मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वैद्यक नोबेल-संशोधन भाग ९ : HIV चा शोध

हेमंतकुमार · · जनातलं, मनातलं

वाचने 37934 वाचनखूण प्रतिक्रिया 42

वन Mon, 12/17/2018 - 12:29
ही मालिका रंगतदार होत आहे. अनेक धन्यवाद. हा विषाणू ‘रेट्रोव्हायरस’ या विशिष्ट गटात मोडतो आणि त्याचे २ मुख्य प्रकार असतात. >>>>> या दोन प्रकारांच्या तीव्रतेत काही फरक असतो का?

हेमंतकुमार Mon, 12/17/2018 - 13:24
वन,आभार. HIV-१ च्या तुलनेत २ हा कमी आक्रमक असतो. २ मुळे झालेल्या संसर्गातून एड्सकडे मार्गक्रमण हळू होते. तसेच त्याची प्रसार करण्याची क्षमता १च्या तुलनेत काहीशी कमी असते.

सुधीर कांदळकर Tue, 12/18/2018 - 13:52
असा विषय अतिशय सोप्या भाषेत मांडलात. धन्यवाद. तरी अनेक प्रश्नांनी डोकी वर काढलीच. व्हायरस आणि रिट्रोव्हायरस यातील फरक ठाऊक नाही. रच्याकने: सुप्रसिद्ध विज्ञानसाहित्यिक आयझॅक अ‍ॅसिमॉव्ह यांना हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर दिल्या गेलेल्या रक्तातून या रोगाच्या विषाणूचा संसर्ग झाला होता.

हेमंतकुमार Tue, 12/18/2018 - 14:51
विषाणूंचे दोन प्रकार असतात: DNA-v व RNA-v. १. DNA-v हा मूलभूत तत्वानुसार चालतो. म्हणजे त्यापासून पेशींचा RNA व पुढे प्रथिने तयार होतात. २. RNA-v हा ‘उलट्या डोक्याचा” आहे ! म्हणजे त्यापासून DNA तयार होतो. त्यासाठी त्याच्याकडे एक विशिष्ट एन्झाइम (reverse transcriptase) असते. इथे पेशींचे मूलभूत तत्व चक्क उलटे होते.म्हणून तो झाला retrovirus

टर्मीनेटर Wed, 12/19/2018 - 12:48
मालिकेतील हा लेखही छानच.
मुळात हा खतरनाक विषाणू माणसात आला कुठून याचे संशोधकांना कुतूहल होते. हा शोध घेता त्याचे मूळ मध्य व पश्चिम आफ्रिकेत सापडले. तेथील चिम्पान्झी आणि अन्य काही माकडांना त्याचा संसर्ग होतो. २०व्या शतकाच्या मध्यात या प्रदेशांत माणसे वृक्षतोडीसाठी ट्रकने जाऊ लागली. त्या दरम्यान ती तेथील वन्य जिवांच्या शिकारी आणि त्यांचे मांसभक्षण करू लागली. त्यातूनच कधीतरी एखाद्या HIV संसर्ग झालेल्या मांसातून हा विषाणू माणसाच्या संपर्कात आला.
याच बरोबर मध्य व पश्चिम आफ्रिकेतील जंगली जमाती/आदिवासी लोकांमध्ये पुरुषांची लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी माकडांचे रक्त जननेंद्रियावर लावण्याच्या अंधश्रद्धेतून या विषाणूंचा संपर्क मानवाशी आला, आणि अशा बाधित व्यक्तींशी आलेल्या शरीरसंबंधांमुळे त्याचा उर्वरित जगात प्रसार झाल्याचेही वाचनात आले होते. लेख आवडला, पुढील लेखनास शुभेच्छा!

In reply to by टर्मीनेटर

हरवलेला गुरुवार, 12/20/2018 - 11:00
"वन्य जिवांच्या शिकारी आणि त्यांचे मांसभक्षण" हे आफ्रिकेत नवीन नाही. हजारो वर्षांपासून तेथील आदिवासी जमाती हे करत आहेत. पण त्यांना "HIV" ची लागण होण्यास विसावे शतक उजाडावे लागले. हे कारण पटण्यासारखे नाही. तसेच त्यांच्या "अंधश्रद्धा" ही नवीन नाहीत. "AIDS" ही लिंक मांसभक्षण हेच कारण स्पष्ट करते. पण बाकीचे प्रश्न अनुत्तरित राहतात. आफ्रिकेतील रोगांच्या इतिहासाच्या अभ्यासाची गरज आहे. तसेच जर १९ व्या शतकाच्या आधी एड्स मुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे अवशेष मिळाले तर मांसभक्षण या तर्काला पुष्टी मिळेल.

In reply to by हरवलेला

हेमंतकुमार गुरुवार, 12/20/2018 - 12:15
कदाचित असेही असेल. तेव्हाही या रोगाने माणसे मरत असतील. पण, तेव्हा सध्याच्या रोगनिदान पद्धती नसल्याने त्या रोगाला ‘नाव’ दिले गेले नाही. असे अन्य काही रोगांच्या बाबतीतही लागू आहे .

In reply to by हरवलेला

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/20/2018 - 13:48
HIV विषाणू... १. हा विषाणू निरोगी त्वचा/श्लेष्मल त्वचा यांना भेदू शकत नाही. त्यामुळे, त्यांच्यावर पडलेल्या दुषित रक्त अथवा इतर शारिरीक स्त्रावांमुळे (वीर्य, थुंकी, इ) संसर्ग होत नाही. मात्र, त्वचेवर/श्लेष्मल त्वचेवर व्रण असल्यास तो त्यामार्गे रक्तात पोचून आजार निर्माण करू शकतो. २. हा विषाणू उष्णतेने नष्ट होतो. त्यामुळे, शिजवलेले दुषित मांस (किंवा इतर कोणतेही शिजवलेले दुषित अन्न) खाल्ल्यामुळे त्याचा संसर्ग होऊ शकत नाही. मात्र, दुषित कच्चे मांस खाणार्‍या माणसाच्या तोंड अथवा जठरात व्रण असल्यास त्याला संसर्ग होऊ शकेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हेमंतकुमार गुरुवार, 12/20/2018 - 14:06
धन्यवाद. हेच लिहायला आलो होतो आणि तुमचा सुयोग्य प्रतिसाद दिसला. वेगळ्या शब्दात : या विषाणूचा प्रसार हा थेट रक्तामार्फत(blood borne) होतो. "अन्नातून (food borne) "नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हेमंतकुमार गुरुवार, 12/20/2018 - 14:09
धन्यवाद. हेच लिहायला आलो होतो आणि तुमचा सुयोग्य प्रतिसाद दिसला. वेगळ्या शब्दात : या विषाणूचा प्रसार हा थेट रक्तामार्फत(blood borne) होतो. "अन्नातून (food borne) "नाही.

In reply to by हेमंतकुमार

वन गुरुवार, 12/20/2018 - 15:20
डॉ सुहास म्हात्रे व डॉ कुमार १, उत्तरा साठी अनेक धन्यवाद. या धाग्यावरील आणि लेखमालिकेतील चर्चेमुळे खूप उपयुक्त माहिती मिळत आहे.

In reply to by हेमंतकुमार

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/20/2018 - 22:52
HIV विषाणूपिडित व्यक्तीचे रक्त अथवा इतर जैवद्रव (बायॉलॉजिकल फ्लुइड्स; उदा: semen, pre-seminal fluid, rectal fluid, vaginal fluid, saliva, इत्यादी) दुसर्‍या व्यक्तीच्या रक्तात मिसळले तरच केवळ HIV संक्रमित होतो. उदा : असुरक्षित यौनसंभोग, गुदसंभोग, विषाणू बाधित व्यक्तीने वापरलेल्या सुईने नशेची औषधे टोचून घेणे, विषाणूयुक्त रक्तदान/रक्तसंक्रमण, तोंडात व्रण असलेल्या पिडीत व्यक्तीचे उघड्या तोंडाने दीर्घ चुंबन, इ. याशिवाय, शरीरात जास्त प्रमाणात विषाणू असलेल्या स्थितीत मातेच्या दुधातून तो बाळामध्ये संक्रमित होण्याची शक्यता असते. या संक्रमणाविषयी अजून संभ्रम आहेत. सद्या तरी धोकाप्रतिबंध म्हणून अश्या प्रकारच्या मातांनी मुलाला स्तनपान करू नये असा सल्ला आहे. स्पर्श करणे, अश्रू/लाळ पुसणे, बाजूला बसणे, एकत्र खाणे-पिणे, कपाळ/गालाचे चुंबन, तोंड बंद ठेवून घेतलेले ओठांचे चुंबन, एकच बाथरूम वापरणे, हवा, पाणी, पाळीव प्राणी, कीटक, इत्यादींमुळे HIV चे संक्रमण होत नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हेमंतकुमार Fri, 12/21/2018 - 09:51
तोंडात व्रण असलेल्या पिडीत व्यक्तीचे उघड्या तोंडाने दीर्घ चुंबन, इ. >>>>> एक शंका बरेच दिवस मनात आहे. आपण काही चित्रपट व मालिकांत अशी चुंबनदृश्ये पाहतो. ती चित्रित करताना संबंधित कलाकारांना एकमेकाबद्दल (बाधित नसल्याची) खात्री असते का? का ते फिकीर करत नाहीत?

In reply to by हरवलेला

हेमंतकुमार Fri, 12/21/2018 - 17:58
हरवलेला, धन्यवाद. सदर दोन्ही लेख वाचले. म्हणजे अशा प्रकारे चुंबन घेणाऱ्या जोडीत: १. एकाला संसर्ग झालेला असणे, आणि २. दोघांच्याही तोंडात जखमा असणे आवश्यक आहे . तरच पहिल्याच्या रक्तातून लाळेत व पुढे दुसऱ्याच्या लाळेतून रक्तात असा तो प्रसार होईल.

In reply to by हरवलेला

चुंबनाद्वारे HIV अतिशय दुर्मिळ आहे. आतापर्यंत एकच केस आढळून आली आहे. आजाराच्या संक्रमणाची एखादी पद्धत किती दुर्मिळ आहे, यापेक्षा तो असाध्य आणि/अथवा गंभीर आहे की नाही* , हे परिणामांच्या दृष्टीने फार फार जास्त महत्वाचे असते. कारण, संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी ज्याला आजार होतो, त्या व्यक्तिला १००% गंभीर धोका होतो... तेथे आकडेवारी (statistics) कामी येत नाही ! ========= * प्रस्थापित झालेला HIV संसर्ग पूर्ण बरा (cure) होत नाही. फक्त, योग्य वेळी निदान झाल्यास, त्याला antiretroviral औषधे वापरून, ताब्यात ठेवता (control ) येते.

हेमंतकुमार Wed, 12/19/2018 - 12:53
आदिवासी लोकांमध्ये पुरुषांची लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी माकडांचे रक्त जननेंद्रियावर लावण्याच्या अंधश्रद्धेतून या विषाणूंचा संपर्क मानवाशी आला >>>>> बाप रे ! काय भयानक समजुती असतात. असो. अभिप्रायाबद्दल आभार .

अनिंद्य गुरुवार, 12/20/2018 - 11:09
आढावा छान आहे HIV चा. HIV / AIDS आणि त्यावरील प्रतिबंधक-उपकारक योजना ह्यावरचे संशोधन बघता अजून काही नोबेल पुरस्कार ह्या विषयाच्या संशोधकांना मिळणार हे नक्की.

हेमंतकुमार गुरुवार, 12/20/2018 - 11:55
हरवलेला व अनिंद्य , आभार व सहमती. जर १९ व्या शतकाच्या आधी एड्स मुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे अवशेष मिळाले तर मांसभक्षण या तर्काला पुष्टी मिळेल. >>>> +१ कुतूहलजनक विषय आहे खरा. अजून काही नोबेल पुरस्कार ह्या विषयाच्या संशोधकांना मिळणार हे नक्की. >>> +१११ . विषयच तसा व्यापक आहे.

चौकटराजा Sat, 12/22/2018 - 20:04
विषाणू रेट्रोव्हायरस प्रकारातील असेल तर त्याच्यात स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता जास्त सबब प्रभावी लस निर्माण करणे अवघड . प्रत्येक विषाणूची आवडती अशी एक होस्ट पेशी असते दुर्दैवाने एच आय व्ही ची आवडती पेशी लिम्फोसाईट म्हणजे पोलीस पेशी सबब तिला मारले की " आव जावं घर तुम्हारा " सुदैवाने हा एक अशक्त विषांणू आहे व तो एअर बॉर्न नाही सबब इबोला सारखा तो भयानकी अवतार धारण करू शकत नाही .

हेमंतकुमार Sat, 12/22/2018 - 20:17
बरोबर आहे. इबोला च्या आजारात मृत्यू होण्याचे प्रमाण ९०% पर्यंत आहे. धन्यवाद

जेडी Sat, 12/22/2018 - 20:58
१९९० ते २००० हाय दरम्यान बरीच माणसे HIV ने मरण पावली , ती साथ एकदमच आल्यासारखे काय झाले असेल ? त्यामुळे लोक प्रत्येकाकडे संशयाने पाहत . अतिशय सोप्या शब्दात समजावून देण्याच्या पद्धतीमुळे कीकात विषय देखील समजून जातात . धन्यवाद .

हेमंतकुमार Sun, 12/23/2018 - 09:22
जेडी, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. एड्सने मृत्यू होण्याचे प्रमाण १९९०-२००४च्या दरम्यान खूप होते. आता ते कमी होण्याची करणे: १. प्रभावी उपचार विकसित झाले. २. प्रतिबंधात्मक उपायांचा वाढता वापर, आणि ३. वाढते लोकशिक्षण .

हेमंतकुमार Sun, 01/26/2020 - 10:56
डॉ गंगाखेडकर : अभिनंदन ! आईकडून मुलात संक्रमित होणाऱ्या एड्स आजाराच्या बहुमूल्य संशोधनाबद्दल डॉ रमण गंगाखेडकर यांना आज पद्मश्री जाहीर झाली आहे. हार्दिक अभिनंदन !

हेमंतकुमार Fri, 10/02/2020 - 09:40
एड्स संदर्भात ‘बर्लिन रुग्ण’ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, ते टी. आर. ब्राऊन यांचे नुकतेच वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या एड्ससाठी त्यांच्यावर २००७मध्ये विशेष मूळ पेशींचे प्रत्यारोपण झाले होते. त्यानंतर ते पूर्णपणे लक्षणमुक्त होते. एड्सचा पहिला ‘बरा’ झालेला रुग्ण अशी त्यांची नोंद झालेली आहे. मात्र नंतर त्यांचा कर्करोग बळावला आणि त्यामुळे निधन झाले.

हेमंतकुमार Tue, 04/06/2021 - 11:34
एचआयव्ही विरोधी लस तयार करण्याचे काम आव्हानात्मक असून गेली २० वर्षे त्याचे प्रयत्न चालू आहेत. सध्या कोविड लसनिर्मितीच्या निमित्ताने ‘एम-आरएनए’ तंत्रज्ञानाचा बराच बोलबाला झाला. फायझर व मॉडरनाच्या लसी या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. आता हेच तंत्रज्ञान वापरून एचआयव्ही विरोधी लस तयार केली जाणार आहे. एड्स संबंधी एक संशोधन संस्था आणि मॉडरना यांच्या सहकार्याने ही लस विकसित केलेली आहे. त्याचे पहिल्या टप्प्यातील शास्त्रीय प्रयोग आशादायक आहेत.

हेमंतकुमार Tue, 04/06/2021 - 12:53
होय, ते एक महत्वाचे कारण आहे. राष्ट्रीय पातळीवरील अभियानांनी या संदर्भात चांगले यश मिळत आहे.

हेमंतकुमार Fri, 02/11/2022 - 13:40
HIV चा शोध लावणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ ल्यूक माँटग्नियर यांचे निधन https://www.loksatta.com/desh-videsh/french-discoverer-of-hiv-virus-luc-montagnier-dies-at-89-hrc-97-2799558/

हेमंतकुमार Tue, 04/12/2022 - 09:34
स्तुत्य उपक्रम कोलकाता येथे डॉ. कल्लोल घोष यांनी 2018 मध्ये एचआयव्हीग्रस्त तरुणांना बरोबर घेऊन एक ‘पॉझिटिव्ह कॅफे’ (उपाहारगृह) चालू केला. यात काम करणारे ७ जण एचआयव्हीग्रस्त आहेत. त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलावा हा या उपक्रमामागचा हेतू आहे. नुकतेच या कॅफेने मोठ्या जागेत स्थलांतर केले. पूर्णपणे एचआयव्हीग्रस्त तरुग्णांकडून चालवला जाणारा हा भारतातील आणि आशियातील पहिला कॅफे असल्याचा दावा डॉ. घोष यांनी केला आहे.

हेमंतकुमार Sun, 08/07/2022 - 16:34
स्वस्तात टॅटू काढून घेणं पडलं महागात; एकच सुई वापरल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये १४ जणांना एचआयव्हीची लागण ही बातमी अन्यत्र आली आहे त्यात बाधितांचा आकडा कमी दिसतोय. एचआयव्हीचा प्रसार याप्रकारे होण्याची शक्यता बरीच कमी असते पण ती असतेच

हेमंतकुमार गुरुवार, 12/01/2022 - 19:32
1 डिसेंबर :जागतिक एड्स दिन यंदाची जागतिक मध्यवर्ती कल्पना Equalize ही आहे. म्हणजेच सर्व एचआयव्हीग्रस्तांना रोगनिदान आणि उपचारांच्या सेवा उपलब्ध होण्याबाबत समानता आली पाहिजे.

हेमंतकुमार Fri, 04/12/2024 - 19:43
एक महत्त्वाची संकल्पना U = U एड्स झालेली व्यक्ती जर नियमित उपचार घेत राहिली आणि कालांतराने तिच्या रक्तावरील HIV Viral Load ही चाचणी निगेटिव आली आणि ती सातत्याने निगेटिव्हच राहिली, तर अशा व्यक्तींकडून त्यांच्या लैंगिक जोडीदाराला एचआयव्हीचे संक्रमण होत नाही. म्हणजेच अशा जोडीच्या लैंगिक संबंधादरम्यान एड्सच्या कारणास्तव निरोध वापरण्याची गरज नसते. यालाच वैद्यकात undetectable = untransmittable असे म्हटले जाते. ok या विषयावरील एक सुंदर हिंदी लघुपट इथे पाहता येईल. त्याचे निर्माता डॉ. संजय पुजारी असून लेखन डॉ. विवेक बेळे यांनी केलेले आहे. सुंदर लघुपट ! जरूर पहा. . .