सर्व हिंदू पद्धती आणि देवतांपासून दूर रहाण्यासाठी काय करावे ?
लेखनविषय (Tags)
कधी कधी एवढ्या सगळ्या हिंदू पद्धती आणि देवतांचा हिंदूंनाही कंटाळा येतो की नाही, आणि ते ३३ कोटी देवतांचे तर भयंकर प्रकरण आहे. खासकरुन ज्यांना अहिंदू म्हणून रहायचे म्हणून हिंदू पद्धती आणि देवतां पासून कटाक्षाने दूर रहायचे तर त्यासाठी काय काय करावे ? याचे या उतार्यात काही उपाय सुचवले आहेत पण यातील काही देवतांपासून दूर रहाण्याचे प्रकार कायदा आणि आप्त स्वकीयांच्या अनुमतीने वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय सल्ल्याने आणि स्वजबाबदारीवर करावेत. धागा लेखकाचा उत्तरदायीत्वास नकार लागू आहे. हिंदूधर्मीय संकल्पनांबद्दलच्या अज्ञानातून डोळे झाकून होणार्या टोकाच्या अपप्रचाराला उत्तर देणारा हा लेख उपरोधिक आहे हे.वे.सा.न.ल.)
फुले आणि वस्त्र जेजे सुवासिक तसेच स्वादीष्ट मिष्ठान्न ते ते टाळावेत ते हिंदू देवतांना अर्पण करण्यासाठी वापरले जातात. सर्वदा मौनव्रतात रहावे कारण 'वाक' हि ऋग्वेदीय देवता आहे विशेषतः असंख्य (भाषिक) वर्णांचे उच्चारण मनातपण येऊ नयेत कारण अनेक पुजांमध्ये अनेक वर्णोच्चार वापरले गेले आहेत. कर्म आणि ज्ञान या हिंदू योग पद्धती आहेत, सत्य आणि परमेश्वराचे नातेही जवळचे आहे त्या पासून दूर रहावे. बरेच हिंदू त्यांच्या दिवसाची सुरवात 'कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती आणि हाताच्या मूळाशी ईश्वर आहे म्हणत करतात म्हणून हातांचा वापर टाळावा . विशेषतः सकाळी स्वतःच्या हातांकडे बघू सुद्धा नये त्यात चुकून हिंदू देवता दिसल्या तर तुमची अहिंदू धर्मीयता भ्रष्ट होऊ शकते. बुद्धी आणि विद्यांच्याही देवता असतात त्यांपासून दूर रहाणेही उत्तम. आपण अहिंदू असल्यास आपापल्या धर्मातील जे जे चांगले असेल आणि आपापल्या देवता आणि ज्ञान ते ते ही टाळावे लागेल कारण हिंदूंचा ऋग्वेद एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति असे काही तरी म्हणतो.
अध्यात्मिकच नव्हे तर सर्व पुस्तकांपासूनही दूर रहावे कारण त्यात सरस्वतीचा वास असू शकतो विशेषतः बुक्स ऑफ अकाउंट टाळावेत पैसा, सोने आणि झाडू आणि स्वच्छता उपकरणे वापरु नयेत साक्षात लक्ष्मीचे रूप असतात. पत्नीही लक्ष्मी स्वरुप म्हणून पत्नीचा, पती परमेश्वर म्हणून पतीचा त्याग करावा लागेल. काम हि सुद्धा देवता म्हणून कोणत्याही स्वरुपातील कामुक भावना आणि लैंगिकतेचा त्याग करावा लागेल. अहिंदूंनी मद, मोह, मत्सर लोभ आणि क्रोध यांचा मात्र अंगिकार करावा कारण हिंदूना त्यांचा त्याग करण्याचे ध्येय दिलेले असते.
तसे तर संपूर्ण सजीव सृष्टी पण विषेषतः अनेक प्राणी जसे सिंह हत्ती गाय बैल ते साप आणि उंदीर आणि अनेक वनस्पतीं जसे तुळस, उंबर , पिंपळ, वड यांच्या आत किंवा सोबत हिंदू देवतांचा वास असू शकतो, (आणि जिथे देवता नसतील तर हिंदु भूतेही असू शकतात पण पुढे महाभूतांची नावे येणार आहेत तेव्हा हिंदू भूतांपसून दूर रहाण्याचा तेवढा प्रश्न येणार नाही).
आकाशातील सप्तर्षींपासून दूर रहावे, नवग्रहांपासून दूर रहावे विशेषतः चंद्र आणि सुर्यप्रकाश टाळावा. (पारंपारीक असोत वा आधुनिक सर्वच दिव्यांचा प्रकाश टाळावा कारण हिंदू अगदी लाईट बल्ब ट्यूबलाईट लावला तरी नमस्कार करतात) सकाळ पहाट म्हणजे उषा देवता म्हणून पहाटेचा अनुभव घेऊ नये. डोक्यावर छत असेल असा कोणताही आश्रय घेऊ नये कारण छत असलेल्या जागेत वास्तू नावाची देवता वास करते. जंगलातही राहू नये कारण जंगलात अरण्यानी नावाची ऋग्वेदीय देवता वास करत असते. ढगाखाली किंवा पाऊसातही थांबू नये त्यांच्याही हिंदू देवता असतात.
पंच महाभूतांपासून दूर रहाण्यासाठी आकाशातून संचार करु नये (म्हणजे विमान प्रवास टाळावा तसे पहाता पुर्वी वाहन म्हणून प्राणी आणि आधूनिक जगात आधूनिक अॅटोमॅटीक वाहनांचीही हिंदू पुजा करताना दिसतात त्यामुळे अहिंदूंनी सर्वप्रकारच्या वाहनांचा त्याग करावा हे. वे सा.न.ल.), पाणि हा पंच महाभूतातील महत्वाचा घटक आहे त्याचे प्राशन अथवा स्नान नक्की नाकारावे. चुकून स्नान केले तरी नद्यांची नावे आठवू नयेत नद्यांचे दर्शन घेऊ नये हिंदू नद्यांना देवता समान मानतात. अग्नि जठरातला किंवा बाहेरचा दोंन्हींचा उपयोग वर्ज्य असावा. बाकी अजून तीन महाभूतांचा विचार पुढे करु.
तत्पुर्वी ईतर सर्व मानवप्राण्यांपासून दूर रहावे कारण इश्वरीय वास कोणत्याही ते प्रत्येक माणसात असु शकतो, अतिथींना नो एंट्रीचा बोर्ड लावावा, विशेषतः कुणासही गुरु शिक्षक करु नये असल्यास लगेच त्यागावे तसेच स्वतःचे माता पिता यांचा त्याग करावा, लहान मुलांपासूनही दूर रहावे. पृथी इश्वरी आणि पंचभाभूतीय माता आहे हिंदू संकल्पनेचा अपमान करण्यासाठी पृथ्वीवर तुम्ही चालू शकता पण पृथ्वी मातेच्या कुशीत झोपण्याची स्वतःस अनुमती चुकुनही देऊ नका. पृथ्वी प्रमाणेच देश सुद्धा अन्नदाता आहे, देशाच्या कल्पनेची तुलनाही मातृदेवतेशी करु लागले आहेत म्हणून देशावर प्रेम करणे टाळावे. आता एवढे व्यवस्थित जमले असेल तर अन्नत्याग करावा विशेषतः अन्न शिजवले जाण्यासाठी अजून दोन दोन हिंदू देवतांची मदत घ्यावी लागते म्हणून शिजवलेले अन्न पूर्णतः वर्ज्य असावे. पण वायू अशी देवता आहे जिच्या पासून दूर रहाण्यासाठी स्वतःचा श्वासोश्वास थांबवण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे त्या आधी खरेच अहिंदू व्हायचे आहे ना याचा विचार करावा पण उपरोकत पैकी काहीही करुन प्राण त्यागही होऊ देऊ नका कारण खासकरुन प्राणत्याग केला किंवा झाला तरी त्यासाठी यम या हिंदू देवतेकडे आधी पोहोचावे लागते आणि नास्तिक अथवा परधर्मीय असाल तरी हिंदू परमेश्वरापाशी पोहोचण्याची मोठीच शक्यता असू शकते -कारण देवाला तुमच्या पुण्यकर्माशी देणे घेणे आहे - त्यात पुन्हा पितर-अतिथी म्हणून पुढच्या पिढीत कुणि हिंदू होऊन जेवणे घालणार नाहीत याचीही खात्री नसते.
आता यात आता पर्यंत डझनपण देवता मोजलेल्या नाहीत अजून काही आमचे मिपाकर मंडळी सुचवतील अजून ३२ कोटी+च्या वरुन देवता शिल्लक आहेत म्हणून हिंदू देवतांपसून दूर रहाण्यासाठी अटोकाट प्रयत्न चालू ठेवा पण हिंदू देवतांपासून पूर्ण दूर रहाता येण्याची खात्री झाल्या शिवाय या लेखात लिहिले असले तरीही अनाठायी जोखीम घेऊ नकाच. त्यापेक्षा तुमच्या स्वतः इश्वराचा वास असू शकतो असेही हिंदू धर्म म्हणतो जमल्यास त्याची अनुभूती घेण्याचा प्रयास करा.
पण एवढे अवघड असूनही हिंदू संत जो जे वांछिल तो ते लाहो असे ही सांगतात त्यामुळे ज्यांना हिंदू पद्धती आणि देवतां पासून दूर जायचे आहे त्यांना त्यांचा मार्ग मिळो हि शुभेच्छा.
* लेखनाचा हेतू कुणाच्याही भावना दुखावणे नाही आहे.
* अनुषंगिका व्यतरीक्त चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.
* स्वजबबदारीवर लेखन वापर करण्यास कॉपीराईट मुक्त
* आमचे इतर काही मिपा लेख
** संस्कृती आणि धर्म यातील गल्लत
** श्रद्धेचे प्रयोजन आणि उपयोजन ?
** ऋग्वेदातील सुविचार
प्रतिक्रिया
काय करावे?
मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार
ख्खिक!
हा लेख खरेच सिरियस आहे काय?
हिंदू धर्माचा व्यवस्थित परिचय
माफ करा पण,
आमचा पण क्षमस्व
जाउ द्या हो. फडकेसाहेब.
जिथे मुद्दे खोडता येत नाहीत
तुम्ही घाबरात तर कोणताही धर्म
कंजूसजी प्रश्न केवळ घाबरणे
आता आमेरीकेतील हि बातमी पहा
* घाबरलात *
>>असे सगळे मला वाटते. एवढे
हिंदुधर्मातच बऱ्याच देवदेवता