Skip to main content

क्षण कण कण..

लेखक यशोधरा यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H
क्षण कण कण..
काळोखाची चाहूल, एकांडा पक्षी, घरट्याच्या शोधात. बहराशी फटकून, शिशिराच्या आठवणीत, निष्पर्ण चिनार. निजल्या आसमंतात, एकुलती जाग, कोणत्याशा खिडकीत. विस्मृत समाधी, सभोवताल पाचोळा, सुकलेला फुलोरा. आकाशाचा भरवंसा, समुद्राच्या साथीने, गलबताचा प्रवास. एकुलता सोबती, लवलवत्या चितेचा, नि:शब्द नदीकाठ. म्हातारपण थकतं, एकाकी शांतता, आठवणी धुरकट. धडाडते आगगाडी, अंधाराला चिरत, क्षणासाठी उजळत. चकाकत्या इमारती, मोडक्या घरकुलाशी, फटकून, तुटक. विझलेली आस, फाटक्या झोपडीत, चाचपडते स्वप्न. देशोधडीचं नशीब, खपाटीचं पोट, हतबल सटवाई! H
दिवाळी अंक वर्ष

वाचने 24025
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

धीरगंभीर कविता _/\_ तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

In reply to by टर्मीनेटर

टर्मिनेटर, तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ही एकसंध कविता नव्हे, तर हायकू आहेत - तीन ओळींच्या छोटेखानी कविता. फक्त त्यातील विषयाचे सूत्र समान आहे.

फार सुंदर, यशो तै, __/\__

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

+१

आवडले, सूत्र सकारात्मक ठेवून दुसरी बाजू लिहाच!! ते तुम्हाला नक्कीच शक्य आहे. समस्त मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! वाचकांची पत्रेवाला नाखु

In reply to by नाखु

असं ठरवून काही लिहीत नाही. जेव्हा आणि जसं सुचेल तसं लिहिलं जातं. कवी शैलेंद्र ह्यांचं एक गीत आहे, त्या गाण्यावर माझा नितांत विश्वास आहे.. सबसे मधुर वो गीत जिन्हें हम दर्द के सुर में गाते हैं जब हद से गुज़र जाती है ख़ुशी आँसू भी छलकते आते हैं काँटों में खिले हैं फूल हमारे रंग भरे अरमानों के नादान हैं जो इन काँटों से दामन को बचाए जाते हैं जब ग़म का अन्धेरा घिर आए समझो के सवेरा दूर नहीं हर रात का है पैगाम यही तारे भी यही दोहराते हैं पहलू में पराए दर्द बसा के (तू) हँसना हँसाना सीख ज़रा तूफ़ान से कह दे घिर के उठे हम प्यार के दीप जलाते हैं..

सगळ्या हायकू आवडल्या. एक समान आणिअनामिक एकाकीपण वाटलं सगळ्या हायकूंमध्ये

सर्व हायकूंनी एक चित्रपट डोळ्यासमोरून फिरवला. अतिशय उत्तर रचना. वर प्रतिसादात तुम्ही उल्लेख केलेल्या कवी/गीतकार शैलेन्द्र यांच्या गीताबद्दलही आभार. ___/\___ Sandy

हायकू मस्त जमलाय. परत परत वाचावेसे वाटले. खूप सुंदर

सुंदर! एक समान आणिअनामिक एकाकीपण वाटलं सगळ्या हायकूंमध्ये सविताशी सहमत. स्वाती

कविता ह्या मानवी मनाचा जणू आरसाच. तुमच्या ह्या हायकू अतिशय सुंदर आणि मनाला वेढणाऱ्या आहेत. कवी शैलेन्द्र ह्यांचे गाणे देखील एकदम विषयाला धरून आहे. एकूण सर्वच आवडलं.

आवडलंय.. पण जरा सकारात्मक पण लिही की गं.. सध्या सगळं नकारात्मकच झालंय, जगणंसुद्धा. अवांतरः हायकू मधली तिसरी ओळ अगदी भिन्न असते आधीच्या दोन ओळींच्या.. पण अर्थाला तितक्याच समर्थपणे समेवर भेदते.. होय ना गं?

फारच सुंदर

शांत रसाला किती वेगवेगळी चव असु शकते. अप्रतीम.