दिवस तुझे ते ऐकायचे....
नमस्कार ! आज १३ फेब्रुवारी. आज एक विशेष ‘जागतिक दिन’ आहे. काय चमकलात ना? किंवा तुम्हाला असेही वाटले असेल, की हा माणूस लिहिताना एका दिवसाची चूक करतोय. कारण उद्याचा, म्हणजेच १४ फेब्रुवारीचा ‘प्रेमदिन’ बहुतेकांच्या परिचयाचा असतो. पण वाचकहो, मी चुकलेलो नाही. मी तुम्हाला आजच्या काहीशा अपरिचित दिनाचीच ओळख करून देत आहे.
तर १३ फेब्रुवारी हा ‘जागतिक रेडीओ दिन’ म्हणून साजरा केला जातो.
टीव्हीच्या आगमनापूर्वी रेडीओ या श्राव्य माध्यमाने आपल्यावर अधिराज्य केले होते. किंबहुना तो आपला जीवनसाथी होता. त्या काळात आपल्यातील अनेकांचे संपूर्ण शालेय जीवन हे रेडीओच्याच संगतीने पार पडले आहे. तेव्हा त्यावरील शांत बातम्या, माहिती, निवेदने, करमणुकीचे विविध कार्यक्रम आणि सुमधुर जाहिराती ऐकण्यासाठी आपले कान आसुसलेले असायचे. कुटुंबातील अनेकांच्या सकाळच्या आवरायच्या वेळा या रेडीओवरील कार्यक्रमांशी घट्ट निगडीत होत्या. घरातील ज्येष्ठ मंडळी त्यावरील पहाटेचा पहिला कार्यक्रम चुकवत नसत. तर कित्येक तरुण कुटुंबे ही विविध भारतीचा ‘बेला के फूल’ हा रात्रीचा शेवटचा गाण्यांचा कार्यक्रम ऐकल्यावरच झोपी जात.
क्रिकेट आणि अन्य काही खेळांचे धावते समालोचन त्यावर ऐकणे हे रोमांचक व थरारक असे.
घरातील वा मनगटावरील घड्याळांच्या अचूक वेळा या ‘रेडिओ-टाइम’नुसार लावल्या जात ! अनेक व्यावसायिकांना वा गृहिणींना आपले काम करता करता रेडीओची साथसोबत मोलाची वाटत असे; किंबहुना आजही वाटते. त्याकाळी एखाद्या कलाकाराची ओळख समाजात ‘रेडीओस्टार’ म्हणून करून देत असत आणि त्या व्यक्तीलाही त्याचे भूषण वाटे.
माध्यमांच्या इतिहासात डोकावता रेडिओने दीर्घकाळ आपले ‘युग’ गाजवले. त्यानंतर टीव्ही, संगणक आणि आंतरजाल अशी दृक्श्राव्य माध्यमांची प्रगती झाली आणि ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसली. तरीसुद्धा आजही रेडीओवर प्रेम करणारे शौकीन बरेच आहेत. डोळ्यांना ताण नाही आणि आपले काम करतानाही तो ऐकता येणे ही त्याची वैशिष्ट्ये अबाधित आहेत. आजच्या टीव्हीवरच्या झगमगाटाशी तुलना करता तर रेडीओची ‘शांत’ प्रवृत्ती अधिकच भावते. किंबहुना गेल्या दोन दशकांत रेडीओने देखील कात टाकून श्रोत्यांना अधिक आपलेसे केले आहे.
तर असे हे सुश्राव्य माध्यम विस्मरणात जाऊ नये म्हणूनच या जागतिक दिनाची संकल्पना पुढे आली. प्रथम ती २०११च्या ‘युनेस्को’च्या बैठकीत मांडली गेली. त्यानंतर २०१२ पासून दरवर्षी हा जागतिक दिन साजरा केला जातो. आता १३ फेब्रुवारी हाच दिनांक म्हणून का निवडला गेला? तर १३/२/१९४६ला संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) आपली रेडीओ सेवा चालू केली होती, त्याची आठवण म्हणून.
तर अशा या आजच्या दिनी सार्वजनिक स्तरावर काही कार्यक्रम साजरे होतीलच. माझा हा धागा काढण्याचा उद्देश आता सांगतो. आपल्या गतायुष्यातील रेडीओच्या कार्यक्रमांच्या अनेक आठवणी आपल्याजवळ असतील. त्यांची इथे उजळणी आपण करूयात. आजही आपल्यातील काहीजण दिवसाचे काही तास रेडीओ ऐकत असतील. पण आपण जरा पूर्वीच्या काळाचे स्मरणरंजन करूयात. विशेषतः तो काळ, जेव्हा ‘सरकारी रेडीओ’ हेच श्राव्य माध्यम लोकांसाठी उपलब्ध होते. त्याच्या जोडीला आजच्या सरकारी आणि खाजगी रेडीओ वाहिन्यांबद्दलही लिहायला हरकत नाही.
आता थोडे ‘रेडीओ’ उपकरणांबद्दल. पूर्वी भला मोठा रेडीओ, मग ट्रांझिस्टर, खिशात मावणारा रेडीओ आणि आता मोबाईलमधले रेडीओ- अॅप अशी स्थित्यंतरे आपण पाहिली असतील. त्याच्या गमतीजमती देखील लिहा. कोणे एके काळी रेडीओ ऐकण्यासाठी सशुल्क सरकारी परवाना काढावा लागत असे. तसेच त्याचे वार्षिक नूतनीकरणही पोस्टात जाऊन करावे लागे. हे ऐकून आताच्या तरुणांना चक्क हसू येईल ! माझ्या आठवणीनुसार तो परवाना प्रकार १९८० –८२ दरम्यान मा. वसंत साठे हे केंद्रीय नभोवाणी मंत्री असताना रद्द करण्यात आला होता (चू भू दे घे). त्यानंतर खऱ्या अर्थाने रेडीओ-सेवा ही जनतेसाठी ‘फुकट’ उपलब्ध झाली.
....
रेडीओ दिनानिमित्त सुरवातीस एक विचार मनात आला होता. तो म्हणजे १९७०-९० दरम्यानच्या माझ्या काही रेडीओच्या आठवणींचा एक लेख लिहावा. परंतु, नंतर लक्षात आले की त्याचा आवाका मोठा आहे आणि वैयक्तिक स्मरणशक्तीला मर्यादा आहेत. तेव्हा हा विषय माझ्या एकट्याच्याने पेलणे अवघड आहे. त्याऐवजी आपण सर्व इच्छुकांनी मिळून इथे स्मरणरंजन करावे हे उत्तम.
....
तर असा आहे या धाग्याचा उद्देश. याचबरोबर या ‘आकाशवाणी’वरील माझे निवेदन संपले ! आता तुमच्या प्रतिसादांचे स्वागत.
*********************************************
चित्र जालावरुन साभार.

वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान लेख आणि कल्पना.
वन, धन्यवाद.
तो फोटोतला रेडीओ फारच आवडला.
आठवण
पुणे केंद्रावरच्या बालोद्यान
छान आठवणी !
मस्तं !
रेडिओमुळे अनेक गीतांचे गीतकार
"आईये अब सुनते है आशा भोसले
रेडीयो दिन
छान आठवणी !
अजून काही..
सहमत
सहमत
सहमत
सहमत
बिनका गितमाला, आपली आवड,
अजून काही आठवणी
मस्त लिवलंय कुमारसाहेब ..
हो न मला पण रेडीओ विकत घ्यावा
क्वालिटी!
जरूर घ्या,
हि लिंक बघा , आवडेल तुम्हाला ! याच विषयावरची आहे !
धन्यवाद,
रविवारी विविध भारतीवर दुपारी
धन्यवाद.
झुमरी तलैया >> हे काल्पनिक
झुमरी तलैया >> हे काल्पनिक
'भूले बिसरे गीत', बेला के फूल आणि बिनाका
मराठी, संस्कृत आणि उर्दूतली
बापरे, रेडिओच्या लेखामुळे
क्रिकेट बद्दल
छान लेख!
गहजब ! धमाल !
छान स्मरणरंजन !
छान स्मरणरंजन !
रेडियो ऐकंत अभ्यास
शिवतांडवस्तोत्र
सुषमा स्वराज यांचं पूर्ण
धन्यवाद
मस्त!
आपलं आवडत गाणं संग्रही असलं
ल भा, सुंदर आठवणी !
वाह मस्तच
लई भारी,
जगभरातील रेडिओ ऐकण्याची सोय
भरपुर आहेत.https://www.google
छान आठवणींना उजाळा
छान स्मरणरंजन !
रेडीओ