Skip to main content

जोगवा

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 13/03/2009 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
नक्षत्रांच्या गावातून कुणी सांगावा धाडला? जीव पाखरू होऊन माझा आभाळा भिडला वैशाखातल्या दुपारी कुणी गारवा पेरला? मनी फुलोरा फुलला, रानी मयूर भारला आला मैफलीला रंग, ताल सुराला भेटला अन्तरात आनंदाचा असा उमाळा दाटला मोतिपोवळे माळून दारी प्राजक्त डोलला हळूवार गूज काही वारा कानात बोलला झाकोळल्या दृष्टीला या दिसे प्रकाश आतला माझ्या फाटक्या झोळीत असा जोगवा घातला
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2108
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

आज अचानक पावसाने लावलेल्या हजेरीमुळे हि कविता सुचलेली दिसते तुम्हाला.. :) पाउस, थंड हवा आणी मातीचा सुगंध मन वेडं करायला समर्थ असतात. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

मोतिपोवळे माळून दारी प्राजक्त डोलला हळूवार गूज काही वारा कानात बोलला मस्तच. काय सुरेख कल्पना आहे!! अप्रतिम. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वैशाखातल्या दुपारी कुणी गारवा पेरला? मनी फुलोरा फुलला, रानी मयूर भारला व्वा. :) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

संपुर्ण कविताच सुंदर आहे. :)

कविता आवडली.