Skip to main content

चॅनलचं पॅकेज! हे काय नवीन?

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 11/12/2018 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या टिव्हीवर वारंवार दाखवतायत की १ जानेवारीपासून आपल्याला हवे ते चॅनेल पॅकेज निवडता येणारेत.जे पॅक निवडू तेवढ्याचेच पैसे द्यायची सोय आहे.त्यासाठी १९ डिसेंबरच्या आत पॅकेज निवडायचेत.चॅनलच्या दरांचीही माहिती प्रत्येक चॅनल देतंय.उदा.झी मराठी १९ रु.सोनी मराठी ९ रु. इ. हा नेमका काय प्रकार आहे?यामुळे सेट टॉप ग्राहकांचे फायदे/तोटे कोणते होणार?हे केल्यामुळे सदर सेवा पुरवणार्‍या कंपन्यांचे फायदे/तोटे कोणते होणारेयत? कृपया याबद्दल कोणाला माहिती असेल तर सांगा! _/\_

वाचने 44261
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

आमच्याकडे केबलचालक च्यानल निवडायला येऊन सांगून गेले, सोबत 5-6 फॉर्म्स दिलेत, एक सेट आहे पॅकेज घ्यायचे असेल तर, एक सेट आहे वेगवेगळी च्यानल घ्यायची असल्यास आणि एक अजून काहीतरी ऑप्शन आहे. आम्ही निवडून ठेवलेत. अजून काही फॉर्म्स गोळा करायला आले नाहीयेत, आधी जसे सुरू होते, तसे सर्व प्रक्षेपण सुखेनैव सुरू आहे. ह्याची अंमल बजावणी कधीपासून होणार होती/ आहे?

माझं चॅनल सिलेक्शन राहून गेलं. मग एक तारखेला सगळं चालू राहिलं. मग म्हटलं बघू, बंद पडलं तर ।.. 4 ला सकाळी एकपण मराठी चॅनल दिसेना. पाचला पण तसंच. सहाला गप सगळं चालू झालं :D बघू आता बंद पडल्यावर. तोपर्यंत थोडं थोडं रिचार्ज करायचं.

हो, आमच्याकडेही गोंधळ आहे. मागची पोस्ट, सगळी च्यानेले व्यवस्थित सुरू आहेत म्हटल्याच्या दुसऱ्या दिवशी बंद पडली! केबालावाल्याला फोन केल्यावर पटापटा फॉर्म घेऊन गेला आणि मग आता जी सांगितली होती, त्यापैकी काहीच सुरू झाली आहेत. आता पुन्हा एकदा फोन करायला लागेल! तरी मराठी वाहिन्या सुरू झाल्या आहेत म्हणून बरं! नाहीतर ज्ये ना चिडले असते! =)) आणि आता काल बातमी, अजून मार्चपर्यंत वेळ दिलाय म्हणे. म्हणजे मार्च पर्यंत खरं तर सगळ्या वाहिन्या सुरू असायला हव्यात ना?

In reply to by यशोधरा

मार्च पर्यंत खरं तर सगळ्या वाहिन्या सुरू असायला हव्यात ना?
हो, मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढवली आहे. TRAI extended TV Channels Selection date to 31 March 2019 ट्रायच्या या आदेशा नुसार तुम्ही केबलावाल्याक्डे पहिली पॅकेजस होती तशी हवी म्हणून आग्रह धरू शकता. फॉर्म बिर्म भरलेला कॅन्सल समज असं स्प्षट सांगायचं

आणखी ..... हे कायप्पा वर आलेलं ढकलपत्रः केबल किंवा डिश टीव्हीचे महिन्याचे पैसे कसे कमी करता येतील याची माहिती. आता मी पहिला उपाय सांगणार आहे तो तुमचा प्रतिमाहिना कमीतकमी ₹ 20+ GST अशी 23.6 ₹ एवढी रक्कम वाचविण्याचा. तर आता ₹130+GST असे मिळून 154 रुपयात 100 फ्री चॅनेल मिळणार आहेत. लक्षात घ्या की 130 ₹ ही 100 फ्री चॅनेल्सची फी नसून 100 इतक्या नेटवर्क कॅपॅसिटीची फी आहे. एक SD चॅनेल घेतला की एक नेटवर्क कॅपॅसिटी स्लॉट भरला जातो. आणि एक HD चॅनेल घेतला की दोन नेटवर्क कॅपॅसिटी स्लॉट भरतात. जर आपण 100 फ्री SD चॅनल घेतले तर आपले हे 100 स्लॉट भरतील. 100 नेटवर्क कॅपॅसिटी स्लॉट भरले की अजून चॅनेल पाहण्यासाठी पुन्हा 20 ₹ देऊन 25 स्लॉट विकत घ्यावे लागतील, तेही भरले की पुढच्या प्रत्येक 25 स्लॉट्ससाठी 20 ₹ द्यावे लागतील. हे अधिकचे 20 ₹ हे चॅनेल्सच्या वैयक्तिक किंवा पॅकच्या किंमतीच्या व्यतिरिक्त आहेत. म्हणजे समजा तुम्ही 100 फ्री SD चॅनेल घेतले, आणि प्रत्येकी 5 ₹ किंमतीचे 25 पेड SD चॅनेल घेतले आणि प्रत्येकी 10 ₹ चे 10 HD चॅनेल्स घेतले तर तुम्हाला एकूण स्लॉट्स लागतील फ्री चॅनेल्सचे 100 + SD पेड चॅनेल्सचे 25 + HD चे प्रत्येकी 2 म्हणजे 20, असे टोटल 145. म्हणजे तुम्हाला एकूण नेटवर्क कॅपॅसिटी फी ही 145 चॅनेल्ससाठी भरावी लागेल, जी वर सांगितल्याप्रमाणे 130+20+20+GST अशी एकूण 200 ₹ इतकी होईल. याउपर परत चॅनेल्सच्या किंमती म्हणजे 25 पेड SD चॅनेल्स साठी 25 x 5= 125, तर 10 पेड HD चॅनेल्ससाठी 10 x 10= 100 असे 125+100=225+GST म्हणजे 265₹ भरावे लागतील. म्हणजे तुमचे एकूण बिल होईल, नेटवर्क कॅपॅसिटी फीचे 200 + पेड चॅनेल्सचे 265 = 465 ₹ इतके. आपण स्वतः तर 20 पेक्षा अधिक चॅनेल्स बघत नाही. ते सर्व पेड चॅनेल आहेत, मग मी काय करावे? तर 130 मध्ये जे 100 फ्री चॅनेल मिळतात ते सर्व घेण्याची सक्ती नाही. त्यातील दूरदर्शनचे 25 फ्री चॅनेल घेण्याची मात्र सक्ती आहे. मग दूरदर्शनचे 25 चॅनेल गेले की आपल्याकडे उरतात 75 फ्री स्लॉट्स. यात आपण फ्री असलेल्या चॅनल्सपैकी आपण बघत असलेले फक्त 25 चॅनेल निवडायचे, कारण इतर बहुतांश चॅनेल्स हे वेगवेगळ्या भाषांचे असतात, ते चॅनेल आपण घ्यायची गरज नाही. असे केल्यावर आपले एकूण 50 स्लॉट खर्च होतात आणि 50 उरतात. आपण जे 25 पेड SD चॅनेल घेणार आहोत ते आता आपण याच उरलेल्या 50 पैकी 25 स्लॉट्समध्ये भरू शकू. यामुळे आपल्याला 20₹ देऊन अधिकचे 25 स्लॉट घेण्याची गरज नाही. आता अजूनही आपल्याकडे 25 फ्री स्लॉट उपलब्ध असतील. त्यात आपण जे 10 HD चॅनेल घेणार आहोत त्याचे प्रत्येकी 2 म्हणजे 20 स्लॉट खर्च झाले तरी आपल्याकडे 100 पैकी 5 स्लॉट उरतीलच. आणि अशाप्रकारे सगळे 100 फ्री चॅनेल्स न घेता, फक्त आपल्याला पाहिजेत तेवढेच घेऊन आपण पुढील नेटवर्क कॅपॅसिटीचे जवळजवळ 47₹ प्रति महीना वाचवू शकतो. म्हणून सर्व्हिस प्रोवायडर्स देत असलेले सगळे 100 फ्री चॅनेल घेऊ नका, मोजकेच घेऊन, आपले इतर नेटवर्क स्लॉट्स हे पेड चॅनेल्ससाठी वापरा आणि पैसे वाचवा. या व्यतिरिक्तही सिंगल पेड चॅनेल्स किंवा चॅनेल पॅक्स नीट पाहून निवडले तर आताच्या स्थितीतही बिल खूप कमी होऊ शकते. मी 20 फ्री, 10 पेड, 2 पेड पॅक्स मधले 15 आणि 5 HD असे 45 चॅनेल्स म्हणजे 50 स्लॉट्स अधिक दूरदर्शनचे 25 असे फक्त 75 स्लॉट्स खर्चून बिल GSTसहीत 240₹ इतकेच येईल अशी चॅनेल्सची निवड केली आहे. यातही पुढे तीन महिन्यात सर्व ब्रॉडकास्टर्सला सब्स्क्रायबर्स कमी झाल्याने चॅनेल्सच्या किंमती कमी कराव्याच लागतील असा TRAI चा अंदाज आहे. असे झाले तर बिल 200च्या आसपास सुद्धा येऊ शकेल. तुम्हीही असेच थोडे डोके लढवून आपले बिल कमी करा. उगीच कधी ढुंकूनही बघत नसलेले चॅनेल्स घेऊन ब्रॉडकास्टर आणि सर्व्हिस प्रोवायडर्सचे खिसे आपल्या मेहनतीच्या पैशांनी भरू नका. *जागो ग्राहक जागो.* ...... एक चिकित्सक ग्राहक मला वाटतं मा़झे दर महिना बील या मुळेच कमी झालेय (फ़ारसा अभ्यास न करता साध्या ठोकताळ्याने त्यांच्या वेबसाईटव्र मराठी+फुकट चॅनेल्स निवडून सबक्राइब केले होते . त्याचे आता २०७ रू प्रति महिना पडतील. आधी अर्धवार्षिक धमाल फॅमिली मिक्स रू ३२० प्रति महिना असा पॅक होता ) आता बघू आणखी काही काढता येतात का .

In reply to by यशोधरा

नुसतेच 25, 20, 75 ,100 असे आकडे आलटून पालटून दिसत राहिले!!
ते उदाहरण म्हणून दाखवलेयत. दुर्लक्ष करू शकता. एकंदरीत : १) सर्व फ़्री चॅनेल्स घ्यायला पाहिजेतच असे नाही. हे कमी घेतल्यास / केल्यास जे पैसे वाचतील (नेटवर्क कॅपॅसिटीची फी) त्यात आपल्याला हवे असलेले मोजके एचडी चॅनेल्स बघता येतील. २) आपल्याला पाहिजेत तेव्हढेच चॅनेल्स घ्या. अगदी मोजके म्हंजे मोजकेच. ३) जेव्हढे चॅनेल्स आता आहेत / होते ते पहायला वेळ तरी आहे/ होता का? बघा, विचार करून ठरवा. ४) जे कधीतरी बघितले जाणार आहेत त्याचे पैसे उगाच नियमितपणे का भरायचे अन महाग महाग म्हणून करवादायचे?

In reply to by उपेक्षित

मी अजून संसुई चा 2003 चा मॉडेल वापरतो,त्यावर dd न्युज आणि dd सह्याद्री हे दोनच चॅनेल लागतात,बाकी मी झी 5 चे सबस्क्रिपशन घेतले आहे,600 रुपये प्रती वर्ष आणि 5 मोबाईलवर ते बघता येते sign इन करून,म्हणजे वर्षाला 120 रुपये प्रत्येकी,पाहिजे तेव्हा बघितले, पाहिजे तेव्हा बंद केले

वाटसप मेसेज भंपकगिरी असते. कोणी पाठवले काय पत्ता लागत नाही. केबलवाल्यांचे पितळ उघडे पडले आहे. ग्राहक किती हे पुर्वी लपवत होते. स्थानीक वजनदार लोक केबलवाल्याकडून फुकट सर्वीस मिळवत असतात. (( रस्त्यावर चुकीच्या तारखेला चुकीच्या ठिकाणी वगैरे पार्किंग केलेल्या टु विलरस उचलून नेल्या पण एक तशीच ठेवली. "ती केबलवाल्याची आहे , नेणार नाही" हे दुकानदार बोलला. अशा बऱ्याच भानगडी असतात.)) डिशटिवीचे प्याकेज डिशटिवी_डॅाट_इन साइटवर आहे. चानेल सिलेक्ट करून सबमिट केल्यावर मेसेज आला आणि टिविवर लगेच नवीन निवड दिसायलाही लागली. ट्राइच्याबरोबर बोलणी करून डिटीएच वाल्यांनी फी वाढवून घेतली. ती पुर्वी टॅक्स धरून १०० रु होती ती १५३ झाली याचा अर्थ जुनेच सर्व चानेलस घेतलेत तर साठ-सत्तर रुपये अधिक द्यावे लागणार. पण या सर्व गोष्टींत ग्राहक ते डिटीएच कंपनी असा पारदर्शक व्यवहार असल्यास काम सोपे होते. केबलवाले हे मध्यस्थ म्हणजे गोंधळच.