विमान प्रवासातील चोरी- सल्ला हवा आहे
दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ५.५० च्या एअर इंडियाच्या विमानाने मुंबई नागपूर प्रवास केला जे विमान एक तास उशिरा सुटले म्हणजे ६.५० ला
सकाळी गडबडीत खिशातील रोख रक्कम (२१००० रुपये रोख ) मी चुकून चेकिन बॅगेज मध्ये ठेवली ( तीच चूक झाली ) आणि बॅगेला लॉकही न्हवते तसेच काउंटर वर देखील संबंधित विमान कंपनीने कुठल्याही प्रकारचे सील केले नाही, नागपूरला उतरून १५० किमी दूर हॉटेलमध्ये पोहोचल्यावर कपडे बदलण्यासाठी जेव्हा बॅग उघडली तेव्हा सगळी रक्कम गायब झालेली आढळली, संबंधित विमान कंपनीला याबाबत दूरध्वनीवर कळवले असता त्यांनी प्रत्यक्ष नागपूर किंवा मुंबई विमानतळावर येऊन तक्रार करण्यास सांगितले, माझे तिथले काम संपवून मी नागपूर विमानळावर सोमवारी संध्याकाळी लेखी तक्रार दिली, मंगळवारी दुपारी मला एक मेल आला त्यात नागपूरच्या एअर इंडियावाल्यानी मला cc ठेवून मुंबई एअर इंडियाला याबाबत कळवले होते आणि तपास करण्यास सुचवले, बुधवारी पुन्हा एक मेल आला कि बॅगचे आणि बोर्डिंग पासचे फोटो पाठवण्यास सांगितले ते मी पाठवले. त्यानंतर काहीच झाले नाही, मी अजून मुंबई विमानतळावर यासाठी भेट दिली नाही.
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे मौल्यवान वस्तू चेकिन बॅगेज मध्ये ठेऊ नयेत, हे मान्य परंतु, बॅगेतल्या वस्तू चोरणे हे हे त्यांच्या अधिकारात बसते का?
आणि माझ्या बॅगेला कुठले लॉक मी लावले न्हवते तसेच त्यांनीहि ती सील केली नाही, म्हणजे त्यात कुणीही काहीही शस्त्र , किंवा नको असलेल्या वस्तू ठेऊ शकले असते.
हे सुरक्षेचे गलथानपणा न्हवे का?
गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी काय करता येईल?
तज्ञानी कृपया मार्गदर्शन करावे.
याद्या
7372
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
एयर
दुर्दैवी
विमानतळावरचा कर्मचारीवर्ग
पैसे परमेश्वर चरणी गेले म्हणून सोडून द्या.
+१००
In reply to पैसे परमेश्वर चरणी गेले म्हणून सोडून द्या. by खग्या
दुर्दैवी अनुभव
+ १
In reply to दुर्दैवी अनुभव by सिरुसेरि
कुलुप असतानाही बॅग उघडुन
चुकूनही..
निष्काळजीपणा
चेकिन बॅगेज, कॅरीओन बॅगेज हे
चेक-इन आणि कॅरी-ऑन लगेज
In reply to चेकिन बॅगेज, कॅरीओन बॅगेज हे by कंजूस
धन्यवाद हो!!