Skip to main content

[शशक' १९] - गॅस चेंबर

[शशक' १९] - गॅस चेंबर

Published on 05/02/2019 - 11:00 प्रकाशित मुखपृष्ठ
"मला बाहेर काढा हो, मला बाहेर काढा." सहाव्या मजल्यावर अडकलेल्या लिफ्ट मध्ये फक्त तो एकटाच जीवाच्या आकांताने ओरडत होता. "पहिल्यादाच लिफ्ट मध्ये चढलाय वाटत." अशा नजरेने त्याच्याकडे बघत उर्वरित सहा जण स्थितप्रज्ञाप्रमाणे उभे होते. "जनरेटर पाच मिनिटात सुरु होईल," बाजूचा म्हातारा समजावत त्याला म्हणाला. "हात जोडतो हो, पाया पडतो कुणी तरी बाहेर काढा मला." पुन्हा कितव्यांदा तरी त्याची आरोळी घुमली. अन तशीच विरली. बाहेरून कुणाचाच प्रतिसाद नाही. अखेरीस कसोशीने दाबून ठेवलेला त्याचा बांध फुटला. "शेवटचा वडा उचलायलाच नको होता." तो मनोमन म्हणाला. "लिफ्ट उघडा लवकर," नाक मुठीत धरून सहाही जण जीवाच्या आकांताने ओरडत होते. अन तो एकटाच उभा होता स्थितप्रज्ञाप्रमाणे.

याद्या 49646
प्रतिक्रिया 82

अगागा... लैच खतरनाक, असली भयंकर शिक्षा वैर्‍यालाही न होवो पैजारबुवा,

+१ लै म्हणजे लै म्हणजे लैच भारी !! लिफ्ट बंद असल्यास बारा-पंधरा माजले चढून लेखकाला सलाम करायला येईल..

हाहाहा. अरे काय चाललय हे...! खुसखुशीत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल.

फदफदून हसलो! -गा.पै.

+१ हायला मस्त हदुन हसून बेजार.

In reply to by जव्हेरगंज

याचबरोबर, "+१ न लिहिता फक्त प्रतिसाद लिहिला तर गुण दिला असे समजले जाणार नाही" असे सुद्धा सांगणे जरूरीचे आहे असे वाटते. कारण, सकारात्मक प्रतिसाद दिलेल्यांपैकी काहींनी मान्य पद्धतीने मतदान केलेले दिसत नाही.

भारी !! जीव बाकी कासावीस होतो असा प्रसन्ग आल्यावर हे खरे :-) पुर्वी कंपन्यांमधे छोट्या बंदिस्त कॉम्पुटर केबिन असायच्या.त्यात काही महाभाग बिन्धास्त सायलेंट बाँब सोडून द्यायचे.

=)) =)) अगदिच कसनुसं लिहिलय =))

धत्त तेरी, सोसना भार घामाघुम झालं अंग लिफट ला उदवाहक का म्हणतात ते समजलं!