रयतेचे राजे..

वेडसर's picture
वेडसर in काथ्याकूट
29 Dec 2018 - 12:09 pm
गाभा: 

भाजप-सेना-कॉंग्रेस... सरकार कुणाचंही असो, अक्षरश: करोडो रुपये खर्च करून समुद्रात बांधले जाणारे शिवस्मारक किंवा वंदनीय श्री भिडे गुरुजींनी योजलेले रायगडावरील ३२ मण सोन्याचे रत्नजडीत सिंहासन!

कशाला इतका खटाटोप? आज महाराजांचे कित्येक किल्ले ओसाड आहेत तिथे आधी डागडुजी करून त्या किल्ल्यांचं देखणेपण राखणे आवश्यक नाही काय?

त्या ऐवजी करोडोअरबो रुपायांचं शिवस्मारक??

आज त्या पैशांची महाराष्ट्रात अन्यत्र अधिक गरज आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेती, आरेग्य, शिक्षण अश्या अनेक गंभीर समस्या आहेत, त्याकरता पैसा लागणार आहे त्याचं काय?

मी खात्रीने सांगू शकतो की खुद्द महाराजांनाही हा वायफळ खर्च आवडणार नाही. कारण शेवटी महाराज हे रयतेचे राजे होते. रयतेचे प्रश्न शिल्लक असताना स्मारकाकरता करोडो रुपये खर्च करणं महाराजांना कधीही आवडणार नाही..

आपलं काय मत?

वेडसर.

प्रतिक्रिया

खिलजि's picture

29 Dec 2018 - 4:49 pm | खिलजि

सहमत आहे , पण इथे या सर्व अनागोंदी कारभाराचा लोकांनी निषेध केला पाहिजे तर परिस्थिती बदलेल अन्यथा हे सर्व असेच चालू राहील ...

वेडसर's picture

29 Dec 2018 - 6:41 pm | वेडसर

True..

टवाळ कार्टा's picture

29 Dec 2018 - 6:44 pm | टवाळ कार्टा

अश्या स्मारकाचे समर्थन करणारे काही जवळचे मिपाकर माहीत आहेत

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Dec 2018 - 5:22 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

स्मारक बांधण्यात काही गैर नाही शेतकर्यांचे प्रश्न, वीजेचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न असताना त्याची गरज नसावी.

"त्या ऐवजी करोडोअरबो रुपायांचं शिवस्मारक??"

इंग्रजीत ह्याला "identity politics" का काय ते म्हणतात. म्हणजे "आम्ही किल्ल्यांची डागडुजी केली ह्यापेक्षा "आम्ही चौकात भव्य पुतळा उभारला" हे विधान जास्त आकर्षक वाटते सामान्य मराठी मतदाराला असे आमचे मत.

चामुंडराय's picture

31 Dec 2018 - 4:04 am | चामुंडराय

>>>>> हे विधान जास्त आकर्षक वाटते सामान्य मराठी मतदाराला असे आमचे मत.

माईसाहेब,

सावध व्हा. बेअरिंग सुटतेय.

हे विधान जास्त आकर्षक वाटते सामान्य मराठी मतदाराला असे आमच्या ह्यांचे मत.

असे हवे.

वेडसर's picture

30 Dec 2018 - 7:52 pm | वेडसर

Hmm.. सहमत्त आहे..

डँबिस००७'s picture

31 Dec 2018 - 1:33 am | डँबिस००७

वेडसर,
तुमचा मुद्दा मान्य आहे पण ,

एकदा एक उच्च शिक्षीत (उशि)आपल्या व्यसनी मित्राला (व्यमि) समजाउन सांगत होता की व्यसन कस वाईट ! उशि: दिवसातुन किती रुची सिगरेट व दारु विकत घेतोस?
व्यमि : १००० रु रोज.
उशि: याचा अर्थ महीन्याचे ३०,००० आणी वर्षाचे ३,६०,००० . ह्या रेट ने १५ वर्षांत तुझ्याकडे मोठी आलिशान गाडी असती !!
व्यमि: सर , तुम्हाला कोणतेही व्यसन नाही मग तुमची आलिशान गाडी कुठे आहे ?

Chandu's picture

31 Dec 2018 - 1:45 am | Chandu

Point is valid but undigestable

Chandu's picture

31 Dec 2018 - 1:45 am | Chandu

Point is valid but undigestable

सुहासवन's picture

7 Jan 2019 - 1:07 pm | सुहासवन

समाजात एक आदर्श निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून जे महान होते त्यांचे स्मारक बनविणे आणि समाजापुढे तो आदर्श सदैव राहिल हे पाहाणे सरकार आणि जनतेचे एक कर्तव्य आणि त्या महान व्यक्तिप्रित्यर्थ एक क्रुतार्थ भावना म्हणून पाहिले पाहिजे. अर्थात खर्च किती आवाक्यात ठेवावा हे तर पाहिलेच पाहिजे.

गामा पैलवान's picture

7 Jan 2019 - 1:44 pm | गामा पैलवान

वेडसर,

तुम्ही म्हणता की खुद्द महाराजांनाही हा वायफळ खर्च आवडणार नाही. इथे एक प्रश्न पडतो की, सिंहासनाचा खर्च वायफळ म्हणावा का? तसा म्हंटला तर खुद्द महाराज कशाला सिंहासन निर्माण करून त्यावर बसायला गेले? ते ही इंद्राभिषेक या विस्मृतीत गेलेल्या रीतीचं पुनरुज्जीवन करून?

आ.न.,
-गा.पै.