Skip to main content

माझे घर

लेखक जागु यांनी मंगळवार, 17/03/2009 12:09 या दिवशी प्रकाशित केले.

मझ्या घराचा तुम्हा काय सांगू थाट ?
रुबाबदार रस्त्यातून एक डौलदार पायवाट!

स्वागता असे उभी जाई जुई ची कमान
वृंदावनातील तुळशीला असे मोठा मान

भवतालीचा बगीचा पशू पक्षांना आसरा
कुंपण सभोवती करी काटेरी पहारा

दारासमोरील प्राजक्ताचे निर्मळ असे मन
विहीरीतील गोड पाणी भागवीते तहान.

टांगता कोहाळ दूर ठेवी अरिष्ठ
काळी सान बाहुली काढी घराची दृष्ट.

ओटीवरला झोपाळा झुलतो झोकात
उंबरठ्यावर लक्ष्मी, पावलांच्या रुपात.

घरात नाद घुमतो दुडदुडणार्‍या पैजणांचा
माझ्या बाळाच्या बोबड्या ओठांचाही चाळा.

थोरा-लहानांची माया जसे माठातले पाणी
एकत्र कुटुंबाचे, घर कौतूके गातो गाणी.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4245
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

सुंदर कविता... साधी सोपी भाषा....

दारासमोरील प्राजक्ताचे निर्मळ असे मन
विहीरीतील गोड पाणी भागवीते तहान.

हे मस्तच...


आयला बेष्ट....
माझा बार साठी एकदम झकास कच्चामाल आहे... लोकहो लागा कामाला
(
धारी)
प्रो.आंबोळी


सुंदर कविता...

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.


मस्त कविता. "खेड्यामधले घर कौलारू" डोळ्यांपुढे आले. खूप खूप आवडली.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}


मदनबाण, सँडी, सहज, क्रांती, प्राजू, लवंगी, जृभणश्वान तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.