इम्रान आणि कर्तारपुरातील भारतीय नाचक्की
या आठव्ड्यात पाकीस्तानातील गुरु नानकदेवांचीं श्रद्धेय स्मृतीस्थान असलेल्या शीखयात्रेकरुंसाठी सहज भेट देता येईल असे भारत आणि पाकीस्तान दरम्यान कर्तारपूर कॉरीडॉर बाबत सहमती होऊन सीमेच्या दोन्ही बाजूला शीलान्यासाचे कार्यक्रम झाले. एकदा पाकीस्तानने अनुमती दिल्या नंतर भारताला नको म्हणणे कठीण असणार होते. तेव्हा भारतानेही सहाजिक प्रस्ताव स्विकारला. कर्तारपूर कॉरीडॉर शीलान्यासाचे कार्यक्रमाच्या निमीत्ताने पाकीस्तानने राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला तर नवल नाही.
शीलान्यासाचाच कार्यक्रम दोन दिवस आधी किंवा दोन दिवस नंतर होऊ शकला नसता का ? २६ नव्हेंबर २००८ च्या मुंबई हल्ल्याला दहा वर्षे होऊनही सर्व कटकर्ते अद्याप पाकीस्तानात मोकाट फिरत असताना २६ नव्हेंबरच्या आसपासची तारीख भारत सरकार स्विकारु शकले याचे आश्चर्य वाटते. पाकीस्तानच्या बाजूने जो शिलान्यास झाला त्यात खलिस्तानवादी अतिरेकी केवळ मोकाट फिरत नव्हते अपेक्षेप्रमाणे नवज्योतसिंग सिद्धु सोबत त्यांनी फोटोपण काढून घेतले.
इम्रान आल्यापासून काश्मिरातील अतिरेकींचा गोंधळ चालू आहेच पण त्या सोबत काश्मिरी अतिरेक्यांच्या नवे पोस्टाची तिकीटे छापण्याचे प्रतापही इम्रानी कारकिर्दीत पार पडत आहेत. कर्तारपूर शिलान्यासाच्या अगदी काही दिवस आधी निरंकारी गुरुद्वार्यावर चक्क ग्रेनेड अटॅकही घडवला जातो. पाकीस्तानातील गुरुद्वार्यांमध्ये भारतीय दूतावासाच्या आधीकार्यांना प्रवेश दिला जात नाही. एवढे असूनही कर्तारपूर कॉरीडॉर करता तर ठिक पण २६/११ची तारीख पारपडेल एवढे भान भारत सरकारने ठेवावयास नको होते का ?
कर्तारपूर कॉरीडॉरने दोन्ही बाजूंच्या पंजाबी लोकांचे आणि दक्षिण आशियातील गैर ड्रग ट्रेड किती सुलभ होईल याची नेमकी कल्पना येणे कठीण असावे. त्या बद्दल भारत सरकारने कोणत्या उपाय योजनेचा विचार केला आहे याची काहीच कल्पना नाही.
बाकी कर्तारपूर मध्ये बसून इम्रानखानने मोठे मोठे तारे तोडण्याचे काम व्यवस्थित पार पाडले. नवज्योत सिंग सिद्धुवर भारतात उगीच टिका होते , पाकीस्तानात सहज निवडून येऊ शकतो म्हणाला. नवज्योत सिंग सिद्धू असेल किंवा इतर कुणि पर धर्मीय असेल त्याला पाकिस्तानचा पंतप्रधान अथवा अध्यक्ष होता येते का ? हे इम्रानखान ने तपासून सांगावे. पाकीस्तान आणि भारताचे संबंध चांगले होण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू भारताचा पंतप्रधान होण्याची वाटपहावी लागेला का फार फारतर भारतातिल २०१९च्या निवडणूका होऊन जाईपर्यंत वाट पाहू असेही तारे तोडले. मोदी पंतप्रधानपदावरुन दूर होण्याची आपण वाट पहात आहोत असा आव तो पाकीस्तानी आणि आंतररास्।त्रीय समुदया समोर आणू पहात आहे. काश्मिर असो वा अफगाणीस्तान अतिरेक्याचे जबाबदारी इम्रान भारत आणि आमेरीकेवर लाख फोडू इच्छित असेल पण अतिरेक्यांना उपलब्ध होणारी शस्त्रे आणि पैसा झाडाला लागत नसतात .
१०० दिवस झाल्याच्या निमीत्ताने केलेल्या भाषणात मनुष्य हा इतर प्राण्यांपेक्षा कसा सुसंस्कृत आहे याचा इम्रान उल्लेख करत होता. मनुष्याचे प्राण्यांपेक्षा अधिल सुसंस्कृत असणे पाकीस्तानी जनतेला आणि शांततेच्या धर्माला समजले असते तर पाकीस्तानचा जन्म होण्याचा प्रश्न ही आला नसताना
याद्या
12723
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
हे प्रकरण अंगाशी येऊ शकते भारताच्या...
पाकीस्तानच्या बाजूने जो
हायला
In reply to पाकीस्तानच्या बाजूने जो by mrcoolguynice
ओ सुरभीमोहोरचैतन्यचुर्णरसिक
In reply to हायला by अभ्या..
परवशतेत आधी तारतम्य हरवते मग पारतंत्र्य येते
In reply to पाकीस्तानच्या बाजूने जो by mrcoolguynice
पूरोगामी....!!
In reply to पाकीस्तानच्या बाजूने जो by mrcoolguynice
वो क्या होता हय ?
In reply to पूरोगामी....!! by विनोद१८
२६ नव्हेंबर २००८ च्या मुंबई
पक्ष कोणतेही असोत मुदलात
In reply to २६ नव्हेंबर २००८ च्या मुंबई by mrcoolguynice
"देशाचे स्वातंत्र्य आणि ऐक्य
In reply to पक्ष कोणतेही असोत मुदलात by माहितगार
असो
In reply to "देशाचे स्वातंत्र्य आणि ऐक्य by mrcoolguynice
धागालेखकाच्या
In reply to असो by माहितगार
मी डोकलामवर लिहीताना
In reply to धागालेखकाच्या by mrcoolguynice
आपल्या लेटेस्ट लेखावर
In reply to मी डोकलामवर लिहीताना by माहितगार
इट्स ओके
In reply to आपल्या लेटेस्ट लेखावर by mrcoolguynice
मोदीत्रस्तता...
In reply to "देशाचे स्वातंत्र्य आणि ऐक्य by mrcoolguynice
हा प्रतिसाद नेमका कुणाला आहे
In reply to मोदीत्रस्तता... by विनोद१८
हो हा प्रश्न मला पण पडलाय
In reply to हा प्रतिसाद नेमका कुणाला आहे by माहितगार
नवीन काये त्यात
In reply to हो हा प्रश्न मला पण पडलाय by आनन्दा
नुकताच "मोदिळ" हा नवीन शब्द
In reply to मोदीत्रस्तता... by विनोद१८
इस्लामाबाद : करतारपूरचा
कैलाश मनसा सरोवर दर्शनास ओपन
In reply to इस्लामाबाद : करतारपूरचा by mrcoolguynice
मला काही कळलं नाही.
पंजाब केवळ शिखांचा दुखरा कोपरा नाहि...
In reply to मला काही कळलं नाही. by कंजूस
दुखर्या कोपर्याची नेमकी अडचण
In reply to पंजाब केवळ शिखांचा दुखरा कोपरा नाहि... by अर्धवटराव
ब्लु-प्रींटचा अर्थच तो आहे.
In reply to दुखर्या कोपर्याची नेमकी अडचण by माहितगार
Imran’s googly takes a wicket
बरखा दत्तचा हिंदूस्तान
याच सुमारास इम्रानखानच्या