तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी काय संस्कार दिले?
थांबा..
असा धागा ऐसीवर आलाय, त्याची replica म्हणून मी हा धागा काढलेला नाही. माझ्या डोक्यात काहीतरी वेगळेच चालू झाले.
एकंदरीत चर्चेचा आशय असा होता की मुलांवर संस्कार करण्याचा प्रयत्न करणे इझ टिपिकल लोवर मिडल क्लास.. (सॉरी, साराभाई संचारली अंगात), मुख्य म्हणजे आपल्या मुलांवर कोणतेही संस्कार करणे हे दमनशाही टाइप काहीतरी आहे वगैरे.
मी सहज विचार करत होतो, की उत्क्रांतीची आदिम प्रेरणा काय आहे? तर ती आहे वंशसातत्य. मग पुढचा प्रश्न असा आला, ही हे सातत्य केवळ जनुकीय पातळीवरच असेल का?
मिसळपाव