यामुळे आस्तिकांसोबतच नास्तिकांनासुद्धा (टिकेप्रमाणेच) मनापासून शुभेच्छाही देत असतो तशा या २३ मार्च २०१९ या जागतिक नास्तिकता दिवसाच्या नास्तिकांना हार्दीक शुभेच्छा.

( जे माझे लेखन प्रथमच वाचताहेत त्यांच्यासाठी मी सर्वधर्मीय आस्तिकता आणि नास्तिकता यांच्या चांगल्या बाजू आणि मर्यादा दोन्हीचीही या पुर्वी वेळोवेळी दखल घेऊन झालेली आहे. तुम्ही अमुक बाजूने च का तमूक बाजून का नाह्ही या विषयावर स्वतःचे डोक्यास त्रास देऊनये )

नमनाला घडाभर

या वर्षीच्या जागतिक नास्तिकता दिवसाचा विशेष म्हणजे स्वतःला नास्तिक म्हणवून घेणार्‍या पुर्वाश्रमीच्या मुस्लीमांचा वाढलेला सहभाग. गेल्या काही वर्षात मुस्लिम बहुसंख्य देशातून युरोमेरीकेत पोहोचलेल्या किंवा स्वतःच्या देशातील जाचक धार्मीक बंधनांना नाकारून युरोमेरीकेत पळून आलेल्या पुर्वाश्रमीच्या मुस्लीम आणि आता स्वतःस नास्तिक म्हणवणार्‍यांची संख्या वाढलेली असली तरीही युरोमेरीकेत शांततेच्या धर्माच्या प्रवर्तकांचेच प्राबल्य युरोमेरीकेत इतपत वाढत चालले आहे कि तेथिल भाषणस्वांत्र्य धाब्यावर बसवून प्रत्यक्ष जिवनातील तसेच अगदी आंतरजालावरील सोशल मिडियातही (पुर्वाश्रमीच्या मुस्लीम) नास्तिकांचे भाषण स्वातंत्र्यावर #इस्लामोफोबीयाच्या दाव्या आडून ही गळचेपी करण्यात अधून मधून बर्‍या पैकी यश येताना दिसते.

हे नास्तिक (पुर्वाश्रमीचे मुस्लीम) मुस्लीम समाजावर टिका न करता (मुस्लविसमाज विरोधी कट्टरता न बाळगता) केवळ शांततेच्या धर्माच्या विचारधारा प्रवर्तक आणि पुस्तकातील उणिवांवर आणि त्यांचे नकारात्मक प्रभाव या बाबत टिका करण्या बाबत सहसा सजग असतात. त्यांच्या कडून होणार्‍या टिकेला वंशवाद किंवा इतर धर्मीय द्वेषाचा संबंध असण्याचीही शक्यता नसते.

धार्मिक विचारधारेतील उणिवांचा विचारपूर्क निर्देश म्हणजे अनाठायी भिती असा अर्थ घेतला जाऊ शकत नाही . त्यामुळे बहुतेक सर्व नास्तिक (पुर्वाश्रमीचे मुस्लीम धरून) इस्लामोफोबीया हा शब्द प्रयोग नाकारू इच्छितात अर्थात मुस्लिम समाजातील जागरूकतेस साहाय्य करावे पण सर्व सामान्य मुस्लिमांचे स्टिरियोटाइपिंग करून त्यांच्याबद्द्ल अनाठायी गैरसमज मनात ठेऊन निरपराध व्यक्तींना समुहद्वेषास सामोरे जाऊ लागू नये अशी त्यांची रास्त अपेक्षा असते.

आपल्याकडे भारतात शांततेच्या धर्मातील विचारधारेवर अभ्यासपूर्ण टिकेचा अभाव आहे दुसरीकडे सर्व सामान्य मुस्लिमांचे स्टिरियोटाइपिंग करून त्यांच्याबद्द्ल अनाठायी गैरसमज मनात ठेऊन निरपराध व्यक्तींना समुहद्वेषास सामोरे जावे लागताना दिसते. (इतरही बाजूच्या निरपराध व्यक्तींना समुहद्वेषास सामोरे जावे लागताना दिसते) तसे न करता नास्तिकांच्या नास्तिकतेबद्दल द्वेष न बाळगता नास्तिकांच्या टिकेस जागा ठेऊन आत्मपरीक्षणाचीसंधी म्हणून बघणे संबंधीत सुयोग्य् असू शकणार्‍या सुधारणा स्विकारणे सामाजिक विकासास सहाय्य्कारी असू शकावे ..

वेगळ्या प्रतिमांचे मुस्लिम या मालिकेत काही नास्तिक (पुर्वाश्रमीचे मुस्लीम ) यांचा परिचय करून देण्याचा मनोदय जुनाच आहे. नास्तिकता दिवसाच्या निमित्ताने जमल्याबघावे असा विचार आहे. माझा लॅपटॉप स्पीड कमी झालाय तरीही जमल्यास बघतो.

Hamid Dalwai

एक निर्भिड नास्तिक हमीद दलवाई मुस्लीम स्त्रीयांच्या मोर्चाचे नेतृत्व करताना

Shriram Lagoo Wikimedia commons

या बाजूने नास्तिकांची यादी मोठी आहे सर्वांची नावेही देऊन होणार नाहीत प्रातिनिधीक म्हणून कलानिधी श्रीराम लागू

धर्मव्यक्तिचित्रणशुभेच्छा

प्रतिक्रिया

कंजूस's picture

23 Mar 2019 - 1:52 pm | कंजूस

मुस्लिम फंडामेंटलिस्ट - म्हणजे कुराणात जे काही लिहिले आहे, आदेश दिले आहेत ते तसेच्या तसे पाळू इच्छिणारे आणि पाळायला लावणारे यांचेपासून मुक्त होणारे म्हणजे नास्तिक असावेत.
त्यांचा लढा असलाच तर त्यांच्या धर्माशी आहे. किंला लढा न देताच दूर राहायचे असेल.

माहितगार's picture

23 Mar 2019 - 2:18 pm | माहितगार

१) विवीध देशातील गेल्या दशकभरातील सर्वेक्षणांचा सर्वसाधारण आराखडा कोणत्याही देशात कोणत्याही धर्मीय बॅकग्राऊंडला किमान ५% नास्तिकता असतच असावी असे दिसते, सभोवतालच्या वातावरणावर वाच्यता करायची अथवा नाही हे ठरवले जाते.

२) शांतत्तेच्या धर्मापासून गेलेल्या नास्तिकांची बरीच आत्मवृत्ते पुस्तक, युट्यूब आणि मुलाखती स्वरुपात गेल्या दशकभरात खास करून गेल्या चारेक वर्षात आलेली आहेत. आत्मकथनांच्या सर्व साधारण स्वरुपावरून २.१) त्यातील बरेच जण वैचारीक साशंकतेनंतर अधिक अभ्यासकरून (भावनेच्या आहारी नव्हे) स्वधर्मापासून दूर होतात. -पण धर्माला चिटकून असणारे धर्माचा त्यांचा अभ्यास चुकल्याने भावनेच्या आहारी अथवा सैतानाने भटकवल्यामुळे भरकटले असा दावा करतात २.२) नास्तिकता जाहीर केलेल्यांचा बहुतेकांचा लढा घरातूनच चालू होतो काही परिवारात चक्क भानामती दूर करण्याचे अघोरी प्रयोग नास्तिकांवर केले जातात किंवा घरातीलच लोक त्यांना मारतात तेही जमले नाही तर सुपार्‍याही देतात २.३) एक तर वाच्यता करू नये केली तर त्यामुळे लढा न देता दूर रहाण्याचा पर्याय यातील बहुतेकांपुढे नसतोच -म्हणजे केवळ धर्म सोडतो असे म्हणून चालतच नाही धर्माशी लढा त्याम्च्यावर लादला जातोच वरून तुम्ही आमच्याशी का लढता असा आरोप करत त्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभेकरण्याचा उलटा प्रकार होताना दिसतो (मी माझ्या मनाचे लिहित नाहीए अनेक नास्तिकांच्या सोशल मिडिया मुलाखती आणि चर्चा ऐकुन वाचून मांडतो आहे.)

कुमार१'s picture

23 Mar 2019 - 1:55 pm | कुमार१

शुभेच्छांचा स्वीकार
आणि तुम्हालाही !

माहितगार's picture

23 Mar 2019 - 2:20 pm | माहितगार

अनेक आभार

रविकिरण फडके's picture

23 Mar 2019 - 2:53 pm | रविकिरण फडके

हे शांततेच्या धर्माचे काय प्रकरण आहे? तुम्हाला इस्लाम म्हणायचे असेल तर तसा स्पष्ट उल्लेख करा. (आणि तो तसा तुम्ही केलाही आहे.)

आणि राग मानणार नसाल तर एक विंनंती, तुम्हाला आणि लिहिणाऱ्या सगळ्यांनाच: कृपा करून लिहिलेले तपासून, सुधारून, मगच प्रकाशित करा. चुका राहिल्या की वाचताना त्रास होतो. उदा. 'आत्मपरीक्षणाचीसंधी' (आत्मपरीक्षणाची संधी), किंवा 'जमल्याबघावे' (जमल्यास बघावे), मुस्लविसमाज (?), इ.

असले प्रतिसाद / प्रतिसादके ५७ च्या पुढे केव्हा गेले किती विस्मरणात जमा झाले यांची मोजदाद अस्मादिकांनी केव्हाच सोडली हे माझ्या बहुतेक वाचकांना ठाऊक आहेच. तथाकथित शुद्धलेखनाच्या मक्तेदारांनी खालील चित्राप्रमाणे पाय वर करून दाखवले तरी आम्ही वाटाण्याच्याच अक्षता आज तागायत लावल्या त्याच आपणासही सप्रेम सादर.

आम्ही आमच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या सिद्धहस्त भूमिकेवरही ठाम असतो त्यामुळे आपला पहिला प्रश्नही निरर्थक असल्याचे वेगळे सांगणे न लगे

shirshasan

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Mar 2019 - 2:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणि आपणासही शुभेच्छा देतो, आपण नास्तिकच आहात पण मित्र काय म्हणतील म्हणून तुम्हाला थेट भूमिका घेता येत नाही.
अशी अनेकांची अडचण होते, असे वाटते. ( पळा)

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

24 Mar 2019 - 5:37 pm | माहितगार

तुमच्या शुभेच्छा स्विकारू शकण्या इतपत उघड नास्तिक सदैव होतोच. (आणि तेही इतपत तर्कशुद्धपणे की शुद्धलेखन पुस्तिकांचीही श्रद्धेय पुजा बांधत नाही व्यवस्थीत उधळून लावतो. - ... - भाषाशास्त्र तज्ञ,मंडळी कधी शुद्धलेखनाच्या नियमांची श्रद्धेय पुजा बांधणे व्यर्थ आहे हे सर्वासमक्ष कबूल करुन दाखवणार ?) - नास्तिकता कशी मूळातून हवी माझ्या घरात नेहमीच सुधारणावादाला पुरेशी जागा असल्याने -आस्तिक आणि नास्तिक दोन्ही सोबत बालपणापासून उठबस झाल्याने आणि समवयस्कांत वाचन आणि तर्क प्राविण्य पुरेसे प्रबळ असल्याने अशी काही अडचण असण्याचा अस्मादिकांच्या बाबतीत प्रश्न नव्हता. अध्यात्म श्रवण वाचनाचा व्यासंगाचे सातत्य ठेऊनही वयाची १० ते २३ हा काळ कोणत्याही देवाला नमस्कारही केला नाही हे घरी प्रत्येकास ठाऊक होते. हिंदू विचारधारेचा आवाक्याबद्दल माझे आकलन व्यवस्थित समतोल असताना मला कुणाला घाबरण्याची काळजी नव्हती आणि नाही असे वाटते.

आपण म्हणता तशी इतर कुणची अडचण असेल तर सहानुभूती असेल. प्रतिसादासाठी अनेक आभार

चौकटराजा's picture

25 Mar 2019 - 6:41 pm | चौकटराजा

लहानपणी पुस्तकात १ मार्कासाठी प्रश्न असे ...... नस्तिक म्हणजे कोण ? .. जो देवचे अस्तित्व मान्य करीत नाही तो .. असे उत्तर दिले की १ मार्क मिळायचा .
पुढे असे ही वाचनात आले की ज्याचा ठोस पुरावा स्वतः ला लाभलेला नाही त्या प्रत्येक गोष्टीचे अस्तित्व काल्पनिक आहे असे समजणारा .मी पहिल्या व्याख्ये त काहीसा बसतो तो असा की मी असे म्हणतो की जरी मानवाच्या ताब्या बाहेरची म्हन्जे त्याच्याशी द्वैत दाखविणारी कोणी महाशक्ती असेल व तिला देव मानले जात असेल तर ती माणसाच्या कोणत्याही आवाहनाला प्रतिसाद द्यायला बान्धील नाही . त्या अर्थाने मी नास्तिक आहे . सबब धन्यवाद !

माहितगार's picture

25 Mar 2019 - 9:49 pm | माहितगार

माझि व्यक्तिगत ढोबळ (जराशी क्लिष्ट) व्याख्या,

नास्तिक म्हणजे, स्वतःच्या किंवा इतरांच्या कोणत्याही बाबतीतील श्रद्धा डोळे झाकून न स्विकारण्याबाबत जागरूक राहून सुयोग्य प्प्रश्न उपस्थित करूनही उत्तर समाधारकारक वाटले नाही किंवा उत्तरच मिळाले नाही हे लक्षात घेतलेली व्यक्ती

माहितगार's picture

23 Mar 2020 - 11:37 am | माहितगार

नास्तिकता दिवस २०२०च्या शुभेच्छा.