Skip to main content

[शशक' १९] - गैरसमज

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 12/02/2019 या दिवशी प्रकाशित केले.
"प्रत्येकवेळी काही झालं तरी मीच...." तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच तो कडाडला. "काय मी मी लावलंय सारखं.मी हे केलं मी ते केलं. मला जसं जमतय तसं मी करतोय. कधी कसलीच तक्रार करत नाही तुझ्याकडे. तु म्हणालीस म्हणुन चाललोय ना मुलीच्या शाळेत मिटींगला. ऑफिस मद्धे कामाचे डोंगर पडलेत त्याचं आधीच टेन्शन आलंय तरी काही बोललो का ? उतर ईथेच" असं म्हणून त्याने कारचा दरवाजा उघडुन तिला खाली उतरवलं. "प्रत्येकवेळी काही झालं तरी मीच सॉरी म्हणायचं. चुक कोणाचीही असो" तिने मनातल्या मनात मघाचे वाक्य पूर्ण केले.आता त्याचा राग कसा घालवायचा असा विचार करत, तिच्या कामांचा ढीग पूर्ण करायला ती ऑफिसमद्धे निघाली.

वाचने 6072
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

चांगली सांगितलीये

+१

+१ आवडली कथा व पुं ची " घर हरवलेली माणसे " आठवली

पटली

+१

आवडली, घरोघरी मातीच्या चुली (पक्षी शेगड्या) ...... नाखु पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर

आवडली

+१ नाट्यमय कलाटणीपेक्षा वेगळी अशी घरोघरीची कथा आवडली.

गोष्ट आवडली पैजारबुवा,

+१


+१

+१

+१