"प्रत्येकवेळी काही झालं तरी मीच...."
तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच तो कडाडला.
"काय मी मी लावलंय सारखं.मी हे केलं मी ते केलं.
मला जसं जमतय तसं मी करतोय. कधी कसलीच तक्रार करत नाही तुझ्याकडे.
तु म्हणालीस म्हणुन चाललोय ना मुलीच्या शाळेत मिटींगला. ऑफिस मद्धे कामाचे डोंगर पडलेत त्याचं आधीच टेन्शन आलंय तरी काही बोललो का ?
उतर ईथेच" असं म्हणून त्याने कारचा दरवाजा उघडुन तिला खाली उतरवलं.
"प्रत्येकवेळी काही झालं तरी मीच सॉरी म्हणायचं. चुक कोणाचीही असो" तिने मनातल्या मनात मघाचे वाक्य पूर्ण केले.आता त्याचा राग कसा घालवायचा असा विचार करत, तिच्या कामांचा ढीग पूर्ण करायला ती ऑफिसमद्धे निघाली.
वाचने
6072
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
काय सांगायचं आहे
+१
ह्यालाच म्हणातात...उलट्या
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
१
+१
+१
+१
शशक स्पर्धेसठी केवळ +१ मतांची