ब्राह्मणेतरांचे नेते मात्र ब्राह्मण

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
20 Oct 2018 - 2:36 pm

सध्या राम आणि रावण यांच्या निमित्ताने निरनिराळे परस्पर विरोधी मुद्दे मांडले जात आहेत. ते ऐकताना सामान्य माणसाचा संभ्रम वाढतो आहे. रावण हा आदिवासींचा राजा होता त्यामुळे तो आमचा राजा आहे असे काही दलित संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे रामाने त्याची हत्या केली हे योग्य केले नाही आणि म्हणूनच दरवर्षी रावण दहन हेही त्यांना पटत नाही. मरणान्तानि वैराणि असं स्वतः राम म्हटले असतील तर दरवर्षी हा वाद उकरून काढून रावणाला का जाळायचं. अफजलखानाच्या वधानंतर महाराजांनी सुद्धा अशीच भूमिका घेतली होती इ. इ.

काहीजणांनी याला आर्य-अनार्य वादही जोडलाय. राम आर्य रावण अनार्य. पण काही अभ्यासकांच्या मते रावणाला त्याची मुले आर्य असं संबोधत असत. तर मग आर्य अनार्य हे मानवी समूह आहेत की ती नुसतीच वैशिष्ट्ये दाखवणारी संबोधने आहेत ?
ashutoshjog@yahoo.com
रामाला मानणारे म्हणतात रामाने वनवासी, आदिवासी जमातींना आपल्याबरोबर घेऊन रावणावर स्वारी केली तेव्हा वनवासींचा नेता रामच.

रावण आमचा असं काही ब्राह्मणेतर म्हणत आहेत. तर काहींचे म्हणणे राम हा क्षत्रिय आणि रावण दशग्रंथी ब्राह्मण. आता कसा सोडवायचा हा गुंता ?

ब्राह्मणेतरांचा नेता मात्र ब्राह्मण हे नंतरही काही उदाहरणात पाहायला मिळते. तमिळनाडूमधे द्रविडी आंदोलन सुरू झाले. त्याचे नेते होते अण्णा दुराई आणि करुणानिधी. करुणानिधी हे लेखक,पटकथा लेखक. आपल्या चळवळीला एक चांगला चेहरा हवा म्हणून त्यांनी एमजीआर म्हणजेच एम.जी.रामचंद्रन यांना आपल्या चळवळीशी जोडून घेतले. पुढे एमजीआर यांची लोकप्रियता वाढू लागली आणि ते मुख्यमंत्री झाले. एमजीआर यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाची सूत्रे त्यांच्या सहकारी जयललिता यांच्याकडे गेली. अशा प्रकारे ब्राह्मणेतर आंदोलनाचे नेतृत्व ब्राह्मण असलेल्या जयललिता यांच्याकडे गेले.

महाराष्ट्रातील ब्राह्मण आज मुख्यतः नरेंद्र मोदींच्या मागे आहेत. या उलट गांधी-नेहरू घराण्यातील लोक आपण काश्मीरी ब्राह्मण असल्याचे अभिमानाने सांगतात.
महाराष्ट्रातील जमीनदारांना, गावोगावच्या पिढीजात सत्ताधार्‍यांना बर्‍याच ब्राह्मणेतरांना काश्मीरी ब्राह्मण राहुल गांधी आपले नेते वाटतात.

या देशातील मूलनिवासी म्हणवणारे परदेशातल्या रावणाला मानतात ? आणि ब्राह्मण ज्यांना नेते मानतात ते नरेंद्र मोदी मात्र निवडणुकीच्या काळात नीचली जाती वगैरे गोष्टी बोलतात.

म्हणजे ब्राह्मणेतरांचे नेते मात्र ब्राह्मणच.
असा हा सगळा गुंता आहे.
ashutoshjog@yahoo.com
गांधी-नेहरु घराण्याचा वंशवृक्ष, फिरोजखान वगैरे गोष्टींची स्वतःला खात्री असल्याशिवाय फेकाफेक करू नये आणि लेखातला मुख्य मुद्दा ध्यानात घ्यावा

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

काश्मीरी ब्राह्मण राहुल गांधी? हे कसे काय?

माहितगार's picture

20 Oct 2018 - 3:25 pm | माहितगार

पुर्वज जातीधर्म जनुकीय प्रवाह अगदी प्रिसाईजली सांगायचे झाले तर सारस्वत ब्राह्मण + पारसी + ख्रिश्चन ( आणि सारस्वत ब्राह्मण नेहरुंवर मुस्लीम असल्याचे जनुकी अथवा मनाने आक्षेपही लावले जातात) पुर्वज प्रादेशिक प्रभाव बघायचे झाले काश्मिर +दिल्ली +खेत्री राजस्थान+ आग्रा+ अलाहाबाद (नेहरुंकडून) + भरुच गुजराथ + मुंबई (फिरोज गांधींकडून ) + लुसिआना (इटाली सोनीआजींकडून) + स्वतः दिल्ली . पुर्वज म्हणजे मिक्स मिसळ असले तरी तुर्तास पॉलीटिकली (सेल्फ ?) डिक्लेअर्ड ब्राह्मण हिंदू मात्र असावेत .

मिक्स मिसळ हि तशी अभिमानास्पद बाबच आहे. अभिमानास्पद नसलेली बाब नेपोटीझम म्हणजे घराणेशाही ही असावी आणि सेक्युलॅरीझम नीट विकता नाही आला की सॉफ्ट हिंदुत्व + जिकड तिकडचे लांगुलचालन

आशु जोग's picture

20 Oct 2018 - 4:56 pm | आशु जोग

लेखाखालची ओळ पहावी. कृपया लेखाचा मुख्य मुद्दा लक्षात घेऊन चर्चा करावी.

लेखास अनुसरुन एक अर्ग्युमेंट अशी येऊ शकते की, ब्राह्मणेतरांचे नेते मात्र ब्राह्मण असणे ब्राह्मणेतरांचा विरोध ब्राह्मणवादाला आहे ब्राह्मणांना नाही. ब्राह्मणेतर चळवळ ब्राह्मण विरोधी जातीयवादी असल्याचा जो प्रचार केला जातो ते ह्या धागा लेखाचे लेखक म्हणतात तसे ब्राह्मणेतर चळवळीत ब्राह्मण नेतृत्वही असल्यामुळे फोल ठरतो. ( हे माझे मत नाहीए पण अर्ग्युमेंट कशी होते ते लक्षात आणून देतोय. मी स्वतः काहीही वावगे लिहिलेले नाही पण इथून चर्चा अधिक जातीय रंग घेऊन घसरु शकते म्हणून मिपा प्रबंधकांनी चर्चा फार घसरत असल्याचे वाटल्यास प्रतिसाद वगळण्यास हरकत नाही.)

ट्रम्प's picture

22 Oct 2018 - 8:18 pm | ट्रम्प

लेखा खालची ओळ पहा ?
लेखात रागा बद्दल एव्हढ्या घोडचूका ठेवून वर लेखाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची अपेक्षा ?
बऱ्याच लोकांनी तुमचा लेख फाट्यावर मारला आहे हे पण लक्ष्यात घ्या !!

आशु जोग's picture

22 Oct 2018 - 4:31 pm | आशु जोग

सुचेता

त्याने स्वतःला का ब्राह्मण म्हणू नये

तुम्ही त्याला ब्राह्मण का समजता हे सांगा !!

काम करेल तो नेता एवढेच पाहतो गट.

आशु जोग's picture

23 Oct 2018 - 2:00 pm | आशु जोग

कंजूसराव,

हेही अगदी बरोबर आहे. नेता कुठल्याही जातीचा असो. तो आपल्या अनुयायांचं हित पाहतो आहे का हे महत्त्वाचे

मुक्त विहारि's picture

23 Oct 2018 - 4:31 pm | मुक्त विहारि

तो आपल्या अनुयायांचं हित पाहतो आहे का हे महत्त्वाचे....."

म्हणजे फक्त अनुनयांचे हित बघायचे की संपूर्ण समाजाचे? कारण "अनुनयी" म्हणजे नेत्याच्या मागे उभे राहणारे.... आणि जे त्या नेत्याच्या मागे उभे रहात नाहीत, ते बिगर-अनुनायी.... आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती नेत्याची अनुनायी असेलच , असे नाही....म्हणजेच, कुठलाही समाज म्हटला की मतावरोध हा असणारच.

आणि एकदा निवडून आल्या नंतर किंवा समाजाचे नेते पद स्वीकारल्या नंतर, नेत्याने, फक्त अनुनयांच्या हिता पेक्षा, समाजाच्या हिताकडे लक्ष देणेच अपेक्षित आहे...

आणि असा, समाजहित बघणारा नेता, हाच खरा, जाणता राजा .....

(आणि हो, "कुठलाही समाज म्हटला की मतावरोध हा असणारच.", हे वाक्य अनुभवले आहे...ऐकीव नाही.....इथे लिहिणारे सगळे मराठीच असले तरी पण, मतावरोध होतोच....हो, नाहीतर परत तुम्हीच म्हणाल, "ऐकीव माहिती" म्हणून....)

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Oct 2018 - 6:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

तो आपल्या अनुयायांचं हित पाहतो आहे का हे महत्त्वाचे

यालाच साध्या भाषेत लांगुलचालन असे म्हणतात. नेत्याची एवढी संकुचित व स्वार्थी व्याख्या करणे हीच सद्याची सर्वात मोठी भारतीय समस्या आहे.

१. अनुयायांचे दूरगामी हित केवळ व्यक्तिगत किंवा समाजातील एका गटाचा तात्कालिक फायदा साधून होत नाही. असे केल्याने, 'समाजात अंर्तगत तट पडून ते तात्कालीक फायद्यासाठी एकमेकाशी भांडत राहणे' हेच फलित अपेक्षित आहे... व ते सद्या स्प्ष्ट दिसत आहेच ! :(
"सर्व समाजाचा सर्वसामावेशक विकास झाला तरच देशाचे व पर्यायाने अनुयायांचे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांचे हित साधले जाते" हे जाणून जो काम करतो, त्यालाच खरा नेता म्हणता येईल.

२. दूरगामी हित साधताना, नेत्याला आपल्या अनुयायांना वेळप्रसंगी सत्य व वस्तूस्थितीचा कडू घोटही गिळायला भाग पाडून योग्य मार्गावर आणणे जमले पाहिजे. खरा नेता अनुयायांचे हित साधण्याच्या (पक्षी : लांगुलचालनाच्या) पडद्याआडून स्वार्थ साधण्याचा विचारही करत नाही.

मुख्य म्हणजे...

'स्वार्थाची लालूच' आणि 'नुकसानाची भिती' यावर अनुयायांना 'ताब्यात ठेवणे' हे तर गुन्हेगारी जगताचे मुख्य लक्षण आहे... लोकशाहीतल्या नेत्यानेसुद्धा तसेच वागावे काय ?!

डँबिस००७'s picture

20 Oct 2018 - 4:17 pm | डँबिस००७

सध्या राम आणि रावण यांच्या निमित्ताने निरनिराळे परस्पर विरोधी मुद्दे मांडले जात आहेत. ते ऐकताना सामान्य माणसाचा संभ्रम वाढतो आहे. रावण हा आदिवासींचा राजा होता त्यामुळे तो आमचा राजा आहे असे काही दलित संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे रामाने त्याची हत्या केली हे योग्य केले नाही आणि म्हणूनच दरवर्षी रावण दहन हेही त्यांना पटत नाही. मरणान्तानि वैराणि असं स्वतः राम म्हटले असतील तर दरवर्षी हा वाद उकरून काढून रावणाला का जाळायचं. अफजलखानाच्या वधानंतर महाराजांनी सुद्धा अशीच भूमिका घेतली होती इ. इ.

ही भुमिका कोणी घेतलेली नसुन तशी भुमिका घ्यायला देशाबाहेरील शक्ती भाग पाडत आहेत. देशा बाहेरील शक्तींना भारतातल्या राजकारणात कश्याला रस असेल वैगेरे भुमिका स्वतःच पडताळुन पहाव्यात.

ह्या प्रकरणार जास्त रस असेल तर श्री राजीव मलहोत्रा ह्यांचे युट्युबवरील व्हिडीयो बघावेत .

श्री राजीव मलहोत्रा यांनी ब्रेकींग ईंडीया या नावाने बेस्ट सेलर पुस्तक लिहीलेल आहे.
https://www.youtube.com/user/BreakingIndia

Nitin Palkar's picture

21 Oct 2018 - 8:50 pm | Nitin Palkar

'जाती, जमाती, धर्म यांच्या नावाने केवळ *स्वतःच्या* फायद्याचे राजकारण करणे ही नीच वृत्ती आहे.' हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत सर्व नेते आपल्याला झुंजवत ठेवून स्वतःची उखळं पांढरी करून घेणार.
पुराण आणि इतिहासातील मढी उकरून काढण्यापेक्षा, देशाने मला काय दिलंय, असा विचार करण्यापेक्षा मी देशासाठी काय करू शकतो, काय केलंय हा विचार प्रत्येकाने केलाच पाहिजे.
आपण किती स्वयंशिस्त, नागरी शिस्त, नागरी स्वच्छता पाळतो हा अतिशय प्राथमिक विचार प्रत्येकाने करायलाच हवा....
राम रावण कोण होते, त्या वेळी काय घडलं या पेक्षा मी सनदशीर मार्गाने माझा स्वतःचा, माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या देशाचा विकास कसा करू शकेन हा विचार करणे गरजेचे आहे.
रुळांवर उभे राहून नौटंकी बघताना गाडीखाली चिरडून मेलेल्यांच्या वारसांना, अथवा विषारी दारू पिऊन मरणाऱ्यांच्या वारसांना जोपर्यंत सरकारने मदत करावी अशी अपेक्षा ठेवतो तो पर्यंत देशाची प्रगती ashky....
आपण आपलं राम तुमचा रावण आमचा हेच वाद करू....

विशुमित's picture

21 Oct 2018 - 9:23 pm | विशुमित

बरं जाऊद्या!
द्या तंबाखूचा ईडा!

अभिदेश's picture

22 Oct 2018 - 3:10 pm | अभिदेश

अजूनही तंबाखूचा नाद जात नाही वाटतं . तुमचे लाडके जाणते राजांचा आजार ऐकूनही ??

ट्रम्प's picture

22 Oct 2018 - 5:09 pm | ट्रम्प

राहुल गांधी हे काश्मिरी ब्राह्मण कसे ? या मुद्याचे स्पष्टीकरण न देता पुढे चर्चा गेलीच कशी ?

गाढवाला गाढव च म्हणतात !!! झेब्रा किंवा घोडा म्हणवून चर्चा करण्यात काय अर्थ ?

आशु जोग's picture

22 Oct 2018 - 6:04 pm | आशु जोग

गाढवाला गाढव च म्हणतात

आता हे कुठं आलं

तुमची लेखा खालची ओळ वाचली !!!

फिरोज ( आडनाव जाऊ द्या ) हे रागा चे आजोबा हे सूर्या सारखे सत्य !!
तुमच्या वाक्या प्रमाणे रागा जर काश्मिरी ब्राह्मण तर फिरोज कुठले ब्राह्मण ते सांगायला हवे होते त्या नंतरच डिस्क्लेमर टाकायचे .

अर्धवट माहिती देऊन तुम्हाला हवी तशी चर्चा घडविण्यात काय अर्थ ?

ट्रम्प भाऊ आम्हाला राजकारणात घराणेशाही आजीब्बात पसंत नाही . आणि जन्माधारीत जाती वर्ण मानणेही सयुक्तीक नाही. फिरोझ गांधींच्या बाबत अजून एका तथ्याकडे दुर्लक्ष होते की लग्नाच्या वेळी महात्मा गांधींनी त्यांना दत्तक घेऊन हिंदू करुन घेतले होते. त्यामुळे हिंदू म्हणवून घेण्याचा आधिकार राहुल गांधींना असणे अगदीच अयोग्य नाही. व्हाया इंदिरा गांधी त्यांनी काश्मिरी ब्राह्मणत्व क्लेम करायलाही हरकत नाही पण व्हाया इंदिरा गांढी राहुल गांधी ब्राह्मणत्व सांगत असतील तर जन्माधारीत जाती संस्थेवर विश्वास ठेवणारी प्रतिगामीता त्यांनी स्विकारली असे म्हणावे लागते.

महासंग्राम's picture

24 Oct 2018 - 2:55 pm | महासंग्राम

या देशातील मूलनिवासी म्हणवणारे परदेशातल्या रावणाला मानतात

रावण परदेशातला कसा ?

आधी सिलोन रेडिओ असताना मानत नव्हते म्हणे. जेव्हापासून श्रीलंकेबरोबर खेळणाऱ्या क्रिकेट मॅच रणजी न म्हणता इंटरनॅशनल म्हणायला लागले तेंव्हापासून रावण बदलला म्हणे.

मराठी कथालेखक's picture

25 Oct 2018 - 11:15 pm | मराठी कथालेखक

सरकारने रावणाचे जातपडताळणी प्रमाणपत्र बनवण्याचे आदेश संबंधित खात्यास द्यावेत. प्रमाणपत्र बनल्यानंतरही वाद सुरु राहिलाच तर एखादी त्रिसदस्यीय समिती स्थापन करावी. यथावकाश उच्च न्यायालय , सर्वोच्च न्यायालयांत याचिका वगैरे पण होतीलच. दरम्यान पाच पंचवीस आंदोलनंही होवून जावू देत.