मंडळी
पहिलेच सांगतो की हा लेख जरासा विस्कळीत होणार आहे. समजुन घ्याल अशी अपेक्षा.
तबला शिकायला लागल्यापासुन अनेक गाणी मनात रुंजी घालत असतात, मनात विविध प्रश्न येत असतात आणि मग कधीतरी युरेका!! असा क्षण येउन त्यांची उत्तरे मिळत असतात. वेगवेगळे कायदे, ताल,मुखडे,रेले, लग्ग्या, तिहाई, उठान शिकता शिकता मी पुर्वीपासुनच ऐकत असलेली गाणी जणु पुन्हा नव्याने ऐकायला लागलो आणि एकेका संगीतकाराने, गायकाने, वादकाने काय कमाल केली आहे असे वाटुन विस्मयचकीत होउ लागलो.
जसे जसे एकेक ताल शिकत गेलो तसे तसे त्या तालांवर बेतलेली गाणी ऐकायचा छंदच लागला किंवा गाणी ऐकुन ताल ओळखायचा छंद लागला म्हणा.
आता एक धुमाळी ठेकाच घ्या. साधा धुमाळी ८ मात्रांचा
"धिन धिन | धाधा तिन|तिरकिट धिन| धागे तिरकिट" ---ह्या ८ मात्रा वेगवेगळ्या गाण्यात किती वेगवेगळ्या रुपाने आपल्या समोर येतात पहा.
बर्याच नाटकांमध्ये "पंचतुंड नर रुंड मालधर" ही नांदी गायली जाते. त्यात हा धिन धिन| धा तिन| त्रक धिन |धागे त्रक बनुन जातो तर "राजसा जवळी जरा बसा" या शृंगारीक लावणीत कत धिन| धा तिन| त्रक धिन |धागे त्रक बनतो. तेच जेव्हा नारदीय किर्तनात जय जय राsssssम कृष्ण हाsssहारी असा लांबलचक सुर लावतात तेव्हा हाच धुमाळी ईतका विलंबित होतो कि तो धुमाळी ठेका आहे असे समजुन घ्यावे लागते.
"धा गे न ती न क धिन " बोल असलेला ८ मात्रांचा केरवा हा तर हिंदी संगीतात चावुन चोथा झालेला ताल. गाईड मधले "काटो से खिंच के ये आंचल" असो कि सलमानचे "तेरे मस्त मस्त दो नैन" सारखे तद्दन बाजारु गाणे, याचे व्हेरिएशन्स सर्वत्र दिसतात. पण इतक्या पद्धतीने वाजवता येणारा आणि वेगवेगळ्या मुडच्या गाण्यांना कवेत घेणारा हा ताल आगळाच. कधी "धाधाधा ती |ता धाधाती" तर कधी "धा तिन नाना| ता तिन नाना" बनुन तो बटाट्याप्रमाणे कुठल्याही भाजीत सामावुन जातो.
"तिन तिन ना धिन ना धिन ना" बोल असलेला ७ मात्रांचा रुपक हा ही एक भन्नाट ताल. गाईडमधले "पिया तोसे नैना लागे" हे रुपक मधले एक अप्रतिम गाणे. फार कमी लोकांना माहित असेल की संतुरवादक शिवकुमार शर्मा यांनी यात तबला वाजवला आहे. मराठीत " आशा भोसले यांचे चांदणे शिंपीत जाशी" हे सुद्धा रुपकचे असेच अप्रतिम गीत. तसेच "जय शारदे वागीश्वरी" हे ऋतु हिरवा मधील गाणे. पण ईथे रुपक जुळत असला तरी त्याऐवजी "धाधिन्ना तिटकत गदीगन" वाला "तेवरा " ताल वाजवला आहे.
जाता जाता पं. सामताप्रसाद हे संगीतकार आर. डी. बर्मन यांचे गुरु. शोले मधील घोडेस्वारी पाठी वाजणारा " धिर धिर किटतक" त्यांचाच.
"तिरकिट तक ता" ह्याचीफोड करुन जे तिरकीट किटतक आणि तिटकत बनतात त्यांनी माझा बराच गोंधळ केलाउडवला होता.
लहानपणापासुन आपण सगळे आरत्या म्हणत आलोय. पण ह्या सगळ्या आरत्या "दादरा" तालावर बेतल्या आहेत हे मला फार उशिरा कळले. मग ती सुखकर्ता दुखःहर्ता असो कि अजुन कोणती आरती. पण भा.रा. तांब्यांचे अप्रतिम "तिन्हि सांजा सखे मिळाल्या" सुद्धा दादरावरच बांधले आहे. ह्याचे लता मंगेशकरांनी गायलेले बंगाली व्हर्जनसुधा खास ऐकण्यासारखे .
बारा मात्रांचा चौताल "धाधा धिनता तीटधा धिनता तिटकत गदीगन" म्हणजे लताबाईंचे गगन सदन तेजोमय हे डोक्यात एकदम फिट बसले आहे.
शेवटी अनेक गाणी अभंग आणि भजने यांना जुळणारा भजनी ठेका "धिन्ना धिन धिना तिन्ना धिन धिना" याबद्दल मी काय सांगणार? भीमसेनजींचे "माझे माहेर पंढरी" "तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल " किंवा लताबाईंचे "अवचिता परिमळु" नुसते सुरु झाले की समाधी चा आनंद मिळवुन देणारा हा ठेका.
असो. मी काही यातला उस्ताद नव्हे , पण विद्यार्थी जरुर आहे. आणि तसेही भारतीय संगीतातील अशी एकेक विद्या अवगत करायला एक जन्म पुरेसा नाहिच. त्यामुळे ईथेच थांबतो. अभिप्राय जरुर कळवा.
वाचने
39261
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह! सध्याच्या मिपा
ताइ क्षमा करा पण हे वाक्य
In reply to वाह! सध्याच्या मिपा by यशोधरा
छे, राग नाही, हे धागेही छानच
In reply to ताइ क्षमा करा पण हे वाक्य by आनन्दा
मस्तं लेख ! अजून विस्ताराने
मस्त.
माझ्या माहितीप्रमाणे
In reply to मस्त. by मराठी_माणूस
ते गाणे
In reply to माझ्या माहितीप्रमाणे by राजेंद्र मेहेंदळे
वाह झकास लेख!
नाहि हो सोन्याभाउ
In reply to वाह झकास लेख! by सोन्या बागलाणकर
छान माहिती.
फारच छान लेख.
मृदुंगाचे ठेके
In reply to फारच छान लेख. by विजुभाऊ
मस्त लेख आवडत्या वाद्यावरचा लेख अतिशय आवडला
नुसता तबला (गाण्याशिवाय)
In reply to मस्त लेख आवडत्या वाद्यावरचा लेख अतिशय आवडला by ज्ञानोबाचे पैजार
मला पेटीसारखी स्वरवाद्ये
माझा एक भाउ सरळ एक अॅप
In reply to मला पेटीसारखी स्वरवाद्ये by विजुभाऊ
ताल आत्मसात करण्यासाठी .....
In reply to मला पेटीसारखी स्वरवाद्ये by विजुभाऊ
लेख आवडला.
वा! सुरेख प्रतिसाद!
In reply to लेख आवडला. by प्रदीप
'पाकिझा' मध्ये....
In reply to लेख आवडला. by प्रदीप
माझ्या वरील प्रतिसादातील चुकीची दुरुस्ती..
In reply to 'पाकिझा' मध्ये.... by विनोद१८
वा , छप्पर उडवणारा प्रतिसाद!
In reply to लेख आवडला. by प्रदीप
अप्रतिम
In reply to लेख आवडला. by प्रदीप
वाह
In reply to लेख आवडला. by प्रदीप
वा प्रदीपसर
In reply to लेख आवडला. by प्रदीप
तसे काही नाही!
In reply to वा प्रदीपसर by राजेंद्र मेहेंदळे
संग्राह्य
In reply to लेख आवडला. by प्रदीप
लताबाई
In reply to संग्राह्य by नंदन
अजून
In reply to लेख आवडला. by प्रदीप
हे गाणे ......
In reply to अजून by प्रदीप
??
In reply to हे गाणे ...... by विनोद१८
अवांतर
In reply to लेख आवडला. by प्रदीप
हा प्रदीप यांना प्रतिसाद होता
In reply to अवांतर by राजेंद्र मेहेंदळे
माहितीबद्दल धन्यवाद
In reply to हा प्रदीप यांना प्रतिसाद होता by राजेंद्र मेहेंदळे
मलमली तारूण्य
In reply to माहितीबद्दल धन्यवाद by प्रदीप
सुधीर फडके व ...
In reply to मलमली तारूण्य by प्रदीप
अप्रतिम लेख
'बगळ्यांची माळ फुले' चा ताल कोणता ??
In reply to अप्रतिम लेख by स्वधर्म
धन्यवाद विनोद
In reply to 'बगळ्यांची माळ फुले' चा ताल कोणता ?? by विनोद१८
जाता जाता, स्वतः डॉक्टर
In reply to अप्रतिम लेख by स्वधर्म
मस्तच
धन्यवाद अभ्या
In reply to मस्तच by अभ्या..
आणकाही गंमत ..
सावर रे
अगदी बरोबर
In reply to सावर रे by पुष्कर
चौराकाका, पुष्कर मस्तच लिहिले
अय्यो रामा
ताल व कीबोर्ड संबंध ई .
उत्सव या चित्रपटातील" मेरे
लेख अन प्रतिसाद वाचून
मस्त चर्चा आणि लेख
धन्यवाद
In reply to मस्त चर्चा आणि लेख by nanaba
१० मे- पं.शिवकुमार शर्मा यांचे निधन