रेल्वे अपघात आणि बेजबाबदार भारतीय

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
20 Oct 2018 - 12:47 pm
गाभा: 

एका ट्रेनला थांबण्यासाठी किती वेळ लागतो ?

अ‍ॅव्हरेज मालगाडीस (वस्तूंची ने आण करणारी माणसांची नव्हे) ९० ते १२० डब्बे असू शकतात. म्हणजे डबे मिळुन हि लांबी अगदी किलोमीटर किंवा दिड किलोमीटर पर्यंत असू शकते ! (रेल्वे म्हटले की केवळ पॅसेंजर ट्रेनच आठवतात नाही ? मालगाड्यांचे वेळा पत्रक तुम्हाला माहित असते ?) समजा अशी मालगाडी ९० किमी प्रतीतास वेगाने धावते आहे तर पूर्ण इमर्जन्सी ब्रेक दाबल्या नंतर अशा मालगाडीस थांबे थांबे पर्यंत दिड एक किलोमीटर पुढे पोहोचलेली असू शकते. (आपण केवळ वेगाचा विचार करतो, त्या मलगाडीच्या इंजीनने ५०-१०० डब्बे ओढणारा फोर्स अक्व्यार केलेला असू शकतो हे लक्षात रहात नाही) . ९० किमी प्रतीतास वेगाने १ किमी अंतर केवळ ४० सेंकदात पार पडत असते . ट्रेनचा वेग १०० किमी असेल तर १ किमी अंतर केवळ ३६ सेकंदात आणि १२० किमीचा वेग असेल तर १ किमी अंतर केवळ ३० सेकंदात पार पडते.

९० किमी प्रतीतास वेगाने १ किमी अंतर केवळ ४० सेंकदात पार पडत असते हा जरी वेग घेतला . तर १० सेकंदात ट्रेन २५० मिटर म्हणजे 820.21 फूट पुढे सरकत असू शकते.

व्यवस्थीत नजर असलेल्या मानवाची दृष्टी पूर्ण सपाट कोणताच अडथळा नसलेल्या परिस्थितीत अनेक किलोमीटर (अगदी कदाचीत २० किमी पर्यंत ) पण हि फार आदर्श स्थिती झाली. पहाडी , चढ, वनस्पती, वळणे, धुके, पाऊस, धुळीचे प्रमाण याच्या परिणामी नजर अत्यंत कमी / मर्यादीत झालेली असू शकते. समजा रेल्वे ड्राय्व्हरला अगदी १ किमी पर्यंतचे दृष्य स्पष्ट दिसते आहे , ब्रेक दाबायला जे सेकंद लागतील तेवढ्या सेकंदात गाडी एक दिड किमी अंतर सहज पार करुन पुढे गेलेली असू शकते. आणि मुख्य म्हणजे रस्त्यावरील वाहनांप्रमाणे समोर आलेली वस्तु व्यक्ती वाचवण्यासाठी ड्रायव्हींगचा अँगल बदलण्याचा पर्याय रेल्वे ड्रायव्हरला उपलब्ध नसतो. रेल्वे केवळ रेल्वे रुळावरुनच धावू शकते.

ताशी ८८.५ किमी प्रतीताशी वेगाला विवीध वाहने थांबण्यासाठी किती वेळ घेऊ शकतील ? आकडे अंदाजे

* टायर ब्रेक व्यवस्थित असलेली चांगल्या कंडीशन मधिल लाईटवेट पॅसेंजर कार इमर्जन्सी ब्रेक दाबल्यावर थांबण्यासाठी दोनशे फूट ( साधारणतः साठ मीटर ?) पर्यंतचे अंतर घेऊ शकते. ( हाय स्पीड ड्रायव्हींगचा सोस असेल तर मिनीमम डिस्टन्सची गरज लक्षात घ्या

* कमर्शिअल व्हॅन किंवा बस २३० फूट

* कमर्शिल ट्रक ट्रेलर ३०० फूट ( साधारण एक फुटबॉल ग्राऊंडची लांबी )

* एक लाईट रेल्वे ट्रेन ६०० फूट ( साधारण दोन फुटबॉल ग्राऊंडची लांबी )

* पण तेच लेखाच्या सुरवातीस नमुद केलेली मालगाडी थांबण्यास १८ फूट बॉलग्राऊंडची लांबी लागू शकते.

* (वर उल्लेखलेले फुटबॉल ग्राऊंड आमेरीकन फूटबॉल ग्राऊंड आहेत, फुटबॉलग्राऊंड म्हटले घरा समोरच्या आंगणाच्या लांबीची कल्पना करु नये हे महत्वाचे)

ट्रेन इतर वाहनांप्रमाणे हवी तशी दिशा बदलून धावू शकत नाही ट्रेनला रूळावरच धावावे लागते.

जसे जमिनी वरुन आपण विमान पहाताना ते तसे सावकाश जात आहे असे वाटते तसेच ऑप्टीकल इल्यूजन दृष्टीभ्रमामुळे ट्रेन आहे त्याच्या पेक्षा लांब आणि सावकाश येत आहे असे वाटते पण प्रत्यक्षात वेग अधिक असतो. (आपल्या गाड्यांच्या आरशांवरही मागची गाडी भासते त्या पेक्षा जवळ असू शकते हे लिहिलेले असते) . ट्रेनचे अंतर आणि वेग या बाबत अदमास लावण्यात सहज गल्लत होऊ शकते खास करुन रात्रीच्या वेळी तर नक्कीच.

जर आवाजाच्या भिंती अथवा मोठ्या फटाक्यांच्या आवाजाने तुमचे कान अधू झालेले असतील तर हॉर्न मग ट्रेनचे असू देत कि गाड्यांचे ऐकु न येण्याची बरीच शक्यता असू शकते.

मालगाड्यांचे वेळा पत्रक, ते पॅसेंजर ट्रेनच्या वेळांमधले सर्व बदल तुम्हाला ठाऊक असतात ? बाळासाहेब ठाकरे म्हणत धोकाच पत्करायचा असेल तर देशाच्या सिमेवर जा ! तिकडे धोका पत्करणार्‍यांची गरज आहे. रस्ते असोत वा रेल्वेचे रूळ धोका पत्करण्याच्या जागा नव्हेत. तुम्ही इतर काहीच काम न करता नुसते खाल्ले तरी एका शतकर्‍याच्या धान्याला आणि कष्टाला न्याय मिळत असतो हे तुमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठे योगदान आहेच. तेव्हा रस्ते आणि रुळांवर तुमचे जीव डावावर लावू नका, आप्त स्वकीयांना टांगणीवर ठेऊ नका. वाहने आणि प्रवास आनंद आणि आरोग्य जपून हवीत.

अमृतसरच्या रेल्वे अपघातात झाले ते होऊन गेले. इथून पुढे शहाणे होण्याचा जरासा प्रयत्न करुयात. काय म्हणता ?

भारतीय रेल्वे मधील ब्रेक पद्धती आणि समज गैरसमजांवर प्रकाश टाकणारा युट्यूब व्हिडिओ

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

संदर्भ : minnesota safety council ऑपरेशन लाईफ सेव्हर वेबसाईट पेज हा लेख लिहिताना जसे पाहीले

* लेखात
* केवळ चुकीच्या जोखीमा घेऊ नयेत या दृष्टीने आंतरजालावर उपलब्ध आकडेवारी कोणतीही वेगळि खात्री न करता वापरली आहे तेव्हा आकडेवारीच्यां अचुकतेचा कोणताही दावा नाही. चुभूदेघे. उत्तरदायित्वास नकार लागू.

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

20 Oct 2018 - 12:56 pm | प्राची अश्विनी

खरंय. "बेजबाबदार भारतीय" हे सर्वच बाबतीत लागू आहे.

गामा पैलवान's picture

20 Oct 2018 - 1:05 pm | गामा पैलवान

माहितगार,

जिथे गाडीचे रूळ ही हा#यची जागा धरली जाते, तिथे कोण कोणाचं कसलं प्रबोधन करणार!

असाच अपघात काही दशकांपूर्वी केरळात घडला होता. अर्णकुलम कोट्टायम अतिजलद गाडी रूळावरची माणसं चिरंत गेली. असेच लोकं आकाशातली आतिषबाजी बघंत बघंत रुळावर सरकंत सरकंत गेले. रूळ वळणावर होते. गाडी आल्याचं कळलंच नाही. २३ मेले.

गाडीचे रूळ ही भीषण जागा आहे. चटकन ओलांडायचे असतात. रेंगाळत राहायचं नसतं. रूळ जितका चकचकीत, तितका धोका जास्त.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

20 Oct 2018 - 1:20 pm | माहितगार

...गाडीचे रूळ ही भीषण जागा आहे. चटकन ओलांडायचे असतात. रेंगाळत राहायचं नसतं. रूळ जितका चकचकीत, तितका धोका जास्त....

सहमत. मी ज्या लेखाचा संदर्भ घेतला त्यात नजरेच्या टप्प्यात ट्रेन दिसत असेल तर धोका पत्करु नये ट्रेन निघून जाऊ द्यावी असे सुचवले आहे . अर्थात नजरेचा उपलब्ध पल्ला एखाद किमीचा वळण आणि चढा शिवाय क्लिअर पल्लातरी हवाच असे वाटते. चुभूदेघे.

नगरीनिरंजन's picture

21 Oct 2018 - 11:01 pm | नगरीनिरंजन

अगदी बरोबर.
आणखी एक मुद्दा ह्यात दुर्ल़क्षिला जातोय तो म्हणजे फोन वापरुन व्हिडिओ शूट करण्याच्या व्यसनाचा.
फोनमध्ये लक्ष असल्यास भवतालाची जाणीव कमी होते हे शास्त्रीय सत्य आहे. आजकाल अशा ठिकाणीच नव्हे तर सगळीकडेच लोक सदानकदा फोनकडे पाहात असतात. फोनकडे पाहात नसते तर कदाचित काही लोक तरी वेळेत बाजूला होऊ शकले असते.
अपघात झाल्यावरही लोक व्हिडिओ व सेल्फी घेत होते म्हणे.
निर्बुद्धपणा व निगरगट्टपणा वाढत चाललाय.

सामान्यनागरिक's picture

20 Oct 2018 - 3:14 pm | सामान्यनागरिक

हे लिहेपर्यंत आकडा साठ म्रुत्यु पर्यंत गेलेला आहे,अश्यांना पाच लाखांची मदत मिळ्णार आहे
जर रेल्वे अपघात झाला असता तर रेल्वे ची जबाबदारी होती. या प्रकारे मरणे हा केवळ निष्काळजी पणा आहे.

रेल्वेने पर्यायाने आपण आप्ल्या पैश्यातुन मदत का द्यावी?

यांना मदत का द्यावी?
जर अशी मदत मिळाली नाही तर लोक रेल्वे रुळ ओलांडताना सुद्धा विचार करतील.

विनिता००२'s picture

20 Oct 2018 - 3:21 pm | विनिता००२

आपण रुळावर असतांना लांबून रेल्वे दिसली तरी पाय दगड होतात, मेंदूला काहीच कळत नाही.

मी एकदा सायकल घेवून रुळ ओलांडत होते. (हे चूकीचे आहे माहित होते, पण जेवणाची सुट्टी व परत ऑफिस वेळेत गाठणे ह्यात समन्वय गाठायचा होता. असो.) लोकल वळणावर दिसत होती आणि मी तिच्याकडे बघतच राहिले. हॉर्न वाजला तशी भानावर आले आणी धडपडत रुळावरुन बाजूला झाले :( नंतरही कितीतरी वेळ धडधडत होते.

वर बातमीत झालेय अशा अपघातांना मदत देवू नये हे नक्की!

माहितगार's picture

20 Oct 2018 - 4:34 pm | माहितगार

कल्पनाही अवघड आहे.

कुमार१'s picture

20 Oct 2018 - 3:21 pm | कुमार१

यांना मदत का द्यावी?>>>>
अगदी पटतंय पण काय बोलणार ?

गेल्या वर्षी बिहार मधील दरभंगा येथे छट पुजा करुन परतणार्या ६ महीला अश्याच रेल्वेच्या अपघातात मृत्युमुखी पडल्या होत्या !
त्यांनाही रेल्वेने मदत जाहीर केलेली होती.

माहितगार's picture

20 Oct 2018 - 4:30 pm | माहितगार

आताचे अमृतसर असो वा मुंबईतले रेल्वे लाईन क्रॉस करतानाचे रेग्युलर अपघात यात स्वसुरक्षेकडे दुर्लक्ष करणार्‍या युपी-बिहारी स्थलांतरीत कष्टकर्‍यांचे बरेच प्रमाण असावे असा कयास आहे.

आता एनडिटिव्हीवर जे वृत्त आले आहे त्यानुसार रावण दहन होण्याच्या काही सेकंद आधी अमृतसर - हावडा ट्रेन जराशा कमी स्पिडने निघून गेली , रावण पेटला म्हणून अधिक उंचीवरुन पहाण्यासाठी किंवा जळत्या पुतळ्या पासून सेफ्टीसाठी गर्दी मागे सरकली. ट्रेन गेली आहे म्हणून कदाचित निर्धास्त असतील तेवढ्या ३० सेकंदात दूसरी जालंधर अमृतसर ट्रेन ९० किमीच्या वेगानी धावत आली ड्रायव्हरच्या लक्षात आल्यावर त्याने ब्रेक मारुनही वेग ६०-६५ पर्यंतच कमी होऊ शकला .

रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी रेल्वेस अशी कोणतीही पुर्वसुचना नव्हती असे सांगून रेल्वेची जबाबदारी साफ नाकारली आहे. एक दावा गेल्या २० वर्षांपासून याच जागेवर रावण दहनाचा कार्यक्रम निर्वेधपणे पार पडत आल्याचे आणि दरवर्षी रेल्वे सावकाश धावल्याचे सांगितले जात आहे, पण हा एक्सक्युज पटणारा नाही. एखादा स्टेशन मास्तर किंवा जो स्थानिक रेल्वे आधिकारी रेल्वे गेली काही वर्षे स्वतःहून सहकार्य करत असेलही पण समजा स्वतःहून काळजी घेणारे आधिकारी रेल्वे ड्रायव्हर काही कारणाने सुट्टीवर गेले बदलून गेले रितायर झाले अशा कितीतरी गोष्टी होऊ शकतात. कॉमन सेन्स कॉमन नसतो आणि भारतीय बे जबाबदार असतो.

मी धागालेखात दिलेल्या आमेरीकन वेबसाईटवर रेल्वे ट्रॅक ओलांडताना घ्यावयाच्या बारीक सारीक काळजींची यादी दिली आहे. ज्यात एक ट्रेन पास झाली कि तुम्ही निर्धास्त होऊ शकतात पण ट्रेन गेल्या गेल्या लगेच रुळ वापरु नका गेलेल्या ट्रेनच्या दिशेकडे बघत आहात तो पर्यंत दुसर्‍या दिशेची ट्रेन येऊ शकते त्यासाठी दोन्ही दिशांना नजरेच्या टप्प्यात ट्रेन नाही हे पहाणे गरजेच आहे या सूचनेचा समावेश आहे. रेल्वे ट्रॅक काटकोनात ओलांडावेत म्हणजे व्हील फसण्याचा धोका कमी असतो, ओलांडणार्‍या वाहनाने आतील गाणी आणि इतर आवाज बंद करावेत म्हणजे ट्रेन चे आवाज ऐकु येण्यास मदत होते, जड वाहनांनी गाड्यांचे गेअर काय बदलायचे ते रेल्वे ट्रॅक ओलांडण्या पुर्वीच किंवा नंतर करावे ट्रॅकवर गेअर बदलू नयेत ट्रॅकवर गेअर बदलताना काही सेकंदही गेले तर अपघात होऊ शकतो . अशा अभ्यासपूर्ण सजगतेचा आणि काळजीपुर्वकतेचा भारतात सातत्याने अभाव आहे. एक घटना होऊन गेली तरी इथेऊन पुढे काय काळजी घ्यावी त्याएवजी पुन्हा केव्हा होईल त्याची आम्ही भारतीय वाट पहात बसतो का ?

माहितगार's picture

20 Oct 2018 - 5:14 pm | माहितगार

या हिंदुस्तान टाईम्स बातमी नुसार ड्रायव्हरने एक वळण न्कतेच पास केले असावे आणि नंतर रावण दहना तील धूरामुळे सुस्पष्ट दिसले नसण्याची शक्यता वर्तवली आहे. धूर नसला तरी ९० किमी वेगाची गाडी अशी अचानक थांबवण तांत्रिक दृष्ट्या सहज शक्य नसावे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Oct 2018 - 5:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा आणि इतर कोणताही अपघात ही अत्यंत दु:खद घटना असते आणि सर्व अघातग्रस्त व्यक्ती व त्यांच्या नातेवाईकांसाठी संपूर्ण सहानभूती आहेच.

पण, असे असले तरी खालील लज्जाकारक सत्यांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही :

१. रेल्वे अपघातच नव्हे तर इतरत्रही आपण भारतिय अत्यंत बेजबाबदारपणे वागत असतो, हे नेहमीचेच झाले आहे ! :(

२. रेल्वेगाडी येत नसेल तरीही, रेल्वे ट्रॅकवर निर्धास्तपणे उभे रहायचे नसते हे कोणी स्वतंत्रपणे सांगायलाच हवे काय ?!

३. असा बेजबाबदारपणा आपल्या अंगात इतका भिनलेला आहे की, त्यामुळे झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तिंना सरकारने पैशांची आणि इतर मदत अध्याहृत धरलेली असते... जणू समज नसलेल्या अज्ञानी बाळाने केलेल्या बाळांची सर्व जबाबदारी मायबाप सरकारचीच आहे ! :(

शेवटी आपण, केवळ वयानेच नव्हे तर, बुद्धीनेही प्रौढ माणसासारखे वागायला कधी शिकणार आहोत ?! :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Oct 2018 - 5:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

रेल्वे ट्रॅकवर रेल्वेचाच पहिला, मधले सगळे आणि शेवटचा हक्क असतो... इतरांना, केवळ अधिकृत जागेवरून (उदा: ट्रॅकला क्रॉस करणारा अधिकृत रस्ता) आणि तेही रेल्वेगाडीच्या येण्याजाण्याच्या वेळा सांभाळून, स्वतःच्या जबाबदारीवर, पार करायची मुभा असते. कारण...

१. रेल्वेचे अवजड धूड काही, मारला ब्रेक आणि थांबली काही मीटरवर, असे थांबू शकत नाही.

२. वेगात असलेल्या रेल्वेगाडीला अचानक ब्रेक लावल्यास, डबे रुळावरून घसरून त्यांच्यात बसलेल्या शेकडो/हजारो निर्दोष व्यक्तींचे जीव व शरीरे धोक्यात येतात.

प्रसाद_१९८२'s picture

20 Oct 2018 - 5:34 pm | प्रसाद_१९८२

आता त्या ट्रेनच्या ड्रायव्हरला अटक केल्याची बातमी वाचली, त्या ड्रायव्हरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याचे ही दाखवत आहेत. एक प्रश्न पडतो की ह्या अपघताला तो ड्रायव्हर जबाबदार कसा ? त्या रेल्वे मार्गावरिल सर्व सिग्नल ग्रीन मिळाल्यावर व मार्गावरिल अधिकतम गतीची जी सीमा आहे, त्या गतीवर तो गाडी चालवत होता तर त्याचे चुकले काय ! आता मध्येच रेल्वे रुळावर माणसांचा अचानक लोंढा आला व चिरडला गेला तर त्याला तो रेल्वे ड्रायव्हर जबाबदार कसा ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Oct 2018 - 5:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

याला दोषारोप भलतीकडे भरकटवण्याचे (scapegoat) राजकारण म्हणतात. खुद्द लोकांना मूर्ख म्हणून दोष देणार कोण ? आणि परखड सत्य समोर ठेवून 'क्ष'ने तसा दोष दिलाच तर 'क्ष'चे विरोधक राजकारणी 'क्ष'च्या नावाने शिमगा साजरा करून आपली स्वार्थी पोळी भाजून घेणारच ! :(

त्या ऐवजी, बिचार्‍या ड्रायव्हरचा बळी देणे (किंवा, वातावरण थंड होईपर्यंत तरी, त्याचा बळी देत आहोत, असे नाटक करणे) अत्यंत सोईचे ! :(

माहितगार's picture

20 Oct 2018 - 5:50 pm | माहितगार

जनतेचा राग ऑर्गनायझर्सवर पक्षी राजकारण्यांवर शेकुनये म्हणून हि केवळ ड्रायव्हरवर केलेली खापरफोड आहे. ड्रायव्हरवरील खटले न्यायालयात सह्सा टिकणार नाही हे आधी पासून माहीत असूनही जनतेची दिशाभूल करणे या शिवाय याक्षणी राजकारण्यांपुढे पर्याय नसावा. मर्यादा पुरुषोत्तम रामाचे नाव जपून ऑर्गनायझर्सनी हलगर्जीपणाचा मर्यादा भंग केला हे वास्तव असण्याची शक्यता असावी.

आपल्या भारतात मरण किती सहज येऊ शकतं याच हे मूर्तिमंत उदाहरण आहे . एल्फिन्स्टन ब्रिज वरील चेंगराचेंगरी , मांढरदेवी तील चेंगराचेंगरी या घटना काय दर्शवतात ?

शिक्षण ,रोजगार, अंधश्रद्धा, भारताची कमजोर आर्थिक स्थिती व लोकसंख्या चा भस्मासुर या उपघटका मुळे भारतातील जनता व शासन दोघांनाही मानवी जीवांची किंमत नाही तर प्राण्यांचा विचारच करू शकत नाही .
प्रत्येक गावात व शहरात मोकळ्या जागांची कमतरता - कारण सतत वाढणारी लोकसंख्या .
लोकसंख्या प्रमाणात असती तर मुबलक जागे च्या उपलब्धते मूळे ट्रॅक शेजारी रावनदहन करायची वेळ आली नसती .

अनिर्बंध लोकसंख्ये मुळेच कुठल्याही उत्सवा साठी लाखोंची गर्दी होते पण अशा वेळी दुर्घटना होत नाही हे आपले नशीब ,
नाहीतर अतेरिक्यानां या सारख सॉफ्ट टार्गेट ची जागा शोधुन सापडणार नाही .

मदनबाण's picture

20 Oct 2018 - 7:45 pm | मदनबाण

अत्यंत दुखद दुर्घटना ! :(
काही काळा पासुन लोकल ट्रेन / एक्प्रेस मध्ये स्टंट करणार्‍यची आणि त्यात जीव गमवणार्‍यांची संख्या वाढली आहे, यात लहान मुलान पासुन वयस्क सगळेच आहेत. स्टंट व्हिडियो तू-नळीवर अपलोड करुन प्रसिद्ध होण्याची विचित्र स्पर्धाच लागली आहे ! असे अनेक व्हिडियो तू-नळीवर उपलब्ध आहेत. या सर्व स्टंट करणारे,आगाउपणे लोकलला लोंबकळणारे या सर्वांन मध्ये दोन गोष्टी कॉमन आहेत... त्या म्हणजे थ्रीलच्या नावाखाली चाललेला कमालीचा मूर्खपणा आणि कमालीचा माज ! हल्लीच एक मुलगी ट्रेन मधुन पडुन जीव गमवण्या पासुन वाचली होती आणि ही घटना घडुन गेल्यावरही तीचा माज कायम होता.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- CYMATICS: Science Vs. Music - Nigel Stanford

कोकणात होळीच्या झाडावरून मी बोललो पण लक्शात आले इथे सल्ला देणे उपयोगाचे नाही.
" आम्ही असंच करतो,असंच करणार" ही वृत्ती आहे.

माहितगार's picture

21 Oct 2018 - 10:27 am | माहितगार

कोकणातील होळीच्या झाडाबद्दलची नेमकी समस्या पुर्णपणे लक्षात आली नाही. युट्यूबवर चाळलेल्या दोनचार युट्यूबमध्ये तरी माडाचे झाडाचे दहन पूर्ण खुल्या मैदानात होताना दाखवले आहे. अर्थात माडासारखे उंच झाड अर्ध्यापर्यंत जळाल्या नंतर मधातूनच तुटणे अपेक्षीत असावे मग जळताना मधूनच तुटलेल्या न जळालेल्या भागाचे काय केले जाते ?

मला कोकणातील होळीच्या झाडाचा हा एक युट्यूब मिळाला पण त्यात अर्ध्यापर्यंत जळून उरलेल्या झाडाचे नेमके काय झाले ते दाखवलेले नाही.

.

यावर्षीची २०१८ होळी झाल्यावर आठेक दिवसांनी इथे होतो. बस स्टॅापजवळ वाट पाहताना बाजूलाच पोफळी पुरलेली दिसली. स्टॅापच्या टपरीत दोघे गाववाले बसलेले.
" अरेच्या हे होळीत जाळलेले दिसत नाही! हार वगैरे घातलेले आहेत, खाली कट्टा केलाय!"
" याला वेळ आहे, देवाची_होळी येईल पंधरा दिवसांनी तेव्हाची तयारी."
" या समोरच्या रवळनाथाची?"
"हो."
" पण या देवळात जागा नसेल तर मागच्या नारायणाच्या देवळाचे एवढे पटांगण रिकामेच आहे ना! तिथे करायचे. इथे रस्त्याकडेला चिंचोळ्या जागेत आणि वर दोन फुटांवर इलेक्ट्रिकच्या ४४० च्या तारा आहेत, झळ लागेल ना!"
" नाही लागत झळ, तेव्हा वीज बंद करतात. इथेच पुर्वंपार करायचे."
"मग या शेजारच्या जिप शाळेच्या मैदानात?"
"नाही, इथ्थेच होते."
--
बोलण्यात,सूचवण्याचा उपयोग नाही हे उमजले.

मुक्त विहारि's picture

21 Oct 2018 - 11:05 am | मुक्त विहारि

ह्या एका वाक्यातच, समस्त भारतीयांची मानसिकता आहे...

गामा पैलवान's picture

21 Oct 2018 - 12:43 pm | गामा पैलवान

मला वाटतं की उच्च दाबाच्या तारा नेतांना स्थानिक प्रथा लक्षात घ्यायला हव्यात.

-गा.पै.

माहितगार's picture

21 Oct 2018 - 12:37 pm | माहितगार

:( अवघड आहे खरे. बोलून घेण्याच्या स्व समाधानासाठी अशा प्रसंगी व्यक्ति ओळखीची असेल तर मी समोरची व्यक्ति चमकेल खोटे कौतुक करतोय हे सहज कळेल असे एक्झॅगरेटेड कौतुक करतो . समोरची व्यक्ति अनोळखी असेल तर एखाद्याच्या हातावर टिप ठेवतात त्या स्टाईल मध्ये दहा- वीस रुपये ठेऊन काय अयोग्य वाटते ते समजावून सांगतो. सहसा व्यक्ति खजील होऊन ती टिप वापस करतात असा अनुभव आहे

झेन's picture

20 Oct 2018 - 10:16 pm | झेन

श्रद्धा असली की डोळे/मेंदू बंद
तस्मात होळीच्या झाडाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्याचीच चूक असते.

टाईम्स नाऊ न्यूजने जोडा फाटक येथील गेटमनची टेलेफोनीक मुलाखत दिली आहे. या गेटमनची जबाबदारी गेट मॅन्युअली बंद आणि चालू करण्याची होती, बंद जसे केले तसे ट्रेन गेल्यावर चालू करण्याचेही त्यांना कदाचित टेंशन असावे. पण ४०० मीटर अंतरावर ट्रॅकवर अचानक आलेला क्राऊड या गेटमनच्या सहज लक्षात आला नसावा, त्याची तीन कारणे तो देताना दिसतो एक पलिकडच्या रस्त्यावरुन लोक नेहमीच जा ये करतात तसेच लोक त्याला दिसले दुसरे त्याचे लक्ष हावडा एक्सप्रेस च्या डब्यांकडे होते कारण ती काहीशा कमी वेगाने जात होती, आणि जिथे घटना घडली तिथे अंधारच होता ४) रेल्वे कडुन त्याला अधिकृत काहीच निरोपही नव्हता कारण मुदलात रेल्वेची अधिकृत कोणतीही परवानगी नव्हती.

गेटमनच्या हातात हिरवा सिग्नल देण्याचा आधिकार होता तरी त्याची आधिकृत जबाबदारी गेट पर्यंतच असावी . माणूसकी म्हणून जे करावयास हवे त्यासाठी तेवढ्या सेकंदात जे काही झाले ते त्याच्या लक्षातही नाही आले. रेल्वे किंवा कार्यक्रमाच्या ऑर्गनायझर्सपैकी कुणि त्यास विश्वासात घेण्याचा प्रयत्नही केला नसावा.

मुक्त विहारि's picture

21 Oct 2018 - 10:38 am | मुक्त विहारि

आमचे बाबा महाराज म्हणतात,

"ज्या देशांतील लोकांना, वाहतूकीचे साधे मुलभूत नियम पण पाळता येत नाहीत, त्या देशांत सुरक्षितता नाही..."

सुबोध खरे's picture

21 Oct 2018 - 11:05 am | सुबोध खरे

मृत व्यक्ती या बहुतांश वेळेस घरातील कमावणारी व्यक्ती असते आणि तिच्या मृत्यू मुळे कुटुंबाचा आधार गेलेला असतो.
जरी त्या व्यक्तीच्या हलगर्जी पणा मुळे त्याचा मृत्यू झाला असला तरी केवळ सहानुभूती म्हणून आणि कुटुंबाला तात्पुरता आधार म्हणून काही रक्कम "मदत"दिली जाते. तो त्यांचा हक्क नसला तरी मानवतावादी भूमिकेतून.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला जशी मदत दिली जाते तशीच.

हा मूद्दा पटला...

नाखु's picture

21 Oct 2018 - 4:11 pm | नाखु

सर्व रेल्वे गाड्या बंद कराव्यात व दरवर्षी होणारा रावण दहन कार्यक्रम रुळांपासून किमान तीन किलोमीटरवर अंतरावर केला तरच चालू केली जाईल असा ठाम पवित्रा रेल्वे प्रशासनाने घेतला पाहिजे.
तीन किमी अंतरावर रेल्वे,रावण व रेमडोके एकमेकांना सामोरे जाणार नाहीत.

रेल्वे कर्मचारी संघटना सुद्धा त्या चालकाच्या पाठीशी उभी राहणार नाही.

सलमान प्रकरणात एकाही संघटनेला त्या पाटीलचा हकनाक बळी गेला असं वाटलं नाही.

मोर्चे करीही गपगुमान बसले.

किती द्वेष कराल त्या रावणाचा?? त्याला काय तरी लिमीट!!
प्रभू श्रीरामचंद्राने हजारो वर्षापूर्वी त्या रावणाचा वध करून त्याचा उद्धार केला तरी आपली भोळी जनता त्याच्यावर फटाक्यांचा बाणांनी वार करण्यात धन्यता मानत हिंदू धर्माचा झेंडा आसमंती फडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.
(आपल्याकडील ते गणपती विसर्जन पण असाच एक नमुना आहे. ज्याला पोहायला येत नाही ते पण नदीत उडी मारतंय.!)
असो मृत आत्म्यांना शांती लाभो!

ह्या अपघाताच्या निमित्याने अभिसार शर्मा नावाच्या स्वतंत्र ( कोणत्याही मोठ्या कंपनीत काम न करणार्या) पत्रकाराने आपल्या नविन व्हिडीयो मघ्ये ह्या रेल्वे अपघाताचा दोष ह्या रेल्वे गाडीच्या चालकावर दिलेला आहे. त्या चालकाने म्हणे हेड लाईट लावलेला नव्हता. त्यामुळे ड्रायव्हरला समोरच दिसल नाही. पुराव्या दाखल त्याने व्हायरल झालेला व्हिडीयो दाखवला.

दरम्यान ज्या रेल्वेमुळे अपघात झाला त्याच ईंजीन डी एम यु प्रकारच असुन त्याला हेड लाईट नसतो. फक्त दोन साईडला दोन लाईट असतात. ते लाईट ह्या व्हिडीयोत चालु असलेले दिसत आहेत.

कोणत्याही प्रकारची बातमीची व्हीडीयोची शहानिशा न करता सरळ दोष देण्याचे व व्हीडीयो काढण्याचे प्रकार हल्ली खुप वाढलेले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=5pUK5gd949Y

माहितगार's picture

21 Oct 2018 - 10:56 pm | माहितगार

कोणत्याही मोठ्या कंपनीत काम न करणार्या

* या रिपोर्ट नुसार वायरशी कनेक्टेड दिसतो एनी वे गौण मुद्दा असावा.

दरम्यान ज्या रेल्वेमुळे अपघात झाला त्याच ईंजीन डी एम यु प्रकारच असुन त्याला हेड लाईट नसतो.

आपण म्हणता तसे लाईट्सच्या बाबतीत काही संशोधन झाले असेलही. पण अभिसार शर्माच्या खालील दुसर्‍या व्हिडीओवरुन अ‍ॅक्च्युअली टॉपलाईट त्याच ट्रेनला इतर वेळी असल्या चा शॉट त्यांनी दाखवला आहे. आता हे सत्य आहे की दिशाभूल हा अधिक अभ्यासाचा विषय नक्कीच असावा. अभिसार शर्मा म्हणतात तसे झाले असेल तर चौकशी होण्याची गरज असावी. दोन ट्रेन्सचे क्रॉसींग असताना एका ट्रेनचा लाईट बंद करण्याची किंवा समोरुन मोठा प्रकाश स्त्रोताने डोळे दिपत असतील तरीही नीट दिसावे म्हणूनही वाहनांचे लाईट्स काही सेकंदांसाठी बंद केले जाऊ शकतात, तसे काही झाले का ? या विषयाचा अधिक शोध घेतला जाण्याची नक्कीच गरज असावी. असे वाटते.

अभिसार शर्मांच्या या युट्यूबखाली एक प्रतिसाद खालील प्रमाणे दिसतो आहे

अभिसार सर आपने पूरी जानकारी जुटाए बिना ये पूरा वीडियो बना दिया।DEMU की दो प्रकार की रैक आती हैं जिसमें एक में TOP position पर हेड लाइट होता है और दूसरे में मिडल में हेड लाइट दिया हुआ है। जिस रैक से यह अमृतसर त्रासदी हुई वह रैक मिडल पोजिशन पर हेड लाइट वाली थी, और यह हेड लाइट लोको पायलट में ने चालू की हुई थी और whistle भी लगातार बजा रहा था।

पण जे काही संशोधन असेल हेड्लाईट नसावा ही सुधारणा असेल तर तत्वतः सुधारणेचे लॉजीक साशंकीत वाटते.

डँबिस००७'s picture

22 Oct 2018 - 10:10 pm | डँबिस००७

अहो माहितगार ,

त्या अभिसार शर्माने तो व्हिडीयौ काढुन टाकलेला आहे ह्यावरुनच कळत की तो चुक होता !!

अपघातातली रेल्वे च ईंजिन हे डि एम यु प्रकारच असुन त्याला ईलेक्ट्रीकल वा डीझेल ईंजीन प्रमाणे हेड लाईट नसतो तर त्याला कारप्रमाणे दोन लाईट असतात मिड लेव्हलला ! अभिसार शर्माने दाखवलेला फोटो हा ईलेक्ट्रीक ईंजीनचा होता !

माहितगार's picture

23 Oct 2018 - 11:51 am | माहितगार

हम्म, अभिसार शर्मांचा डिलीट झालेला युट्यूब वेगळ्या लिंकवर नव्याने अपलोड झालेली मिळाली. आणि अभिसार शर्मांनी दिलेल्या माहितीतील त्रुटी दाखवणार्‍या काही युट्यूब पण पाहिल्या.

जर ९० च्या स्पीड ने धावणार्‍या कारसाठी मिड लेव्हलचे लाईट दूरचे क्लिअर दिसण्यात पुरेसे ठरु शकत असतील तर रेल्वेसाठीही पुरेसे ठरण्यास हरकत नाही. या अमृतसर अपघाताच्या वेळी ड्रायव्हरला मिडलेव्हलचे लाईट पुरेसे होते, असे गृहीत धरुन चालू आणि मिडलेव्हलचे लाईट अपघातीस्थलावर ट्रेन असताना चालू होते हि वस्तुस्थितीही लक्षात घेऊ. तरीही अजून एक संबंधीत गोष्टीवर क्लॅरीफिकेशन झालेले चांगले जालंधर - अमृतसर ट्रेन अपघाती स्थळावर पोहोचण्या आधी काही सेकंद हावडा एक्सप्रेसशी तिचे क्रॉसींग झाले. समोरच्या ट्रेनचा लाईट डोळ्यावर येतो तेव्हा गेटवरचे सिग्नल ड्राय्व्हरला क्लिअर दिसत नाहीत म्हणून क्रॉसींगची ट्रेन पास होई पर्यंत काही सेकंद ट्रेनचे ड्रायव्हर कडून लाईट बंद करुन चालू करणे किंवा डिम केले जाऊ शकतात. सदर केस मध्ये ड्रायव्हरला असे काही करावे लागले का ? तशी संधी होती का ? क्रॉस करणार्‍या ट्रेनचे दिवे आणि जळत्या रावणाच्या प्रकाशाने त्याचे डोळे दिपून जाऊन त्याला लोक दिसण्यात अडचण आली असू शकेल का याचा ड्राय्व्हर ला जबाबदार धरण्यासाठी नाही पण पुढच्या काय सुधारणा करता येतील यासाठी शास्त्रीय अभ्यासाची गरज असावी असे वाटते.

त्या शिवाय डि एम यु प्रकारात हेड लाईट सध्या नसेलही आणि असता तरीही अपघात होणे टळलेच असते असे नाही हे ही लक्षात घेऊ पण तरीही; मी हेडलाईट उपलब्धता असण्याच्या बाजू ने आहे . कारण लो लेव्हलचा लाईट अडवळणातील एखाद्या अडथळ्यामुळे न दिसण्याची शक्यता असू शकते तेच हेडलाईट किमान लो लेव्हच्या अडथळ्यांच्या पलिकडे दिसू शकण्याची अधिक शक्यता वाटते. अनधिकृत रेल्वे ट्रॅकवर येणार्‍यांची चिंता सोडून द्या रेल्वेचे स्वतः काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या सुरक्षीततेसाठी म्हणून टॉप लाईट असावा असे माझे मत या विषयावरील ईतर परदेशी साईट वाचून बनले. असो. संदर्भ : ,

डँबिस००७'s picture

23 Oct 2018 - 1:43 pm | डँबिस००७

रेल्वे ईंजिनात कितीही तांत्रिक सुधारणा केल्या तरीही खुप रहदारी चालु असलेल्या रेल्वेच्या रुळावर रावण दहन सारखे कार्यक्रम देहभान विसरुन बघणारे जो पर्यंत आपल्या देशात आहेत तो पर्यंत असे अपघात होतच रहाणार त्यात काहीही होऊ शकणार नाही.

राष्ट्रीय महामारर्गावर विरुद्ध दिशेने ट्र्क, मोटार सायकल वैगेरे नेणारे लोक आपल्या व ईतरांच्या जीवावर उदार होऊन अपघाताला निमंत्रण देत असतात.

रेल्वेच्या मार्गीकेच्या दोन्ही साईडला, हाय वे च्या दोन्ही साईडला व मध्ये डीव्हाईडर वर कुंपण घालणे हा एक उपाय आहे. तरी सुद्धा रस्त्याच्या क्रॉस रोड वर वहातुक न बघता आपली गाडी फाजिल आत्म विश्वासाने पुढे दामटवणारे वाहकांना कस रोकणार ?

सुबोध खरे's picture

23 Oct 2018 - 10:19 pm | सुबोध खरे

22000 व्होल्टेज ए सी चा प्रवाह असताना रेल्वेच्या टपावर चढून प्रवास करणारे मूर्ख शिरोमणी भारतात आहेत तोवर कितीही सुरक्षा ठेवा अपघात होणारच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Oct 2018 - 10:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

टिप्पणीची गरज नाही...

हे भारतात असंख्य रेल्वे फाटकांवर दिसणारे दृष्य आहे. असे असतानाही नेहमी, "कोण दोषी आहे हे ठरवण्यासाठी कमिटी बसवली की नाही याची चर्चा चालू होते"... किती दांभिक असावे याला काही सीमा ?! :(

आलमगिर's picture

27 Oct 2018 - 5:57 pm | आलमगिर

DMU ला हेडलाईट असतो. पण तो मधे असते वरती नाही. फाटक cross करताना headlights on ठेवलाच असणार की. शिवायषप्रत्येक फाटकापासून जवळ T/P असा Board असतो. तो पाहिलाकी मोटरमन High-Low-low-High sound देतोच. याची माहिती तुम्हाला Railgyankosh या youtube चँनेलवर मिळेल

डँबिस००७'s picture

21 Oct 2018 - 9:21 pm | डँबिस००७

प्रत्येक गोष्टीत बातमीत हिंदु धर्म आणल्याशिवाय करमत नाही असा नविन ट्रेंड आलेला दिसतोय.

विशुमित's picture

21 Oct 2018 - 9:26 pm | विशुमित

शेतकरी- सलमान बाबतीत नाही सुचले काही लोकांना?
दुष्ट कुठचे

ज्योति अळवणी's picture

22 Oct 2018 - 1:21 am | ज्योति अळवणी

लेखाशी पूर्ण सहमत

बबन ताम्बे's picture

22 Oct 2018 - 8:19 am | बबन ताम्बे

बेजबाबदारपणा भारतीयांच्या रक्तातच आहे.
आमच्याकडे पुणे महापालिकेने नगर हाय वे वर फिनिक्स मॉल समोर रस्ता क्रॉस करायला अंडरग्राउंड सब वे बांधला. दिव्य संबंधितांनी सब वे मध्ये हवा खेळती रहाण्यासाठी रस्त्याच्या मधेच दोन फूट उंच चौकोनी बांधकाम उभे केले. तिन्ही बाजूंनी दोन फूट भिंत आणि एका बाजूला लोखंडी जाळीची खिडकी. हाय वे वर स्पीड मध्ये असणारी वहाने कायम त्या अडथळ्याला धडकून अपघात होत. विशेषतः रात्री. दिव्य ते इंजिनियर आणि प्लॅन मंजूर करणारी दिव्य ती महापालिका ! हाय वे वर मधेच कुणी असा अडथळा बांधते का ? बरेच अपघात झाल्यांनंतर आता ते स्ट्रक्चर रस्त्यामधून काढलंय.

ट्रम्प's picture

22 Oct 2018 - 9:42 pm | ट्रम्प

हो मी पाहिलंय ते !!!
रस्त्याच्या मध्येच छोटी दोन चौकनी बांधकामे , सिग्नल सुटल्यावर बाहेरगावच्या गाड्या त्याला हमखास धडाधड धडकायच्या.

सोन्या बागलाणकर's picture

1 Nov 2018 - 11:00 am | सोन्या बागलाणकर

+१

पुणे तिथे काय उणे!

असेच मागे एकदा साकोरे नगर मध्ये रस्ता खणून पाच एक फुटाचा खड्डा केला होता. तिथे ना काही danger साइन ना कोणी सिक्युरिटी वाला. रात्रीच्या अंधारात एकदा एक बाईकस्वार खड्यात गेल्यावर पालिकेला फलक लावण्याचे सुचले.