“ बघ हं .. वाटतं तितकं सोप्पं नसतं सगळं , नाई ! आत्ता हो म्हणशिल पण नंतर मन खाइल तुझं तुलाच .“ ह्यावर दरवेळेला माझं “बघु तेव्हाचं तेव्हा “ एवढच उत्तर असायचं . भरकटत चाललेय हे जाणवत असतानाहि स्वताहाला वाहवुन जाउ देत होते मी . तो माझी वाट बघायचा एवढं एक कारण पूरेसं होतं माझ्या बेताल वागण्याला . त्याला कळायचं , माझं जरा जास्तच मागे लागणं वगैरे , मला काहि फरकच पडत नव्हता . जेव्हा , जसं जमेल तसं भेटायचो . व्यसनाधीन झाल्यासारखं . त्याच्यासोबत रहाणं , वेळ घालवणं , हिंडणं , फिरणं . खर्या अर्थाने लाइफ जगले ,मुंबईचा एकहि बीच सोडला नाहि .
एकदा तर ट्रेन साठी प्लॅटफॉर्म वर उभं असताना , इकडच्या ट्रेन मधुन पलिकडच्या रुळावर उडी मारणारा त्रुतिय पंथी इसम , त्याच्या अंगावरुन त्याचे तुकडे करत निघुन गेलेली ट्रेन , हे सगळं पाहुन घाबरलेली मी , मला एवढ्या गर्दितहि त्याने घट्ट मिठी मारली होती . थरथरणारा देह मिठीत आधार शोधत होता आणि तो मिळालाहि . मग ऑफिसला गेलोच नाहि . दिवसभर भटकलो. गोरेगाव , बोरीवलीच्या आधल्या मधल्या रस्त्यावर ,कोणीच ओळखीचं भेटणारं नव्हतं तिथे याची खात्री होती दोघांनाहि .
मला कळलं होतं , त्याचा जीव अडकला होता माझ्यात पण कधीच माझ्या मागे येणं , मस्का मारणं , मागे पूढे करणं , सतत कॉल करणं असलं काहिहि त्याने कधीच केलं नाहि . हो , पण संधी साधुन घरी येणं , बहाणे करुन भेटणं , बोलताना पापणी न पडु देता डोळ्यात डोळे घालुन पहाणं , हळुवार स्पर्श पण नकळत झालाय बरका ! असा आव आणणं मात्र त्याला भारी जमायचं .
एकदा बोरिवलीच्या नॅशनल पार्कला गेलो ,अगदि पर्फेक्ट प्लानिंग करुन . दोघांनी ऑफिसात दांडी मारण्यापासुन ते कोणी भेटलच तर काय बोलायचं इथपर्यंत प्लानिंग. फारच स्मार्ट दिसत होता तो . व्यवस्थित ठरवुन केलेलं पहिलं डेटिंग . दिवसभराचा प्लान . सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत एकत्र वेळ घालवायचा . पार्कात एन्ट्री झाली . वयाची एकविस वर्ष मुंबईत घालवुनहि पहिल्यांदा मी त्या पार्कात गेले होते तेहि त्याच्या सोबत . घनदाट जंगल , जितकं आत जाऊ तितकी दाट झाडी . फारच सुनसान , वर्दळ फारच तुरळक .पण त्याच्यासोबत भिती नाहि वाटली . विश्वास होता माझा त्याच्यावर . बराच वेळ चालत गेल्यावर एका शांत रस्त्यावर थांबला तो . अगदि मधोमध . तिथे फक्त मी , तो आणि घनदाट झाडी ह्यापलिकडे काहिच नव्हतं . हातात हात घेऊन त्याने माझ्याकडे नेहमीच्या सवयीनेच डोळ्यात पाहिलं . तिथला एकांत त्याला झेपला नाहि . इतकावेळ धरुन ठेवलेला संयम सुटला , घट्ट बिलगला , त्याच्या श्वासांची लय जानवली .
ओठांवर ओठ टेकताच असंख्य शहारे फुटले . वेगळीच नशा होती ती .आयुष्यातला पहिला किस्स .. तोहि इतक्या रोमँटिक वातावरणातला ,एकांतातला . दोघांच्या संमतीनं घडलेला . आजहि तो स्पर्श माझ्या ओठात अडकलाय .. स्वताहाचं अस्तित्व ठेवुन माझ्या त्या सुंदर क्षणांना ताजं ठेवत जगलाय .
असं मग बर्याचदा ठरवुन भेटायचो , भटकायचो . बस च्या , ट्रेनच्या वेळा गाठणं , झालाच उशिर तर अंधेरीच्या गणपती मंदिरात भेटणं , तिथुन रिक्षाने घरी . एकाच तर एरियात रहात होतो , त्यामुळे दोघांनाहि ओळखणारी मंडळी , आम्हाला एकत्र पाहुन सहज “ लफडं “ असणार असा लेबल लावणार , म्हणुन सावधगिरी बाळगावी लागायची. मी बस स्टॉप वर उतरायचे आणि तो रिक्षाने चाळीच्या गेटवर जायचा . मग अगदि एकमेकांसमोर आलोच तर “ अरे ... आत्ताच आलास का ? कोणत्या बसने ? दिसला नाहिस तो ?? “ अगदि सहज डायलॉग मारायचे मी .
एकदा तो ऑफिसच्या गेटवर न्यायला आला , नवी बाइक घेतली होती त्याने , सर्प्राइझ द्यायचं होतं . “ मागच्या सीटवर बसायचा पहिला मान तुझा “ असं म्हणाला , मला खुप वेगळच वाटलं ..
आयुष्यात पहिल्यांदा बाइकवर तेहि त्याच्या मागे बसताना मी जरा जास्तच प्राऊड फील केला , तो मला सहारा एअर्पोर्ट वर घेऊन गेला .पहिली बाईक राईड . शांत रस्त्यावर फक्त रस्त्याकडेच्या लाईट्स , जागोजागी हिरवळीने भरलेल्या , फुलांनी लगडलेल्या छोट्या छोट्या बागा , मोठा उड्डान पूल आणि पुलाच्या एका कडेला बुटक्या कट्ट्यावर हातात हात घातलेले , खांद्यावर डोके टेकवलेले कपल्स , रीलॅक्स , कूल प्लेस टू मीट लवबर्ड्स . बाइकवरुन उतरुन आम्हिहि त्यांच्यातले एक झालो . त्यादिवशी त्याने खुप गप्पा मारल्या , फ्युचर बद्दल भरभरुन बोलला . आवडला होता मला तो त्यादिवशी , नेहेमीपेक्षा जरा जास्तच .
एकदा त्याने ऑल द बेस्ट नाटकाची तिकिटं आणली , फॅमिलिसोबत जायचा प्लान होता त्याचा , तरिहि एक तिकिट एक्स्ट्रा आणुन , मित्राने तिकिट्स काढुन झाल्यावर हातात ठेवलं असं सांगुन मला न्हेन्याचा फुल्प्रूफ प्लान बनवला . मी गेलेहि , पण बाजुबाजुला बसायला मिळेल का ?? हे टेंशन होतं , मग हलकाच हात दाबुन “ तु शेवटी रहा “ असा इशारा देऊन तो विंगेत सगळ्यात पहिला घुसला , सगळ्यांना सीटवर बसवत बसवत बाहेर आला आणि पटकन माझ्या शेजारी बसला , काय डोकं लावलं होतं , जबर्दस्त . कोणालाच त्याच्या प्रेमळ हेतु बद्दल शंका आली नसावी इतका सुंदर अभिनय . मी पून्हा प्रेमात पडले .लाईट्स डीम होताच हातात हात गुंफले , अन मी फक्त तुझीच .. एवढच काहिसं दर्शवता आलं .
आम्हि बर्याचदा एकमेकांच्या सहवासात रहाण्याचा प्रयत्न करायचो . मी त्याच्या घरी जायचे , तो माझ्या घरी यायचा . गर्दितहि आम्हि एकमेकांशी नजरेनं बोलायचो . सहज निसटता स्पर्श असायचा , बोलताना नजर चंचल झाली की समजुन जायचं, “ उद्या ८:३० , पहिली बस “ हा मेसेज . एकटक डोळ्यात बघणं , मी नजर चोरलीच तर “ तुझं लक्ष नाहिये माझ्याकडे “ असं सहज बोलुन जायचा तो , पण खरच सांगु का , प्रत्येकवेळी नव्यानं प्रेमात पडायचे मी त्याच्याकडे पाहुन .
वेडी होते त्याच्यासाठी . एखादा दिवस न भेटता जाणहि मंजुर नव्हतं मला .धडधडायचं काळीज त्याला दुसर्या मुलीसोबत साधं बोलताना बघितलं तरिहि .
आयुष्यातले ते सोनेरी दिवस आजहि आठवले तरी मी अलगद त्या क्षणांवर ताबा मिळवते .आपण इतकं कुणासाठी तरी वेडे होतो ?? आणि तो हि आपल्यात अडकला होता ? खुप प्रश्न विचारुन उगाच आनंदुन जाते . त्याला आजहि आठवुन ओठातला तो पहिला स्पर्श ताजा होतो , ओठावर हसु उमलतं . कधी निसटले हात हातातुन ते आठवण्यापेक्षा मी सहवासातले क्षण आठवते , खुश होते .
पण खरच तो माझा पहिला क्रश होता .
पहिला क्रश ..
वाचने
5204
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
+ 1111
धन्यवाद
In reply to + 1111 by ट्रम्प
खूप छान लिहीलंय
धन्यवाद.
In reply to खूप छान लिहीलंय by श्वेता२४
छान लिहिलंय...थोडं नॉस्टॅल्जीक व्हायला झालं वाचताना!
:)
In reply to छान लिहिलंय...थोडं नॉस्टॅल्जीक व्हायला झालं वाचताना! by टर्मीनेटर
वाह, क्लासिक. एक नंबर.
धन्यवाद . एकच भाग होता . ;)
In reply to वाह, क्लासिक. एक नंबर. by चौथा कोनाडा
अप्रतिम....
धन्यवाद .
In reply to अप्रतिम.... by शित्रेउमेश
खूप छान.. आवडले लेखन.. पण
प्रतिसादाबद्दल धन्यवाद .
In reply to खूप छान.. आवडले लेखन.. पण by बाप्पू
क्रश हा शब्द योग्य नसावा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद .
In reply to क्रश हा शब्द योग्य नसावा by गवि
खूप छान
धन्यवाद विक्रम :)
In reply to खूप छान by विक्रम चव्हाण
छान!
माफ करा .. प्रतिसाद आत्ता
In reply to छान! by समीरसूर