वाघिणच होती ती , त्यात २ पिलांची आई, कुत्री न्हवे,
प्रत्येक वाघाची एक स्वतःची हद्द असते , सहसा दुसऱ्या कुठल्या हिंस्त्र प्राण्याला तिच्या हद्दीत येण्याची परवानगी नसते, २ बछडे सांभाळायचे त्यांचे रक्षण करायचे आणि या जगात उद्या एकटे जीवन जगण्यासाठी तयार करायचे, शिकार शिकवायची, आत्मरक्षण शिकवायचे, लाड करायचे प्रसंगी कठोर व्हावे लागते हे सगळे करताना.
आणि या वाघिणीवर आरोप काय तर १३ लोकांचे प्राण घेतले म्हणे.. त्यातील ३ लोकांचे शवचिकित्सा केल्यावर त्याच्या जखमेवर अवनीची थुंकी आढळली. म्हणजेच तिने ठार केले. पण खाल्ले नाही. खाल्लेही असेल बहुदा. पण बाकी १० जणांच्या मृत्यूचे कारण काय ? माहित नाही. तरीही १३ लोकांच्या हत्येचे आरोप.
बरं मारलेही असतील तिने १३ जण , पण काय ती तुमच्या घरात घुसून हल्ला करत होती? अरे तुम्हीच वनक्षेत्रात शेती सुरु केलीत वनरक्षकांना हाताशी धरून, तेंदूपत्ते गोळा करायला तिच्या हद्दीत शिरलात..मग २ पिल्लांची आई असलेली वाघीण ती तिला धोका वाटल्यावर काय करणे अपेक्षित होते तिने?
वन्यप्राणी आणि वनसंपदा सांभाळण्यासाठी आपल्याकडे एक स्वतंत्र विभाग आहे, त्यासाठी एक मंत्री, एक राज्यमंत्री, आणि एक आय ए एस अधिकारी देखील नेमलाय . पण या प्रगत राज्याच्या वनविभागाला एक वाघ जिवंत पकडता आला नाही हि शरमेची नाही तर संताप आणणारी बाब आहे. तुम्हाला १३ महिने पाठलाग करून २ पिलांच्या आईला जिवंत पकडता आले नाही? खरंच प्रामाणिक प्रयत्न झाले का?
अवनीला मारल्यानंतर आता तिच्या २ पिलांचे काय ? जगातील का ती?
बरं या सगळ्या मोहिमेत संशय घेण्याला बरीच जागा आहे, १३ महिन्याचा शोध, रात्री केलेली कारवाई, त्यात दाट मारण्यासाठी पशुवैद्याचिकिसक असावा लागतो, तोही नव्हता सोबत, मग दाट कोणी मारला? नक्की दाट मारला का?
आज शवविच्छेदन करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगतिले ते म्हणजे अवनीला पाठमोरी असताना गोळी घातली गेलीये, दाट मारल्यावर तिथून रक्त निघणे अपेक्षित असते ते निघाले नाहीये., आणि महतवाचे म्हणजे शिकारी असगर अलीने गोळी नाही तर त्याच्या मुलाने शिकार केली आहे .....वर तो शिकारी असगर अली म्हणे तिची २ पिल्लेही नरभक्षक होऊ शकतात..म्हणजे याला हौस पूर्ण करण्याची अजून २ संधी.. अरे १३ महिन्याची पिल्ले माणसाची सोड, सशाची तरी शिकार करू शकतात का?
आणखी एक चीड आणणारी गोष्ट म्हणजे तिथली गावकऱ्यांनी अवनीची हत्या झाल्यावर गावात फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला.. कहर आहे .. गावातील, घरातील व्यक्ती ठार झाल्यावर दुःख हे होणारच पण या गावकऱ्यांना समुपदेशनाची गरज होती, जेणे करून हि घटना टाळता अली असती.
वन आणि वन्य प्राण्याचे महत्व समजावून सांगून गावकऱ्यांच्या मदतीने हातात हात घालून काम करता आले असते.
त्याच कसंय ना कि असे वाघ मारल्याने सरकारला कधी धक्का लागत नाही, जेमतेम मंडळी सोशल नेटवर्किंगवर विरोध निषेध करतात पण चिंता नसावी , आपले सरकार सुरक्षित आहे.
आणि हो जेव्हापासून मुनगंटीवार वनमंत्री झालेत तेव्हापासून ३ वाघ, १२ बिबटे, आणि २००च्या वर रानडुकरे मारण्याचे आदेश गेलेत आणि अमलात देखील आलेत.
सलाम मुनगंटीवार आपल्याला.
वाचने
27852
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
योग्य शब्दात छान प्रतिसाद.
In reply to कोणत्याही वादात न पडता आणि by सुबोध खरे
छान प्रतिसाद..!!
In reply to कोणत्याही वादात न पडता आणि by सुबोध खरे
उत्तम संतुलित प्रतिसाद डॉक्टर
In reply to कोणत्याही वादात न पडता आणि by सुबोध खरे
वा डॉक मस्त प्रतिसाद . सौ
थोडे विषयांतर...सॉरी!
साहेब
In reply to थोडे विषयांतर...सॉरी! by समीरसूर
ताक चालेल...
In reply to साहेब by इरसाल
हा इफेक्ट सर्व ऑनलाईन
In reply to थोडे विषयांतर...सॉरी! by समीरसूर
न्यूजपेपर्स
In reply to हा इफेक्ट सर्व ऑनलाईन by गवि
तुम्ही या बचड्यानची चिंता
अरेरे =:(
In reply to तुम्ही या बचड्यानची चिंता by प्रमोद देर्देकर
अवनीसंदर्भात ही काही माहिती.
खूप महत्वाची माहिती दिलीत, वन
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन