Skip to main content

विमान प्रवासातील चोरी- सल्ला हवा आहे

विमान प्रवासातील चोरी- सल्ला हवा आहे

Published on 13/12/2018 - 14:53 प्रकाशित
दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ५.५० च्या एअर इंडियाच्या विमानाने मुंबई नागपूर प्रवास केला जे विमान एक तास उशिरा सुटले म्हणजे ६.५० ला सकाळी गडबडीत खिशातील रोख रक्कम (२१००० रुपये रोख ) मी चुकून चेकिन बॅगेज मध्ये ठेवली ( तीच चूक झाली ) आणि बॅगेला लॉकही न्हवते तसेच काउंटर वर देखील संबंधित विमान कंपनीने कुठल्याही प्रकारचे सील केले नाही, नागपूरला उतरून १५० किमी दूर हॉटेलमध्ये पोहोचल्यावर कपडे बदलण्यासाठी जेव्हा बॅग उघडली तेव्हा सगळी रक्कम गायब झालेली आढळली, संबंधित विमान कंपनीला याबाबत दूरध्वनीवर कळवले असता त्यांनी प्रत्यक्ष नागपूर किंवा मुंबई विमानतळावर येऊन तक्रार करण्यास सांगितले, माझे तिथले काम संपवून मी नागपूर विमानळावर सोमवारी संध्याकाळी लेखी तक्रार दिली, मंगळवारी दुपारी मला एक मेल आला त्यात नागपूरच्या एअर इंडियावाल्यानी मला cc ठेवून मुंबई एअर इंडियाला याबाबत कळवले होते आणि तपास करण्यास सुचवले, बुधवारी पुन्हा एक मेल आला कि बॅगचे आणि बोर्डिंग पासचे फोटो पाठवण्यास सांगितले ते मी पाठवले. त्यानंतर काहीच झाले नाही, मी अजून मुंबई विमानतळावर यासाठी भेट दिली नाही. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे मौल्यवान वस्तू चेकिन बॅगेज मध्ये ठेऊ नयेत, हे मान्य परंतु, बॅगेतल्या वस्तू चोरणे हे हे त्यांच्या अधिकारात बसते का? आणि माझ्या बॅगेला कुठले लॉक मी लावले न्हवते तसेच त्यांनीहि ती सील केली नाही, म्हणजे त्यात कुणीही काहीही शस्त्र , किंवा नको असलेल्या वस्तू ठेऊ शकले असते. हे सुरक्षेचे गलथानपणा न्हवे का? गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी काय करता येईल? तज्ञानी कृपया मार्गदर्शन करावे.

याद्या 7372
प्रतिक्रिया 13

दुर्दैवी. एयर इंडियाची सध्याची अवस्था पाहिली तर पैसे परत मिळतील का ह्या बद्दल शंका वाटते.

जे झाले ते दुर्दैवी आणि मनस्ताप देणारेच आहे पण ती चूक केवळ एअर इंडियाची आहे असं नाही. हे कोणत्याही विमान कंपनीसोबत होवू शकतं. तुम्ही म्हणता तसं हा विमानतळावरील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न आहे. बॅगेतल्या वस्तू चोरणे हे हे त्यांच्या अधिकारात नक्कीच नाही परंतु सतत पाठपुरावा न केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता नगण्य आहे. तसेच तुमचे पैसे शक्यतो मुंबई विमानतळावरच लांबवले गेले असावेत. माझ्या एका नातेवाईकांचा महागडा कॅमेराही असाच चेकईन बॅगमधून काढून घेतलेला आहे आणि ऐकीव किस्सेही बरेच आहेत. विमानतळावरील अनेक कनिष्ठ कर्मचार्‍यांची वागणूक सखेद आश्चर्याचा धक्का देणारी असते. त्यांना त्यांच्या वरच्या पातळीच्या कर्मचार्‍यांचा पाठिंबा असल्याचंही बरेच वेळा लक्षात आलंय. त्यामुळे पैसे चोरणारा कर्मचारी सापडला तरी त्याच्यावर काही कारवाई होईल असे वाटत नाही. अवांतर: हल्ली देशांतर्गत (आणि देशाबाहेरही) विमानप्रवास खूप स्वस्त झालाय आणि त्यामुळे अनेक लोक विमानाने प्रवास करतात. पण विमानाने प्रवास करणारे म्हणजे अतिश्रीमंत असतात हा समज काही कमी होत नाही किंवा काही लोक तसं मुद्दाम बोलून विमान प्रवाश्यांचा फायदा घेतात. त्यात रिक्षा-टॅक्सीवाल्यांपासून विमानतळावरचे पोर्टर सर्वच आलेत.

हे सरकारी नोकरांपेक्षा कमी नसतात. व्हील चेअर सारख्या सुविधेसठीही हे लोक पैश्याची अपेक्शा ठेवतात. एक गमतीशीर अनुभव परदेशातुन मुम्बई विमानतळावर उतरलो तेव्हा एका विमानकंपनीच्या पोर्टर् ने सामान उचलण्यासाठी ५ डॉलर मागितले होते. ते सुद्धा आम्ही दोघे मराठीत बोलत असताना. मी म्हटले वेडा कि काय तु? फारतर १०० ची नोट देईन सुट्टे नाहित म्हणुन.

पैसे परमेश्वर चरणी गेले म्हणून सोडून द्या. निदान त्रास तरी कमी होईल. त्यातून मुंबई विमानतळावर तपासा. चुकून पैसे मिळालेच तर लॉटरी लागल्याचा आनंद होईल. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे कमीत कमी सामान घेऊन प्रवास करावा. मी शक्यतो चेकिन बॅग घेतच नाही. कॅरी ऑन बॅग जरी ७ च्या ऐवजी १० किलोची झाली तरी कोणी बघत नाही. आणि पुन्हा लॅपटॉप बॅग असतेच, तिच्या वजनावर काहीही निर्बंध नाही. अर्थात दोन्ही बॅग्स च्या आकारावर निर्बंध आहे. म्हणून त्या बॅग्स हलक्या आणि पातळ (thin) घेतल्या कि खूप सामान त्यात मावत. आठवड्याचे कपडे तर सहज मावतात. आणि मूल्यवान वस्तू लॅपटॉप बॅग मध्ये ठेवून मी प्रवास करतो. दोन्ही बॅग्स डोळ्यासमोर असल्या कि काही टेन्शन रहात नाही.

In reply to by सिरुसेरि

+ १ अगदी हे तपासून हाच योग्य मार्ग आहे. २१,००० रुपये ही रक्कम बरीच मोठी आहे. रोख रक्कम चेकिन बॅगेज मध्ये ठेवताना ज्या सेवकवर्गाने / कर्मचार्‍यांनी बघितलं, त्यांनी संगनमत ती रक्कम काढून घेतली असणार (इतर प्रवासी असं शक्यतो असं करणार नाहीत असं मला वाटतं) चोरी होऊन खुप कालावधी झाला नाहीय. सतिश पाटील यांनी संबधित विमानतळ आणि अधिकारी यांनी भेटून सीसीटीव्ही चित्रण पाहून घ्यावेच. यात काही निष्पन्न झाले तर रक्कम नक्की परत मिळेल. आशा न सोडता फॉलो-अप घ्यावा.

कुलुप असतानाही बॅग उघडुन पाहण्याचे अधिकार विमानतळावरील सेक्युरिटी एजन्सीला असावेत. मागे एका आंतरराष्ट्रीय प्रवासात माझ्या चेकईन बॅग ला साधी कुलुप किल्लीचे कुलुप होते ते काढायला लावले. मी हरकत घेतली असता एक्स रे तपासणीत काही आक्षेपार्ह आढळले तर बॅग उघडुन पाहु शकतो असे सांगितले गेले. डिजिटल लॉक असेल तर तुमच्याशी फोन वरुन बोलुन कोड विचारुन बॅग उघडली जाऊ शकते पण ह्या केस मध्ये ते शक्य नाही म्हणुन कुलुप लावायला हरकत घेतली होती. आधी मला मुद्दामुन रेसिस्ट वागणुक देण्यात येते आहे असे वाटले. पण दुसर्या एका प्रवासात कलिग ने तसेच लॉक लावले होते आणि बेंगलोरला उतरल्यावर त्याला दिसले कि लॉक तोडण्यात आले आहे म्हणुन. तेव्हा सेक्युरिटी एजन्सीला असे अधिकार असावेत असे वाटते. ह्याचा अर्थ चेक-इन बॅग मधे किमती वस्तु ठेवणे अजिबात सुरक्षित नाही.

चुकूनही कधी पैसे, दागिने किंवा कुठल्याही मुल्यवान वस्तू चेक-इन बॅगेजमध्ये ठेवू नका. त्यांच्या स्कॅनिंगमध्ये दागिने, पैसे ह्या गोष्टी स्पष्टपणे कळून येतात. तसेच केबीन-लगेजमध्ये आणि अंगावर तूम्ही हवे तितके पैसे नेऊ शकता. अगदीच मोठी रक्कम असली तरी जर तुमच्याकडे त्या रकमेची योग्य ती कागदपत्रे असतील तर तशी कायदेशीर नोंद घेऊन ते पैसे तुम्हाला नेऊ देणे किंवा संशय वाटल्यास योग्य त्या यंत्रणेच्या (पोलिस, इन्कम टॅक्स, कस्टम) ह्यांच्या ताब्यात देणे, ही विमान कर्मचार्‍यांची किंवा सुरक्षा-कर्मचार्‍यांची जबाबदारी आहे. नुकत्याच एका प्रवासात (स्पाईसजेट) माझ्या चेकइन बॅगची चेनमला उघडलेली आढळली. काहीही गेलेलं नव्हत, पण तरी मी विमानतळावर रितसर तक्रार केली. त्यावर काही होईल, ही अपेक्षा शून्य..

आपली कोणतीही मौल्यवान वस्तू, कॅश, लॅपटॉप - आयपॅड चेकइन बॅगेत ठेवू नये अशा स्पष्ट सूचना सर्व एअरलाईन्सने दिलेल्या असतात. असे असूनही एवढी कॅश चेक-इन बॅगेत ठेवणे हा स्पष्ट शब्दांत सांगायचं तर निव्वळ निष्काळजीपणा आहे. पैसे परत मिळण्याची शक्यता जवळपास नाही. दुसरं म्हणजे, नागपूरसारख्या ठिकाणी जिथे अनेक एटीएम आहेत, तिथे जाताना एवढी कॅश बरोबर बाळगण्याची गरज होती का? गेल्यावर्षी काही महिन्यांसाठी अमेरीकेत येणार्‍या फ्लाईट्ससाठी गल्फमधून येणार्‍या विमानांमध्ये ( दुबई / अबुधाबी / कतार / सौदी / बहारीन ) मोबाईल फोनचा अपवाद वगळता लॅपटॉप, आयपॅड इत्यादी इलेक्ट्रॉनिक्सही चेकइन बॅगेत भरण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यासाठी या सर्व विमानतळांवर पुन्हा सिक्युरीटी चेकही करण्यात येत होता. अर्थात यापैकी एखादी जरी वस्तू गहाळ झाली किंवा कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्यास विमान कंपन्या पूर्ण भरपाई करुन देत होत्या.

चेकिन बॅगेज, कॅरीओन बॅगेज हे स्टँडर्ड शब्द आहेत का? सर्व विमान कंपन्या हेच वापरतात का? तपासणी दोन्हींची होते का? त्यांचे वजन, काय नेता येईल,नियम हे त्यांच्या वेबसाइटवर असतात का?

In reply to by कंजूस

गेल्या ९ वर्षांपासून भारतबाहेर राहत असल्याने भारतातल्या डोमेस्टीक फ्लाईट्स आणि त्यांच्या वेबसाईट्सची कल्पना नाही, पण सर्व इंटरनॅशनल एअरलाईन्स चेक-इन आणि कॅरी-ऑन लगेज याच संज्ञा वापरतात असे आढळले आहे. अमेरीका आणि युरोपातल्या डोमेस्टीक एअरलाईन्सही चेक-इन आणि कॅरी-ऑन असेच शब्दं वापरतात, फक्तं लगेज आणि बॅगेज एवढाच काय तो फरक पडतो. वजनाबद्दल बोलायचं तर डोमेस्टीक / इंटरनॅशनल फ्लाईटला चेक-इन बॅग ही २३ किलो - ५० पौंडापेक्षा जास्तं असल्यास (यात बॅगेचेही वजन गृहित धरलेले असते), त्यातले सामान काढायला लागते किंवा दुसर्‍या बॅगेचे वजन कमी असल्यास त्यात भरावे लागते. कॅरी ऑन बॅगेचे वजनही ७ किलो - १५ पौंड या मर्यादेत असावे असा नियम आहे, पण बहुतेक वेळेस, खासकरुन इंटरनॅशनल फ्लाईट्सला कॅरी-ऑन बॅगेचे वजन केले जात नाही. भारतातून येताना क्वचित झालं तरच! गेल्या ९ वर्षात फक्तं एकदा एमिरेट्सने भारतात येताना माझ्या कॅरी ऑन बॅगेचं वजन केलेलं होतं. लॅपटॉप बॅग / पर्सनल बॅग / बॅकपॅक यावरही साधारणत: ७ किलो - १५ पौंड अशी मर्यादा आहे, पण या बॅगेचे वजन क्वचितच केले जाते. एका पॅसेंजरला किती बॅगा चेक-इन करता येतील यावरही मर्यादा आहेत. बहुतेक सर्व इंटरनॅशनल एअरलाईन्स एका पॅसेंजरला २३ किलो - ५० पौंडाची एकच बॅग फ्री ऑफ कॉस्ट चेक-इन करु देतात. अर्थात याला एअर इंडीया, एमिरेट्स, ब्रिटीश एअरवेज हे माझ्या माहितीतले अपवाद आहेत. अमेरीकेत डोमेस्टीक फ्लाईटला प्रत्येक बॅगेला २५$ च्या हिशोबाने पैसे मोजावे लागतात. अर्थात यालाही साऊथवेस्ट एअरलाईन्ससारखे अपवाद आहेत. काही एअरलाईन्सचा क्रेडीट कार्ड कंपनी / बँक यांच्याशी टाय-अप असतो. त्यांचं क्रेडीट कार्ड असल्यास चेक-इन बॅगेचे चार्जेस लागत नाहीत. उदाहरणार्थ माझ्या सिटीबँक - अमेरीकन एअरलाईन्सच्या क्रेडीट कार्डच्या जोरावर मी माझी आणि माझ्याबरोबरच्या ३ जणांची अशा एकूण ४ चेक-इन बॅगा फ्री मध्ये नेऊ शकतो. ही सर्व माहिती बॅगेज / लगेज पॉलिसी किंवा अलाऊन्स या सेक्शनमध्ये प्रत्येक एअरलाईनच्या वेबसाईटवर दिलेली असते. उदा. - https://www.aa.com/i18n/travel-info/baggage/checked-baggage-policy.jsp