कवी संजीव यांची क्षमा मागून
मूळ गीत - सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी देशाला मिळून लुटाया...
वेड्या बहिणीची रे वेडी माया || धृ ||
माया माहेराची बोफोर्स दलालीची...
'इकडून' घातली भर पाचशे कोटींची...
गिळलेल्या जमिनीची झाली चौकशी तयार आम्ही नाटक कराया...
वेड्या बहिणीची रे वेडी माया || १ ||
येता निवडणूक साडी नेसावी...
आई - भावासाठी मते मागावी...
चमचांचा सागर नाचतो समोर आपली निष्ठा दाखवाया...
विमानातून काही हाती आले नाही, कोकलतो भाऊराया रे...
वेड्या बहिणीची रे वेडी माया || २ ||
- यतिन भट
जबरदस्त !! एक नंबर ओरिजीनल !!
छान
तुमची परवानगी गृहित धरून व्हाट्सएप ला फॉरवर्ड करतो = )
बिनधास्त!
लै म्हणजे लै म्हणजे लैच आवडले
आता पुढचे कोणते गाणे येणार त्याची उत्सुकता लागली आहे
पैजारबुवा,
=))
आवडले
वाट लावली मिपाची तरी अजून समाधान होईना. हे दोन्हीकडच्या लोकांसाठी आहे. एकाने चिखल फेकला की, दुसर्याने शेणाचा गोळा उडवलाच पाहीजे.
बहोत खूब , बहोत खूब
खिलजी खुश हुआ
जबराव जबराव जबराव
हम जब खुश होते हय
जबराव जबराव बोलते हय
प्रतिविडंबन