क्षण कण कण..
काळोखाची चाहूल,
एकांडा पक्षी,
घरट्याच्या शोधात.
बहराशी फटकून,
शिशिराच्या आठवणीत,
निष्पर्ण चिनार.
निजल्या आसमंतात,
एकुलती जाग,
कोणत्याशा खिडकीत.
विस्मृत समाधी,
सभोवताल पाचोळा,
सुकलेला फुलोरा.
आकाशाचा भरवंसा,
समुद्राच्या साथीने,
गलबताचा प्रवास.
एकुलता सोबती,
लवलवत्या चितेचा,
नि:शब्द नदीकाठ.
म्हातारपण थकतं,
एकाकी शांतता,
आठवणी धुरकट.
धडाडते आगगाडी,
अंधाराला चिरत,
क्षणासाठी उजळत.
चकाकत्या इमारती,
मोडक्या घरकुलाशी,
फटकून, तुटक.
विझलेली आस,
फाटक्या झोपडीत,
चाचपडते स्वप्न.
देशोधडीचं नशीब,
खपाटीचं पोट,
हतबल सटवाई!

प्रतिक्रिया
धीरगंभीर कविता.
टर्मिनेटर, तुम्हांला आणि
In reply to धीरगंभीर कविता. by टर्मीनेटर
छान काव्य
In reply to टर्मिनेटर, तुम्हांला आणि by यशोधरा
फार
+१
In reply to फार by मिसळलेला काव्यप्रेमी
एकेक कडवं खणखणीत. फार सुरेख.
चित्रदर्शी
एकटेपणा,थकलेलं शरीर यालाच
हायकू आवडल्याबदल सर्वांचे खूप
सगळेच हायकू
असं ठरवून काही लिहीत नाही.
In reply to सगळेच हायकू by नाखु
मस्तच ग यशो
अनामिक एकाकीपण वाटलं सगळ्या हायकूंमध्ये
In reply to मस्तच ग यशो by सविता००१
जबरदस्त लिहिलंस ग! सगळेच
चांगले जमले आहेत.
=))
In reply to चांगले जमले आहेत. by पिवळा डांबिस
=)) =)) =))
In reply to चांगले जमले आहेत. by पिवळा डांबिस
वा!
सुंदर हायकू
वा..
अप्रतिम
पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप
आवडलंय.. पण जरा सकारात्मक पण
मस्त
टेरीफीक.