Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सत्य धर्म on Fri, 02/15/2019 - 20:25
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
पुलवामा CRPF जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निमित्ताने... काल 14 फेब्रुवारीला काश्मीर मध्ये पुलवामा येथे शहीद झालेल्या भारत मातेच्या सर्व वीर सुपुत्रांना त्रिवार सलाम. या हल्ल्याला येणाऱ्या काळात आपली तिने सैन्यदले कृतीतून योग्य उत्तर देतीलच हे सर्व चालू घडामोडी वरून सांगता येते. या हिंदुस्तानचा एक सजग आणि जबाबदार हिंदू नागरिक म्हणून माझ्या बौद्धिक कुवतीप्रमाणे या भ्याड हल्याचा अन्वयार्थ लावण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही जर कोणाला असे वाटत असेल तर त्यांनी या पुढे वाचू नका. आपल्या अखंड हिंदुस्थानावर परक्यांचे हल्ले होने ही तशी नवीन बाब नाही. हजारो वर्षांपासून आपल्या देशाने कित्येक आक्रमणे पाहिली आणि परतवूनसुद्धा लावली पण हे करत असताना आपल्या संपन्न आणि पवित्र भूमीचे कित्येक तुकडे पडले पाकिस्तान आणि बांगलादेश ही त्याची काही उदाहरणे आहेत. या हल्ल्यामागची विचारधार जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता हजारो वर्षे पाठीमागे जाऊन इतिहासाची पाने चाळावी लागतील. मुस्लिम धर्माच्या स्थापनेपासूनच ही आक्रमणे आपल्यावर होत आहेत. इतिहासाचा खोलात संदर्भ न घेता फक्त उदाहरण सांगायचे झाले तर गझनीचा मेहमूद, मोहम्मद घोरी, अलाउद्दीन खिलजी,बाबर, औरंगजेब यांनी केलेले हल्ले सर्वश्रुत आहेत हे सर्व हल्ले आणि त्यामागची विचारधारा हि स्फटिकाप्रमाणे साफ आहे हे सर्व हल्ले हिंदुस्तानी लोकांची संपत्ती लुटण्यासाठी आणि धर्म थोपवण्यासाठी झालेले होते त्या त्या काळच्या राजकारण्यांचे यश किंवा अपयश म्हणा पण हे सर्व हल्लेखोर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले. आताचा पाकिस्तान आणि बांगलादेश ही त्याची निष्पत्ती म्हणावी लागेल. अपवाद फक्त शिवाजी महाराजांचा होता ज्यामुळे हिंदू, हिंदुस्थान आणि हिंदुत्व टिकले आणि तरले जर शिवाजी महाराज नसते तर सद्यस्थितीत हिंदुस्थानाचे चित्र काहीतरी वेगळेच असते थोड्या विषयांतराबद्दल माफी. सदर हल्ल्याचा अन्वयार्थ माझ्यामते तरी वरील विषयास अनुसरून होतो थोड समजवून घ्यायचे झाले तर ते पुढीलप्रमाणे होईल मुद्दा नंबर १ - मुस्लिमांना फक्त मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र हवे होते ते 1947 मध्ये दिले आताचा बांगलादेश (पूर्व पाकिस्तान) आणि पाकिस्तान हा त्यांना धर्मावर आधारित दिला त्यांनी तात्काळ धर्मावर आधारित देश अशी मान्यता बनवून हिंदूंचा मोठ्या प्रमाणावर नरसंहार घडवून आणला. अजून सुद्धा तिथे राहिलेली हिंदूंची मंदिरे तोडणे असले प्रकार चालू आहेत. याच गोष्टी शांतिदुताकडून जगभर चालु आहेत. यामागची विचारधारा काय असेल? मुद्दा नंबर २ - त्यांना हवी ती आर्थिक मदत त्या काळानुसार दिली गेली त्यानंतर पण त्यानि आपल्यासोबत युद्ध केलेच. हे सर्व फक्त आपली जमीन बळकावण्यासाठी नव्हते हे निश्चित. यामागची विचारधारा हा शोधाचा विषय होऊ शकतो. मुद्दा नंबर 3 - पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र असल्यामुळे हिंदूंची मोठ्या प्रमाणात कत्तल आणि नरसंहार त्यांनी घडवून आणला प्रार्थनास्थळे नष्ट केली यामुळे आत्ता पाकिस्थान मध्ये हिंदू धर्मीय नगण्य राहिले आहेत आणि काही भारताच्या आश्रयाला येत आहेत. तिथं असणाऱ्या स्थानिक संघटनांना तिथे असणारे सरकार आणि ISI हे पाठिंबाच देत आले आहेत. यामधून त्याची विचारधारा स्पष्ट होते. मुद्दा नंबर ४ - हिंदुस्तान हे सर्वसमावेशक राष्ट्र असल्यामुळे आपल्या इथे आपण सर्व धर्माना सामावून घेतले परंतु काही लोकांचे लांगुलचालन केल्यामुळे देशसोबत गद्दारी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. याचाच नमुना आपण मागील काही वर्षात देशविरोधी घोषनांमधून पहिला आहे. काही राजकारणी लोक याना सपोर्ट करतात त्यामुळे आजची घटना घडण्यापर्यंत मजल गेली. मुद्दा नंबर ५ - राज्यघटनेनुसार प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार आहे सर्व सोयी सवलती सुविधा या सर्वांना जवळपास सारखेच आहेत असे असताना फक्त मुस्लिमच टोकाचा कट्टरतावाद का जोपासतात हिंदुस्थानातील कित्येक मुस्लिम भारत भूमीला वंदन करणे तिरंग्याला वंदन करणे या गोष्टीला विरोध करतात काश्मिरी पंडितांना हुसकावून लावताना काय घडले हे पूर्ण हिंदुस्थानाला माहित आहे. हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा यांवर वेळोवेळी बदल करण्यात आला, विरोध झाला असला तरी कालांतराने सर्व समाजाने याला मान्यता दिली. मुस्लिम धर्मामध्ये मुस्लीम विचारवंत धर्म संशोधनासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत त्याचाच परिपाक म्हणून कुठल्याही संघटनेच्या नादी लागून आतंकवादी तयार होतात आणि हिंदुस्थानच्या सार्वभोमत्वाच्या विरुद्ध युद्ध पुकारण्यात धन्यता मानतात. मुद्दा नंबर ६ - हिंदू दहशतवादाबद्दल बोलले की अल्पसंख्याकांची मते मिळतात यासाठी हे राजकारणी मुस्लिम दहशतवादाकडे सोईस्कर डोळेझाक करतात. कालचा हल्ला हा याचाच परिपाक नसेल? मुस्लिम दहशतवादाकडे सोईस्कर डोळेझाक करतात. कालचा हल्ला हा याचाच परिपाक नसेल? मुस्लिम दहशतवाद जगासाठी सर्वश्रुत असताना यावर बोलताना कोणीही दिसत नाही याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. माझ्या मते तर हा हिंदुस्थानच्या सर्वभोमत्वावर झालेला हल्ला आहे. या हल्ल्यामध्ये असणारी विचारधारा ही सैन्याला मारण्याच्या पलीकडची आहे कदाचित त्यांना हिंदूंनाच मारायचं आणि हिंदुस्थान ताब्यात घ्यायचा आहे अस ही असू शकत म्हणून तर हे आतंकवादी मृत्यूनंतर जन्नत ची वाट पाहतात आणि मृत्यूला सामोरे जातात. याचा इतिहाससुद्धा खूप मोठा आहे आणि हिंदुस्थानला त्रास देने हा एकच हेतू यामागे असू शकत नाही, यामधून आपण इतिहासाची पार्श्वभूमी अभ्यासन्याची गरज आहे अन्यथा असे कितीतरी हल्ले या मातृभूमीवर होतच राहतील आणि निष्पाप हिंदूंचे आणि आपल्या सैन्याचे बळी जात राहतील. मुस्लिम विचारधारेचा उत्तरे देण्याचा प्रयत्न आपल्यातील विचारवंतांनी वेळोवेळी केला आहे परंतु त्यांचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचले नाहीत अशा हल्ल्यांपासून आपण वेळीच सावध झालो नाही तर बाहेरील देश आणि देशातील गद्दार आपल्या डोळ्यादेखत या मातृभूमीचे तुकडे पाडतील. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर पुढील पिढीला आपण कोणत्या नरक यातनेत सोडू याची कल्पनाही करवत नाही. आपण सर्व सुज्ञ आहात याचा आपण आपल्या परीने अन्वयार्थ लावालआणि शोध घ्याल ही अपेक्षा. आपला सत्य धर्म
  • Log in or register to post comments
  • 32389 views

प्रतिक्रिया

Submitted by आजानुकर्ण on Fri, 02/22/2019 - 02:31

In reply to फक्त पाकिस्तान नाहि... by अर्धवटराव

Permalink

हा हा

नाही तर काय! तिकडे उत्तर - दक्षिण अमेरिकेत स्थानिक संस्कृती आणि मूलनिवासींची संपूर्ण कत्तल करणार्‍या युरोपियनांबद्दल कळवळा येऊन हे ढसाढसा रडताहेत. दादाभाई नौरोजी, आंबेडकरांपासून अगदी शशी थरूर पर्यंत लोकांनी पुरावे देऊन भारताला कुणी सुटलंय हे सिद्ध करुनही आता वीसेक पिढ्या भारतात जन्मून तिथेच मेलेल्या टिपू, औरंगजेबादी मंडळींनी 'हिंदुस्तानावर हल्ले करुन संपत्ती लुटून नेली' असे हास्यास्पद आक्षेप घेताहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Fri, 02/22/2019 - 23:02

In reply to हा हा by आजानुकर्ण

Permalink

किती गोंधळ

इथे मात्र तुम्ही म्हणताय "मग औरंगजेबानं तेव्हा जे केलं त्याला समस्त हिंदू समाजावरील अत्याचार मानून आता ऊर बडवण्यात काहीही अर्थ नाही ." आणि या प्रतिसादात मात्र "तिकडे उत्तर - दक्षिण अमेरिकेत स्थानिक संस्कृती आणि मूलनिवासींची संपूर्ण कत्तल करणार्‍या युरोपियनांबद्दल कळवळा येऊन हे ढसाढसा रडताहेत." दोन्हीकडे सामान न्याय का नको? बरं काही शतकांपूर्वी मुस्लिम आक्रमकांनी हिंदुस्थानवर केलेल्या अत्याचाराचं तुम्ही समर्थन करताय मग त्याच न्यायाने युरोपियनांनी उत्तर - दक्षिण अमेरिकेत स्थानिक लोकांवर केले. उत्तर - दक्षिण अमेरिकेत स्थानिक मुसलमान नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे, युरोपियनांनी काही शतकापूर्वी जे केलं ते केलं पण आताचे युरोपियन असं काही करत आहेत का? मुसलमानांची काही शतकांपूर्वी असेच अत्याचार जिथे गेले तिथे केले. पण आताही ते थांबत नाहीयेत ना, हा मुद्दा आहे. तुमच्या लक्षात येईल असे काही वाटत नाही, पण इतर वाचकांना कदाचित फायदा झाला तर... वीसेक पिढ्या भारतात जन्मून तिथेच मेलेल्या टिपू, औरंगजेबादी मंडळींनी 'हिंदुस्तानावर हल्ले करुन संपत्ती लुटून नेली' असे हास्यास्पद आक्षेप घेताहेत. वीसेक पिढ्या? टिपू, औरंगजेबादी कोणाच्या वीसेक पिढ्या भारतात होत्या? जरा आमच्या ज्ञानात भर पडेल. माझं मत विचारलं तर बाहेरून आक्रमण करून लुटणाऱ्यांपेक्षाही जिथे जन्मलो तिथल्याच लोकांवर अत्याचार करणारे जास्त दोषी आहेत. संपत्ती लुटून नेली म्हणजे तुमच्या पुढच्या गल्लीत राहणाऱ्या चोरांनी तुम्हाला लुटून संपत्ती त्यांच्या घरात नेली तर तुम्ही काय म्हणणार? बाकी सोयीस्कर नावे घेतलीत हे नमूद करतो. कारण घोरी, गझनी वगैरेंचा उल्लेख नाही केलात. तसेच टिपूबद्दल बोलताय तर तुम्हाला विजयनगर साम्राज्य, वाडियार वगैरे माहिती आहेत का हो? बादवे, तुम्हाला टिपू जयंती साजऱ्या करणाऱ्या कर्नाटकात विजयनगर व वाडियार साम्राज्यातील कोणत्या राजाची जयंती अथवा त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही सण साजरा करतात असं आठवतंय का हो?
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sat, 02/23/2019 - 05:06

In reply to किती गोंधळ by ट्रेड मार्क

Permalink

क्लिष्ट वाक्यरचना

दोन्हीकडे सामान न्याय का नको?
क्लिष्ट वाक्यरचनेमुळे तुम्हाला समजायला अडचण येत आहे त्यामुळे सोप्या भाषेत लिहितो. औरंगजेबाने ज्या मंदिरांवर हल्ले केले त्या मंदिरांमध्ये बहुसंख्य (हिंदू मानल्या गेलेल्या) लोकांना प्रवेशच नव्हता. त्यामुळं तो हल्ला हिंदूंवर आहे असे मानता येत नाही. याउलट उत्तर-दक्षिण अमेरिकेत युरोपियनांनी संपूर्ण मूलनिवासींची कत्तल केली आहे. केवळ 200 वर्षाच्या युरोपीय राजवटीनंतर उत्तर-दक्षिण अमेरिकेत आता तोंडी लावण्यापुरते मूलनिवासी आढळतात, याउलट भारतीय उपखंडात 700 वर्षे मुस्लीम राज्य असूनही हिंदू बहुसंख्य आहेत. ज्या औरंगजेब-टिपूंनी 'भारतावर हल्ले करुन भारताला लुटले' त्यांनी ती लुटलेली संपत्ती त्याच देशात इन्वेस्ट केली, याउलट तुम्हाला पुळका असलेल्या युरोपियनांनी भारताला संपूर्ण धुवून नेल्याचे सविस्तर पुरावे आता उपलब्ध आहेत.
बरं काही शतकांपूर्वी मुस्लिम आक्रमकांनी हिंदुस्थानवर केलेल्या अत्याचाराचं तुम्ही समर्थन करताय मग त्याच न्यायाने युरोपियनांनी उत्तर - दक्षिण अमेरिकेत स्थानिक लोकांवर केले. उत्तर - दक्षिण अमेरिकेत स्थानिक मुसलमान नव्हते.
समर्थन? काहीही थापा मारु नका. मी अत्याचाराचं कुठं समर्थन करतोय. किती खोटं बोलाल. तुम्ही जी अत्याचाराची उदाहरणं देताय, आणि मुद्दाम थापा मारताय ते फक्त कसं चुकीचं आहे हे फक्त मी दाखवतोय.
वीसेक पिढ्या? टिपू, औरंगजेबादी कोणाच्या वीसेक पिढ्या भारतात होत्या? जरा आमच्या ज्ञानात भर पडेल. माझं मत विचारलं तर बाहेरून आक्रमण करून लुटणाऱ्यांपेक्षाही जिथे जन्मलो तिथल्याच लोकांवर अत्याचार करणारे जास्त दोषी आहेत. संपत्ती लुटून नेली म्हणजे तुमच्या पुढच्या गल्लीत राहणाऱ्या चोरांनी तुम्हाला लुटून संपत्ती त्यांच्या घरात नेली तर तुम्ही काय म्हणणार? बाकी सोयीस्कर नावे घेतलीत हे नमूद करतो. कारण घोरी, गझनी वगैरेंचा उल्लेख नाही केलात. तसेच टिपूबद्दल बोलताय तर तुम्हाला विजयनगर साम्राज्य, वाडियार वगैरे माहिती आहेत का हो? बादवे, तुम्हाला टिपू जयंती साजऱ्या करणाऱ्या कर्नाटकात विजयनगर व वाडियार साम्राज्यातील कोणत्या राजाची जयंती अथवा त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही सण साजरा करतात असं आठवतंय का हो?
अहो ह्या सगळ्या मुस्लीम राज्यकर्त्यांच्या आता वीसेक पिढ्या भारतात आहेत, तरीही त्यांना बाहेरुन आलेत अशा थापा लोकं अजूनही मारतात. याउलट अमेरिकेत जाऊन अगदी पहिल्या दुसऱ्या पिढीतच स्वतःला अमेरिकन म्हणवून घेण्यात ही कुजबूज आघाडी पुढे असते, त्यादृष्टीने म्हटले मी! तुम्ही घोरी, गझनी, अकबर, टिपू सगळ्यांना एकाच माळेत ओवताय यातच तुमचं इतिहासाचं आकलन दिसतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Sat, 02/23/2019 - 09:38

In reply to क्लिष्ट वाक्यरचना by आजानुकर्ण

Permalink

कार्तिकस्वामी मंदिरात विशिष्ट

कार्तिकस्वामी मंदिरात विशिष्ट वयातील बायकांना प्रवेश नव्हता.. म्हणजे तो त्यांचा देव नव्हता का? वर्णव्यवस्था आणि देव या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.. पंढरीला देवळात दर्शन नसलेले अनेक संत होऊन गेले.. जर योगायोगाने कोणी पंढरीचे मंदिर फोडले असते तर ते पण मला प्रवेश नाही, मग भंगू दे मंदिर असे म्हणत राहिले असते का? आपला एक विचार मांडला. पटला तर ठीक आहे, नाहीतर आहेच जकात आणि जिझिया.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sat, 02/23/2019 - 10:57

In reply to कार्तिकस्वामी मंदिरात विशिष्ट by आनन्दा

Permalink

एक्झॅक्टली मीही तेच म्हणतोय

वर्णव्यवस्था आणि देव या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
मीही तेच म्हणतोय. हल्ले मंदिरांवर झाले होते. हिंदू धर्मावर नाही. मंदिरांवर हल्ले होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पूर्वीच्या काळी मंदिरांमध्ये संपत्ती साठवून ठेवली जायची.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Sat, 02/23/2019 - 11:32

In reply to एक्झॅक्टली मीही तेच म्हणतोय by आजानुकर्ण

Permalink

मंदिरे हे हिंदूचे

मंदिरे हे हिंदूचे श्रद्धास्थान होते, काही हिंदूची अजूनही आहेत.. पण तेव्हा सर्वसामान्य हिंदू मग तो अस्पृश्य जातीचा जरी असेल तरी त्यांची त्या देवावर श्रद्धा होती. अश्या परिस्थितीत मंदिरावर हल्ला म्हणजे श्रद्धेवर हल्ला. त्यामुळे मंदिरांवर हल्ला म्हणजे हिंदू धर्मावर हल्ला नव्हता असे म्हणणे चूक आहे.. जाता जाता 1. मला स्वतःला एक मुसलमानाने कसले तुम्ही मूर्ख, किती देवांची पूजा करता, तुम्ही नरकात जाणार असे डिवचले आहे, आणि अन्य काही उच्चशिक्षित मुस्लिम मुले देखील या मेंदूधुणी ला बळी पडलेली मी बघितली आहेत. मला धोका अल्लापासून नाही, पण अल्लाच्या बंद्या पासून नक्कीच आहे असे मी तेव्हापासून मानतो.. 2. मी वर शेअर केलेली लिंक कोणत्याही फेक आयडीची नाही. त्या असत्य असतील तर तसे सिद्ध करा. 3. जाता जाता एक प्रयोग करून बघायला सुचवतो तुमचे मुसलमान मित्र असतील त्यांना त्यांना एक एकट्याला गाठून एक साधा प्रश्न विचारा. समजा आपल्या शहरात सगळे मुसलमान झाले, आणि मुसलमानांनी जिहाद पुकारला, परंतु मी मुसलमान होऊ शकत नाही, आणि आश्रयाला तुझ्या घाईने येऊन लपून बसलो. दरवाज्याबाहेर जिहादी तुला माझा पत्ता विचारत आहेत. माझा पत्ता दिला तर तुला स्वर्ग मिळणार, नाही दिलास तर नरक. तू कोणाची निवड करशील - स्वर्गाची की दोस्ताची? 100 मुसलमान लोकांना हा प्रश्न विचारा, आणि शंभर हिंदू लोकांना हा प्रश्न विचारा. उत्तर तुम्हाला मिळून जाईल. तुमच्या मनाने उत्तर ठरवू नका, आणि समोरचा तुम्हाला तोंडदेखले हो म्हणत नाहीये ना याचा पण अंदाज घ्या. मी वर दिलेल्या लिंकामध्ये नेमका याचाच उल्लेख आहे, आणि माझे अनुभव पण मला तसाच विचार दर्शवतात. अजून एक, बूत शिकान आणि गाझी म्हणजे काय ते थोडे मला समजावून सांगा आणि तीन, मध्ययुगीन व्यवस्थेचे मोजमाप आजच्या काळाच्या कसोटीवर करू नका... आम्ही मुलासमानाना यासाठी नावे ठेवत नाही की त्यांनी मंदिरे फोडली, पण आम्हाला याची भीती आहे की ते अजून मध्ययुगीन मानसिकता आणि झापडबंद धर्म यातून बाहेरच पडायला तयार नाहीत.. अश्या परिस्थितीत त्यांच्या हातातील आधुनिक तंत्रज्ञान इतर खऱ्या शांतताप्रिय समाजाच्या मुळावर उठू लागले आहे... आम्ही फक्त मुसलमान लोकांनाच शिव्या घालतो का, तर नाही. परंतु तलवारीच्या किंवा पैश्याच्या बळावर धर्मांतरण करू इच्छिणाऱ्या सगळ्या लोकांचा मला राग आहे. त्यातल्या त्यात पैसेवाले बरे, कारण त्यांच्यामुळे कोणाचे तरी राहणीमान "थोडेसे" सुधारते, पण नंतर ते लोक देखील तशीच अस्पृश्यता वगैरे पाळतात, त्यामुळे भारतात जातीव्यवस्था देखील धर्मातीत आहे, त्यामुळे नावे कोणाला ठेवणार? ठेवायची असेल तर भारतीय संस्कृतीला ठेवा.. फक्त हिंदूना का?
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Sat, 02/23/2019 - 09:48

In reply to क्लिष्ट वाक्यरचना by आजानुकर्ण

Permalink

जाता जाता

जाता जाता 20 पिढ्या इथे राहिलेले लोक 50 पिढ्या इथे राहिलेल्या लोकांशी स्वतंत्र भारतात कसे वागले ते पण एकदा बघा.. https://m.facebook.com/story.php?story_fbid=10156427533747326&id=652482325 नाहीतर हे सगळं खोटं आहे असे म्हणून टाका, म्हणजे मी तरी काय ते समजून जाईन. एकच सांगू इच्छितो. हिंदू आज जे वागतायत ती प्रतिक्रिया आहे. मी स्वतः radical मुसलमानांचे काही अनुभव घेतले आहेत. तोपर्यंत मी पण तुमच्या सारखाच उदारमतवादी वगैरे होतो. पण प्रत्येक जण अनुभव घेईपर्यंत थांबायला आता वेळ नाही.. दुर्दैवाने
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sat, 02/23/2019 - 10:58

In reply to जाता जाता by आनन्दा

Permalink

??

फेसबुकमधल्या रँडम फेक आयडीच्या पोस्ट ह्या पुरावे म्हणून ग्राह्य धरायच्या का आता?
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Sat, 02/23/2019 - 10:01

In reply to क्लिष्ट वाक्यरचना by आजानुकर्ण

Permalink

वा वा , क़ाय पण

तुम्ही एका फटक्यात शिवाजी महाराज, राणा प्रताप , बाजीराव पेशवे यांना गारद केलेत. ओरंग्याने (इथे कुत्रा, गाढव, डूक्कर ऐसे लिहिन्याची इच्छा होती पण ह्या जनावराचा अपमान होतो म्हणून है टाळतो) मंदिरे तोडली यात त्याचा काही उपेक्षित समाजाला न्याय मिळवून द्यायची नीति नव्हती, तर धर्मप्रसार करणे है उद्दिष्ट होते. मग त्यासाठी खून , बलात्कार , आक्रमण हे प्रकार आम होते. त्याने मंदिरे पाडुन बहुजनसमाजासाठी खुली केली नाही तर त्यांना दहशत देण्यासाठी हे दाखवून दिले की तुमच्या देवाच्या मूर्तित स्वसंरक्षण करण्याची ताकत नाही. अगदी आपल्या पहिल्या पंतप्रधान नेहरुचि मानसिकता देखील अशीच होती म्हणून त्यानी डिसकवरी ऑफ इंडिया मधे शिवाजी महाराजांचा उल्लेख अपमानास्पद केला , आणि आमची सहिष्णुता इतकी की आम्ही नेहरुना माफ देखील केले, महाराष्ट्र राज्याने जर तेव्हाच मराठी बाणा दाखवला असता तर है लांगुलचालन आज तरी कमी प्रमाणात असते. राहिली गोष्ट दक्षिण अमेरिकेतील स्थानिक लोंकाची तर हे लोक पूर्ण संघटित नव्हते , त्यांना राणा प्रताप , शिवाजी महाराजासारखे नेते लाभले नाहीत , आणि मुख्य कारण म्हणजे त्यांच्यात असलेल्या चालिरिति अत्यंत अघोरी होत्या. साहेब तुम्ही तर इतिहास बदलायला चालला आहात, ओरंगया जर क्रूर होता तर त्याची नाव असलेले सर्व सार्वजनीक वास्तु वा पथांची नावे बदलली पाहिजेत , पण तसे होत नाही कारण तुमच्यासारखे लोक त्याचे उद्दात्तिकरण करतात
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sat, 02/23/2019 - 10:52

In reply to वा वा , क़ाय पण by भंकस बाबा

Permalink

भंकसगिरी

भंकस बाबा, भंकसगिरी कशाला करता. झापडं लावली की जे लिहिलं नाही तेही दिसू लागतं की काय? मी शिवाजी महाराज, बाजीराव (पहिला), किंवा राणा प्रताप यांना कसं गारद केलंय? शिवाजीराजांचं कार्य अतुलनीय आहे. पहिला बाजीरावही व्हिजनरी योद्धा होता. त्यांना कुठं कमी दाखवलंय. की उगीच स्वतःच्या डोक्यातली घाण दुसऱ्याच्या नावावर भंकसगिरी करुन खपवायची? औरंगजेबाने न्याय मिळवून देण्यासाठी मंदिरांवर हल्ले केलेत हा जावईशोध तुम्ही कुठून लावला? आणि इथं मी औरंगजेबाचं उदात्तीकरण करतोय असं तुम्हाला का बरं वाटलं. तुम्हाला वाचनाचे प्राथमिक धडे घेण्याची नितांत गरज आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Sat, 02/23/2019 - 17:19

In reply to भंकसगिरी by आजानुकर्ण

Permalink

जरा दाखवून देता का

मी कुठे लिहिले आहे की सामाजिक न्याय मिळण्यासाठी ओरंगयाने मंदिरे तोडली. वर तुम्हीच लिहित आहात की मंदिरातील संपत्ति लुटन्यासाठी मंदिरे फोड़ली असावीत, धन्य आहे तुमची! म्हणजे तुम्ही शांतिप्रिय धर्माचे धर्मवेड पण ह्या सेक्युलर विधानाखाली दाबून टाकत आहात, जियो मेरे लाल बादवे रागाला भेटला होतात क़ाय?
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sun, 02/24/2019 - 00:53

In reply to क्लिष्ट वाक्यरचना by आजानुकर्ण

Permalink

औरंगजेबाने तोडलेली मंदीरं....

औरंगजेबाने मंदीर नावाच्या वास्तुवर हातोडा नाहि चालवला, तर त्याने त्याच्या दृष्टीने धर्मकृत्यच केलं. आणि तो हिंदु धर्मावरच आघात होता. मुस्लीम राज्यकर्त्यांच्या कृत्याचं जस्टीफीकेशन हिंदुंच्या जातीव्यवस्थेतल्या विषमतेच्या आधारे देता येत नाहि.
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Mon, 02/25/2019 - 05:15

In reply to क्लिष्ट वाक्यरचना by आजानुकर्ण

Permalink

अवघड आहे

औरंगजेबाने ज्या मंदिरांवर हल्ले केले त्या मंदिरांमध्ये बहुसंख्य (हिंदू मानल्या गेलेल्या) लोकांना प्रवेशच नव्हता. त्यामुळं तो हल्ला हिंदूंवर आहे असे मानता येत नाही. उदाहरणासहित स्पष्ट करा. काही प्रश्न आहेत, त्या सगळ्यांची पुराव्यासहित उत्तरे द्या. १. कोणती मंदिरे औरंगझेबाने पाडली आणि त्यातील कोणत्या कोणत्या मंदिरांमध्ये कोणत्या हिंदूंना प्रवेश नव्हता? २. ज्या हिंदू गटाला ज्या मंदिरांमध्ये प्रवेश होता असं तुम्ही म्हणताय, ते मंदिर पडणे त्या "हिंदू" गटाच्या धर्मावर हल्ला का मानू नये? ३. त्याने कुठल्या एकाच हिंदू गटाची मंदिरे तोडली का? ४. ही मंदिरे तोडण्यामागचा उद्देश समस्त हिंदूंना प्रवेश मिळवून द्यावा असा होता का? ५. मंदिरांमधील संपत्ती लुटण्यासाठी मंदिरे, विशेषतः देवांच्या मुर्त्या, तोडण्याची काय गरज होती? याउलट भारतीय उपखंडात 700 वर्षे मुस्लीम राज्य असूनही हिंदू बहुसंख्य आहेत. भारतीय उपखंडात काही शतके विविध युरोपियन राज्यकर्ते येऊनही हिंदूंची संख्या बहुसंख्य आहेच. वर त्यांना हुसकून लावण्यात हिंदू यशस्वीसुद्धा झाले. ज्या औरंगजेब-टिपूंनी 'भारतावर हल्ले करुन भारताला लुटले' त्यांनी ती लुटलेली संपत्ती त्याच देशात इन्वेस्ट केली माझा रोख संपत्ती (पैसे, सोने, जवाहीर) यांच्या पेक्षा मनुष्यसंपत्तीवर आहे. पहिल्यापासून मी फक्त या लोकांनी हिंदू स्त्रियांवर केलेले अत्याचार आणि तरुण पुरुषांची कत्तल यावरच बोलत आहे. संपत्तीचे कारण तुम्ही मध्ये घुसडलेत. तुम्ही जी अत्याचाराची उदाहरणं देताय, आणि मुद्दाम थापा मारताय ते फक्त कसं चुकीचं आहे हे फक्त मी दाखवतोय. म्हणजे मुस्लिम शासकांनी अत्याचार केले नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय? किंवा केले तरी फक्त पैसे लुटण्यासाठी केले? अहो ह्या सगळ्या मुस्लीम राज्यकर्त्यांच्या आता वीसेक पिढ्या भारतात आहेत, तरीही त्यांना बाहेरुन आलेत अशा थापा लोकं अजूनही मारतात. तुम्हाला खरंच आकलनाचा प्रॉब्लेम आहे किंवा विस्मरण होतं किंवा तुमच्या डोक्यात प्रचंड गोंधळ आहे. मुस्लिम हे हिंदुस्थानातले मूलनिवासी नाहीत हे तर तुम्हाला मान्य आहे? हे लोक बाहेरून आले आणि आक्रमण केले. केवळ राज्य/ साम्राज्य विस्तार करण्यासाठी हे पूर्वी चालत होतेच. पण मुस्लिमांचे आक्रमण हे नुसते साम्राज्य विस्तारासाठी नसून इस्लामिक राज्य निर्माण करण्यासाठी होते. जरी ते भारतातच राहिले तरी त्यांचा उद्देश हिंदूंना धर्मांतरित करणे हाच होता. त्यासाठी त्यांनी अवलंबलेले मार्ग हे फार क्रूर होते हे तुम्ही नाकारू शकाल का? घोरी, गझनी, अकबर, टिपू सगळ्यांना एकाच माळेत ओवताय यातच तुमचं इतिहासाचं आकलन दिसतंय. संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावे. सांगा बघू हे सगळे कसे वेगवेगळे होते? यातल्या कोणी हिंदूंवर अत्याचार केले नाहीत? कोणी देवळे तोडली नाहीत? कोणी हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले नाहीत? चला तुमचा इतिहासाच्या अभ्यासावर तुम्हाला एवढा गर्व आहे ना, तर स्वीकार हे आव्हान आणि एक मस्त लेखमाला येऊ द्या प्रत्येक मुस्लिम आक्रमक, राजा, सम्राट या सगळ्यांबद्दल लिहा.
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Mon, 02/25/2019 - 06:20

In reply to क्लिष्ट वाक्यरचना by आजानुकर्ण

Permalink

तुमच्या वीसेक पिढ्या भारतात आहेत ह्या म्हणण्यावर अजून थोडेसे.

भारत सोडून इतर राष्ट्रे पण बघा. हा लेख वाचा. आफ्रिका: साधारण 7th century CE मध्ये आफ्रिकेत इस्लामिक आक्रमण झाले. आज आफ्रिका खंडात जवळपास ५०% मुस्लिम लोकसंख्या आहे. तिथे काय होतंय हे माहित असेलच. पर्शिया: तुम्हाला पर्शिया माहित असेलच, तिथे झोराष्ट्रीयन धर्म होता. तिथे मुस्लिम आक्रमण जवळपास सन ६३३ ला झाले, तेथील स्थानिकांना इस्लाम स्वीकारा म्हणून सांगितले गेलं. ज्यांनी स्वीकारला ते शाबूत राहिले आणि ज्यांनी नाही म्हणले त्यांना बळजबरीने धर्मांतरित करण्याचा प्रयत्न झाला आणि झोराष्ट्रीयन धर्म पर्शियामधून अस्तंगत झाला. साधारण १००० वर्षांमध्ये पर्शिया मुस्लिम नेशन झाला. याआधीच पारशी काही लोक निसटून भारतात पळून आले आणि स्थायिक झाले. हे इतके भारतीय संस्कृतीत मिसळून गेले की पारशी लोकांचे आपल्या देशाच्या प्रगतीत खूप मोठे योगदान दिले. या पारशी लोकांनी कधी कोणाला धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केला का? अलीकडेच इराकमध्ये यझदी लोकांवर कसे अत्याचार झाले हे ऐकले असेलच. युरोप: युरोपातील आक्रमण हे बऱ्याच अलीकडच्या काळातील आहे. पण आता तिथे काय चालू आहे हे डोळे आणि कान उघडे ठेऊन बघा/ एक म्हणजे समजेल. उत्तर अमेरिका: यात अमेरिका आणि कॅनडा दोन्ही आलं. दोन्ही देशांत वेगाने मुस्लिम लोकसंख्या वाढत आहे. बहुतेक सर्व दुकानांत हलाल फूड मिळते. यात फक्त नॉन-व्हेज नसून, व्हेज हलाल पण आहे (कसं काय हे कोणीतरी समजावेल का?). बीफ मिळण्याचं प्रमाण प्रचंड आहे पण त्याप्रमाणात पोर्क बऱ्यापैकी कमी झालं आहे. यावरून काय निष्कर्ष काढता येतो? तर पूर्वी जिथे इस्लामिक आक्रमण व्हायचे तेव्हा ते तलवारीच्या बळावर तिथल्या स्थानिक लोकांवर अत्याचार करून तिथल्या धार्मिक खुणा पुसून होत होते. आता आधुनिक काळात परिस्थिती पण बदलली, आता हे लोक जमेल त्या मार्गाने एखाद्या देशात जातात, मग यात रेफ्युजी म्हणून, वैधअवैध मार्गाने, मानवतावादाला वेठीला धरून कसेही जातात. हळूहळू तिथली त्यांची लोकसंख्या वाढायला लागल्यावर मग शरिया लागू करण्याचा आग्रह धरतात. मधल्या काळात छुपे सांस्कृतिक आक्रमण चालूच असते. तरुण मुलींना नादाला लावणे, तरुण मुलांचे ब्रेनवॉश करणे, स्थानिक राजकारणात व प्रशासनात वर्चस्व निर्माण करणे हे चालूच असते. थोडक्यात सांगायचं म्हणजे आक्रमणाची पद्धत बदलली पण उद्देश मात्र तोच आहे. दुर्दैव हे आहे की युरोपात पण स्थानिक लोक अजून खोट्या सेक्युलॅरिझमच्या प्रभावात आहेत. तसेच भारतात सुद्धा आहेतच. येणार काळच सांगेल आपले भवितव्य काय आहे. उद्या आपल्याच पोरीबाळींना एखाद्याने नादाला लावून जबरदस्तीने निकाह करायला लावला आणि नंतर धर्मात सांगितले म्हणून ३ सवती आणून ठेवल्या अथवा ३ वेळा तलाक म्हणून सोडून दिले आणि नंतर परत स्वीकारण्यासाठी निकाह हलाला करायला भाग पाडले असे होऊ नये म्हणून एवढे प्रतिसाद लिहिले. प्रकाश पडला तर ठीक नाहीतर जो तो आपल्या कर्माने जे होईल ते भोगेलच.
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Fri, 02/22/2019 - 23:23

In reply to फक्त पाकिस्तान नाहि... by अर्धवटराव

Permalink

अर्धवटराव

तुमच्या विखुरलेल्या प्रतिसादांना एकच प्रतिसाद देतो. दोष कुणाचा? हा तुमचा प्रश्न आहे. दोष हिंदूंचाच आहे, हिंदूंमध्ये असलेल्या सहिष्णुतेचा आहे, घरभेद्यांचा व फितुरांचा आहे, डोळ्यावर आणि बुद्धीवर लावलेल्या झापडांचा आहे. पण आता काही हिंदू जागे होत आहेत, ज्यांना जाणवतंय की आपल्याला सावत्र वागणूक मिळतेय आणि आपल्या सहिष्णुतेचा इतर धर्मीय फायदा उठवत आहेत. सगळ्यात मोठा दोष या हिंदूंविरुद्ध खोटे रान उठवणाऱ्या सेक्युलर हिंदूंचा आहे. भगवा आतंकवाद म्हणणारे कोणत्या धर्माचे होते? ही भाकडकथा खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी झटणारे, खोटे पुरावे तयार करणारे कुठल्या धर्माचे होते? मूठभर हिंदू देवळांमध्ये पूर्वापार चालत आलेली प्रथा म्हणून स्त्रियांना प्रवेश नाही याविरुद्ध आरडाओरडा करणारे कुठल्या धर्माचे होते/ आहेत? हिंदूं संस्कृतीची, देवदेवतांची चेष्टा करणाऱ्या सिनेमांना शेकडो कोटींचे उत्पन्न मिळवून देणारे कोण आहेत? अशी चेष्टा करणाऱ्या सिनेमांना/ सीन्स ना विरोध करणाऱ्यांना असहिष्णू म्हणून त्यांच्याशीच भांडणारे कोण आहेत? भारत तेरे तुकडे होंगे म्हणून घोषणा देणारे कोण आहेत? त्यांचे समर्थन करणारे कोण आहेत? अतिरेक्यांच्या फाशीला स्थगिती मिळावी म्हणून जीवाचे रान करणारे, रात्री १२ वाजता कोर्ट उघडायला लावणारे कोण आहेत? माझ्या मते हे सगळे जास्त दोषी आहेत. घरभेदी नेहमीच जास्त धोकादायक असतात. आणि असे घरभेदी तयार करण्यासाठी ब्रेनवॉशिंग बऱ्याच काळापासून चालू आहे. (आता आजानुकर्ण आणि इतर काही पुरावे मागतील. पण स्वतः मात्र एकही मुद्देसूद उत्तर देणार नाहीत, सुसूत्र विचार मांडणार नाहीत आणि पुरावे देण्याची गोष्ट तर लांबच राहिली). अनेक मुस्लीम सत्ता / संस्था हा अजेंडा डोक्यात ठेऊन असाव्यात. असाव्यात नाही आहेतच. हा अजेंडाच तर लक्षात यायला आणि घ्यायला हवा. पण याच मुस्लिम सत्ता जे अत्याचार करतात ते बरोबर मानून त्यांना विरोध करणारे दोषी हे आपले नावाने (का नावापुरते) "हिंदू" लोक आहेत, त्यांचं काय करायचं? मिपावरच्याच काही धाग्यांमध्ये याचे पुरावे काही प्रतिसादांमध्ये मिळतील.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sat, 02/23/2019 - 00:09

In reply to अर्धवटराव by ट्रेड मार्क

Permalink

दोष हिंदूंचाच आहे

दोष हिंदूंचाच आहे, हिंदूंमध्ये असलेल्या सहिष्णुतेचा आहे, घरभेद्यांचा व फितुरांचा आहे, डोळ्यावर आणि बुद्धीवर लावलेल्या झापडांचा आहे.
सहिष्णुता दोष नसुन बावळाटपणा हा दोष आहे. घरभेदी, फितुर वगैरे सेकंडरी इश्यु आहेत. आपल्या समस्येकरता इतरांना जबाबदार धरण्याची झापडं काढली तरी मॅक्झीमम प्रॉब्लेम दूर होतील.
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Sun, 02/24/2019 - 01:08

In reply to दोष हिंदूंचाच आहे by अर्धवटराव

Permalink

आपली कुठली समस्या?

सहिष्णुता दोष नसुन बावळाटपणा हा दोष आहे. सहिष्णू लोक बावळट आहेत असं म्हणायचंय? सगळे लोक बावळट नाहीत ना? ज्यांना परिस्थिती कुठे चाललीये हे समजतंय ते लोक प्रतिकार करत आहेत, त्यांना करू दे की. घरभेदी, फितुर वगैरे सेकंडरी इश्यु आहेत. हा समज अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्या समस्येकरता इतरांना जबाबदार धरण्याची झापडं काढली तरी मॅक्झीमम प्रॉब्लेम दूर होतील. आपली कुठली समस्या? सहिष्णुता का फितुरी का आपल्याला परिस्थितीची जाणीव नाही ही?
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sun, 02/24/2019 - 02:04

In reply to आपली कुठली समस्या? by ट्रेड मार्क

Permalink

आपली कुठली समस्या? सहिष्णुता का फितुरी का आपल्याला...

या पैकी काहिच नाहि.
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Sun, 02/24/2019 - 23:29

In reply to आपली कुठली समस्या? सहिष्णुता का फितुरी का आपल्याला... by अर्धवटराव

Permalink

मग खरी समस्या

मग खरी समस्या हिंदू जागृती होऊ लागली किंवा प्रतिकार करू लागले ही आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Mon, 02/25/2019 - 20:06

In reply to मग खरी समस्या by ट्रेड मार्क

Permalink

ते ही नाहि.

.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sat, 02/23/2019 - 05:08

In reply to अर्धवटराव by ट्रेड मार्क

Permalink

मी मुद्देसूद पुरावे देतो त्यापूर्वी

पण स्वतः मात्र एकही मुद्देसूद उत्तर देणार नाहीत
मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो पण त्यापूर्वी हिंदूंच्या कुठल्या चांगल्या प्रथा आता वाईट म्हणून शिकवत आहेत, आणि औरंगजेब-तैमूर यांचे गोडवे गात इतिहास शिकवला जातोय याचे पुरावे तुम्ही कधी देणार ते सांगा. की खोटे बोलणे आणि थापा मारणे हा तुमचा ट्रेड मार्क झालाय!
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Sun, 02/24/2019 - 01:01

In reply to मी मुद्देसूद पुरावे देतो त्यापूर्वी by आजानुकर्ण

Permalink

अवघड आहे

मी सांगतोय त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही म्हणून मी तुम्हाला एक प्रयोग करायला सांगितला होता. तुमच्या आसपासच्या शाळकरी मुलांना हिंदू सम्राट, राजे यांची किती माहिती आहे ते बघा आणि मुस्लिम राज्यकर्त्यांची किती माहिती आहे ते बघा. बाकी माझ्या लहानपणी घरात रोज देवांची पूजा व्हायची, संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभंकरोती म्हणाली जायची. त्यातून काही झालं तरी सुटका नसायची. आता किती घरात हे सगळे किंवा एक तरी होतं? परत एक प्रयोग करा, किती शाळकरी मुलांना शुभंकरोती म्हणता येतं, देवाची कुठली कुठली स्तोत्र पाठ आहेत हे विचारा. किती घरांमध्ये रोज पूजा होते हे विचारा. कॉलेजमधली किती मुलं नेमाने देवळात जातात ते विचारा. तुमचे तुम्हालाच कळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Sun, 02/24/2019 - 20:16

In reply to अवघड आहे by ट्रेड मार्क

Permalink

सहमत ट्रेड मार्क

आणि आमच्या शांतता प्रिय धर्माचे 95% टक्के मुले मदर्शात जातात, अरबी शिकवण्यासाठी घरी शिक्षक ठेवतात, कारण विचारले तर सांगतात की जन्नतमधे फक्त अरबी बोलली जाते . आता आजानुकर्ण याना खुमखुमी येईल की 95% आकड़ा कुठून काढला, तर तुमच्या माहितिसाठी सांगतो मी ज्या भागात रहातो तो मुस्लिमबहुल भाग आहे, तिथे 100 टक्के लोक आपल्या मुलाना मदर्शात पाठवतात वा घरी मौलानाला बोलवतात, 5% मी माझ्या मनाचेच कमी केले हो!
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Sun, 02/24/2019 - 01:03

In reply to मी मुद्देसूद पुरावे देतो त्यापूर्वी by आजानुकर्ण

Permalink

आणि हो

मी विचारलेल्या प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे दिलीत आणि तुम्ही जे दावे करताय त्याचे पुरावे दिलेत की मी पण पुरावे देतो.
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Sun, 02/24/2019 - 17:53

In reply to मी मुद्देसूद पुरावे देतो त्यापूर्वी by आजानुकर्ण

Permalink

कर्नाटकात २०१५ साली काँग्रेस

कर्नाटकात २०१५ साली काँग्रेस सरकारने टीपु जयंती सुरु केली !! देशाच्या राजधानी दिल्लीत औरंगजेब रोड काल पर्यंत होता !! एका विद्वान कॅनडीयन ( मुळचा पाकिस्तानी ) असलेल्या माणसाने ( श्री ताहेर फतेह )नी विचारल की एका क्रुर हुकुमशहा ज्याने लाखो हिंदुं ची कत्तल केली, मंदिरे तोडली, आया बहीणींवर अत्याचार केले त्याच्या नावाने हिंदु बहुल देशात रस्ता कसा काय असु शकतो? त्यावर कोणाकडेही उत्तर नव्हते ! म्हणुन त्यांनी रस्त्याच नाव बदलण्याचा प्रस्ताव दिला ! देशात मुसलमानांचा प्रॉब्लेम हा आहे की काँग्रेसवाले त्यांना शिकवतात आणी आपल हि त कश्यात आहे ह्याचा विचार न करता मुसलमान लोक त्या ट्रॅप मध्ये फसतात. टिपुमुसलमान असला तरी त्याची जयंती साजरी करणे हे मुसलमान रिवाजाच्या विरुद्ध आहे ! पण लाखो हिंदुंची कत्तल करणार्या टिपुच्या जयंतीमुळे हिंदु बिथरतात त्यांच्या जखमावरची खपली परत काढली जाईल हे माहीत असुन काँग्रेसवाल्यांनी हे असे प्रकार सुरु केले व मुसलमानांना त्यात सहभागी करुन घेतल. टिपु जयंती साजरी करण्यात ह्यांना काहीही प्रॉब्लेम नाही ? काँग्रेसच्या ह्याच नितीमुळे लोक हळुहळु काँग्रेसपासुन दुर झाले आहेत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 02/24/2019 - 20:14

In reply to कर्नाटकात २०१५ साली काँग्रेस by डँबिस००७

Permalink

बर्र

टिपुच्या जयंतीमुळे हिंदु बिथरतात त्यांच्या जखमावरची खपली परत काढली जाईल हे माहीत असुन काँग्रेसवाल्यांनी हे असे प्रकार सुरु केले व मुसलमानांना त्यात सहभागी करुन घेतल. काँग्रेसमधे असलेले हिंदू बिथरत नाहीत का?
कर्नाटकात २०१५ साली काँग्रेस सरकारने टीपु जयंती सुरु केली !!
मग २०१८ ला येडी आले तेंव्हा बंद करायची. त्यात काय येवढं.
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Sun, 02/24/2019 - 20:21

In reply to बर्र by अभ्या..

Permalink

अभ्या भाऊ,

2018 मधे येडी कुठे आले हो ? नाय आजकाल अतिरिक्त वाचन होतच नाही , तुमच्यासारखे काही मौलिक माहिती देतील तर आमचे भलेच होईल
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 02/24/2019 - 20:37

In reply to अभ्या भाऊ, by भंकस बाबा

Permalink

अडीचडे नायक

१७ मे २०१८ ला नाय का सिंगल लार्जेस्ट पार्टि म्हनून शपथ घेतली. १९ मे पर्यंत अडीच दिवस नव्हते का सीएम? नाय आजकाल अतिरिक्त वाचन होतच नाही मग पेस्टवता त्या लिंकाबाजारातला माल काय वरुन येतो काय तुमच्या सीएनएफला?
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Sun, 02/24/2019 - 23:53

In reply to अडीचडे नायक by अभ्या..

Permalink

अभ्या भाऊ,

नायक शिनेमा कालच बघितला क़ाय?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 02/25/2019 - 00:50

In reply to अभ्या भाऊ, by भंकस बाबा

Permalink

व्हय, त्यातली आमरिषपूरी आणि

व्हय, त्यातली आमरिषपूरी आणि सौरभ शुक्लाची जोडगोळी लै भारी. ते कल्लूमामा तर खत्रा. त्याला पक्षध्यक्षचा रोल द्यायला पाहिजे होता.
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Sun, 02/24/2019 - 22:16

In reply to बर्र by अभ्या..

Permalink

काँग्रेसमधे असलेले हिंदू

काँग्रेसमधे असलेले हिंदू बिथरत नाहीत का? म्हणजे कॉंग्रेस मधले न बिथरणारे हिंदु सोडले तर बाकीच्या हिंदुच काय तुम्हाला काही घेण देण नाही अस तुमच म्हणण आहे हे स्पष्ट झाल !! कॉंग्रेस पक्षातील हिंदु नेत्यांनीच जाणुन बुजुन सरसकट हिंदु लोकांना, हिंदु धर्माला अतिरेकी घोषित केल कारण तेंव्हा पर्यंत टेररिस्ट म्हणजे ईस्लाम आणि ईस्लाम म्हणजे टेररिस्ट हे मानल जायच ! कॉंग्रेस सारखा निच पक्ष नाही !! हिंदु लोकांचा अंत पाहिला आहे !! ह्याच हिंदु नेत्यांनी "ओसामा जी","अफझल गुरु जी" सारख्या कुख्यात अतिरेक्यांना आदराने "जी" लावुन संबोधल होत !!
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Sun, 02/24/2019 - 23:58

In reply to काँग्रेसमधे असलेले हिंदू by डँबिस००७

Permalink

डंबिस साहेब,

ते कोर्टातले शपथपत्र विसरलात! राम आणि रामसेतु काल्पनिक आहेत म्हणून आपले अभ्या भाऊ प्रकाश घालतीलच या मुद्द्यावर काहीतरी मजबूरी असेल ना या इटालियन पक्षाची?
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Sun, 02/24/2019 - 23:50

In reply to बर्र by अभ्या..

Permalink

अभ्या भाऊ,

2018 मधे येडी कुठे आले हो ? नाय आजकाल अतिरिक्त वाचन होतच नाही , तुमच्यासारखे काही मौलिक माहिती देतील तर आमचे भलेच होईल
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Mon, 02/25/2019 - 00:05

In reply to बर्र by अभ्या..

Permalink

मानवतावादी आणि शेकुलर

युरोपात व अमेरिकेत देखील भरपूर आहेत, तिथे काही शिख धर्मियावर मुस्लिम समजून हल्ले झाले , पण तिथल्या एकाही राजकीय पक्षाने ख्रिस्ती आंतकी म्हणून बोंबा नाही मारल्या . अशी पवित्र कामे कोंग्रेसच करू जाणे
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Tue, 02/19/2019 - 22:32

Permalink

The official policy of Japan

The official policy of Japan is not to give citizenship to Muslims who come to Japan, and even permits for permanent residency are given sparingly to Muslims.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 02/22/2019 - 02:24

In reply to The official policy of Japan by NiluMP

Permalink

चांगलच आहे कि मग.

जपानचा आदर्श घेऊन आपलं राष्ट्र सुव्यवस्थीत करावं आणि सर्वांगाने प्रोटेक्ट करावं. कुणी रोखलय भारताला? भारत जर तसं करु शकत नसेल तर दोष कोणाचा?
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Fri, 02/22/2019 - 19:06

Permalink

आजानुकर्ण,

आजानुकर्ण, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
मंदिरं पाडणं हे 'हिंदूं'वरील अत्याचाराचं उदाहरण होऊ शकत नाही.
देवदेवतांना आम्ही हिंदू आईबाप मानतो. कळविण्यास अत्यंत आनंद होतो की आम्ही मेल्या आईचं दूध प्यालेलो नाही. भारताला कोण्या नेत्याबित्याने एकसंध ठेवलं नसून आमच्या देवांमुळे भारत एक आहे. मंदिर पाडणे हा भारतीय एकात्मतेवरचा आघात आहेच. भले कोणी नास्तिक भारतीय असला तरीही त्याने मंदिरांचं संरक्षण केलंच पाहिजे. २.
पण हे मंदिर संपूर्ण हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व करतं का?
हो. निदान औरंग्या तरी तसंच मानतो. ३.
अगदी स्वातंत्र्यानंतर मंदिर प्रवेशासाठी आंदोलनं करावी लागली आहेत.
त्या आंदोलनांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला ना? कायद्याने अस्पृश्यता नष्ट झालेली आहे. ४.
मग औरंगजेबानं तेव्हा जे केलं त्याला समस्त हिंदू समाजावरील अत्याचार मानून आता ऊर बडवण्यात काहीही अर्थ नाही .
मग काय घराला आग लागल्यावर विहीर खणायला घ्यायची म्हणता? धन्य आहे! ५.
दुसरं असं की शेकडो वर्षाच्या मुसलमानी राजवटीनंतरही फुल्यांसारख्या द्रष्ट्या विचारवंताला महंमदाचा पोवाडा लिहून मुसलमानी आक्रमणाचे आभार मानावे वाटले यात, मुसलमानी सत्तेचा त्रास सामान्य जनतेला फारसा होत नव्हता असे मानायला हरकत नाही.
कम्युनिस्ट क्रांतीचे पोवाडे तर रशियातही गायले जायचे. मग अचानक ७० वर्षांनी स्टालिन व लेनिनचे पुतळे पाडण्यात आलेच ना तथाकथित सोव्हियेत साम्राज्यात? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Sat, 02/23/2019 - 20:58

In reply to आजानुकर्ण, by गामा पैलवान

Permalink

स्टॅलिन वानी लेनिन महापुरुरूष

जग सोडा पण भारतात जरी bagital तरी खूप महापुरुषांनी ह्या भूमीवर जन्म घेतला आणि स्वतचं पूर्ण आयुष्य लोक कल्याणासाठी कुर्बान केले . ह्या सर्व महापुरुषंच्या विचाराची सर्वात जास्त वाट कोण्ही लावली आसेल तर त्यांच्याच बेगडी अनुयानी .आसच दिसेल समाजात
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Sat, 02/23/2019 - 00:26

Permalink

पाकिस्तान शत्रू राष्ट्र आहे

चर्चेचं गुऱ्हाळ विषारी रस निर्माण करताय . ऐकाच ध्येय पाकिस्तान शत्रू राष्ट्र आहे आणि पाकिस्तानच आडमार्गाने samardhan करणारे हिंदुस्थानी हिताची भूमिका घेवू शकणार नाहीत . तेव्हा निर्णय प्रक्रिये मध्ये त्यांचा सहभाग आसता काना नये हीच काळजी घेणे
  • Log in or register to post comments

Submitted by विनोद१८ on Sat, 02/23/2019 - 00:33

In reply to पाकिस्तान शत्रू राष्ट्र आहे by Rajesh188

Permalink

डिप असेट्स....

पाकिस्तानी डिप असेट्स.... ...हळुहळु सगळ्यांच्या लक्षात येत आहेत कि नाही ??
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Sat, 02/23/2019 - 10:05

In reply to डिप असेट्स.... by विनोद१८

Permalink

दुर्दैव हे आहे की त्यांना

दुर्दैव हे आहे की त्यांना स्वतःला हे कळत नाहीये.. आपल्याला कळून काय उपयोग?
  • Log in or register to post comments

Submitted by जानु on Mon, 02/25/2019 - 00:42

Permalink

सुप्रिया ताईंना बॅग पॅक करून

सुप्रिया ताईंना बॅग पॅक करून काश्मीरला जावे वाटतं. प्रेमाने प्रश्न समजून घ्यावा म्हणताय. या लोकांना तेव्हाच काश्मीरी लोकांचा कळवळा येतो जेव्हा सरकार काहीतरी निश्चित भूमिका घेते. त्यात धाकटी पाती डोवाल साहेबांचीच चौकशी लावायला चाललेत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 03/11/2019 - 22:45

Permalink

आता पुलवामा. हा धागा

आता पुलवामा. हा धागा वाचनमात्र करण्यात आल्याने इथे प्रतिसाद दिला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kesari | Official Trailer
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com