✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

उत्तररात्र

ह — हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर, गुरुवार, 12/13/2018 - 22:02
ओढ्यावर माळावरच्या थांबला चांद शरदाचा, कडब्याच्या पडवीपाशी चमचमतो हिरवा वेचा सौंदळीच्या झाडाखाली भूजलात पेटली धुनी, वाहते मंद ही रात्र थिजलेल्या वाऱ्यामधुनि. सिगरेट कधीची विझली बोटांत जळुनि सबंध, श्वासातून येतो अजुनि त्या सातविणीचा गंध ना मागत नाही निद्रा ही पहाट समंजस क्षीण, धाडली तिला कवितेच्या माहेरी पाठराखीण स्मरणांच्या फिकट धुक्याचे पडतील कुठे दहिवर? कुसळाच्या सुकल्या देठी आधीच अडकले गहिवर

प्रतिक्रिया द्या
2176 वाचन

💬 प्रतिसाद (2)

खूप छान. आवडली.

प्रमोद देर्देकर
Sun, 12/16/2018 - 16:48 नवीन
खूप छान. आवडली. फक्त काही शब्दांचे अर्थ कवितेच्या खाली देत चला. जसे हिरवा वेचा , सातविणीचा गंध, कूसळ
  • Log in or register to post comments

छान. आवडली.

वन
Mon, 12/17/2018 - 12:03 नवीन
छान. आवडली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा