Skip to main content

[शशक' १९] - ग्लास

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 01/02/2019 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
केशवने चार ग्लास भरले. बाहेर सुंदर चांदणं पडलं होतं. "आज जेवन झाल्यावर कोल्ड्रिंग पिऊ आपन...पोरांना आवडंल बघ. आपल्या गावात पानी नाय भेटत प्यायाला पण कोल्ड्रिंग लगेच भेटतयं! तेच पिऊन पाहू; कळंल तरी नुसतं प्यायासाठी आहे की पिकाला बी चालंल..." केशव किंचित खिन्नपणे गौरीशी बोलत होता. गौरीने केशवकडे नुसतं पाहिलं आणि मुलांना हाक मारली. "आये, शुभमनं माझं सर्टिफिकेट खराब केलं." कल्याणी रडू लागली. "कसलं सर्टिफिकेट?" केशवने विचारले. “शाळेत गनिताची एक स्पर्धा झाली होती. त्याच्यात दुसरा नंबर आला माझा, बाबा!" केशव विचारात गुंतला. "गौरी, काहीतरी गोडधोड कर. ते कोल्ड्रिंग नाय प्यायचं.” गौरीने चमकून केशवकडे पाहिलं. केशव सगळे ग्लास मोरीत रिकामे करत होता.

वाचने 49528
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

+१

+१

शेवट ग्वाड तर समदं ग्वाड

बापरे , कसली सकस कथा आहे ,

+१

प्रथमवाचनी कथा कळली नाही, प्रतिसाद वाचल्यावरच समजले. केशव ‘किंचित’ खिन्न असल्यामुळे अगदी अात्महत्त्येपर्य़ंत पोहोचलेला होता असे वाटले नसावे. तसेच त्याची मन:स्थिती बदलली, त्यासाठी एक अोळ अाली असती तर कथा पटकन समजली असती.

+1

+१

+१