Skip to main content

अवकाश स्पर्धा (अमेरिकन बाजू)

लेखक सतिश म्हेत्रे यांनी शनिवार, 16/02/2019 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना या लेखमालेत माझा कयास मुख्यत्वे अमेरिकेच्या सुरवातीच्या अवकाश मोहिमांच्याविषयी असेल. रशियाने सर्वप्रथम मानवनिर्मित उपग्रह प्रक्षेपित करून या स्पर्धेत आघाडी घेतली. नंतर त्यांनी पहिला अंतराळवीर देखील अवकाशात पाठवला. याला उत्तर म्हणून अमेरिकेने आधी मर्क्युरी आणि नंतर जेमिनी व प्रसिद्ध अपोलो मोहिमा राबविल्या. मर्क्युरी मोहिमेचा मुख्य उद्देश एका मानवाला अवकाशात सोडणे व इतर तांत्रिक बाबी चेक करणे असा होता. जेमिनी या मोहिमेचा उद्देश अपोलो मोहिमेसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करणे हा होता (आवश्यक बाबी त्या त्या वेळी सांगितल्या जातील.) आणि अपोलो मोहीम ही मानवाला चंद्रावर उतरवणे व सुरक्षितपणे परत आणणे हा होता. या मालिकेत मी सुरवातीला अवकाश स्पर्धेची सुरवात कशी झाली याबद्दल लिहिन. नंतर क्रमाक्रमाने मर्क्युरी, जेमिनी आणि अपोलो मोहिमांच्या विषयी माहिती देईन. सोबतच रशिया मध्ये काय काय घडत होते याबद्दल ही थोडक्यात सांगेन. या लेखात काही इंग्रजी शब्द जशेच्या तसे वापरावे लागतील नाहीतर त्या वाक्याचा (किंवा घटनेचा) नीटसा अर्थ कळणार नाही. पण लेखाच्या सुरवातीला किंवा शेवटी त्या इंग्रजी शब्दांचा अर्थ समजावयाचा प्रयत्न करेन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5504
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

रोचक विषय आहे हा. लवकर लिहा. ---- या विषयाला वाहिलेली "BBC Space Race" नावाची ४ भागांची डॉक्युमेंट्री YouTube वर आहे. तीही अतिशय माहितीपुर्ण आहे.

In reply to by प्रसाद_१९८२

यामध्ये त्यांनी wernher von braun आणि Sergei korolel यांमधील स्पर्धा दाखवली आहे. ती मुख्यत्वे त्या दोघांच्या वर भर देते.

रोचक विषय निवडला आहेत. सर्व लेखमालेची आतुरतेने वाट पाहत आहे. जालावर इंग्लिश मध्यें बरेच लिखाण उपलब्ध आहे, पण मराठी वाचायला खूप धमाल येईल.