Skip to main content

कंपन्यांचे ले ऑफ

लेखक जेडी यांनी मंगळवार, 23/10/2018 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
आय टी कंपन्या बऱ्याच वेळा ले ऑफ करतात म्हणजेच अर्थात आपल्या एम्प्लॉयीना नारळ देतात . तशा बऱ्याच कंपन्या अगदी नॉन आयटी कंपन्याही ले ऑफ करतात पण कमीतकमी त्यांच्या एम्प्लॉयीना भरपाई देतात . (टेल्को , बजाज वैगेरे ) पण आयटी कंपन्या मात्र फक्त नोटीस पिरेडचे पैसे देतात . कंपनी त्यांना रेसिग्नेशन द्यायला लावते. सभ्य भाषेत त्याला पिंक लेटर मिळाले असेही म्हणतात. रेसिग्नेशन नाही दिले तर टर्मिनेट करू अशी भीती घालतात . मग बिचारे एम्प्लॉयी मुकाट रेसिग्नेशन देतात . त्यांची एकजूट नसल्याने ते कोणाकडे दाद मागू शकत नाहीत . मोठा पगार हा नुसता दिखावा असतो कारण खूपशा लोकांनी घरे घेतलीत . पुण्यामुंबईत घर घ्यायचे म्हणजे करोडो रुपयांचे फ्लॅट असतात. त्याचे हफ्ते , लाईफस्टाईल मेंटेन करण्यात सगळा पगार खर्ची पडत असतो त्यामुळे सेविंग्ज नसतेच आणि असे ले ऑफ झाले कि काही खरे नसते . अक्षरशः दुसरा जॉब मिळोंपर्यंत पूर्णतः वाट लागते कारण घराचे हफ्ते थकवणे शक्य नसते . हे सर्व का लिहिले तर मी माझ्या कंपनीतले आतापर्यंतचे दोन ले ऑफ पहिले आता तिसरा होऊ घातलाय त्यामुळे डोक्याचा नुसता भुगा झालाय . ज्यांना काढले जाते त्यांच्याकडे त्यांचा परफॉर्मन्स कसा चांगला नव्हता म्हणूनच त्यांना जायची वेळ आली ह्याच नजरेने पाहतात . मॅनेजरचे राजकारण पण काहींना भोवते. एखादा प्रोजेक्ट जातो त्यात क्लाएन्टला किती फुंडींग मिळाले , त्याचा व्यवसाय किती वाढला , आपल्या कंपनीने त्यांच्याकडून किती नफा काढला , इथली तिथली माणसे बदलणे अशा बऱ्याच फॅक्टरवर प्रोजेक्टचे जाणे अवलंबून असते पण सर्वात शेवटी त्याचे खापर एम्प्लॉयी वर फोडून त्यांची हकालपट्टी होते . आतापर्यंत तुम्ही त्यांना का ठेवले त्यांचा परफॉर्मन्स नव्हता तर? पण जोवर कंपन्यांचा फायदा असतो तोवर त्या ठेवून घेतात , भरघोस नफा कमावतात आणि नको असेल तेंव्हा सरळ त्यांना काढून टाकतात . शिवाय ह्या आयटी कंपन्यात तुम्ही एकदा शिका तुम्हालाते कायम उपयोगी पडेल असे कधीच होत नाही , नेहमी स्वतःला अपडेट करत राहा, त्यासाठी खर्च करा , स्वतःला छानछोकी मेंटेन करत रहा , पार्ट्या वगैरे करा , टीमला खुश ठेवण्यासाठी पार्ट्या करत राहा असले उद्योग करावे लागतात . सतत तुम्ही गुलाम असल्यासारखे क्लायंटचा शब्द झेला , त्यासाठीचे पराकोटीचे टेन्शन , स्ट्रेस घ्या पण बिन बोलता तोंडात साखर पेरून काम करत राहा असले उदयॊग करावे लागतात .हे सर्व असह्य होऊन दर फ्रायडेला दारूचे ग्लास रिचवा , दर अर्ध्या तासाला भकाभका सिगारेटी फुंका ...हेच लाईफ होऊन गेलेले असते . काही उदाहरणे द्यायला आवडतील , पहिल्यांदा जेंव्हा ले ऑफ झाला तेंव्हा एकाची बायको गरोदर होती . रोजची टेन्शन पेलवणार नाही म्हणून ह्याने तिला रिझाईन द्यायला लावलेले . आईवडील ह्याच्यावरच अवलंबून. त्याने कंपनी अगदी लहान होती तेंव्हापासून काम केलेले म्हणजे कंपनि मोठी होण्यात त्याचा नक्कीच हाथ होता .अशा वेळी त्याला व आणखी पंधरा जणांना अर्ध्या तासाच्या नोटीसवर काढून टाकले . टेन्शन ने इतका गोंधळला होता कि बास . कंपनीने काढून टाकताना त्याच्या योगदानाचा विचार केला नाही . घरी सांगितलेस का म्हणल्यावर ,"घरी सांगायची हिम्मत नाही म्हणाला ". त्याला बरेच दिवस जॉब मिळाला नव्हता . किती अवघड आहे अशा स्थितीत जॉब जाणे . त्याच वेळी नुकतेच कॅम्पस मधून रिक्रूट केलेले चार जणांना काढून टाकले . वाळल्यासंगे ओलं जळतंय तसा प्रकार झालेला . बिचाऱ्यांची कॅम्पस मधल्या पुढल्या संधी पण हुकल्या आणि पुन्हा फ्रेशर म्हणून जॉब शोधणे किती अवघड . त्यात एक मुलगी खूप कष्टाने शिकून आलेली ती तर असं झाल्यामुळे इतकी रडली होती कि बास . अर्ध्या तासात कंपनी इमेल अकाउंट बंद झाले . आपल्या सॅलरी स्लिप पण त्यांना फॉरवर्ड करायला जमले नाही . एकाने नुकतेच होम लोण घेतले होते , काही बॅकअप नाही , डाउनपेमेंट सुद्धा इथून तिथून लोकांकडून उसने घेतले होते. ते परत करण्याचे शेड्युल होते . त्याला हे कंपनीला समजावता समजावता नाकी नऊ आले . कसेतरी त्याला घेतले , पण कधीही संबध नसलेल्या टेकनॉलॉजि वर टाकले आणि शिवाय भारतातच दुसऱ्या लोकेशनला पाठवून दिले . इतके अवघड झाले कि बिचार्याला आपणहून राजीनामा द्यावा लागला . दुसऱ्या ले ऑफ च्या वेळी काहींना अड्जस्ट करण्यासाठी भलत्याच टीम मधल्या लोकांना जावे लागले . त्यांना चार दिवसाच्या मुदतीवर काढले . जबरदस्त मनस्ताप दिला . दोन महिन्यात पाहिजे तो जॉब मिळण्यासाठी एकजण आपल्या दोन महिन्याच्या बाळाला बायकोला हिथेच सोडून दुसरीकडे जॉब ला गेला. मोठी मुलगी शाळेत , तिला नवीन शहरात ऍडमिशन घेणे अड्जस्ट होणे अवघड वाटले . त्यानेही जवळपास ६ वर्षे ह्या कंपनीत जॉब केला होता . तो गेला तेंव्हा बाकी टीमची पण गोची झाली होती , मॅनेजर तर बिचारा रडकुंडीला आला होता , नवीन लोकांना घेऊ न कसे काम करायचे म्हणून ते हि चार दिवसाच्या केटीवर . कंपन्या करोडो रुपये मिळवतात आणि पाहिजे तेंव्हा लोकांच्या पोटावर पाय आणतात. काहीतरी कायदे व्हायला हवेत . अवघड आहे एकूण . कंपन्यांच्या मालकांना काहीही फरक पडत नाही . अशा परिस्थितीत नक्की काय करायचे? कंपन्यांशी लॉयल राहणे किती घातक असू शकते . होम लोन घेताना काय करायचे , नवीन जॉब मिलोपर्यंत कसा पेशन्स टिकवायचा ह्यावर ह्यात चर्चा व्हावी असे वाटते . कायदे असले तर कोणते ? त्यासाठी काय क्रायटेरिया असतो वैगेरे मुद्दयांवर चर्चा अपेक्षित आहे . अगोदर अशी चर्चा झाली असल्यास त्याचा धागा हि अवश्य द्यावा .

वाचने 33227
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

ले ऑफ हि चांगली गोष्ट आहे. अश्याने कंपनी चे नसते खर्च कमी होतात, कंपनी चांगली चालते आणि जास्त लोकांना रोजगार मिळतो. ले ऑफ करणाऱ्या कंपन्या आमच्या देशांत तसेच इतर सर्व देशांत जास्त प्रगती करतात आणि नाही करणाऱ्या कंपन्या रेल्वे, इंडियन एरलाईन्स प्रमाणे चालतात. कर्मचारी ह्या दृष्टीने दुसर्याच्या संपत्तीवर तुमचा काहीही अधिकार नाही आणि म्हणूनच नोकरीची हमी सुद्धा नाही. तुम्हाला नोकरी तोपर्यंतच मिळेल जो पर्यंत तुम्ही कंपनी साठी फायदा करून देता. त्यामुळे एकदा तुम्ही कंपनीवर ओझे झालात कि इतर कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने तुम्हाला नारळ देणे आवश्यक आहे. ले ऑफ विरोधांत कायदे झाले तर भारतातील गुंतवणूक कमी होईल आणि कमी नोकऱ्या निर्माण होतील आणि आम्ही पुन्हा इंदिरा गांधींच्या गरिबी हटावो समाजवादी गटारांत लोळत पडू. टीप : काही कंपन्या रोजगार कराराचा भंग करून ले ऑफ करतात, अश्याना त्वरित आणि जबर शिक्षा करायला पाहिजे.

In reply to by साहना

ले ऑफ योग्य की अयोग्य हा प्रश्न नाही.. पण ले ऑफ ची वेळ येवू नये याकरिता कंपन्या स्वत: काय प्रयत्न करतात , कशी धोरणे अवलंबतात .. मूळात काही दीर्घदृष्टी असते की नाही हा प्रश्न आहे.. खाली एका प्रतिसादात मी लिहिलंय. कंपन्यांनी तोट्यात जात कर्मचार्‍यांना सांभाळावं असं मी म्हणत नाहीये पण भरती करताना आणि पगार वाढवतानाच दीर्घकालीन विचार करायला हवा. उगाच रेल्वे , एअर इंडिया ई सरकारी आस्थापनांशी तुलना करण्यात अर्थ नाही. ले ऑफची वेळ येवू नये म्हणून कंपन्यांनी , तर कंपनीवर तशी वेळ आलीच तरी त्यात आपण असू नये याकरिता कर्मचार्‍यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे (म्हणजे सकारात्मकपणे गुणवत्ता, स्किल्स , परफॉर्मन्स यावर काम करुन ... राजकारण करुन नव्हे) एखाद्या कंपनीवर वारंवार ले ऑफची वेळ येत असेल तर त्या कंपनीची अधोगती निश्चित आहे... अशी कंपनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार इतकं नक्की.. अशा कंपनीत जाताना असुरक्षिततेमूळे नवीन लोक वाजवीपेक्षा खूप जास्त पगाराची अपेक्षा करतील.. अनेक लोक तर अशी कंपनी सरळ टाळतीलच. .. आत असलेल्या लोकांच्या मनातही असुरक्षिततेच्या भावनेमुळे अस्वस्थता येईल, राजकारण वाढेल आणि परफॉर्मन्सचे बारा वाजतील. असो.

नाण्याची दुसरी बाजू --आय टी क्षेत्रातील एक वास्तव (जे आय टी कर्मचारी स्वतःहून कधीही सांगणार नाहीत.) जेंव्हा तुमच्या कौशल्याला बाजारात किंमत असते तेंव्हा जास्त पगार देणाऱ्या कंपनीकडे तडकाफडकी जाणारे आय टी कर्मचारी भरपूर आहेत. अशावेळेस हे लोक कंपनीची अडचण पाहत नाहीत. एक तर पगार जबर वाढवून मागतात किंवा सरळ बॉण्ड असेल तर पैसे भरून नाही तर असेच फटकन सोडून जातात. चालू असलेल्या प्रोजेक्ट चे काय होते याची त्यांना फिकीर नसते. प्रकल्प चालू असताना कित्येक कर्मचारी आपल्या मागण्या मान्य करून घेताना कंपनीला वेठीस धरतात. ३०-५०% पगारवाढही देऊन अशा माणसाला ठेवून घेतात. याचा गोपनीय अहवाल वरिष्ठ व्यवस्थापनाकडे पोचतच असतो. कंपन्या अशा माणसाचे कौशल्य काय ते शोधून त्याला पर्याय निर्माण करतात आणि पर्याय निर्माण केला कि सर्वात पहिल्यांदा अशा कर्मचाऱ्यांना गुलाबी चिठ्ठी देतात. कोणत्याही कर्मचाऱ्याला डोईजड होऊ न द्यायचे कंपनीचे धोरण असते. SAP या तंत्रज्ञानात सुरुवातीला लोकांना प्रचंड पगार देत असत आणि पगारवाढीसाठी लोक असे इकडून तिकडे जात असत. हा लेख मी आय गेट (पटणी) मध्ये काम करत असलेल्या एका अति वरिष्ठ माणसाशी (ज्याची आता स्वतःची पुण्यात कंपनी आहे). बोलत असताना त्याने सांगितलेली वस्तुस्थिती आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे पाच सहा वर्ष अनुभव असलेले काही अभियंते अतिशय माजोरड्या भाषेत बोलत असत. ता क- मला आय टी मध्ये काहीही ज्ञान नाही आणि हे सर्व ऐकीव माहितीवर( मित्राने सांगितलेल्या) माहितीवर आधारित आहे.

In reply to by सुबोध खरे

कारण, माझ्या नात्यातल्या एका स्वतःची आय.टी. कंपनी असलेल्या माणसाने पण हेच सांगीतले. आणि मी ज्या-ज्या कंपनीत काम केले होते, तिथे पण हीच परिस्थिती होती. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही...आणि एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात...

साहना आणि डॉ.सुबोध खरेंच्या प्रतिसादाशी सहमत. साहनाजी ले ऑफ हि कर्मचाऱ्यांच्या दृष्टीकोनातून नसली तरी कंपनीसाठी चांगली गोष्ट आहे. सुबोधजी आपण दिलेली माहिती ऐकीव असली तरी त्यात नक्कीच तथ्य आहे. अशा गोष्टी सर्रास होतात. कॉल सेंटर्स (Customer Care), BPO (Business Process Outsourcing ), KPO (Knowledge Process Outsourcing), LPO (Legal Process Outsourcing) हि IT क्षेत्राच्या विकासातून जन्मलेली अपत्ये आहेत. व्यवसाय देणाऱ्या क्लायंटची हांजी हांजी करणे हि त्यांची व्यावसायिक गरज आणि SLA (Service level agreement) मधील अटी आणि शर्तींचे काटेकोरपणे पालन करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे. IT क्षेत्रातील इंफोसिस , टीसीएस, विप्रो, टेक महिंद्रा सारख्या बड्या भारतीय कंपन्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डिजिटल सोल्युशन अशी कामे करत असल्या तरी त्यांचा तंबू हा मुख्यत्वे BPO आणि KPO च्या बाम्बुंवर उभा आहे. देशी/परदेशी क्लायंटस कडून मिळणाऱ्या व्यवसायावरच हेड काउंट ठरत असल्याने त्यांच्यावरही ले ऑफ ची वेळ आलेली आहे तिथे मध्यम व लहान कंपन्यांची काय कथा. मुळात आगमनातच ह्या कंपन्यांनी इंडस्ट्री स्टँडर्ड पेक्षा कितीतरी अधिक पगार देऊन कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या होत्या, त्यामुळे ले ऑफ मिळाल्यावर अथवा स्वेच्छेने नोकरी सोडल्यावर कमी पगारावर दुसरीकडे नोकरी स्वीकारण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. काहीजणांना मिळतेही लवकरच दुसरी चांगली नोकरी पण ज्यांना नाही मिळत त्यातले बरेच जण नैराश्याने ग्रासून जातात. वरचा मुक्तविहारींचा प्रतिसादही छान आहे. माझ्या मते जॉब सिक्युरिटी नसलेल्या ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी IT तील चांगल्या पगाराच्या जॉब कडे नोकरीच्या दृष्टीने न बघता धंद्याच्या दृष्टीने बघणे योग्य. कारण त्यांना मिळणारा मासिक पगार हा लहान वा मध्यम व्यवसाय असणाऱ्या दुकानदार किंवा व्यापाऱ्याच्या मासिक उत्पन्नाएवढा असतो काही प्रसंगी त्याहूनही जास्तीच असतो. धंद्यात जसे सगळेच दिवस चांगले नसतात तसेच वाईटही नसतात, उतार चढाव येत जात असतात. त्यामुळे चांगल्या दिवसांत होणाऱ्या लाभातून पुढे कधीतरी येणाऱ्या अनिश्चिततेसाठी बेगमी करून ठेवणे इष्ट.

या समस्येचे मूळ अनेक वर्षांपासूनच्या आय टी कंपन्यांच्या गडबडलेल्या धोरणात आहे. दूरचा विचार केला जात नाही. आलाय प्रोजेक्ट,चांगला पैसा मिळणार आहे तर भरा घाईने मग त्याकरिता नेहमीचा बँड सोडून अधिक पगार द्यावा लागला तरी चालेल... मग असे केल्याने पगाराचा सामान्य पट्टाच अधिक उंचावतो आणि उत्तरोत्तर अधिक उंचावत राहतो. दुसरी गोष्ट अमूक टेक्नॉलॉजीचा एकच प्रोजेक्ट आलाय तरी त्याकरिता खास त्याकरिता लोक भरतील भले एक वर्षाचाच प्रोजेक्ट असेल, एक वर्षाने असे हे भरती केलेले लोक इतरत्र कुठे फिट होतील का नसल्यास त्यांची काय सोय करता येईल वगैरे काहीच विचार नसतो...फक्त लघू पल्ल्याचा विचार अशाने या कंपन्या (म्हणजे त्यांची टॉप मॅनेजमेंट) स्वतःही तणावाखाली राहतात आणि कर्मचार्‍यांनाही सतत दडपण.

In reply to by मराठी कथालेखक

एक वर्षाने असे हे भरती केलेले लोक इतरत्र कुठे फिट होतील का नसल्यास त्यांची काय सोय करता येईल वगैरे काहीच विचार नसतो USE & THROW

In reply to by अभिजित - १

गूगल सारख्या कंपन्या वर्षाला २०-२५ लाख रुपये पगार देतात(१/२ वर्षे अनुभव असला तरी) असे ऐकले आहे. अभियंता कितीही हुशार असला तरी हा पगार अचाट वाटतो. गूगलला नफाही अतिप्रचंड मिळत असल्याने तसे असावे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माझ्या कॉलेज मध्ये मध्ये DE Shaw, Uber, Sprinklr, Intuit वगैरेंनी 20 लाखांच्या आसपास बेस सॅलरी असणार्‍या ऑफर्स दिल्या आहेत.

In reply to by सतिश म्हेत्रे

पण असे काय योगदान हे लोक देतात हा प्रश्न कायम पडतो. मागणी-पुरवठा- नफा… हे सगळे मान्य पण विप्रोतला फ्रेशर ४ लाख(?) तर त्याचाच वर्गतला एखादा "Uber" मध्ये २० लाख . उत्सुकतेपोटी विचारत आहे. मध्यंतरी एम.बी.ए.चे फॅड आले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

जर तुम्ही IIT, NIT मधुन असाल तर प्रवेश घेताना तुम्ही ईतके कष्ट घेतलेले असते की त्यामुळे कष्ट करायची सवय आधीच लागलेली असते आणि गणित वगैरे विषयातील ज्ञान ईतर कॉलेज मधील मुलांपेक्षा जास्त असते. पुढे या कॉलेज मधील मुले निव्वळ कॉलेज मध्ये काय शिकवले जात आहे याचा अभ्यास न करता ईतर गोष्टी ही शिकतात (जसे की machine learning, no sql, big data). ही मुले स्वतः चे प्रॉब्लेम solving स्किल्स सुधारण्यासाठी codechef, codeforces, hackerrank अश्या वेबसाईटवर competitive कोडिंग करतात. आणि बाजारात प्रॉब्लेम solvers ना जास्त पगार आहे. या जास्त पगार देणार्‍या कंपन्या कोडिंग चेच प्रश्न प्रामुख्याने विचारतात. जरी ईतर tier 2,tier 3 कॉलेजेस मधील काही मुले या गोष्टी करत असतील तरी त्या कॉलेज मध्ये शक्यतो या कंपन्या जात नसल्याने या मुलांना करियर च्या सुरुवातीला तरी अश्या ठिकाणी काम करण्याची संधी सहसा मिळत नाही. 1.विप्रो कॉलेज नुसार पॅकेज बदलते. माझ्या कॉलेज मध्ये त्यांनी 10 लाखाचे पॅकेज दिले. पण तरीही त्यांना CSE चे कोणी मिळाले नाही. कारण CSE चे सगळे आधीच प्लेस झालेले. 2.IIT, NIT मधील सगळीच मुले वर सांगितलेल्या गोष्टी करतात असे नाही. मात्र बहुतेक जण करतात. पॅकेज देखील प्रत्येकाला त्याच्या योग्यतेचे मिळते. 3.IIT, NIT हे फक्त tier 1 colleges ना संबोधित करण्यासाठी वापरलेले आहे. Tier 1 मध्ये ईतर ही काही कॉलेज येतात. जसे की BITS पिलानी. 4. योगदानाबद्दल म्हणाल तर 4 5 लाख रुपये पगार देणार्‍या कंपन्या 20 लाख रुपये पगार देणार्‍या पेक्षा खूप कमी काम करवून घेतात. किंवा ते काम करण्यासाठी CSE ची पदवी असण्याची गरज नसते. त्यांना फक्त माणसे हवी असतात. मग भलेही तो माणूस केमिकल इंजिनियर का असेना. याउलट जास्त पगार देणार्‍या कंपन्या फक्त CS, IT साठी उघड्या (open) असतात. 5. MBA केल्यावर माणूस Software Engineer रहात नाही. त्यामुळे त्याचा पगार हा software engineer चा पगार म्हणता येणार नाही. 6. विप्रो वाल्याच्या वर्गातला Uber मध्ये - हाताची पाचही बोटे सारखी नसतात. आरक्षण असल्यामुळे एका वर्गातील सर्व जण सारख्या बुद्धीमत्तेची नसतात. माझ्या वर्गात JEE Mains AIR 306 asnara देखील आहे आणि 1 लाखावर असणारा देखील आहे. माझ्यामते सर्व जण हा गॅप फिल करू शकत नाहीत. (हा माझा पाहिलाच मोठा प्रतिसाद आहे. काही चुका असतील तर त्या निदर्शनास आणून द्याव्यात.)

माझा वर म्हटलेल्या मित्राशी बोलताना मी त्याला विचारले कि आय आय टी मध्ये संगणक शास्त्रात होणार अभियंता आणि कवडे पाटील( किंवा तत्सम कोणतेही महाविद्यालय) मुंबई विद्यापीठ यातून पास झालेला अभियंता या दोघात फरक काय आहे. (शब्दशः आय आय टी मधून पास होणार्यांना काय गूळ लागलाय?) त्याने मला सांगितले कि आय आय टी मध्ये तळापासून वर चढत्या भाजणीने अधिकाधिक उच्च दर्जाचे गणित आणि लॉजिक (कोडींग किंवा जे काही लागते ते मला आता आठवत नाहीये) शिकवले जाते. परीक्षेत चढत्या भाजणीने कठीण आणि गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जातात आणी त्याप्रमाणे गुण दिले जातात. त्यामुळे तेथे (आय आय टी मध्ये) पहिल्या आलेल्या मुलाला १०० गुण असतील तर ज्याला ५० गुण मिळतात त्याला पहिल्या मुलाच्या ज्ञानाची पातळी च्या तुलनेत ५० % ज्ञान असते असे नाही तर त्याला जेमतेम २० % ज्ञान असते. म्हणजेच (law of diminishing returns) ५० % मिळवण्यास जेवढी मेहनत आणि उमज असावी लागते तेवढीच उमज पुढच्या २५ टक्क्याला आणि तेवढीच उमज आणि मेहनत पुढच्या १२.५ % ला लागते. यामुळे मॅकेन्झी (Mckinsey) सारख्य कंपन्या पहिल्या २० मध्ये आलेल्या मुलांना मुलाखतीत सखोल ज्ञानाबद्दल प्रश्न विचारून २४ लाखांपासूनवर कितीही पॅकेज देऊन उचलतात. google qualcomm सारख्या कंपन्या अभियंते निवडताना त्याला चिपबद्दल आणि त्याच्या SYSTEM आणि SOFTWARE बद्दल किती सखोल ज्ञान(KNOW WHY) आहे ते पाहूनच इतका प्रचंड पगार देतात.

In reply to by सुबोध खरे

गूगल Qualcomm च्या तुलनेत जास्त पॅकेज देते. गूगल मध्ये प्रामुख्याने कॉम्प्युटर engineer लागतात. याउलट Qualcomm मध्ये प्रामुख्याने Electronics and communication engineers, electrical engineers लागतात. गूगल कधीही चिप शी संबंधित प्रश्न विचारत नाही. सिस्टम म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम हे समजले पण सॉफ्टवेअर म्हणजे नेमक काय म्हणायच आहे आपल्याला?

In reply to by सतिश म्हेत्रे

माफ करा मला स्वतःला त्यातलं काहीही कळत नाही. मी जे लिहिलं आहे ते मित्राने सांगितलं त्याप्रमाणे आहे. त्याने सरमिसळ झाली असू शकेल. तेंव्हा एकंदर गोषवारा ध्यानात घ्यावा. क्षमस्व. त्याने अभियांत्रिकी भाषेत सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यावरुन जातील हे मी गृहीत धरून असतो. त्याने अजून एक गोष्ट सांगितली ती म्हणजे --कवडे पाटील महाविद्यालयात

प्राध्यापक जे शिकवू शकतील तेच शिकवले जाते.

अद्ययावत ज्ञान किंवा उद्योगाला काय आवश्यक आहे ते शिकवले जातेच असे नाही. ( मुळात बर्याच ठिकाणी नोकरी मिळेपर्यंत एम इ केलेले प्राध्यापक सुरुवातीला काही वर्षे अर्ध वेतनावर काम करत असतात. त्याना स्वतःलाच उद्योगात काय चाल्ले आहे ते माहिती नसते मग ते विद्यार्थ्यांना काय शिकवणार?) यामुळे बाजारात या दोन ठिकाणहून पास झालेल्या अभियंत्याना मिळणाऱ्या

मान आणि धन

यात इतकी तफावत दिसून येते.

In reply to by सुबोध खरे

स्वायत्त असल्याने इंडस्ट्री मध्ये काय गरज आहे त्यानुसार ते अभ्यासक्रमात तात्काळ बदल करू शकतात. विद्यापीठांतर्गत असलेल्या कॉलेज मध्ये बदललेला अभ्यासक्रम येण्यास खूप वेळ लागतो. IIT मधले बरेचसे प्रोफेसर हे IIT मधूनच शिकलेले असतात. त्यामुळे प्रोफेसरांच्या गुणवत्तेत फरक हा असणारच.

किमान ३ ते ६ (आणि मुलं असतील तर जास्तच ) महिने बॅकअप ठेवल्या शिवाय घर घ्यायची हिम्मत माझी तरी होऊच शकत नाही. पण असे लोक आसपास खूप दिसतात कि ज्यांना पहिल्या दिवसापासून नीटच राहायचं असतं. खिशात पैसे नसले तरी चालतील पण घर "वेल फर्निश्ड " असलंच पाहिजे, कार असलीच पाहिजे, ब्रँडेड गोष्टी असल्याचं पाहिजेत. त्या लोकांचा जास्त प्रॉब्लेम होतो नोकरी गेल्यावर. काही जेनुइन केसेस असतात पण जास्त हादरा घर + कार लोन + मुलांच्या फी ने बसतो. बाकीच्या गोष्टी आपण अड्जस्ट करू शकतो.