नमनाचे तेलः
माझी बायको ऑईल, वॉटर आणि पोस्टरकलर अशा माध्यमात चित्रे काढत असते.
तिची काही चित्रे इथे तुम्ही पाहिली होतीच.
इतकी वर्षे तिची चित्रकारी पाहता-पाहता मलाही रंगांशी खेळायची हुक्की आली.
आमच्या गावात एक आर्किटेक्ट/लेखक/कवि/नाट्यकर्मी कलाकार आहेत - प्रकाश धर्मा म्हणून.
अत्यंत हरहुन्नरी माणूस. स्वतः उत्कृष्ट चित्रकार.
त्यांनी एक प्रयोग म्हणून नवशिक्या, अर्धशिक्षित आणि अनुभवी चित्रकारांना वॉटरकलर चित्रकला
शिकवायला सुरुवात केली. दर रविवारी सकाळी उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या परिसरात हा प्रयोग सुरू असतो.
(हे वाचून इथल्या कुणाला हुक्की आली तर तेही सामिल होऊ शकतात. प्रवेश विनामूल्य!)
मीही त्या प्रयोगात नवशिक्या म्हणून सामिल झालो. चुकत माकत काही कागद आणि बरेच रंग खराब केले.
अजून करतोच आहे. मी रंगवलेले एक चित्र येथे देण्याचे धाडस करतो आहे.
काही चुकलंय असं वाटलं तर सांगा.
काही बरं वाटलं तर श्रेय 'मास्टरजींना'. :)
आता चित्र :
शीर्षक : पुलावरचा न्हावी (द बार्बर ऑन द ब्रिज)
माध्यम : वॉटरकलर (जलरंग)
आकार : ६ इंच * ४ इंच अंदाजे.
चित्राबद्दल थोडेसे :
दररोज ऑफिसला जाताना मला नल्लाकुंटा नाल्यावरील पुलाच्या फुटपाथवर हा न्हावी आपले दुकान मांडून बसलेला दिसतो. हे दृष्य मला कालौघातील दोन बिंदूंना जोडणार्या पुलासारखं दिसतं. म्हणून चित्राचं नाव 'न्हाव्याचा पूल' किंवा 'द ब्रिज ऑफ द बार्बर' असं द्यावं काय? असाही विचार मनात डोकावतो. (स्पष्टीकरण : जागतिक नकाशावरच्या आजच्या शहरात अजूनही साठ सत्तर वर्षांपूर्वीच्या खेड्यात पिंपळाच्या पारावर हजामतीचं दुकान मांडणारे न्हावी दिसतात. )
![]() |
वाचने
8952
प्रतिक्रिया
30
मिसळपाव

प्रतिक्रिया
सहीए हे!!
अगदी अगदी ...
In reply to सहीए हे!! by भाग्यश्री
अच्छा
In reply to अगदी अगदी ... by छोटा डॉन
हेच म्हणते..
In reply to अच्छा by आनंदयात्री
छान फील
वा! चित्र
वावा..
सुंदर !!
छान
छान चित्र
खूप
In reply to छान चित्र by नितिन थत्ते
असेच म्हणतो
In reply to छान चित्र by नितिन थत्ते
वाह!
वा नाना वा !!
विसुनाना
वा!
छान जमलय.
खुप छान
खासच.
चित्र छान
चित्र मस्तच आलंय विसूनाना!
पुलावरचा ज्योतिषी
चित्र
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
कल्पक
In reply to चित्र by नंदन
मस्त.
न्हाव्याच्या पुलाचे
धन्यवाद
मस्त...
अवघड माध्यम
छान जमले आहे