Skip to main content

[शशक' १९] - निरागस

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 05/02/2019 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळची लगबग. ससुल्याला प्रांगणला पाठवायची व तिला ऑफीसला पळायची घाई. केवळ दीड वर्षाच्या, शांत झोपलेल्या पोटच्या गोळ्याला तिने पापे घेऊन उठवलं. त्याचं आवरायला सुरुवात केली. मनात विचार. डबा रोज संपलेला असतो म्हणजे नीट जेवत असणार, रोज हसून बाय करतो म्हणजे त्याला पाळणाघर आवडलंय. महिनाभरापासून लागलेल्या अपराधीपणाच्या बोचणीतून सुटका होणार या समाधानाने तिने नि:श्वास सोडला. कपडे घालताना तो तिला बिलगू लागला. तिच्या अंगावर रेलू लागला. तिलाही ते हवं होतं पण घड्याळाकडे बघून तिने मन आवरलं. रिक्षाचा आवाज येताच तो रिक्षापाशी चालत गेला, आणि मागे वळून म्हणाला “आई! मी पांगनमदे तुदी वात बगून येतो. बाय!” आणि ती आसवांच्या पडद्याआडून हात हलवत राहिली..........

वाचने 18677
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

बिच्चारा ससुल्या पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आरारारा! लै बिचारं प्वार न त्याची आय. हा ससूला नशीबवान याची आय त्याला काय वाटत आसल ते समजून टिप गाळती. आमाला ल्हानपनी येवडा हानलंय आमच्या आय नि बापुस न कि असं कुटं प्रांगन बिंगन ला पाटीव्हल असतं तर उड्या मारत गेलू अस्तू +11111111 लै चोपला गेलेला चोपदार

:( +१

आवडली.

कथा आवडली, पण ससुल्याच्या स्थितीचं वाईट वाटलं.

+१.

आवडली!

+१

+१ Sandy

+१

खरंच भावुक होती ओ शशक .. वाईट वाटलं आणि चित्र उभं राहील त्या पाळणाघरातल्या मुलांचं .. त्याच ते निरागस भावविश्व् , आई किंवा बाबा आता येतील मला घरी घेऊन जायला . वेळ तर कळत नाही , त्यामुळे चिमुकल्याना वाट बघण्याशिवाय पर्याय नसतो . खात्री आहे मला कि हि कथा ज्या पण कामावर जाणाऱ्या महिला वाचतील , त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही .

आवडली.

+१

आवडली

+१

आवडली

+१ कटू वास्तव पण आई वडील तरी काय करणार बिचारे :(

ला कि हि कथा ज्या पण कामावर जाणाऱ्या महिला वाचतील , त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही . +१ नक्कीच माझं बाळ १० महिन्यांच आहे. ऑफिसच्या पहिल्याच दिवशी अगदी धाय मोकलुन रडले होते मी ऑटोत आणि ऑफिसला जाईपर्यंत. तिला ठेऊन जाताना अपराधी वाटतं खुप पण नाईलाज आहे, काय करणार? बाकी कथा आवडली.

अगदी खरं. पहिल्या बाळाला आई/वडील घ्यायला आले की त्याक्षणापासून खिडकीत बसून आपल्या पालकांची वाट बघणारी पाळणाघरातली चिमुकली आठवली. पण आई-बाबा देखील संसार चक्रात अडकलेले आहेतच की

अगदी खरं. पहिल्या बाळाला आई/वडील घ्यायला आले की त्याक्षणापासून खिडकीत बसून आपल्या पालकांची वाट बघणारी पाळणाघरातली चिमुकली आठवली. पण आई-बाबा देखील संसार चक्रात अडकलेले आहेतच की

.

.

+१

+१ आईची वाट बघण्यासाठी पोरगं पाळणाघरात जातं. निरागसता सरसरून बोचली.

+1

थोड्याफार फरकाने रोजची सकाळ अशीच.