कंपन्यांचे ले ऑफ
आय टी कंपन्या बऱ्याच वेळा ले ऑफ करतात म्हणजेच अर्थात आपल्या एम्प्लॉयीना नारळ देतात . तशा बऱ्याच कंपन्या अगदी नॉन आयटी कंपन्याही ले ऑफ करतात पण कमीतकमी त्यांच्या एम्प्लॉयीना भरपाई देतात . (टेल्को , बजाज वैगेरे ) पण आयटी कंपन्या मात्र फक्त नोटीस पिरेडचे पैसे देतात . कंपनी त्यांना रेसिग्नेशन द्यायला लावते. सभ्य भाषेत त्याला पिंक लेटर मिळाले असेही म्हणतात. रेसिग्नेशन नाही दिले तर टर्मिनेट करू अशी भीती घालतात . मग बिचारे एम्प्लॉयी मुकाट रेसिग्नेशन देतात . त्यांची एकजूट नसल्याने ते कोणाकडे दाद मागू शकत नाहीत . मोठा पगार हा नुसता दिखावा असतो कारण खूपशा लोकांनी घरे घेतलीत . पुण्यामुंबईत घर घ्यायचे म्हणजे करोडो रुपयांचे फ्लॅट असतात. त्याचे हफ्ते , लाईफस्टाईल मेंटेन करण्यात सगळा पगार खर्ची पडत असतो त्यामुळे सेविंग्ज नसतेच आणि असे ले ऑफ झाले कि काही खरे नसते . अक्षरशः दुसरा जॉब मिळोंपर्यंत पूर्णतः वाट लागते कारण घराचे हफ्ते थकवणे शक्य नसते .
हे सर्व का लिहिले तर मी माझ्या कंपनीतले आतापर्यंतचे दोन ले ऑफ पहिले आता तिसरा होऊ घातलाय त्यामुळे डोक्याचा नुसता भुगा झालाय . ज्यांना काढले जाते त्यांच्याकडे त्यांचा परफॉर्मन्स कसा चांगला नव्हता म्हणूनच त्यांना जायची वेळ आली ह्याच नजरेने पाहतात . मॅनेजरचे राजकारण पण काहींना भोवते. एखादा प्रोजेक्ट जातो त्यात क्लाएन्टला किती फुंडींग मिळाले , त्याचा व्यवसाय किती वाढला , आपल्या कंपनीने त्यांच्याकडून किती नफा काढला , इथली तिथली माणसे बदलणे अशा बऱ्याच फॅक्टरवर प्रोजेक्टचे जाणे अवलंबून असते पण सर्वात शेवटी त्याचे खापर एम्प्लॉयी वर फोडून त्यांची हकालपट्टी होते . आतापर्यंत तुम्ही त्यांना का ठेवले त्यांचा परफॉर्मन्स नव्हता तर? पण जोवर कंपन्यांचा फायदा असतो तोवर त्या ठेवून घेतात , भरघोस नफा कमावतात आणि नको असेल तेंव्हा सरळ त्यांना काढून टाकतात . शिवाय ह्या आयटी कंपन्यात तुम्ही एकदा शिका तुम्हालाते कायम उपयोगी पडेल असे कधीच होत नाही , नेहमी स्वतःला अपडेट करत राहा, त्यासाठी खर्च करा , स्वतःला छानछोकी मेंटेन करत रहा , पार्ट्या वगैरे करा , टीमला खुश ठेवण्यासाठी पार्ट्या करत राहा असले उद्योग करावे लागतात . सतत तुम्ही गुलाम असल्यासारखे क्लायंटचा शब्द झेला , त्यासाठीचे पराकोटीचे टेन्शन , स्ट्रेस घ्या पण बिन बोलता तोंडात साखर पेरून काम करत राहा असले उदयॊग करावे लागतात .हे सर्व असह्य होऊन दर फ्रायडेला दारूचे ग्लास रिचवा , दर अर्ध्या तासाला भकाभका सिगारेटी फुंका ...हेच लाईफ होऊन गेलेले असते .
काही उदाहरणे द्यायला आवडतील , पहिल्यांदा जेंव्हा ले ऑफ झाला तेंव्हा एकाची बायको गरोदर होती . रोजची टेन्शन पेलवणार नाही म्हणून ह्याने तिला रिझाईन द्यायला लावलेले . आईवडील ह्याच्यावरच अवलंबून. त्याने कंपनी अगदी लहान होती तेंव्हापासून काम केलेले म्हणजे कंपनि मोठी होण्यात त्याचा नक्कीच हाथ होता .अशा वेळी त्याला व आणखी पंधरा जणांना अर्ध्या तासाच्या नोटीसवर काढून टाकले . टेन्शन ने इतका गोंधळला होता कि बास . कंपनीने काढून टाकताना त्याच्या योगदानाचा विचार केला नाही . घरी सांगितलेस का म्हणल्यावर ,"घरी सांगायची हिम्मत नाही म्हणाला ". त्याला बरेच दिवस जॉब मिळाला नव्हता . किती अवघड आहे अशा स्थितीत जॉब जाणे . त्याच वेळी नुकतेच कॅम्पस मधून रिक्रूट केलेले चार जणांना काढून टाकले . वाळल्यासंगे ओलं जळतंय तसा प्रकार झालेला . बिचाऱ्यांची कॅम्पस मधल्या पुढल्या संधी पण हुकल्या आणि पुन्हा फ्रेशर म्हणून जॉब शोधणे किती अवघड . त्यात एक मुलगी खूप कष्टाने शिकून आलेली ती तर असं झाल्यामुळे इतकी रडली होती कि बास . अर्ध्या तासात कंपनी इमेल अकाउंट बंद झाले . आपल्या सॅलरी स्लिप पण त्यांना फॉरवर्ड करायला जमले नाही .
एकाने नुकतेच होम लोण घेतले होते , काही बॅकअप नाही , डाउनपेमेंट सुद्धा इथून तिथून लोकांकडून उसने घेतले होते. ते परत करण्याचे शेड्युल होते . त्याला हे कंपनीला समजावता समजावता नाकी नऊ आले . कसेतरी त्याला घेतले , पण कधीही संबध नसलेल्या टेकनॉलॉजि वर टाकले आणि शिवाय भारतातच दुसऱ्या लोकेशनला पाठवून दिले . इतके अवघड झाले कि बिचार्याला आपणहून राजीनामा द्यावा लागला .
दुसऱ्या ले ऑफ च्या वेळी काहींना अड्जस्ट करण्यासाठी भलत्याच टीम मधल्या लोकांना जावे लागले . त्यांना चार दिवसाच्या मुदतीवर काढले . जबरदस्त मनस्ताप दिला . दोन महिन्यात पाहिजे तो जॉब मिळण्यासाठी एकजण आपल्या दोन महिन्याच्या बाळाला बायकोला हिथेच सोडून दुसरीकडे जॉब ला गेला. मोठी मुलगी शाळेत , तिला नवीन शहरात ऍडमिशन घेणे अड्जस्ट होणे अवघड वाटले . त्यानेही जवळपास ६ वर्षे ह्या कंपनीत जॉब केला होता . तो गेला तेंव्हा बाकी टीमची पण गोची झाली होती , मॅनेजर तर बिचारा रडकुंडीला आला होता , नवीन लोकांना घेऊ न कसे काम करायचे म्हणून ते हि चार दिवसाच्या केटीवर .
कंपन्या करोडो रुपये मिळवतात आणि पाहिजे तेंव्हा लोकांच्या पोटावर पाय आणतात. काहीतरी कायदे व्हायला हवेत . अवघड आहे एकूण . कंपन्यांच्या मालकांना काहीही फरक पडत नाही . अशा परिस्थितीत नक्की काय करायचे? कंपन्यांशी लॉयल राहणे किती घातक असू शकते . होम लोन घेताना काय करायचे , नवीन जॉब मिलोपर्यंत कसा पेशन्स टिकवायचा ह्यावर ह्यात चर्चा व्हावी असे वाटते . कायदे असले तर कोणते ? त्यासाठी काय क्रायटेरिया असतो वैगेरे मुद्दयांवर चर्चा अपेक्षित आहे . अगोदर अशी चर्चा झाली असल्यास त्याचा धागा हि अवश्य द्यावा .
याद्या
33180
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
असे ले-ऑफ होतात तेव्हा
कमीत कमी २-३ महिने तग धरायचा
In reply to असे ले-ऑफ होतात तेव्हा by रुपी
२ महिने?! तुमच्या इतर
In reply to कमीत कमी २-३ महिने तग धरायचा by जेडी
सहा महिन्यांनी तुमचा जॅाब
आयटी मध्ये एक युनीअन झाली आहे
कोणती युनियन, शोधुन सांगाल का
In reply to आयटी मध्ये एक युनीअन झाली आहे by पाषाणभेद
फाईट : FITE
In reply to कोणती युनियन, शोधुन सांगाल का by जेडी
स्वतःला लायक बनवा
त्यामुळे कर्मचार्यांनी
In reply to स्वतःला लायक बनवा by नेत्रेश
फक्तआय टी कंपन्या.......
हम्म
क्लाऊडमुळे सगळेच ढगात आहेत
या IT मधील लोकांनी आपल्या
छानछोकी मेंटेन करत रहा , पार्ट्या वगैरे करा , टीमला खुश ठेवण्यासाठी पार्ट्यायाची कोणी जबरदस्ती करतो काय ? स्वतःची इमेज वाढवण्याकरता हि फालतुगिरी चालते. बंद करा.करोडो रुपयांचे फ्लॅट असतात. त्याचे हफ्ते , लाईफस्टाईल मेंटेन करण्यात सगळा पगार खर्चीजर का कोणी १ वर्ष लोन करता बॅकअप पुरवणार असेल तरच घर घ्यावे. पूर्वचि पिढी काय वेडी होती काय ? उशिरा / सेटल झाल्यावर घर घ्यायला. जे नोकरीत सुखचित्र दिसतेय ते कायम टिकणारे नाही हि जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. हॉटेलिंग / lifestyle / फॅन्सी शॉपिंग सर्व फालतुगिरी आहे. अंथरूण पाहून पाय पसरावे. थोडक्यात नोकरी गेली तर रडण्यात काय अर्थ नाही. आणि हे प्रकार आता वाढतच जाणार आहेत हे लक्षात ठेवावे.योग्य
In reply to या IT मधील लोकांनी आपल्या by अभिजित - १
Not Only IT
आमचे २ पैसे!
>>होणारे बदल कारणीभूत आहेत
पण मध्यम/लहान आकाराच्या
पण मध्यम/लहान आकाराच्या सर्विस कंपन्या मध्ये असं तडकाफडकी काढून टाकण्याचे प्रकार जास्त होतात असं वाटतं.भारतीय आय टी कंपन्या यात आघाडीवर आहेत. काही अमेरीकन कंपन्यादेखील आहेत. या सर्व बड्या कंपन्या आहेत.हे नाही पटलं
मी स्वत: हे फेस करते, लोक
In reply to हे नाही पटलं by मिसळलेला काव्यप्रेमी
नाव?
In reply to मी स्वत: हे फेस करते, लोक by जेडी
मी एका आय टी कंपनीत काम करते,
तुमचं नाव जेडी आहे म्हटल्यावर
In reply to मी एका आय टी कंपनीत काम करते, by जेडी
जेडी म्हणजे Jack Daniel नाही
In reply to तुमचं नाव जेडी आहे म्हटल्यावर by आनन्दा
साधारण 5 वर्षांपूर्वी
मस्त प्रतिसाद....
In reply to साधारण 5 वर्षांपूर्वी by आनन्दा
स्वानुभव सांगितल्याबद्दल
In reply to साधारण 5 वर्षांपूर्वी by आनन्दा
अतिशय छान प्रतिसाद!
In reply to साधारण 5 वर्षांपूर्वी by आनन्दा
मी asset असे वेगळ्या अर्थाने
In reply to अतिशय छान प्रतिसाद! by Nitin Palkar
पाचही मुद्दे पटले
In reply to साधारण 5 वर्षांपूर्वी by आनन्दा
अगदी हेच चालते
In reply to पाचही मुद्दे पटले by राजेंद्र मेहेंदळे
मस्त धागा आहे.
आय टी त नोकरी लागल्यावर,
शेती शिवाय मजा नाही..!!
In reply to आय टी त नोकरी लागल्यावर, by विशुमित
कमाल आहे !
In reply to आय टी त नोकरी लागल्यावर, by विशुमित
आय टी त नोकरी लागल्यावर, फ्लॅट घेण्यापेक्षा 2 एकर शेती घ्या. कधीच उपाशी मरणार नाही. शेती शिवाय मजा नाही..!!असे !!! नक्की काय भानगड आहे ?!मी फायदा तोट्या बाबत चकार
In reply to कमाल आहे ! by डॉ सुहास म्हात्रे
असं होय ! :)
In reply to मी फायदा तोट्या बाबत चकार by विशुमित
आय टी मधील बरेच जण मिपा
माझ्या आॅफिसमधले मी सोडुन
In reply to आय टी मधील बरेच जण मिपा by विशुमित
मला पण असेच वाटायचे.
In reply to माझ्या आॅफिसमधले मी सोडुन by जेडी
पडिक असतात
In reply to आय टी मधील बरेच जण मिपा by विशुमित
खरंच पहिला मी पडिकच होतो
In reply to पडिक असतात by Nitin Palkar
धन्यवाद....
+1
In reply to धन्यवाद.... by मुक्त विहारि
_/\_
In reply to धन्यवाद.... by मुक्त विहारि
हम्म
In reply to _/\_ by तुषार काळभोर
सुंदर व्यावहारिक आणि "केले ते
In reply to धन्यवाद.... by मुक्त विहारि
धन्यवाद...
In reply to सुंदर व्यावहारिक आणि "केले ते by डॉ सुहास म्हात्रे
उत्तम प्रतिसाद पण..
In reply to धन्यवाद.... by मुक्त विहारि
तुम्हाला COBOL म्हणायच आहे का
In reply to उत्तम प्रतिसाद पण.. by सतिश म्हेत्रे
कोबोल
In reply to तुम्हाला COBOL म्हणायच आहे का by मराठी_माणूस
COBOLच आहे....
In reply to कोबोल by माईसाहेब कुरसूंदीकर
अभी इस प्रतिसादके लिये, हम .
In reply to धन्यवाद.... by मुक्त विहारि
धन्यवाद मुवी, खुपच छान
In reply to धन्यवाद.... by मुक्त विहारि
स्वतःचे घर नाही ? १५ वर्षा
In reply to धन्यवाद.... by मुक्त विहारि
१५ वर्षा पूर्वी ५ लाख ला घेतलेल्या घराची किंमत आज ५५ लाख आहे.
In reply to स्वतःचे घर नाही ? १५ वर्षा by अभिजित - १
गंभीर प्रश्न
In reply to धन्यवाद.... by मुक्त विहारि
EVERYONE is replaceable
In reply to धन्यवाद.... by मुक्त विहारि
वा वा !__/\__
येवा आणि एकदा आमच्या घरला वैनींना घेऊन !
In reply to वा वा !__/\__ by सस्नेह
. . .
मस्त प्रतिसाद. सध्या
म्हणजे
In reply to मस्त प्रतिसाद. सध्या by मार्मिक गोडसे
माईसाहेब, अवांतर वाचनामुळे
In reply to म्हणजे by माईसाहेब कुरसूंदीकर
कर्ज काढून कुठलीच वस्तू घेत नाही.
In reply to माईसाहेब, अवांतर वाचनामुळे by मार्मिक गोडसे
मी या मताशी सहमत नाही.
In reply to कर्ज काढून कुठलीच वस्तू घेत नाही. by मुक्त विहारि
तुमचे मुद्दे बरोबर आहेत....
In reply to मी या मताशी सहमत नाही. by सुबोध खरे
माझ्या बाबतीत उलट आहे. मी
In reply to तुमचे मुद्दे बरोबर आहेत.... by मुक्त विहारि
अतिशय योग्य...!
In reply to मी या मताशी सहमत नाही. by सुबोध खरे
सर्वचं ठिकाणी असे प्रकार चालतात.
ले ऑफ हि चांगली गोष्ट आहे.
ले ऑफ योग्य की अयोग्य हा
In reply to ले ऑफ हि चांगली गोष्ट आहे. by साहना
नाण्याची दुसरी बाजू --आय टी
ही पण एक बाजू आहेच....
In reply to नाण्याची दुसरी बाजू --आय टी by सुबोध खरे
उत्तम विश्लेषण.
In reply to नाण्याची दुसरी बाजू --आय टी by सुबोध खरे
साहना आणि डॉ.सुबोध खरेंच्या प्रतिसादाशी सहमत.
या समस्येचे मूळ अनेक
USE & THROW
In reply to या समस्येचे मूळ अनेक by मराठी कथालेखक
एक वर्षाने असे हे भरती केलेले लोक इतरत्र कुठे फिट होतील का नसल्यास त्यांची काय सोय करता येईल वगैरे काहीच विचार नसतोUSE & THROWखरे आहे
In reply to USE & THROW by अभिजित - १
1, 2 वर्षांचा अनुभव! फ्रेशर ना देखील अशा ऑफर मिळतात.
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
पण
In reply to 1, 2 वर्षांचा अनुभव! फ्रेशर ना देखील अशा ऑफर मिळतात. by सतिश म्हेत्रे
कॉलेज वर अवलंबून असते.
In reply to पण by माईसाहेब कुरसूंदीकर
माझा वर म्हटलेल्या मित्राशी
गूगल आणि qualcomm ची तुलना पॅकेज च्या बाबतीत होवू शकत नाही.
In reply to माझा वर म्हटलेल्या मित्राशी by सुबोध खरे
माफ करा
In reply to गूगल आणि qualcomm ची तुलना पॅकेज च्या बाबतीत होवू शकत नाही. by सतिश म्हेत्रे
प्राध्यापक जे शिकवू शकतील तेच शिकवले जाते.
अद्ययावत ज्ञान किंवा उद्योगाला काय आवश्यक आहे ते शिकवले जातेच असे नाही. ( मुळात बर्याच ठिकाणी नोकरी मिळेपर्यंत एम इ केलेले प्राध्यापक सुरुवातीला काही वर्षे अर्ध वेतनावर काम करत असतात. त्याना स्वतःलाच उद्योगात काय चाल्ले आहे ते माहिती नसते मग ते विद्यार्थ्यांना काय शिकवणार?) यामुळे बाजारात या दोन ठिकाणहून पास झालेल्या अभियंत्याना मिळणाऱ्यामान आणि धन
यात इतकी तफावत दिसून येते.IIT किंवा tier 1 colleges स्वायत्त(Autonomous) असतात.
In reply to माफ करा by सुबोध खरे
त्यांना मदतही भरपुर
In reply to IIT किंवा tier 1 colleges स्वायत्त(Autonomous) असतात. by सतिश म्हेत्रे
किमान ३ ते ६ (आणि मुलं असतील