लेखकMipaPremiYogeshयांनी शुक्रवार, 26/10/2018 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
सीमोल्लंघन
काल नासिक ला निघालो तेंव्हाच विचार केला की गोंदेश्वर ला जमल्यास जाऊन यायचे. नाही हो करत करत, ठरवले जायचेच. आणि जेंव्हा सिन्नर मध्ये प्रवेश करून मंदिराच्या आवारात आलो, तेंव्हा एकदम आश्चर्यचकित झालो. अप्रतिम कोरीव काम आणि मंदिर बघून मनोमन त्या अनामिक कलाकारांना नमस्कार केला. सूर्य अस्ताला जात होता, आणि एकदम सुंदर वातावरण होतं. काय अप्रतिम दगडी मंदिर समुह.. बाजूला सूर्य मंदिर आणि त्यात कलत्या सूर्याची किरणे पडत आहेत..कमाल architecture.. नंदी च्या २-3 varities तुटलेल्या अवस्थेत होत्या पण मुख्य नंदी अप्रतिम आणि थोडा लांब नेहेमी असतो त्या पेक्षा..
शंकराच्या पिंडीचा आकार एकदम मोठ्ठा. इतकं शांत नि सुंदर वाटत होतं..हे मंदिर शिव पंचायतन ह्या प्रकारातले आहे. साधारण 11व्या शतकातील मंदिर आहे.
बाहेर पडलो आणि एकदम सुंदर नजारा, एक बाजूला चंद्र उगवत होता आणि दुसऱ्या बाजूला सूर्य मावळत होता..
विचार केला दोन्ही एक फ्रेम मध्ये बसवलं तर किती छान होईल. एक विचार आला..आपल्या आयुष्यात पण अशाच गोष्टी घडत असतात, काही नव्याने सुरुवात होतात आणि काही संपत असतात.दोन्ही जर आपल्या आयुष्याच्या फ्रेम मध्ये घेतल्या, तर जगणं अजून सुंदर होईल..
काही अशाच इतर फ्रेम्स घेऊन निघालो ते परत निवांत येण्यासाठी..
~ योगेश पुराणिक
मला अगदी पहिला आणि अगदी शेवटला हे दोन्ही फोटो खूप आवडले. विशेषतः पहिल्या फोटोत दोन्हीकडे गवताची किनार असलेला मातकट रस्ता मंदिराकडे आपल्याला खेचत नेतो. तिथले मंदिर, आडव्या भिंती आणि झाडझाडोर्याची झुरमुट यात आपली नजर गुंतते आणि त्याहीपलिकडे पाहू जाता एकदम निखळ आकाश अवघी जागा व्यापून आपल्याला शून्यात नेते....
प्रतिक्रिया
(No subject)
वा! सुंदर फोटो!
In reply to (No subject) by जयंत कुलकर्णी
फोटो
In reply to (No subject) by जयंत कुलकर्णी
ब्लॅागरवर फोटो / फ्रेमस टाकले
In reply to फोटो by MipaPremiYogesh
Dhanywad
In reply to ब्लॅागरवर फोटो / फ्रेमस टाकले by कंजूस
थोडं अजून लिहिण्याचा प्रयत्न
अभिप्राय
In reply to थोडं अजून लिहिण्याचा प्रयत्न by प्रचेतस
अतिशय त्रोटक लिहिले आहे. लेख
धन्यवाद
In reply to अतिशय त्रोटक लिहिले आहे. लेख by यशोधरा
वरून तिसरा आणि शेवटचे दोन
In reply to धन्यवाद by MipaPremiYogesh
छान लिहलय... असेच लिहीत रहा.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस हाथ ले उस दे दे ये हे प्यार का हे दस्तुर... :- PYAR KA RANG - Raageshwariधन्यवाद
In reply to छान लिहलय... असेच लिहीत रहा. by मदनबाण
तुम्ही अल्बमचा दुवा दिलेला
१. मिपावर चित्रे प्रसिद्ध
In reply to तुम्ही अल्बमचा दुवा दिलेला by डॉ सुहास म्हात्रे
पहिला आणि शेवटला
Dhanywad