तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी काय संस्कार दिले?

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
1 Dec 2018 - 8:43 pm
गाभा: 

थांबा..

असा धागा ऐसीवर आलाय, त्याची replica म्हणून मी हा धागा काढलेला नाही. माझ्या डोक्यात काहीतरी वेगळेच चालू झाले.

एकंदरीत चर्चेचा आशय असा होता की मुलांवर संस्कार करण्याचा प्रयत्न करणे इझ टिपिकल लोवर मिडल क्लास.. (सॉरी, साराभाई संचारली अंगात), मुख्य म्हणजे आपल्या मुलांवर कोणतेही संस्कार करणे हे दमनशाही टाइप काहीतरी आहे वगैरे.

मी सहज विचार करत होतो, की उत्क्रांतीची आदिम प्रेरणा काय आहे? तर ती आहे वंशसातत्य. मग पुढचा प्रश्न असा आला, ही हे सातत्य केवळ जनुकीय पातळीवरच असेल का? जेव्हापासून माणूस *विचार* करायला लागलाय तेव्हा या जनुकीय पातळीवरील वंशसातत्याच्या जागेत हे वैचारिक वंशसातत्य पण घुसखोरी करत आहे की काय? आणि असे असेल, तर आपले संस्कार आपल्या मुलाला देऊन मुलाला आपल्यासारखे बनवण्याचा प्रयत्न म्हणजे एक उंक्रांतीमध्ये आपल्याला मिळालेली आदिम प्रेरणा मानावी का? आणि जर तसे असेल तर मग आपण त्या प्रेरणेला नाकारण्यात काय हशील?

तुम्हाला काय वाटते?

प्रतिक्रिया

माहितगार's picture

1 Dec 2018 - 9:13 pm | माहितगार

रोचक मुद्दा

कुमार१'s picture

2 Dec 2018 - 12:24 pm | कुमार१

असं म्हणतात.....
संस्कार हे होतात, करता येत नाहीत.

कभी कभी मेरे दिलमे ख्याल आता है,
की
हिरण्यकश्यपुने प्रल्हादाला, वंशसातत्य / वैचारिक वंशसातत्य, च्या दृष्टीकोनातुन काय संस्कार दिले असतील ?

त्याने दिलेच की. प्रल्हादाने स्वीकारले नाहीत.. त्याचे काही वेगळे जीन्स ऍक्टिव्हेट झाले होते, आणि त्याला चुलत घराण्याचे संस्कार आवडत होते.. ☺️☺️

कपिलमुनी's picture

2 Dec 2018 - 1:11 pm | कपिलमुनी

ही चर्चा होण्याऐवढं मिपा वैचारिक आणि प्रगल्भ राहिला आहे का ??

आनन्दा's picture

2 Dec 2018 - 4:44 pm | आनन्दा

का नाही? तुम्ही आम्हीच तर मिपा घडवतो.. तुम्ही सुरू तर करा, चर्चा पुढे आपोआप सरकेल.

टवाळ कार्टा's picture

2 Dec 2018 - 5:25 pm | टवाळ कार्टा

+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

नाखु's picture

2 Dec 2018 - 10:45 pm | नाखु

प्रश्र्न सुटण्यास मदत होईल असे नाही पण मोर्चा काढण्यानेही सुटतीलच असे नाही तरी मोर्चे काढले जातात.
तस्मात निरूपद्रवी आणि पांढरपेशीय विषय चर्चेला व्यर्ज नसावेत.
जाता जाता मिपा प्रगल्भ होवो न होवो मिपाकरांनी प्रगल्भ होण्याची संधी सोडू नये

वाचकांची पत्रेवाला नाखु पांढरपेशा

पु ल देशपांडे यांनी संस्कृती टिकवण्यावर दिलेले भाषण आठवले. विनोद सोडले तरी विचार करण्याजोगे नक्की आहे.

https://youtu.be/rsTwQTYGl8Q

विनिता००२'s picture

3 Dec 2018 - 9:50 am | विनिता००२

आईवडीलांचे वागणे बघून मुले शिकत असतात, पण काही वेळा घरातून चूकीचे संस्कार होत असतील, व मुले विचारी आणि प्रगल्भ असतील तर त्यांचे वागणे वेगळे असते.
जसे प्रल्हाद हे एक उदा. आहे. बरेचदा 'भांगेत तु़ळस' असे अशा मुलांना म्हटले जाते :)

mrcoolguynice's picture

3 Dec 2018 - 11:19 am | mrcoolguynice

म्हणज़ेच,
“घरातून होणारे संस्कार”

“मुलांची प्रगल्भता”
हयांच्यात कोरिलेशन नाही आहे.

चिगो's picture

5 Dec 2018 - 2:36 pm | चिगो

माणसाचे व्यक्तिमत्त्व संस्कार, स्वभाव आणि अनुभव ह्यांच्या मिश्रणातून घडत असते. संस्कारांतही केवळ आई-वडीलच हातभार लावतात, असे नाही तर आपले शिक्षक-शिक्षिका, मित्र-मैत्रिणी, त्यांचे आईवडील असा सगळा सामाजिक गोतावळा असतो. तुम्ही म्हटल्याप्रमाणे 'वैचारीक वंशसातत्य' हा संस्कारांमागचा एक महत्त्वपुर्ण कारणभाव आहे, कारण की 'Survival' ही आदीम-प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येक संस्कार हा त्या-त्या काळातील सामाजिक परिस्थितीतून बघायला हवा.