Skip to main content

तुझ्या दु:खाविना

लेखक शिवापा यांनी बुधवार, 18/03/2009 05:47 या दिवशी प्रकाशित केले.
अजुन किती वेळ जाईल? तुझी आठवण कुठपर्यंत राहिल? तु गेलायेस पण आठवण छळतेय तुझ्या सांवल्यात मी अजुन चालतेय कुठलाच विचार येत नाहि तुझ्या दु:खाविना अवचित वाजलेला फोन काळजाचे ठोके चुकवतो गर्दीतला प्रत्येक चेहरा तुझाच भासतो प्रत्येक रात्री वाट पहात रहाते झोपेची झोपही येत नाहि तुझ्या दु:खाविना जाग आल्यावर हात तुझ्या स्पर्शासाठी आसुसतो तु नसल्याची आठवण झाल्यावर एकदम बावरतो कधितरी थांबेलच हे सर्व दु:खांचे हेहि संपेल पर्व आयुष्याच्या पटलावर पुढे सरकतांना आठवणीची सारी भुते जळतांना हसणे तेव्हढेसे कठिण रहाणार नाहि अवेळी अश्रुही तरळणार नाहि तुझी आठवण तेव्हांहि येईल पण तुझ्या दु:खाविना

वाचने 1800
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

प्रेमकाव्य छान आहे. :) अवांतर - राजे यांच्याकडे शिकवणी लावली असेल का ह्यांनी.. :?

In reply to by शितल

नाहि लावली. म्हणजे गेला होतो खरा पण प्रवेश नाहि मिळाला. त्यात ते कुठल्याश्या तबकड्यांवर काहितरी सिरियस लिवायच्या मागे आहेत.

In reply to by शितल

>>मग तुमचे नशिब थोर आहे. =)) =)) =)) सह्ही!!! उत्तम प्रेमकाव्य !!! येउ देत अजुनही !!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..