Skip to main content

अवनी हम शरमिंदा है...

लेखक सतिश पाटील यांनी मंगळवार, 13/11/2018 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
वाघिणच होती ती , त्यात २ पिलांची आई, कुत्री न्हवे, प्रत्येक वाघाची एक स्वतःची हद्द असते , सहसा दुसऱ्या कुठल्या हिंस्त्र प्राण्याला तिच्या हद्दीत येण्याची परवानगी नसते, २ बछडे सांभाळायचे त्यांचे रक्षण करायचे आणि या जगात उद्या एकटे जीवन जगण्यासाठी तयार करायचे, शिकार शिकवायची, आत्मरक्षण शिकवायचे, लाड करायचे प्रसंगी कठोर व्हावे लागते हे सगळे करताना. आणि या वाघिणीवर आरोप काय तर १३ लोकांचे प्राण घेतले म्हणे.. त्यातील ३ लोकांचे शवचिकित्सा केल्यावर त्याच्या जखमेवर अवनीची थुंकी आढळली. म्हणजेच तिने ठार केले. पण खाल्ले नाही. खाल्लेही असेल बहुदा. पण बाकी १० जणांच्या मृत्यूचे कारण काय ? माहित नाही. तरीही १३ लोकांच्या हत्येचे आरोप. बरं मारलेही असतील तिने १३ जण , पण काय ती तुमच्या घरात घुसून हल्ला करत होती? अरे तुम्हीच वनक्षेत्रात शेती सुरु केलीत वनरक्षकांना हाताशी धरून, तेंदूपत्ते गोळा करायला तिच्या हद्दीत शिरलात..मग २ पिल्लांची आई असलेली वाघीण ती तिला धोका वाटल्यावर काय करणे अपेक्षित होते तिने? वन्यप्राणी आणि वनसंपदा सांभाळण्यासाठी आपल्याकडे एक स्वतंत्र विभाग आहे, त्यासाठी एक मंत्री, एक राज्यमंत्री, आणि एक आय ए एस अधिकारी देखील नेमलाय . पण या प्रगत राज्याच्या वनविभागाला एक वाघ जिवंत पकडता आला नाही हि शरमेची नाही तर संताप आणणारी बाब आहे. तुम्हाला १३ महिने पाठलाग करून २ पिलांच्या आईला जिवंत पकडता आले नाही? खरंच प्रामाणिक प्रयत्न झाले का? अवनीला मारल्यानंतर आता तिच्या २ पिलांचे काय ? जगातील का ती? बरं या सगळ्या मोहिमेत संशय घेण्याला बरीच जागा आहे, १३ महिन्याचा शोध, रात्री केलेली कारवाई, त्यात दाट मारण्यासाठी पशुवैद्याचिकिसक असावा लागतो, तोही नव्हता सोबत, मग दाट कोणी मारला? नक्की दाट मारला का? आज शवविच्छेदन करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगतिले ते म्हणजे अवनीला पाठमोरी असताना गोळी घातली गेलीये, दाट मारल्यावर तिथून रक्त निघणे अपेक्षित असते ते निघाले नाहीये., आणि महतवाचे म्हणजे शिकारी असगर अलीने गोळी नाही तर त्याच्या मुलाने शिकार केली आहे .....वर तो शिकारी असगर अली म्हणे तिची २ पिल्लेही नरभक्षक होऊ शकतात..म्हणजे याला हौस पूर्ण करण्याची अजून २ संधी.. अरे १३ महिन्याची पिल्ले माणसाची सोड, सशाची तरी शिकार करू शकतात का? आणखी एक चीड आणणारी गोष्ट म्हणजे तिथली गावकऱ्यांनी अवनीची हत्या झाल्यावर गावात फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला.. कहर आहे .. गावातील, घरातील व्यक्ती ठार झाल्यावर दुःख हे होणारच पण या गावकऱ्यांना समुपदेशनाची गरज होती, जेणे करून हि घटना टाळता अली असती. वन आणि वन्य प्राण्याचे महत्व समजावून सांगून गावकऱ्यांच्या मदतीने हातात हात घालून काम करता आले असते. त्याच कसंय ना कि असे वाघ मारल्याने सरकारला कधी धक्का लागत नाही, जेमतेम मंडळी सोशल नेटवर्किंगवर विरोध निषेध करतात पण चिंता नसावी , आपले सरकार सुरक्षित आहे. आणि हो जेव्हापासून मुनगंटीवार वनमंत्री झालेत तेव्हापासून ३ वाघ, १२ बिबटे, आणि २००च्या वर रानडुकरे मारण्याचे आदेश गेलेत आणि अमलात देखील आलेत. सलाम मुनगंटीवार आपल्याला.

वाचने 27852
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

वा डॉक मस्त प्रतिसाद . सौ सोनार की तो एक लोहार की . आता हा धागा वामा करा म्हणावं सं. मंडळाने.

अवनीला का ठार मारले, तिला वाचवता आले असते का, माणसाचा जीव महत्वाचा की वाघाचा...बरेच प्रश्न आहेत. मला या घटनेची पूर्ण माहिती नसल्याने त्यावर मला सध्या तरी मत नाही. मुळात ही चर्चा (की हमरीतुमरी?) इथे करून काय होणार आहे मला खरंच कळत नाही पण काही प्रतिसाद बघता एक गोष्ट जाणवते, आपण आपल्या प्रतिसादांमध्ये लगेच हमरीतुमरीवर येतो आणि उद्धट वाटावेत असे प्रतिसाद टाकतो. आपण "तुला काय कळतंय? आलाय मोठा! कवडीची अक्कल नाही आणि चालला इतरांना शिकवायला!" असा छुपा सूर असलेले, वैयक्तिक उणीदुणी काढणारे, समोरच्याची लगेच लायकी काढणारे, भलताच मुद्दा पकडून मूळ मुद्द्यापासून कुठल्याकुठे भरकटत जाणारे आणि त्यावरून समोरच्याची अकारण अक्कल काढणारे असे प्रतिसाद टाकून चर्चेला भांडणाचे रूप देत आहोत का हे तपासून बघायला पाहिजे. वाघाचा मृत्यू किंवा अजून कुठलीही चर्चा असो, वैयक्तिक दुश्मनी करावी असे काही हे विषय नाहीत. किंबहुना कुठल्याच चर्चा तशा नाहीत/नसाव्यात. आपल्या इथल्या कडाक्याच्या भांडणाने हे प्रश्न सुटणारदेखील नाहीयेत. मग अकारण दुसर्‍या व्यक्तीला मूर्खात काढून आपणच कसे श्रेष्ठ आहोत हे अपमानास्पदरीत्या दाखवून देण्याने काय साध्य होत असावे? ते ही अशा विषयांवर ज्याच्याशी आपला थेट संबंध येण्याची सुतराम शक्यता नाही किंवा ज्यांवर आपल्या इथल्या भांडणाचा कणभरदेखील परिणाम होणार नाही! बरे, अशा विषयांतली आपल्याला संपूर्ण माहिती असते का? बहुधा नाही. अशा घटनांमध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग असतो का? अजिबात नाही. मग इथे ज्यांच्याशी आपण इतकी वर्षे संवाद साधतो त्यांच्याशी अशा विषयांवरून वितुष्ट करण्याने काय समाधान मिळत असेल? सहज आठवले. परवा कॅबने कुठूनतरी घरी येत होतो. पौड रस्त्यावर मेट्रोचे काम चालू असल्याने वाहतूकीचे प्रश्न आहेत. एक दुसरी कॅब डाव्या बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. काही कारणामुळे त्याला पुढे जायला अर्ध्या मिनिटाचा उशीर झाला. कारण काय होते माहित नाही. तो जसा पुढे गेला, त्याने खिडकीतून मान बाहेर काढून माझ्या कॅबच्या दिशेने बघत कचकचीत शिवी दिली. "का रे ****द, दिसत नाही का **व्या?" आमचा कॅबचालकदेखील मुरलेला होता. "ये ***द! तुला दिसत नाही का पुढे गाडी आहे ते, ***ल्या?" पुढे जाणार्‍या कॅबला किती उशीर झाला? अर्धा मिनिट! पण संवादाची पातळी बघा, दर्जा बघा! हा संवाद असाच व्हायला पाहिजे का? इतका मोठा प्रॉब्लेम खरंच होता का? पण भारतीय लोकांची ही मानसिकताच आहे. कुणाला म्हणून आपणहून रिस्पेक्ट दिला तर आपली रेषा, आपली वट, आपला जोर कमी पडेल...आणि ते तर अजिबात नकोय! कालपरवाच्या इकॉनॉमिक टाईम्समध्ये नारायण मूर्तींचा सुंदर इंटरव्ह्यू आला आहे. त्यांनी आपल्या या मानसिकतेवर अचूक बोट ठेवले आहे. https://economictimes.indiatimes.com/markets/expert-view/one-cant-hold-… असो. विषयाला धरून नाहीये पण सांगावसं वाटलं म्हणून सांगीतलं. चुकलं असल्यास माफ करा आणि सोडून द्या. (आधीच माफी मागीतलेली बरी!)

In reply to by इरसाल

ताक चालेल...मिरचीपूड नको! ;-) नाहीतर आधीच जहाल, मिरचीपूड टाकली तर मग कानातून धूर!

In reply to by समीरसूर

हा इफेक्ट सर्व ऑनलाईन न्यूजपेपर्सच्या बातम्यांखाली प्रतिसादांतून उफाळताना दिसतो. लोक सुरुवातीपासूनच थेट आयमाय काढणे, घोडा लावणे, कोणाची माता कोणासोबत आणि एकूणच एकमेकांवर थेट व्यक्तिगत अत्यंत तीव्र हल्ले करतात. हे जवळजवळ सर्वत्र आहे. परस्परांना, बातमीदाराला, संपादकाला, नेत्यांना, लेखकांना सर्वांना लाखोली वाहिली जाते आणि त्यात सर्वात तीव्र कटुता दाखवण्याची स्पर्धा असते. याहून डिटेल उदाहरणं देणं इथे शक्य नाही पण कोणालाही सहज वाचता येईल ऑनलाईन वृत्तपत्रांत. वाचलंच असेल. कदाचित याच कारणाने लोकसत्ताच्या कॉमेंटस अचानक दिसेनाश्या झाल्या आहेत. अमोनिमस होणे याचा पहिला इफेक्ट म्हणजे मनातलं साठलेलं जहर बाहेर टाकणे इतकंच असतं का? त्याचं प्रमाण भयंकर मोठं आहे आणि अस्वस्थ करणारं आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक खदखदत आहेत. फार काही करता येणार नसलं तरी यावर एक वेगळ्या धाग्यात चर्चा व्हावी.

In reply to by गवि

न्यूजपेपर्समध्ये समजू शकतो; तिथे कुठलाच विधिनिषेध नसतो. सगळ्या जगातली शंभर वेगवेगळ्या भाषा बोलणारी, अनोळखी, निरनिराळ्या संस्कृतीची, पार्श्वभूमीची लोकं वावरत असतात. तिथं बातम्या कधी-कधी संताप आणणार्‍या असतात. मिपासारख्या संस्थळावर फक्त मराठी, काहीशी चांगली पार्श्वभूमी असलेली, वाचन-कला यांचा आस्वाद घेणारी/घेऊ शकणारी, जग फिरून पाहिलेली अशी सुज्ञ मंडळी असताना असे व्हावे हे जरा विचित्र वाटते. बरीचशी मिपाकर मंडळी एकमेकांना वैयक्तिकरीत्या ओळखतातदेखील, अगदी मित्र म्हणावेत अशी! शिवाय कट्टे होतात; एकत्र खाणं-पिणं होतं. अशा एका संस्थळावर असे होत असेल तर ते थोडं खटकतं. अमोनिमस होणे याचा पहिला इफेक्ट म्हणजे मनातलं साठलेलं जहर बाहेर टाकणे इतकंच असतं का? त्याचं प्रमाण भयंकर मोठं आहे आणि अस्वस्थ करणारं आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक खदखदत आहेत. मला नेमका हाच प्रश्न पडतो, कसलं आहे हे जहर? लोकं इतकी का खदखदत आहेत? असं काय महाभयंकर घडलेलं आहे यांच्या आयुष्यात? छान एसी खोलीत भरल्या पोटी बसून कुठली खदखद बाहेर निघते आहे? ज्यांच्या मनात जहर किंवा खदखद असायला हवी किंवा असेल ते तर बिचारे ऑनलाईनपासून कितीतरी दूर आहेत. मग हे विनाकरण अहंगंड कुरवाळत इतरांना फालतू म्हणून हिणवणारे नक्की कोण आहेत आणि हे सगळं ते का करतायेत? मला वाटतं हा प्रश्न आपल्या मानसिकतेत दडलेला आहे. आपल्याकडे जो तो स्वतःला बादशाह समजतो...एनीवे...फार काही करता येणार नाही हे मात्र खरं!

तुम्ही या बचड्यानची चिंता सोडा ते सापडलेत. पण वाघांची संक्रांत काही सुटत नाहीये अजून. आजच चंद्रपूर येथे 3 बचड्याचा रेल्वे ओलांडताना चिरडून म्रुत्यु. वाघीण जिवंत आहे तिचा शोधत चालू आहे .

In reply to by प्रमोद देर्देकर

अरेरे =:( आता यावरून रेल्वेच्या ड्रयव्हरची नोकरी गेलीच... संदर्भ.. पंजाब मधल्या रावण दहणाचे प्रकरण...

अवनीसंदर्भात ही काही माहिती. मला सत्यासत्यता ठाऊक नाही. Revealing FACTS ON AVNI's CASE: The alleged killings in Pandharkawada Division in Pandharkawada started in June 2016. This was right in between the announcement of the cement factory sale by the Ambanis and actual purchase by MP Birla group in August 2016. 1. Feb 2016: Announcement of acquisition of Cement Company from Ambanis -- https://www.birlacorporation.com/media/press-releases/press_release_4fe… 2. August 22, 2016: Purchase completed -- https://economictimes.indiatimes.com/industry/indl-goods/svs/cement/bir… 3. August 2017: Announcement of expansion plans for Yavatmal plant in the forest -- https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/birla-corp-to-invest-in… * Half decomposed mutilated human bodies, deep inside the forest started being declared by the Forest Department as killings by T-1. No DNA analysis was done to prove TIGER attack. * Compensation of 8 lakhs given to victims’ families without any consideration of the fact that they were illegally inside the forests. No forest rights allows grazing to be done INSIDE forests or Forest Development Corporation of Maharashtra (FDCM). * Locals can’t use the forest for grazing as they have not been given any rights under CFR or PESA. It is indeed illegal to graze inside the forests and the FD is making up excuses for their lack of capability and their incompetence by saying the locals taking cattle inside the forests are not truly illegal graziers. 4. January 22, 2018: Notification of forest land diversion --https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/civic/465-hectares-forest-la… * Within 7 days of the notification of forest land’s official diversion to the Ambanis, on 22 January 2018, the first shoot to kill order for the Tigress was issued by the PCCF on 29th January 2018. * Eye-witnesses were illegally taking their cattle into the forest’s waterbody where the new mother -- Tigress and her cubs lived. * The post-mortem report does not even mention time of death. No clarity if the injuries were ante-mortem and it was a decapitated body of an illegal grazier. * The PCCF hastily called Shafat Ali Khan the very day to shoot the Tigress and was officially reprimanded for this. * No DNA analysis was done to ascertain if there was Tigress DNA on the body either before the shoot-to-kill order was issued by the PCCF. Now, the sanitizing of the Forest for the expansion plans of the cement factory also meant that the PCCF hastily issued the capture order for the MALE Tiger, T-2. 5. August 8, 2018: Announcement of expansion and new mega cement plant for another 2000+ crores -- https://economictimes.indiatimes.com/industry/indl-goods/svs/cement/bir… Birla Cement Board meeting held on Saturday, August 4, 2018, announces expansion plan for Yavatmal plant located in Mukutban, Pandharkawada Forest. Doubling of capacity, creation of captive thermal plant, and a heat-recovery plant. On the same day, after a long gap of 6+ months, a Forest Dept. 'Field Monitoring Team' allegedly spots the tigress and cubs (one of the ONLY actual sightings), and later that same day, in the evening, a human kill is reported.

खूप महत्वाची माहिती दिलीत, वन आणि वन्य प्राण्यांबद्दल आपले शासन आणि नागरिक किती गंभीर आहेत हे या विषयावर दिसले.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या समितीने दिलेला हा अहवाल. एक वाघ काय मारला तर असे अश्रू ढाळत आहेत जणू यांच्याच घरातला कोणी मेला, किंवा मारल्या गेलेल्या लोकांच्या घरातले दुःखचे तुम्हाला काही पडले नाही का? मारू दे कि वाघ ... असे बोलणारे आता हा अहवाल वाचून काय स्पष्टीकरण देतील वाघाचा खून केल्याचे?