Skip to main content

हमसे तो छूटी महफ़िलें…

लेखक मनिष यांनी मंगळवार, 26/02/2019 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
Lonely Journey काव्य, शास्त्र, विनोदाने दरवळणार्‍या मैफिलीत हुरळून आपण सामिल होतो. संवादासाठी, मैत्रीसाठी आसुसलेले आपण चार दोस्तांच्या सहवासात हरखून जातो. मैफिलीतल्या अनवट कविता, एखादी नेमकी दाद, तिथली व्यासंगी चर्चा, आणि मनसोक्त गप्पा. अशा हव्याहव्याशा वातावरणात आपणच नकोसे आहोत, हे अवचितच झालेले दंशभान…. शरीरात एखादे विष पसरत जावे तसा पसरत जाणारा तुटकपणा. आपल्याच हाताने तोडून सर्व पाश खुलाशाचाही न करता अट्टहास, पुन्हा एकदा मौन प्रवास. एकट्याचा…. कधीही न परतण्यासाठी. ~ मनिष
लेखनविषय:

वाचने 6106
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

फोटो/इमेज आंतरजालावरुन घेतला आहे, खूप ठिकाणी वापरल्यामुळे नेमके श्रेय कुणाला द्यायचे ते कळत नाही, पण हा फोटो माझा नाही हे नमूद करतो.

ऐसा मायुस नही होनेकारे बाबा.. फटाकसे एक डू आयडी बनानेका और मैफिलमे वापस घूस जानेका, दो देनेका दो लेनेका हिसाब बराबर हाय काय अन नाय काय पैजारबुवा,

ओ मनीषसेठ... आपणच नकोसे आहोत, हे अवचितच झालेले दंशभान…. असं काही नसतं. सगळेच सर्वांना हवे असतात. लिखते रहो. :) -दिलीप बिरुटे

हम हस दीए हम चूप रहे मंजूर था चर्चा तेरा... छान आहे

आवडले. फोटोही चपखल! बाकी मित्रांची मैफल हरवणं म्हणजे काय ते सांगायला हवं काय.. त्रास त्रास म्हणतात तो हाच.. असो. अवांतरः राजकारणाच्या भाऊगर्दीत असं काही वाचून जरा गार वाटतं. :-)

ओ भाव असा का करुन राह्यलाय. या जरा कट्टे करुया झकास. एकदम झ्ह्याक हुईल तब्येत तुमची