✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शीघ्र कविच्या तीन कविता

प — प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, Mon, 03/16/2009 - 09:05
एक तांत्रिक कारणामुळे कविता स्वतः कवीने वगळली आहे. दोन आवंढ्यासारखी गिळता येत नाही भळभळणारी कविता मुक्यामुक्यानं जगावं अशी नाही एकही जागा जालावर येतो जरासे सुखाचे क्षण मिळावेत म्हणून, तर इथेही दोस्ताच्या कथेत लहानग्या लेकराला त्याची माय कपाटात कोंडून ठेवते. अन बोटे कुरतडतात त्याची ,उंदीर माझ्या स्वतःच्याच वेगळ्या चिंता असतांना, उगाच चिंता करतो..याची,त्याची.. अन, संस्कृतीच्या नावाने बोंबलतही बसतो. खरं तर या अशाच वेदनांवर एखादा प्रोजेक्ट केला असता, पण आजकाल टीचभर कविताही दमवू लागल्यात साल्या. तीन रस्ते सारेच रस्ते गूलाम निलाम झालेले, श्वानपुच्छ . एक-दोन-तीन-चार म्हणताच जयजयकार करणारे, एखादाच रस्ता असतो गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला, बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा.

प्रतिक्रिया द्या
4954 वाचन

💬 प्रतिसाद (26)

दिलीपशेट!!!

अवलिया
Mon, 03/16/2009 - 09:12 नवीन
दिलीपशेट!!! आजपासुन तुमची प्रा.डॉ. ची झुल आमच्यासाठी संपली.... आजपासुन तुम्हाला आम्ही दिलीपशेटच म्हणणार... सोमवारची सकाळ सार्थकी लागली... सुंदर... अतिशय छान.
एखादाच रस्ता असतो गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला, बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा
मस्त !!!! --अवलिया
  • Log in or register to post comments

सही

सहज
Mon, 03/16/2009 - 09:13 नवीन
लै राग येतो. पण आजकाल टीचभर कविताही दमवू लागल्यात साल्या. बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा. विवा लै लै भारी!
  • Log in or register to post comments

+१

दशानन
Mon, 03/16/2009 - 10:42 नवीन
लै भारी हेच म्हणतो !!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सहमत!

प्रमोद देव
Mon, 03/16/2009 - 10:43 नवीन
विवा लै लै भारी! सहमत आहे. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

कडक!!!

घाटावरचे भट
Mon, 03/16/2009 - 10:29 नवीन
क आणि ड आणि क!!!
  • Log in or register to post comments

कविता/तूर्तास

नंदन
Mon, 03/16/2009 - 11:41 नवीन
आवडल्या, सर. दुसरी आणि तिसरी विशेष आवडली. पहिली तूर्तासमधल्या 'कवी' या कवितेच्या पहिल्या कडव्याचे मिपाकरण म्हणता येईल ना? तसा स्पष्ट उल्लेख हवा, हे माझं वैयक्तिक मत. उगाच कुणाला बोट ठेवण्याची संधी देता कामा नये.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

+१

झेल्या
Mon, 03/16/2009 - 18:30 नवीन
सहमत. उल्लेख आवश्यक होता. मूळ कविता दासू वैद्य यांची आहे. -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

तुर्तास...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/16/2009 - 20:56 नवीन
>>पहिली तूर्तासमधल्या 'कवी' या कवितेच्या पहिल्या कडव्याचे मिपाकरण म्हणता येईल ना? हो, आता 'तुर्तास' शोधल्यावर लक्षात आले, वरील पहिल्या कडव्यांचे 'मिपाकरण' झाले असे समजावी इतकी ती सारखी उतरली आहे. मात्र दासुंची संपूर्ण कविता वेगळ्या आशयाची आहे आणि दुर्दैवाने तशाच कल्पनेच्या नादात (मिपावरील निवासी /अनिवासींच्या चक्रात)तसेच शब्द उतरल्यामुळे सदरील कवितेवरुन आली आहे, उचलली आहे, असे वाटण्यापेक्षा...सदरील कविता वगळत आहे. नंदन आभारी !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

मस्त

आनंदयात्री
Mon, 03/16/2009 - 11:44 नवीन
मस्त कविता प्रा डॉ !!
  • Log in or register to post comments

आवडल्या !

परिकथेतील राजकुमार
Mon, 03/16/2009 - 11:48 नवीन
आवडल्या ! सुंदरच आहेत. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

वा मियां....

बिपिन कार्यकर्ते
Mon, 03/16/2009 - 12:18 नवीन
प्राडॉ..... कब्बी कब्बीच आते, मगर जब्बी आते.... क्या शान मे आते मियां... मस्तच आहेत कविता. २ आणि ३, विशेषतः ३ तर फारच आवडली. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

ते - रस्ते आणि मी - रस्ता

विसुनाना
Mon, 03/16/2009 - 12:26 नवीन
सारेच रस्ते गूलाम निलाम झालेले, श्वानपुच्छ . एक-दोन-तीन-चार म्हणताच जयजयकार करणारे, एखादाच रस्ता असतो गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला, बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा. ही कविता मास्टरपीस आहे. कवि बिरुटे चांगलाच दमदार आहे.
  • Log in or register to post comments

बरोबर

श्रावण मोडक
Mon, 03/16/2009 - 13:45 नवीन
रस्ता - बुद्धालाही युद्धभूमीपर्यंत आणून सोडणारा. वा. एक पाऊल पुढे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

छान कविता, खूप आवडली

नाना बेरके
Mon, 03/16/2009 - 13:05 नवीन
एखादाच रस्ता असतो गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला, बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा. - हे खर आहे.
  • Log in or register to post comments

आठवण आली ..

नाना बेरके
Mon, 03/16/2009 - 13:15 नवीन
काळं बेट, लाल बत्ती - ह्या नाटकाच्या शेवटाची. गुप्त खजिन्याच्या हव्यासापोटी इतर माणसांची हत्या करणार्‍या माणसाला शेवटी खजिना सापडतो आणि तो म्हणजे - "बुध्दाच्या शांततेच्या संदेशाचे भूर्जपत्र "
  • Log in or register to post comments

एखादाच

मदनबाण
Mon, 03/16/2009 - 13:18 नवीन
एखादाच रस्ता असतो गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला, बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा. सॉलिट्ट्ट्ट्ट मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments

प्रा.डॉ.

विनायक प्रभू
Mon, 03/16/2009 - 13:21 नवीन
लै भारी. मदन बाण म्हणतो ते कडवे तर शॉलेट्ट
  • Log in or register to post comments

एखादाच

निखिल देशपांडे
Mon, 03/16/2009 - 14:05 नवीन
एखादाच रस्ता असतो गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला, बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा हे कडवे छानच आहे..... कविता २ सुद्धा छान आहे....
  • Log in or register to post comments

भारी

जयवी
Mon, 03/16/2009 - 14:57 नवीन
अरे क्या बात है राजासाब....... !! एकदम जबरी आहे काव्य.....!! बोले ते एकदम कडक :)
  • Log in or register to post comments

हेच म्हणते..

प्राजु
Mon, 03/16/2009 - 21:49 नवीन
एकदम कडक.. दुसरी आणि तिसरी जास्ती छान आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयवी

छान!!!

उर्मिला००
Mon, 03/16/2009 - 17:44 नवीन
सुंदर लेखन !अभिनंदन
  • Log in or register to post comments

वा .. कविता

लिखाळ
Mon, 03/16/2009 - 18:13 नवीन
वा .. कविता छान आहेत. बुद्धाची विशेष ! पहिल्या कवितेत कल्पना छान आहे. पण अनिवासी घरटी वगैरेने वेगळे वळण लागले असे वाटले. ते तसे पटले सुद्धा नाही. (किंवा मला समजले नाही) अजून कविता वाचायला आवडतील. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

वा वा प्राडॉ!

चतुरंग
Mon, 03/16/2009 - 18:20 नवीन
३ री विशेष आवडली. (बामियानचा बुद्ध आठवला) २ री त्या खालोखाल. पहिली समजली नाही! प्राडॉ लगे रहो! अजून येऊदेत. :) चतुरंग
  • Log in or register to post comments

तिसरी खासच

धनंजय
Mon, 03/16/2009 - 19:45 नवीन
आवडली. दुसरीही त्याच्यापाठी. (पहिली सशक्त असून आवडली नाही. वर काही जणांनी सांगितल्यामुळे "ते परप्रकाशामुळे असावे" असे वाटते - पण मूळ कविता मी वाचलेली नाही.)
  • Log in or register to post comments

मस्त!

क्रान्ति
Mon, 03/16/2009 - 21:43 नवीन
तिसरी कविता एक्दम मस्त! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

असेच म्हंतो

प्रकाश घाटपांडे
Mon, 03/16/2009 - 21:49 नवीन
आपल्याला बी तिसरी जाम आवाडली प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा