Skip to main content

चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१८

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 01/10/2018 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
Companies pay up Rs 1.1 lakh crore for fear of insolvency action कर्ज देणे व वसूल करणे यांच्या प्रशासनासंबंधीचे (इन्सॉल्व्हन्सी व बँकरप्सी) नवीन कायदे (उदा : Insolvency and Bankruptcy Code किंवा IBC) आणल्यामुळे पूर्वी चालढकल करत बुडित कर्जांच्या दिशेने वाटचाल करणार्‍या कर्जदारांवर वचक निर्माण झाल्याचे दिसत आहे. याचा परिणाम म्हणून, याअगोदर कर्ज फेडण्याबाबत चालढकल करणार्‍या कर्जदारांनी, आतापर्यंत सुमारे रु१.१ लाख कोटीचा भरणा बँकात केला आहे. गेल्या आठवड्यात सरकारने, या वित्तवर्षांत, नाठाळ कर्जदारांकडून रु१.८ लाख कोटी वसूल करण्याचे लक्ष ठेवल्याचे जाहीर केले आहे.  कायद्याचे बळ व प्रशासकिय पाठींब्याचे (Insolvency and Bankruptcy Board of India किंवा IBBI; National Company Law Tribunal किंवा NCLT; इत्यादी) बळ व बारीक देखरेख आस्तित्वात आल्यामुळे, भविष्यात बँका आपले कर्ज वसूल करण्यात कसूर करण्याची आणि/किंवा कर्जदारांनी चलाखी करून कर्ज बुडवण्याची शक्यता फार कमी झाली आहे.

वाचने 90676
प्रतिक्रिया 213

प्रतिक्रिया

माहितगार, आपला उपरोक्त संदेश वाचला. १.
थोडक्यात शेवटी समान न्याय तुम्ही तुमच्याच धर्मातील माता भगिनींना देणार ना, मग त्यासाठी हात एवढा आखडता कशासाठी ?
ऋतुवती स्त्रियांना प्रवेशबंदी असणे हा अन्याय आहे हे कोणी ठरवलं? अय्यप्पा नेहमी संन्याशाच्या रुपात दाखवला जातो. संन्याशांना स्त्रीसहवास निषिद्ध असल्याने शबरीमालाच्या गाभाऱ्यात बायकांना प्रवेश नाही. ज्या दहातेपन्नास मधल्या बाईस अय्यप्पाचं गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायचं आहे तिने अंचनकोविल येथे खुशाल जावं. शबरीमाला हे स्थान उचित नव्हे. इकडे स्वामी अय्यपांच्या इतर मंदिरांची माहिती आहे : https://en.wikipedia.org/wiki/Ayyappan#Temples जर स्त्रीभक्तांना त्यांच्यावर अन्याय झाल्याचं वाटंत नाही तर निधर्म्यांना तसं का वाटतंय? चायसे किटली गरम क्यू? कोणतरी नौशाद खान नामे मुस्लिम उठतो आणि शबरीमालात बायकांना प्रवेश का नाही म्हणून याचिका दाखल करतो. त्यावर न्यायालयाने 'हे आपलं काम नाही' म्हणून अंग काडून घ्यायला हवं. त्याऐवजी हिंदूंच्या भावना पायदळी तुडवायचा निर्णय बिनदिक्कीतपणे माथी मारला जातो. मग रेहाना नावाची मुस्लिम युवती शबरीमाला मंदिरात घुसायला सिद्ध होते. हा सर्व प्रकार पराकोटीचा संशयास्पद आहे. हिंदूंची मंदिरं उघडपणे भ्रष्ट करायची ताकद नाही म्हणून मागील दाराने प्रयत्न चालू आहेत. २.
गा.पै. ह्या धागा चर्चेत आपला प्रतिसाद दिसला नाहीत.
त्या धाग्यात फटाके वाजवणे व बोंबल्या लावणे हे दोनच मुद्दे सापडले. हे दोन्ही हिंदू धर्माशी संबंधित नाहीत. हिंदू धर्माच्या गळ्यात ही धोंड कशासाठी! साहजिकंच अशा चर्चेत मला रस नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

...चायसे किटली गरम क्यू? ....
सुधारणांच्या दृष्टीने एकमेकांकडे बोट दाखवणे आणि शेजारी शेजारी एकमेकांचे निंदक असणे एका अर्थी बरे असते. अर्थात शेजारच्या घरात अयोग्य आहे म्हणुन माझ्या घरात अयोग्य असू शकते याचे समर्थन होत नाहि. परस्पर निंदेचा प्रवास सर्वच शेजार्‍यांच्यात सुधारणा होण्याकडे असणे आदर्श असावे.
....ऋतुवती स्त्रियांना प्रवेशबंदी .....संन्याशांना स्त्रीसहवास निषिद्ध.....
हिंदू धर्माबद्दल भक्तांची अंधश्रद्धा आणि तार्कीक उणीव आहे. १.१) संन्यासाचा मुख्य उद्देश्य मोक्ष प्राप्ती असावा १.२) संन्यसत्वात सर्व नाती नाकारुन वैराग्य प्राप्ती करावयाची असते त्यामुळे इतर प्रत्येक सजीव ते निर्जीव वस्तुमात्रात ईश्वरीय अस्तीत्वाची माया / अनुभूती म्हणून बघण्या शिवाय मार्ग नसतो. त्यामुळे काहीशे वर्षापुर्वॉ अस्तीत्वात येऊन गेलेल्या अवतारास संन्यसत्वाची अवस्था पूर्णत्वास गेली नसल्यास आजच्या सर्व मग ऋतुमती असोत अथवा नसोत सर्व स्त्रीया स्व कन्येसमान असणार यात आश्चर्य नसावे आणि संन्यसत्वाची (वैराग्याची) स्थिती पूर्णत्वास गेली परमहंसस्थिती आली तर समोर कोणताही सजीव कोणतीही स्त्री आल्याने काही फरक पडण्याचा प्रश्न रहात नाही कारण कोणताही भेदाभेद न पाळता प्रत्येकात ईश्वरीय अस्तीत्व तुम्ही पहात असता त्यामुळे ईश्वराचे कोणतेही अस्तीत्व नाकारण्याचा प्रश्न रहात नाही. ऋतुवती स्त्रीयांना दर्शनाचा आधिकार नाकारणे हा तथाकथित भक्तांनी तार्कीक उणिव आणि अंधश्रद्धेतून केलेला अन्याय आहे. १.३) केवळ ऋतु कालावधी संपला म्हणून स्त्री पुरुष षडरिपूमुक्त-काममुक्त होतात असे नसावे त्यामुळे हे तार्कीक उणीवेचे आहे. काममुक्तता ही मानसिक स्थिती आहे ती साधण्याची पहिली जबाबदारी संन्याशाची आहे भक्तांची नव्हे. भक्त मन काममुक्त ठेवण्यासाथी व्रत करु शकतात पण पुरुष असोवा स्त्री मनाची काममुक्तता ठेवण्याचे प्रयत्न आणि यशापयश व्यक्तीपरत्वे बदलणार ज्यावर ज्याचे दर्शन घेतले त्या व्यक्तीचे देवत्वाला पोहोचल्या शिवाय नियंत्रण असणार नाही. स्वतःचे मन षडरिपूमुक्त काममुक्त ठेवण्याची जबाबदारी संन्याशाचीच. आणि जर संन्यासी स्वतः देवत्वास पोहोचला असेल तर भक्तांचे मन काममुक्त करण्याची इश्वरीय क्षमता त्यांच्या देवत्वात असणारच. त्यामुळे ऋतुवती स्त्रीयांना दर्शन नाकारणारा सारा युक्तीवाद तार्कीक उणीवेचा ठरतो किंवा कसे. २) मोक्षप्राप्तीसाठी जो संन्यास घेतला जातो, त्यात मानसिक विरक्ती प्राप्त करणे हे ध्येय असते त्यासाठी (काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर) षडरिपूंचा या त्याग मनावर नियंत्रण ठेऊन करावयाचा असतो, स्त्री तिरस्कारकरुन किंवा स्वतःस बुरख्यात बांधून घेऊन नव्हे. मत्सर किंवा क्रोध केले तरी मोक्षाचा मार्ग स्थगित होतो. ३) केवळ स्त्री न पहाता घेतलेल्या संन्यसत्वाने काम भावना लोप पावते हि अंधश्रद्धा आहे, वैराग्याचा आदर्श शुक आहे ज्याचे मन स्त्री दिसली तरी निर्मळ रहाते. ४.१ ) ऋतुवती असण्याचा पावित्र्याशी संबंढ जोडणे हि दुसरी अंधश्रद्धा आहेत. परमेश्वर आणि त्याच्या अवतारास परमेश्वर निर्मित सर्व सजीव सर्व स्थितीत समान असतात . ४.२) ऋतुवती असण्याच्या काळात तिला श्रद्धेय स्थानाच्या आधाराची स्त्रीला अधिक गरज असते आणि कर्मठ अंधश्रद्ध दृष्टीकोण नेमके गरज असतानाच्या काळात हकनाक स्त्रिचा भावनिक श्रद्धेय आधार काढून घेतात, जी स्थिती नैसर्गिक आहे आणि ज्याबाबत पुरेश्या स्वच्छतेची काळजी घेतली तर पुरेसे आहे त्या बाबत अनावश्यक अपावित्र्याची भावना निर्मिती केली जाते. जगातले ऋतुवती नसलेले सर्व सजीव आणि मानव धरुन दररोज नैसर्गिक विधीचे उत्सर्ग करतच असतात स्वच्छतेनंतर ते पवित्र गृहीत धरले जातात. ऋतुवती असणे सुद्धा स्वाभाविक नैसर्गिक उत्सर्गापलिकडे काहीच नाही. त्यास इतर मानवीय उत्सर्गांपेक्षा अधिक हिनत्व अथवा गौणत्व देण्याचे काहीच कारण नाही. उत्सर्ग उत्सर्ग आहे त्या बाबत स्वच्छतेची आपापली काळजी घेतली कि शरीर पवित्र होते. ४.३) जगातील इतर प्रमुख धर्मीय ऋतुवती असण्यावरुन स्त्रीयांना इश्वरीय प्रार्थनेचा आधिकार नाकारत नाहीत. हिंदू धर्मीय ऋतुवती असण्यावरुन स्त्रीयांना इश्वरीय प्रार्थनेचा आधिकार नाकारला जाण्यात ऋतुवती स्त्रीयांवर अन्याय आहेच पण एखाद्या बाबतीत अंधश्रद्धेमुळे एखादी सवलत स्वधर्मीयांनाच नाकारणे हा स्वतःच्याच धर्मीय आणि स्वतःच्याच धर्मावर अन्याय आहे. तुमच्या धर्मात अन्याय आहे म्हणून कुणि तुमच्या धर्माकडे पाठ फिरवण्यात तुमच्याच धर्माचे नुकसान असते. त्यामुळे स्वकीयांवर अन्यायाचे चुकीचे समर्थन प्रशस्त नसावे.

In reply to by माहितगार

माहितगार, १. हिंदू धर्माबद्दल भक्तांची अंधश्रद्धा आणि तार्कीक उणीव आहे. जरी असली तरी काय बिघडतंय? कुणाचं काही नुकसान झालंय का? २. कारण कोणताही भेदाभेद न पाळता प्रत्येकात ईश्वरीय अस्तीत्व तुम्ही पहात असता त्यामुळे ईश्वराचे कोणतेही अस्तीत्व नाकारण्याचा प्रश्न रहात नाही. स्त्रीभक्तांना कोणीही नाकारीत नाहीये. ३. ऋतुवती स्त्रीयांना दर्शनाचा आधिकार नाकारणे हा तथाकथित भक्तांनी तार्कीक उणिव आणि अंधश्रद्धेतून केलेला अन्याय आहे. भक्तीत अधिकाराची भाषा नसते. त्यातूनही ज्यांना हा न्याय वाटतो त्यांनी शबरीमालास जाऊ नये. अशांकडे अंचनकोविलसारखे इतर पर्याय उपलब्ध आहेत. ४. केवळ ऋतु कालावधी संपला म्हणून स्त्री पुरुष षडरिपूमुक्त-काममुक्त होतात असे नसावे त्यामुळे हे तार्कीक उणीवेचे आहे. काममुक्तता ही मानसिक स्थिती आहे ती साधण्याची पहिली जबाबदारी संन्याशाची आहे भक्तांची नव्हे. भक्त मन काममुक्त ठेवण्यासाथी व्रत करु शकतात पण पुरुष असोवा स्त्री मनाची काममुक्तता ठेवण्याचे प्रयत्न आणि यशापयश व्यक्तीपरत्वे बदलणार ज्यावर ज्याचे दर्शन घेतले त्या व्यक्तीचे देवत्वाला पोहोचल्या शिवाय नियंत्रण असणार नाही. स्वतःचे मन षडरिपूमुक्त काममुक्त ठेवण्याची जबाबदारी संन्याशाचीच. आणि जर संन्यासी स्वतः देवत्वास पोहोचला असेल तर भक्तांचे मन काममुक्त करण्याची इश्वरीय क्षमता त्यांच्या देवत्वात असणारच. त्यामुळे ऋतुवती स्त्रीयांना दर्शन नाकारणारा सारा युक्तीवाद तार्कीक उणीवेचा ठरतो देवाच्या वतीने बोलणे तुम्ही कोण? शिवाय श्री. पप्पूशिरोमणी यांच्या 'गरिबी ही मानसिक अवस्था आहे' या विधानाची आठवण होते ती वेगळीच. तसेच शबरीमालाचा काममुक्तीशी कसलाही संबंध नाही. ५. स्त्री तिरस्कारकरुन किंवा स्वतःस बुरख्यात बांधून घेऊन नव्हे. मत्सर किंवा क्रोध केले तरी मोक्षाचा मार्ग स्थगित होतो. ते अय्यप्पा बघून घेतील. ६. केवळ स्त्री न पहाता घेतलेल्या संन्यसत्वाने काम भावना लोप पावते हि अंधश्रद्धा आहे, वैराग्याचा आदर्श शुक आहे ज्याचे मन स्त्री दिसली तरी निर्मळ रहाते. कामभावनेपायी बायकांना दूर ठेवलंय हीच मुळी अंधश्रद्धा आहे. ७. ऋतुवती असण्याचा पावित्र्याशी संबंढ जोडणे हि दुसरी अंधश्रद्धा आहेत. परमेश्वर आणि त्याच्या अवतारास परमेश्वर निर्मित सर्व सजीव सर्व स्थितीत समान असतात . समानता नामक पदार्थ निसर्गात कुठेही आढळून येत नाही. त्यामुळे त्याच्या नादी न लागणेच श्रेयस्कर. ८. ऋतुवती असण्याचा पावित्र्याशी संबंढ जोडणे हि दुसरी अंधश्रद्धा आहेत. परमेश्वर आणि त्याच्या अवतारास परमेश्वर निर्मित सर्व सजीव सर्व स्थितीत समान असतात . हे अवताराने ठरवायला हवं ना? ९. उत्सर्ग उत्सर्ग आहे त्या बाबत स्वच्छतेची आपापली काळजी घेतली कि शरीर पवित्र होते. पावित्र्याचे नियम काय आहेत? तुम्ही यमनियम पाळून योगसाधना वगैरे केलीये का? किंवा धर्मशास्त्रांचं अध्ययन केलेलं आहे का? १०. जगातील इतर प्रमुख धर्मीय ऋतुवती असण्यावरुन स्त्रीयांना इश्वरीय प्रार्थनेचा आधिकार नाकारत नाहीत. हिंदू धर्म तरी कुठे नाकारतोय. अगदी पाळी चालू असलेली बाईसुद्धा नामस्मरण करू शकते. नामाला सीमा नाही. ११. हिंदू धर्मीय ऋतुवती असण्यावरुन स्त्रीयांना इश्वरीय प्रार्थनेचा आधिकार नाकारला जाण्यात ऋतुवती स्त्रीयांवर अन्याय आहेच पण एखाद्या बाबतीत अंधश्रद्धेमुळे एखादी सवलत स्वधर्मीयांनाच नाकारणे हा स्वतःच्याच धर्मीय आणि स्वतःच्याच धर्मावर अन्याय आहे. हिंदू धर्मातल्या भक्तीत अधिकारांची भाषा नसते. त्यामुळे अन्यायाची भाषाही गैरलागू आहे. १२. तुमच्या धर्मात अन्याय आहे म्हणून कुणि तुमच्या धर्माकडे पाठ फिरवण्यात तुमच्याच धर्माचे नुकसान असते. ते भक्त स्त्रिया आणि अय्यप्पा बघून घेतील. असो. एक सावधगिरीची सूचना. कम्युनिस्ट लोकं नेहमी अधिकाराची भाषा करतात. त्यांच्यापासून सावधान! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

....एक सावधगिरीची सूचना. कम्युनिस्ट लोकं नेहमी अधिकाराची भाषा करतात. त्यांच्यापासून सावधान!...
आपल्याच घरातील कन्या, माता, भगिनीं, भार्यांचे स्वातंत्र्य आणि आधिकार (अ)सुरक्षीत करण्यासाठी भांडवलशाही, समाजवाद ते परधर्मीय कॉन्स्पिरसी थेअरीज कशासाठी ?
...ते भक्त स्त्रिया आणि अय्यप्पा बघून घेतील....
अन्यायाने मनातील श्रद्धा आणि भक्ती विरुन जाण्याची शक्यता असते . हिंदूधर्मीय संकुचित कर्मठ अंधश्रद्धा आणि अन्यायच नास्तिकतेला आणि परधर्म शरणतेला पाठबळ पुरवत आल्याचा काही शतकांचातरी इतिहास असावा.
....हिंदू धर्मातल्या भक्तीत अधिकारांची भाषा नसते. त्यामुळे अन्यायाची भाषाही गैरलागू आहे...
.. वाक्य बर्‍याचबाजूंनी निसटतय, मुख्य म्हणजे सेल्फ गोल आहे :) एक एक करुन बघूया १) भक्तीस काहीच अधिकार नसतील हिंदूंच्या भक्तीत जसे सर्वांचे सर्व हस्तक्षेप वैध ठरतील , त्यात न्याय आणि राज्यसंस्थेची हस्तक्षेपही वैध ठरतात. २) तुमची मुर्तीपुजा ते अनेक देवता वाद नाकारुन तुमच्या भक्तीत अब्राहमीक धर्म ते मुस्लीम राज्यकर्ते यांनी केलेले हस्तक्षेप ज्यात मुर्ती / मंदिर भंजन ते जिझीया कर लावणे याचाही समावेश व्हावा हे भक्तांच्या भक्तीला काहीच आधिकार उरले नाही तर वैध ठरते. ३) ईश्वर आणि भक्ताचे नाते केवळ मालक आणि गुलाम असणे हि कल्पना अब्रहामीक आणि मुख्यत्वे मुसलमानी असावी, तिकडून हिंदूंनी काही प्रमाणात उसनी घेतली असावी. हिंदू धर्मात भक्ताचा ईश्वरावर आधिकार फार मोठा आहे. ईश्वराच्या घरी आलेल्या भक्ताला ईश्वराला अतिथी म्हणूनच स्वागत करावे लागते, भक्त ईश्वरालाही शाप देऊ शकतात. अख्खी भगवद गीता आधिकारांसाठी संघर्ष करण्यास सांगते. आयप्पाच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अतिथी स्त्रीस परत पाठवणे हिंदूसंस्कृती च्या आतिथ्य संस्कारानुसार अनुचित असावे.
....हिंदू धर्म तरी कुठे नाकारतोय. अगदी पाळी चालू असलेली बाईसुद्धा नामस्मरण करू शकते. नामाला सीमा नाही.....
नाम स्मरण तर इतर धर्मीय पण करु शकतात. ईतर धर्मात व्यक्ती मुर्तींची दैविक व्यक्ती म्हणून जोडलेली नाही. हिंदू धर्मात मुर्ती दैविक व्यक्ती म्हणून जोडली आहे. दैविक व्यक्ती असलेल्या मुर्तीवर श्रद्धा निर्माण करुन दिली जाते आणि अगदी तिला जेव्हा गरज आहे तेव्हा मुर्तीपासून दूर ठेऊन केवळ नामस्मरण कर म्हणून आधिकार नाकारला जातो ? (या न्यायाने वीर्य उत्सर्जीत होणार्‍या वयातील सर्व पुरुषांनाही मुर्तीपुजेपासून सक्तीने दूर का ठेऊ नये ?) पुरुषांच्या शरीरात वीर्याची निर्मिती आणि स्खलन कोणत्याही पिरीयॉडीक शिस्ती शिवाय चालू असते आणि तरीही त्यांचे पावित्र्य टिकून राहते ! पण सृजनाच्या त्याच प्रक्रीयेचा भाग असलेली पाळीची प्रक्रीया अपवित्र ? हा कोणता न्याय ? ईतर शारिरीक उत्सर्ग तर स्त्री पुरुष दोघांनाही चुकत नाहीत. जिथे केवळ स्वच्छतेची काळजी घेणे पुरेसे आहे त्यासाठी आपल्याच कुटूंबीयांना अखंड अन्याय्य प्रक्रीयेचे राबवणे कशासाठी ? वैज्ञनिक दृष्ट्या पहाता पाळी सजीव सृष्टीच्या चैतन्यपूर्ण सृजनातील सुदृढतेसाठीची महत्वाची प्रक्रीया आहे ती अपवित्र कशी असू शकेल ? बरे तसे पहाता पाळी केवळ चारच दिवस येते त्यासाठी अयप्पा मंदिरात ऊरलेले २६ दिवस * १२ महिने * ४१ वर्षे दर्शन नाकारण्याचे समर्थन कसे होते ?
....किंवा धर्मशास्त्रांचं अध्ययन केलेलं आहे का?....
अगदी होय, त्या हिंदू धर्मशास्त्राचे अध्ययन केले आहे ज्यात कोणत्याही विवाहीत गृहस्थाची ईश्वरचरणी उपासना -अगदी ब्रह्मदेवाची सुद्धा - अर्धांगिनी शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे आयप्पा मंदिरात सध्या होणारी अर्धांगिनी सोबत नसतानाची गृहस्थांची उपासना अर्धवट रहाते त्यामुळे अन्याय केवळ स्त्रीयांवरच नाही सर्व गृहस्थ पुरुष भक्तांवरही होतो आहे. त्यांची उपासना प्रयत्न करुनही अर्धवट ठेवली जात असल्याने त्या भक्तांवर तो अन्याय आणि अन्यायच आहे. .
..पावित्र्याचे नियम काय आहेत? तुम्ही यमनियम पाळून योगसाधना वगैरे केलीये का?...
तार्कीक उणीवेचे विधान आहे . आधी प्रश्न पावित्र्याचे नियम काय कसे असावेत असा असावयास हवा. ज्या नियमांचा आधारच ईश्वरीय सजीवांना विषमतेची वागणूक असू शकेल असे काही नियम कुठे असतील तर त्या नियमांचे स्वतःचेच पावित्र्य संपलेले असते . ज्या नियमांचे पावित्र्य संपले आहे त्यांना पावित्र्याचे नियम कसे काय म्हणणार ? आधि अपवित्र विषमतेच्या नियमांचे पालन करण्याची अपेक्षा करुन मग पावित्र्याचे नियम विचारण्यासाठी कोणते नैतिक आधिकार शिल्लक रहातात ? जे विषमतेने अपवित्र झाले ते निर्योग आहे . आम्ही समान संधी देणार्‍या खर्‍या पवित्र योगाची साधना करतो .
....हे अवताराने ठरवायला हवं ना?....
अगदीच अस काही नाही . हिंदू धर्म अवतार आणि अगदी ईश्वरासही अनिर्बंध स्वातंत्र्यही देताना दिसत नाही. आलेल्या आतिथीस नाकारण्याचा आधिकार त्यांनाही नाही. आणि जे दर्शनास आले त्यांना आशिर्वाद द्यायचे कि नाही तेही अवतार ठरवतो ना ? अवताराची स्वतःची ईच्छा झाल्या शिवाय भक्ताला बोलावणेही जात नाही अशी पण एक श्रद्धा आहे ना ? अवताराने ज्या स्त्रीयांच्या मनात ईच्छा निर्माण करुन बोलावून घेतले त्या स्त्रीयांना दर्शना पासूनवंचित करणारे ईतर कोण ? जेव्हा अवतार न्यायाधीश , पोलीसी, सरकारी अवतार धारण करुन दर्शन घेऊ ईच्छित स्त्रीयांना दर्शनाची मोकळीक देईल तेव्हा हिंदू धर्मातील उदात्ततेस ग्रहण झालेले व्हिलनीश भोंदू खोटे भक्त -आता पर्यंत सुधारणा वादासमोर बर्‍याच गोष्टीत विरघळलेत - एक दिवस याही बाबतीत विरघळून जातील . आपल्या बाकी प्रश्नांची उत्तरे वर आलेली आहेत त्यामुळे त्यांचे पुर्नलेखन टाळतो. चर्चेसाठी अनेक आभार.

Number of 'crorepatis' has risen by 60% in last four years: CBDT आयकर विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीप्रमाणे खालील माहिती मिळाली आहे : १. मूल्यांकन(असेसमेंट) वर्ष २०१४-१५ आणि मूल्यांकन वर्ष २०१७-१८ यामध्ये एक कोटीपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न जाहीर करणार्‍यांची संख्या ८८,६४९ वरून वाढून १,४०,१३९ झाली आहे, म्हणजे, जवळ जवळ ६०% ने वाढली आहे.. २. वित्तवर्ष २०१३-१४ (मूल्यांकन वर्ष २०१४-१५) आणि वित्तवर्ष २०१७-१८ : करविवरण (आय टी रिटर्न) भरणार्‍यांची संख्या ३.७९ लाखांवरून वाढून ६.८५ लाख झाली आहे, म्हणजे ८०% पेक्षा जास्त वाढली आहे.. नोटाबंदी आणि जीएसटी पार नाकाम झाल्या आहेत असा एक प्रवाद आहे. पण, तसे असतानाही, वरचे आकडे पाहून, माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला काही प्रश्न पडले आहेत... अ) इतक्या कमी वेळेत, इतके लोक, एकाएकी इतके श्रीमंत कसे झाले ? म्हणजे, बापरे ! एकाएकी, अच्छे दिन आले की काय? आ) समजा काहीजण पूर्वी आपले उत्पन्न लपवित होते आणि आता त्यांनी ते जाहीर करायला सुरुवात केली, म्हणून त्यांचा आकडा एकाएकी इतका वाढला असला... तर मग, काळाबाजारी लोकांना कराच्या जाळ्यात गुंतविण्याच्या सरकारच्या सगळ्या योजना अयशस्वी झालेल्या असतानाही... इतक्या लोकांना पूर्वी लपवत असलेले उत्पन्न आता जाहीर करण्याची उपरती कोणत्या कारणाने झाली असावी? कोणत्या कारणाने का होईना, जर लोकांना आपले उत्पन्न लपवणे गैरसोईचे वाटू लागले असेल तर, ती अच्छे दिनांची खूण मानावी काय? मिपावरील जाणकार अर्थतज्ज्ञांच्या विश्लेषणाच्या प्रतिक्षेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

छे छे काँग्रेसच्या ७० वर्षाच्या आर्थिक सुधारणांचे परिणाम आत्ता दिसायला लागले आहेत. "गरिबी हटाव" म्हणून इंदिराजींनी सांगितले होते ना त्याचेच हे परिणाम. बाकी सर्व मोहमाया आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आजच्या घडीला एक कोटी रूपये रक्कम एकदम किरकोळ बाब आहे. त्याचा आणि नोटबंदीचा संबंध जोडला हे काय उमगले नाही. .... हे फक्त 'चालू' सरकार मुळे घडले ह्याला काही आधार असेलच याबाबत साशंक आहे. असो.

In reply to by विशुमित

एक कोटी रुपये वर्षाला म्हणजे सव्वा आठ लाख महिन्याला उत्पन्न आहे. साडे पाच कोटी रुपये एक एकरात काढणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्याला ठीक आहे. इतरांना किरकोळ नाही. बाकी चालू द्या.

In reply to by विशुमित

शिंपल आहे. एक तर उत्पन्न दाखवत नव्हते आणि कर भरत नव्हते (ज्याची शक्यता जास्त आहे) किंवा उत्पन्न खरोखरच वाढलंय ( म्हणजे अच्छे दिन आ गये). बेंबट्या ,आपल्या लोकांना ढुंगणावर हंटरच हवा हे खरे

In reply to by विशुमित

=)) =)) =)) गैरसोईच्या मूळ मुद्द्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करायची असली की होतं असं कधी कधी ! =)) =)) =)) काही हरकत नाही. तुमचा गोलपोस्ट बदलून मांडलेला नवीन मुद्दा अनेक नवीन प्रश्न उभे करतो आहे, हे लक्षात असेलच ? आजच्या घडीला एक कोटी रूपये रक्कम एकदम किरकोळ बाब आहे.* १. भारतात दरवर्षी, दरकरदात्यामागे, एक कोटी रूपये रक्कम एकदम किरकोळ बाब बनली आहे, असे तुम्ही म्हणताय. वाह, वाह, वाह, हे अच्छे दिन आल्याचे ठळक लक्षण होत नाही का? मोदी मिपा वाचत असते आणि त्यांनी तुमचा प्रतिसाद वाचला असता, तर त्यांनी तुम्हाला जरूर मनापासून धन्यवाद दिले असते ! २. मग ती किरकोळ* असलेली रक्कम 'ते ६०% लोक' आधी का जाहीर करत नसावेत ? आणि आत्ताच जाहीर करावी अशी उपरती त्यांना का बरं झाली असावी??? जर ते उगाचच, एकाएकी सज्जन झाले व कर भरू लागले तर, ते अच्छे दिन आल्याचे ठळक लक्षण नाही का? ३. केवळ, 'पाच-दहा हजार रुपयांच्या कर्जासाठी देशात आत्महत्या होत आहेत' असा मोठा गदारोळ असताना, दरवर्षीचे कोटी किंवा जास्त रुपये उत्पन्न "एकदम किरकोळ बाब" कशी काय ठरते बुवा? "की, किरकोळ रकमेचा आकडा, आपल्या सोईच्या मुद्द्याप्रमाणे हवा तसा वर-खाली होतो? ४. बाकीचं जाऊ द्या, त्या प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे सुद्धा खूsssप गैरसोईचे आहे... त्यापेक्षा, ते खोडणारा कोणताही पुरावा न देता "हँ, हँ, हे सगळं पटत नाही / अविश्वासू आहे / खोटं आहे" असे म्हणणे कित्ती कित्ती सोप्पं, नाही का?! ========================= अवांतर : * : "वीस वीस लाख रुपये घेऊन भारतभर फिरणार्‍यांना एक कोटी काही फार मोठी रक्कम नाही" अशी कुजबूज ऐकू आली... पण, "हँ, हँ, हे सगळं पटत नाही / अविश्वासू आहे / खोटं आहे," असे म्हणत, मी नाही दिले लक्ष तिकडे! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

करोडपतींनी रिटर्न्स भरण्याचा आणि नोटबंदीचा संबंध कसा जोडला आहे ते आधी सांगा. (जसा ट्रकचा आणि माझ्या विधानाचा जोडला तसा) .... बाकी तुमचं रिटर्न्सच लाॅजीक खूपच तकलादू आहे. मला टंकाळा असल्याकारणाने उत्तरे नाही द्यायची.

I-T dept launches major drive against Indians with illegal foreign assets; thousands under scanner संशय असलेल्या अनेक महत्वाच्या आणि/किंवा अतीश्रीमंत व्यक्तींची परदेशात असलेली बँक खाती आणि इतर स्थावर व जंगम मालमत्तेबद्दल आयकर विभागाने विचारणा सुरू केली आहे. त्यांच्याकडे ती संपत्ती कशी आली याबद्दल व तिच्या वैधतेबद्दल माहिती देण्यासाठी आयकर विभागाने नोटीसेस जारी केल्या आहेत. भारतिय कायद्याप्रमाणे सर्वसाधारण निवासी भारतियांना, काही खास नियमांप्रमाणे मिळालेल्या सरकारी परवानगीशिवाय, परदेशात संपत्ती ठेवण्यास परवानगी नाही. भूतकालात सरकारने कधीही विचारातही न घेतलेल्या या मोहिमेचे फलित काय निघेल याबद्दल खूपच उत्सुकता आहे.

ईतक्या अडचणीचे प्रश्न कसे काय विचारता तुम्ही ? आता एक्सपर्ट विष्लेषण करायला कोणी येणार नाही !! फारतर झुमरीतल्लय्यातील नगर पालिकेत कोणी दुय्यम क्लर्कने चिरिमीरी घेतली ह्या संशयावरुन सरळ मा पं प्रधान यांना धारेवर धरणारे लोक आता तोंड उघडणार नाहीत !!

In reply to by विशुमित

आसं सरकारी बाबूंची टार्गेटं वाढ्वून लोकान्ला शिद्द्या लायनित आणायला जमत आसंल तर ह्ये लई अदुगर करायला हवं व्हतं नाय का? त्येच्यातबी काटाच दिसतुया का? का बाबू लोकान्ला घाबरून लोकं नस्लेलं पैकं दाकवून त्येच्यावरचा ट्याक्स भरायला लागली आसं म्हन्ताव? =)) =)) =))

In reply to by विशुमित

बाकी समद्या न्येत्यांच्या आनी जन्तेच्या, बोल्लेल्या आनी न बोल्लेल्या गोश्टी फटाफट समजनार्‍या तुमाला ह्येची टोटल लागना व्हय ??? ही ही ही. आसूद्या, आसूद्या ! आत्ता ! रस्तावरचा फाईन जमा करायचा टार्गेट आनी आयकर जमा करायचा टार्गेट हेच्यातला फरक आसतो का नाय? बाबू मागं लागला म्हनून कोन आपला पैसा वाढवुन दावील आनी त्येच्यावर टॅक्स भरंल? कायच्या काय? बाब्बौ, इतर लोकं ह्ये समदं वाचत्यात, त्येन्ला बी डोक्सं आसतंय, आनी त्ये बी वाचून लिवनार्‍याचा बरावाईट इचार करत्यात, ह्ये तरी समजून लिवा, कसं?

First Made-in-India engine-less train gets on track for trial run The first train set conceptualised, designed and manufactured completely in India, which looks like a bullet train, will be released for trial in a week’s time. A train set is a rake which is self-propelled and does not need a locomotive, said Sudhanshu Mani, general manager of Integral Coach Factory (ICF) which has designed and manufactured the train set, known as Train-18, at a cost of Rs 100 crore. A second rake would be ready by March, with costs expected to reduce as more rakes are manufactured. Built for a quick intra-day travel on Shatabdi Express routes like Delhi-Bhopal, Chennai-Bengaluru and Mumbai-Ahmedabad, the sixteen-coach train has the latest amenities and can cut down on travel time by 10-15%. The train has better acceleration than conventional trains as it has 50% more power and is equipped with a smart braking system consisting of regenerative and electro-pneumatic braking imported from Hungary. स्वातंत्र्यानंतर भारतात स्वतःची हाय स्पीड रेल्वे बनवायला ७ दशक लागली. दरम्यान जगातल्या पहील्या काही रेल्वे चालवण्याचा मान हा ब्रिटीश ईंडीयाला जातो. ब्रिटीशांनी भारतात ९४,००० किमीच रेल्वे जाळ बनवलेल होत. मात्र ब्रिटीश गेल्यावर मात्र सत्तेत असलेल्या सरकारला त्या रेल्वेच्या पसार्यात फक्त १०,००० किमी रेल्वेची भर टाकता आली. गेल्या चार - पाच वर्षांत रेल्वेच जाळ अजुन २५,००० किमी ने वाढलेल आहे. श्री मा मोदीजीच्या मेक ईन ईंडिया खाली आता हाय स्पीड रेल्वेही भारतात बनुन तयार झालेली आहे. १८ महीन्यात डिझाईन ते फिनिश किमान स्पीड २२० किमी/ तास सध्या चाचणीचा स्पीड १६० किमी/ तास.

माहितगार, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
आपल्याच घरातील कन्या, माता, भगिनीं, भार्यांचे स्वातंत्र्य आणि आधिकार (अ)सुरक्षीत करण्यासाठी भांडवलशाही, समाजवाद ते परधर्मीय कॉन्स्पिरसी थेअरीज कशासाठी ?
घर आपलं आहे. घरातल्या कन्या, माता, भगिनीं, भार्यांही आपल्या आहेत. अगदी तस्सेच अय्यप्पाही आपलेच आहेत. आपल्याच स्वामींनी घालून दिलेले नियम आपणंच पाळायचे असतात. २.
अन्यायाने मनातील श्रद्धा आणि भक्ती विरुन जाण्याची शक्यता असते . हिंदूधर्मीय संकुचित कर्मठ अंधश्रद्धा आणि अन्यायच नास्तिकतेला आणि परधर्म शरणतेला पाठबळ पुरवत आल्याचा काही शतकांचातरी इतिहास असावा.
हे जरतरयुक्त विधान आहे. त्यामुळे ठोस पुरावा असल्याशिवाय मी हे विधान स्वीकारू शकंत नाही. ३.
१) भक्तीस काहीच अधिकार नसतील हिंदूंच्या भक्तीत जसे सर्वांचे सर्व हस्तक्षेप वैध ठरतील , त्यात न्याय आणि राज्यसंस्थेची हस्तक्षेपही वैध ठरतात.
यथोचित बंधनं पाळूनंच भक्ती करायचा अधिकार मिळतो. उद्या साधू नग्न असतात म्हणून कोणीही कुठल्याही मंदिरात नागव्याने प्रवेश करायचा अधिकार गाजवू पाहील तर त्यास / तीस मंदिरप्रवेश नाकारण्यात येईल. ४.
२) तुमची मुर्तीपुजा ते अनेक देवता वाद नाकारुन तुमच्या भक्तीत अब्राहमीक धर्म ते मुस्लीम राज्यकर्ते यांनी केलेले हस्तक्षेप ज्यात मुर्ती / मंदिर भंजन ते जिझीया कर लावणे याचाही समावेश व्हावा हे भक्तांच्या भक्तीला काहीच आधिकार उरले नाही तर वैध ठरते.
भक्तांच्या अंगात जिझिया कर झुगारण्याची वा मूर्तीभंजन थांबवण्याची शक्ती नसू शकते. पण म्हणून कुठलाही हस्तक्षेप वैध होत नाही. ५.
हिंदू धर्मात भक्ताचा ईश्वरावर आधिकार फार मोठा आहे. ईश्वराच्या घरी आलेल्या भक्ताला ईश्वराला अतिथी म्हणूनच स्वागत करावे लागते, भक्त ईश्वरालाही शाप देऊ शकतात.
वय वर्षे १० ते ५० वाल्या बायकांसाठी खुशाल अतिथीगृहे बांधावीत. त्यांचं गाभाऱ्यात काम नाही. ६.
अख्खी भगवद गीता आधिकारांसाठी संघर्ष करण्यास सांगते.
साफ चूक. गीतेतून कर्तव्य करायची प्रेरणा मिळते. ७.
आयप्पाच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अतिथी स्त्रीस परत पाठवणे हिंदूसंस्कृती च्या आतिथ्य संस्कारानुसार अनुचित असावे.
वय वर्षे १० ते ५० वाल्या बायकांसाठी खुशाल अतिथीगृहे बांधावीत. ८.
हिंदू धर्मात मुर्ती दैविक व्यक्ती म्हणून जोडली आहे. दैविक व्यक्ती असलेल्या मुर्तीवर श्रद्धा निर्माण करुन दिली जाते आणि अगदी तिला जेव्हा गरज आहे तेव्हा मुर्तीपासून दूर ठेऊन केवळ नामस्मरण कर म्हणून आधिकार नाकारला जातो ?
हे कथन अतिशय रोचक आहे. कारण की शेवटी जो प्रश्न केलाय त्याचं उत्तर आधीच्या विधानात आहे. मूर्तीचे म्हणून स्वत:चे नियम आहेत. नेमक्या याच कारणासाठी तिचं पावित्र्य व शुचिता काटेकोरपणे पाळावी लागते. म्हणून तरुण स्त्रियांना गाभाऱ्यात प्रवेश नाही. ९.
(या न्यायाने वीर्य उत्सर्जीत होणार्‍या वयातील सर्व पुरुषांनाही मुर्तीपुजेपासून सक्तीने दूर का ठेऊ नये ?)
माझ्या माहितीप्रमाणे या व्रतासाठी पुरुषांनी ४० दिवस लैंगिक संबंध टाळायचा असतो. तसंही पाहता पाळी आपोआप येते, तर वीर्य मुद्दामून काढावे लागते. १०.
वैज्ञनिक दृष्ट्या पहाता पाळी सजीव सृष्टीच्या चैतन्यपूर्ण सृजनातील सुदृढतेसाठीची महत्वाची प्रक्रीया आहे ती अपवित्र कशी असू शकेल ?
वैज्ञनिक दृष्ट्या पहाता मलमूत्रविसर्जन सजीव सृष्टीच्या चैतन्यपूर्ण सृजनातील सुदृढतेसाठीची महत्वाची प्रक्रीया आहे. तरीही ती अपवित्र आहे. ११.
अगदी होय, त्या हिंदू धर्मशास्त्राचे अध्ययन केले आहे ज्यात कोणत्याही विवाहीत गृहस्थाची ईश्वरचरणी उपासना -अगदी ब्रह्मदेवाची सुद्धा - अर्धांगिनी शिवाय पूर्णच होऊ शकत नाही.
अशा प्रसंगी तुम्ही अंचनकोविल येथे जावे हे उत्तम. या ठिकाणी स्वामी अय्यप्पा गृहस्थी पुरुष आहेत. तिथे बायकांना गाभाऱ्यात थेट मूर्तीपर्यंत प्रवेश आहे. १२.
त्यामुळे आयप्पा मंदिरात सध्या होणारी अर्धांगिनी सोबत नसतानाची गृहस्थांची उपासना अर्धवट रहाते त्यामुळे अन्याय केवळ स्त्रीयांवरच नाही सर्व गृहस्थ पुरुष भक्तांवरही होतो आहे. त्यांची उपासना प्रयत्न करुनही अर्धवट ठेवली जात असल्याने त्या भक्तांवर तो अन्याय आणि अन्यायच आहे.
आजिबात नाही. उलट शबरीमालात स्त्रियांना गाभाऱ्यात प्रवेश दिल्यास स्वामी अय्यप्पांना संन्याशी म्हणून पुजणाऱ्या भक्तांवर अन्याय होतो. तो तसा होता कामा नये. १३.
ज्या नियमांचा आधारच ईश्वरीय सजीवांना विषमतेची वागणूक असू शकेल असे काही नियम कुठे असतील तर त्या नियमांचे स्वतःचेच पावित्र्य संपलेले असते .
हे पार दिशाभूलजनक विधान आहे. सृष्टी विषमतेवर चालते. समानता ही एक अफूची गोळी आहे. समानतेच्या नावाखाली मृगजळाच्या मागे धावणे चालू आहे. १४.
हिंदू धर्म अवतार आणि अगदी ईश्वरासही अनिर्बंध स्वातंत्र्यही देताना दिसत नाही.
मग तुम्हाला तरी चालू प्रथा मोडायचं स्वातंत्र्य कशास हवंय? या प्रथेमुळे कोणाचाही जीव जात नाहीये. की कुणाचंही आयुष्य बरबाद होत नाहीये. मग तुम्हाला ती मोडायचीये कशाला? १५.
अवताराने ज्या स्त्रीयांच्या मनात ईच्छा निर्माण करुन बोलावून घेतले त्या स्त्रीयांना दर्शना पासूनवंचित करणारे ईतर कोण ?
प्रस्तुत प्रसंगी कुण्या स्त्रीस दर्शनाची इच्छा झाली नसून न्यायालयाने हस्तक्षेप करून निकाल दिला आहे. १६.
जेव्हा अवतार न्यायाधीश , पोलीसी, सरकारी अवतार धारण करुन दर्शन घेऊ ईच्छित स्त्रीयांना दर्शनाची मोकळीक देईल तेव्हा हिंदू धर्मातील उदात्ततेस ग्रहण झालेले व्हिलनीश भोंदू खोटे भक्त -आता पर्यंत सुधारणा वादासमोर बर्‍याच गोष्टीत विरघळलेत - एक दिवस याही बाबतीत विरघळून जातील .
तोवर चालू प्रथांची मोडतोड न करता अवताराची वाट पहाणे श्रेयस्कर. आपला नम्र, -गामा पैलवान

In reply to by विशुमित

कारण, अ‍ॅप द्वारे भरलेल्या देणागीचा स्त्रोत तर नकीच लागू शकतो, असे वाटते. देणगी जर व्हाईट मनी असेल तर द्यायला काही हरकत नसावी.मग ती मंदिरात असो किंवा एखाद्या ट्रस्टला...

In reply to by मुक्त विहारि

माझा रोख वेगळा होता. ती बहुचर्चित रक्कम कोण कोणाच्या खात्यात जमा करायचे होते हा विषय होता. Nothing serious. .... साहेब असे बोललेच नव्हते या चर्चेत मला रस नाही. कृपया ती टाळवी.

In reply to by विशुमित

तो काही मला समजला नाही... पण, भाजपा जर अ‍ॅप द्वारे पैसे देणगी मागत असेल तर, कुणी-किती=कधी देणगी दिली आहे? हे आयकर खाते नक्कीच शोधू शकत असेल, असा माझा होरा आहे.

In reply to by मुक्त विहारि

हर एक के खाते मै 15 लाख आ सकते है/ डालेंगे वगैरे वगैरे.. ... ( मी याबाबत शाशंक आहे. उपरोधिक प्रतिसाद होता)

In reply to by विशुमित

असा अट्टाहास धरु नये आणि अपेक्षा पण करू नये... कुठल्याही लोकशाहीत किंवा राजेशाहीत, असेच चालते. पैसा लवकर कुणीच सोडत नाही...मग ती "गरिबी हटाव" ही घोषणा असू दे किंवा "हर एक के खाते में १५ लाख"... अशा घोषणा ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या... अहो, ह्यांना धड "एक रुपयात झुणका भाकर" ही योजना पण ५ वर्षे राबवता आली नाही.... हे कुठले १५ लाख देतात?

सीबीआयमध्ये मोदींचा माणूस व नॉर्मल प्रोसेसने आलेला माणूस ह्यांच्यात झगडा होऊन सीबीआयची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. त्याबद्दल इथे चकार शब्दही नाही. लोकशाहीत लोकांनी सरकारचे टीकाकार असले पाहिजे ह्या गैरसमजुतीतून मी मोदीसरकार विरोधात काही प्रतिसाद लिहीले. इथल्या ब्रह्मवृंदाला लोकशाही व त्यातल्या आरबीआय, सुप्रिम कोर्ट व इतर सरकारी संस्थांबद्दल देणेघेणे नसल्याचे कळते आहे. मोदीसरकार विरोधात गैरसमजातून प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल जाहीर क्षमा मागतो. जेव्हा मोदींच्या हातात सगळ्या संस्था व सत्ता जाईल तेव्हा कृपया मला लींच करु नये ही विनंती. इथून पुढे मोदीसरकार विरोधात चकार शब्दही काढणार नाही. क्षमस्व. हर हर मोदी!

In reply to by नगरीनिरंजन

या प्रतिसादापुरते आपण मिपाचे सत्ताधीश
....लोकशाहीत लोकांनी सरकारचे टीकाकार असले पाहिजे....
आपण मत देऊन निवडून दिलेल्यावर पुढच्या सेकंदाला टिका चालू करता का ? आपण आपले मत डायरेक्ट मोदींन तर दिले असणार नाही कोणा तरी खासदाराला दिले असणार. आपण आजतागायत मत दिलेल्या खासदारावर मिपावर अथवा मिपा बाह्य टिकेबद्दल एक धागा लेख टाकावा. किंवा अलरेडी टाकून झाला असल्यास दुवा द्यावा हि नम्र विनंती. विरोधी पक्षांनी सरकारवर टिका करणे त्यांचे काम आहे. लोकशाहीत सरकार निवडून देणार्‍या जनतेने दुसर्‍या क्षणापासून सरकारचा विरोध करावा हि अपेक्षा अचंबित करणारी आहे. लोकशाहीत नागरीकांनी सुजाण असावे हे ऐकले होते प्रत्येक नागरिकाने प्रत्येक वेळी फक्त विरोधक असावे हे ऐकले नव्हते. निवडून गेलेल्यांना विरोधासाठी विरोध करायचा असेल आणि त्यांना राजशकट चालवूच द्यायचा नसेल तर विरोधी पक्षालाच देश चालवायला देण्याची व्यवस्था राज्यघटनेत करावी, निवडून गेलेल्यांच्या हातात सत्ता कशासाठी द्यायची. बाकी सध्याच्या उपराष्ट्रपतींचे वाक्य तसे प्रॅक्टीकल असावे विरोधकांना 'से' असावा पण 'वे 'सत्ताधारी पक्षाकडेच असावा. विरोधासाठी विरोध करणार्‍यांनी उपराष्ट्रपतींच्या या वाक्याचा विरोध अवश्य करावा.
....इथल्या ब्रह्मवृंदाला .....
आपण उपरोक्त प्रतिसादापुरते मिपाचे सत्ताधीश झाला म्हणजे मिपा काय ब्रह्मवृंदाला आंदण देणार? एवढा वर्णवाद ? तळ्यात फक्त हंसानीच रहावे आणि बगळ्यांनी राहूच नये असे काही आहे का ? बाकी चालू द्या

In reply to by विशुमित

या समुद्राची आमच्याएवढी कुणाला माहिती असू शकत नाही

असं सांगताना तांडेल यांनी या स्मारकाच्या संकल्पनेवरच आक्षेप घेतला आहे याना पश्चिम नौदल कमांडचा ध्वजाधिकारी (FLAG OFFICER COMMANDER-IN-CHIEF) करून टाकावे असा PIL मुंबई उच्च न्यायालयात दाखल करता येईल.

In reply to by सुबोध खरे

जरूर करा PIL! आले तुमच्या प्रयत्नांना यश तर आले. तांडेलांची लाईफ बनेल. पण तेवढं तांडेल यांच म्हणणे खोडून काढाल की जे आधी जिथे जलपूजन केले होते ती तीच जागा होती.

In reply to by सुबोध खरे

नाही माहित उत्तर तर नाही म्हणा. नाही म्हणालात तरी चालेल . सांगायचे नसेल तरी चालेल पण उगाच गोल गोल कशाला फिरवता हे मात्र समजत नाही.

In reply to by विशुमित

या समुद्राची आमच्याएवढी कुणाला माहिती असू शकत नाही हे वाक्य बोलणाऱ्या एका मच्छीमाराची भलामण करताय? आपण शेती करतो म्हणून आपण डॉ. स्वामिनाथन यांच्या लायकीचे झालो समजणाऱ्या शेतकऱ्यासारखीच हि स्थिती आहे आणि तुम्ही त्यांची तळी उचलताय? भाजप द्वेष इतका खालच्या थराला जावा? बढिया है!

In reply to by सुबोध खरे

शिवस्मारकाची वस्तुस्थिती मी त्यावर काढ्लेल्या धाग्यात मांडलेली होती. या स्मारकाला पाठिंबा मी दिलेला नव्हता किंवा केवळ श्री मोदींचा समर्थक म्हणून मी अशा स्मारकांना पाठिंबा देणार नाही. खाली माझा प्रतिसाद दिलेला आहे. https://www.misalpav.com/node/38323 बोका शेट हा प्रकल्प अगोदरच्या सरकारने मंजूर केला आहे त्याबद्दल त्यांनी "काहीच केले नाही". आपण म्हणता तसे या सरकारला हा प्रकल्प पूर्ण करणे हि राजकीय अपरिहार्यता आहे. हा प्रकल्प "करणार नाही" हे म्हणणे कुणालाच राजकीय दृष्ट्या शक्य नाही.पण त्यातून आताच्या सरकारला त्याचा राजकीय फायदा होणार आहे याचा हा पोटशूळ आहे. प्रकल्पाला विरोध करणे हि राजकीय आत्महत्या आहे हे सर्वाना माहिती आहे त्यामुळे तो मुद्दा बाद ठरतो उद्या प्रकल्प झाल्याने जनमत या सरकारच्या बाजूने झाले तर तेलही गेलं तूप हि गेलं हि स्थिती होते आहे म्हणून काँग्रेस किंवा राष्ट्रवादी लोक याच्या खर्चाचा मुद्दा उगाळत आहेत. मूळ प्रकल्पाचा खर्च अवाढव्यच होता( महागाई गृहीत धरली तर खर्च तेंव्हा होता तितकाच खर्चिक होता/आहे). अस्मितेचा प्रश्न आला कि बाकी सर्व मुद्दे मागे पडतात. बाकी सुश्री मायावती यांनी ४०००० कोटी रूपये स्वतःच्या हत्तीच्या आणि डॉ आंबेडकरांच्या पुतळ्यावर खर्च केले http://www.rediff.com/news/slide-show/slide-show-1-mayawati-s-parks-elep... त्यावर मिपा वर चर्चा किंवा घमासान झाल्याचे आठवत नाही. कदाचित तसे करणे म्हणजे प्रतिगामी ठरण्याची भीती असावी.

In reply to by सुबोध खरे

कश्मिर मधे ऑपरेशन करायला जायचं असेल तर गाईड म्हणून स्थानिक पोर्टर पोरांना ब्रिगेडियर लेवलचे अधिकारी बरोबर नेतात. कशामुळे? .... अजून एक उदाहरण देतो. भालकूराम नावाच्या मेंढपाळाने कालका-शिमला रेल्वे लाईन टाकण्यात ब्रिटिश इंजिनियरस ना मोलाचे मार्गदर्शन केलं होते. https://blogs.timesofindia.indiatimes.com/thediaryofacontrarian/the-for… .... सामान्य माणसाला निच समजणे ही खूप हीन विचारसरणी आहे. जमलं त्यातून बाहेर पडा. प्रेमाचा सल्ला. ..... शरद जोशींनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीना केराची टोपली दाखवली होती. त्यांच्या कौतुक सोहळ्याचा अजून तरी शेतकर्याना अपेक्षित फायदा मिळाला नाही. .... बाकी भाजपप्रेम इतकं उतू जावे असे काही त्यांचे विषेश कर्तुत्व नाही.

In reply to by सुबोध खरे

आपण शेती करतो म्हणून आपण डॉ. स्वामिनाथन यांच्या लायकीचे झालो समजणाऱ्या शेतकऱ्यासारखीच हि स्थिती आहे आणि तुम्ही त्यांची तळी उचलताय? जमल्यास खालील पुस्तक वाचा, गैरसमज दूर होण्यास मदत होईल. https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5456605441957111386

In reply to by मार्मिक गोडसे

त्यांच्या दृष्टीने फक्त एकच मसिहा आहे सर्वब्रह्मांडनायक ! बाकी सगळे किडेमुंग्या. असो. जास्त नको बोलायला नाहीतर कर्नल गोळी (बंदुकीची नाही बरं) मारायचे. (डाॅ हा.घ्या)

In reply to by विशुमित

एके ठिकाणी नदीकाठी कोळ्याची मुले कमरेभर पाण्यात उभे राहून पाण्यातील बिळात हात घालून जिवंत वाम पकडत होते. त्यांना मी विचारले, बिळात वाम आहे हे कसे कळते तुम्हाला? वाम असलेल्या बिळातील पाणी थोडे कोमट असते असे त्यांनी सांगितले. काही लोकं प्रत्यक्ष अनुभवातून शिकत असतात, तर काही पुस्तकातून. पुस्तकातून शिकलेले अशा अडाणी परंतू अनुभवी लोकांचा तिरस्कार करत असतात, त्यांना स्वतःच्या शिक्षणाचा गर्व असतो, अशांना पोकळ बांबूचे फटके मारावे लागतात.

In reply to by मार्मिक गोडसे

कोणीही श्री मोदींच्या/ भाजपच्या विरोधात बोलले कि त्याचे समर्थन करण्याचा किती द्वेषांधपणा. हे महाशय काय म्हणत आहेत या समुद्राची आमच्याएवढी कुणाला माहिती असू शकत नाही अशी दर्पोक्ती करणाऱ्या अहंमन्य माणसाचे समर्थन करण्याचा किती अट्टाहास शास्त्रीय दृष्ट्या संशोधन करणाऱ्या अनेक संस्था भारतात कार्यरत आहेत. येथील अनेक लोकांनी भारतीय सागरी भागाचे संशोधन करण्यात आयुष्य वेचलेले आहे उदाहरणादाखल खालील दुवे तपासून घ्या( जर डोळे उघडे ठेवण्याची इच्छा असेल तर) https://en.wikipedia.org/wiki/National_Institute_of_Oceanography,_India https://en.wikipedia.org/wiki/National_Institute_of_Hydrology http://www.indiannavy.gov.in/nih/hi http://nfdb.gov.in/index.htm EGIS India हि कंपनी शिवस्मारक प्रकल्पाची योजना तयार करत आहे त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल कि नाही.ज्यांच्या आंतरराष्ट्रीय मूळ कंपनीची प्रतिष्ठा इतकी सहज धुळीस मिळवतील काय? लार्सन अँड टुब्रो हि कंपनी ज्यांनी हे कंत्राट घेतले आहे ते विना अभ्यास समुद्रात भराव घालतील काय? बोट उलटून एक दुर्दैवी अपघात काय झाला लगेच जुमला? केवळ द्वेषापायी एका मच्छीमर कृती समितीच्या माणसाची दर्पोक्ती आणि अहंगंडाचे( आमच्या इतकी माहिती कुणालाच असणे शक्य नाही) समर्थन इतकी द्वेष बुद्धी? असो आपली द्वेषबुद्धी आपल्यालाच लखलाभ होवो. यावर अधिक वितंडवाद घालण्याची माझी अजिबात इच्छा नाही. भद्रम ते भवतु!

In reply to by सुबोध खरे

इथे मोदी द्वेष कुठून आणला तुम्ही? तुम्ही तुलना करताना दिलेली उदाहरणे बघा, कष्टकऱ्यांचा द्वेष किती करायचा ह्याला काही मर्यादा?

In reply to by मार्मिक गोडसे

मी तुम्हाला प्रतिसाद दिलाच नव्हता. तुम्हीच उगाच यात तोंड घालताय. तुम्ही स्वतंत्र धागा काढा कि. तो तुमचा प्रश्न आहे. मला त्यात गुंतवू नका. --/\--

In reply to by विशुमित

2019 तक ही झुमले! सही आहे, २०१९ निवडणुकी पर्यत झुमले ! त्या नंतर परत पाच वर्षांसाठी खोल खोल गर्तेत !

" जुमले " " जुमले " ओरडा ओरड याच्या दरम्यान स्टॅचु ऑफ युनिटी अश्या सार्थ नावाने स रदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा भारत देशात तयार झालाय व त्याच उद्द्घाटन येत्या ३१ ऑक्टोबरला होत आहे. गेल्या ७० वर्षांत स्वतंत्र भारतात जगाच्या पाठीवर छाप पाडेल अस स्ट्रक्चर उभ झालेल नाहीय. ७ आश्चर्या पैकी ताज महाल सोडुन त्यानंतर भारतात असा प्रयत्नच झालेला नाही. सदा न कदा पैश्याची रड, म्हणे तेच पैसे गरीबांच्या कल्याणा करता वापरता आले असते वैगेरे वैगेरे ! ह्या अगोदर तर असा कोणताही प्र कल्प उभा केलेला नाही ना मग ७० वर्षांत का गरीबाच कल्याण केल नाही ?

खरे डॉक्टर,
आमच्या इतकी माहिती कुणालाच असणे शक्य नाही
माला वाटतं की या वाक्याची पार्श्वभूमी बघितली पाहिजे. प्रस्तुत प्रसंगात एकाचा जीव गेला आहे. तसंच श्री. दामोदर तांडेल यांनी स्वत:हून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हा नक्कीच गंभीर मामला आहे. तांडेलांचं वक्तव्य शासनाच्या अधिकृत संस्थांविरुद्ध नाही. नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना उद्देशून आहे. विधानाचा वाव त्यापेक्षा जास्त विस्तारित नसावा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गा पै साहेब एखाद्याचा अपघातात जीव गेला तर ती गंभीर गोष्ट नक्कीच आहे.त्याची चौकशी महाराष्ट्र शासन करीत आहेच. त्यात तिसऱ्या माणसाने पोलिसात तक्रार करण्याचे कारण (LOCUS STANDI) काय? अपघाताचे कारण काढून आपली पोळी भाजून घेणे हि गोष्ट अतिशय हीन आहे. तेथे असणाऱ्या मच्छीमार बांधवांचा या प्रकल्पाला विरोध आहे हि गोष्ट सर्वाना माहिती आहे. त्यांच्या मासेमारी या व्यवसायावर गदा येते या त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेलच.त्यासाठी त्यांनी शासन दरबारी अर्ज करावा नाही तर न्यायालयात न्याय मागावा. पण दिवंगत व्यक्तीच्या मृत्यूवर आपली पोळी भाजून घेणे सर्वथा चूक आहे. (अपघाताचे भांडवल करणे हा राजकारणाचा भाग आहे.) आणि आम्हीच सर्वज्ञ आहोत या म्हणण्याला अहंकाराचा वास आहे. प्रकल्प तेथे नक्की करण्याच्या अगोदर त्याची व्यवहार्यता(FEASIBILITY STUDY) इ सर्व गोष्टी झालेल्या असतातच. त्यासाठी समुद्र तळाचा आणि तेथल्या सर्व ऋतूमधील पाण्याच्या प्रवाहांचा अभ्यास केलेलाच असतो. त्यासाठी केवढे मोठे सर्वेक्षण होत असते. त्याशिवाय असे प्रकल्प हाती घेतले जात नाहीत आणि सरकारने( राजकारणाचा भाग) म्हणून केले तरी खाजगी कंपन्या त्यात हात घालणार नाही. नौदलात असल्याने अशा तर्हेच्या प्रकल्पात केवढ्या मोठ्या प्रमाणात अभ्यास केला जातो याची मी बऱ्यापैकी माहिती मिळवली होती. समुद्रात प्रकल्प उभारतात तेंव्हा तेथे किती गाळ जमा होतो. गेल्या १०० वर्षात झालेली वादळे यांची साद्यन्त माहिती गोळा केली जाते. त्या जागेवरील समुद्राच्या तापमानातील बदल समुद्राची क्षारता( SALINITY) CORROSIVITY इ गोष्टी सुद्धा तपासून पाहायला लागतात. अन्यथा समुद्रात टाकलेल्या कॉंक्रिटमधील लोखंड लवकर गंजून त्या वास्तूला मोठा धोका होऊ शकतो. एवढ्या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय कोणती सरकारी/ खाजगी कंपनी त्यात हात घालेल?

आमच्या इतके ज्ञान कुणालाच नाही म्हणणाऱ्या आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या माणसांच्या अहंकाराबद्दल

मला आणखी काहीच म्हणायचे नाही.

In reply to by सुबोध खरे

खरे डॉक्टर, माहितीबद्दल धन्यवाद. मात्र तांडेलांचं वक्तव्य शासनाच्या अधिकृत संस्थांच्या विरोधात नाहीये किंवा नसावं. तांडेल यांनी विनायक मेटेंच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अधिक माहिती : https://divyamarathi.bhaskar.com/news/complaint-against-mla-vinayak-met… दामोदर तांडेलांकडे तुम्ही म्हणता ती लोकस स्टँडी नाही. म्हणून त्यांनी पोलिसांना गुन्हा दाखल करायला सांगितलं आहे. वरील घटनेचा स्मराकाच्या औचित्याशी कसलाही संबंध नाही. तो पार वेगळा मुद्दा आहे. शासनाने तांडेल यांचं म्हणणं ऐकलं असेल अशी आशा आहे. नसल्यास शासन, मच्छिमार व स्मारकाच्या उर्वरित पक्षकारांनी (=स्टेकहोल्डर्स) एकत्र येऊन विचारविमर्श करावा. माझ्या मते समुद्राच्या माहितीबाबतचं श्री. तांडेल यांचं वक्तव्य अहंकारी म्हणून झटकून टाकू नये. ते दुर्घटनेशी संबंधित असल्याचं गृहीत धरून पुढील कारवाई व्हावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दोन दिवसापूर्वीच दिले आहेत. त्याबद्दलचे सत्य बाहेर येईलच. https://www.mumbailive.com/en/politics/cm-devendra-fadnavis-orders-enqu…

शुक्रवारी २६ ऑक्टोबरला श्रीलंकेत राष्ट्रपती सिरीसेना यांनी पंतप्रधान राणिल विक्रमसिंघे यांची हकालपट्टी करून माजी राष्ट्रपती राजपक्षे यांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे सिरीसेना यांनी २००५ मध्ये राजपक्षे यांना हरवून राष्ट्रपतीपद मिळवले होते व ते दोघ एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. २००५ मध्येच श्रीलंकन घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात येऊन राष्ट्रपतींचे पंतप्रधानांना पदच्युत करण्याचे अधिकार काढले गेले होते. त्यामुळे आताचा सिरीसेना यांचा हा निर्णय घटनाबाह्य असल्याचं म्हटलं जातंय. टीप १ : १) सिरीसेना - सध्याचे राष्ट्रपती २) विक्रमसिंघे - परवापर्यंतचे पंतप्रधान ३) राजपक्षे - (२००५ पर्यंत राष्ट्रपती होते.) सिरीसेना यांनी काल नियुक्त केलेले पंतप्रधान टीप २ : या तिघांनीही मागील काही महिन्यात भारतात येऊन विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. टीप ३ : मागच्या आठवड्यात कॅबिनेट बैठकीत सिरीसेना व विक्रमसिंघे यांच्यात श्रीलंकेचे एक बंदर भारताला भाड्याने वापरायला देण्यावरून वाद झाला होता. टीप ४ : राजपक्षे हे चीन समर्थक व भारत विरोधी समजले जातात. त्यामुळे आपल्यादॄष्टीने या घटनेचा सिग्निफिकन्स काय ते बघावं लागेल.

In reply to by तुषार काळभोर

श्रीलंकेचे पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक
श्रीलंकेत राजकीय संकट अधिकाधिक गडद होत चालले आहे. श्रीलंकेचे पदच्च्युत पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांचे विश्वासू समर्थक आणि पेट्रोलियममंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक करण्यात आली आहे. रविवारीच रणतुंगा यांच्या सुरक्षारक्षकाने राजपक्षे यांच्या समर्थकांवर गोळीबार केला होता. ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. दोन जण जखमी झाले होते.

India jumps 23 spots, now ranks 77 in Ease of Doing Business जागतिक बँकेने (वर्ल्ड बँक) प्रसिद्ध केलेल्या "व्यापार करण्यासाठीची सहजता (Ease of Doing Business)" यादीत भारताचा क्रमांक गेल्या वर्षीच्या १०० वरून २३ने कमी होत आता ७७ वर आला आहे. गेल्या वर्षीही भारताचा क्रमाक त्यापूर्वीच्या १३० वरून कमी होत १०० झाला होता. दोन वर्षांत क्रमांकाच्या ५३पायर्‍या पार करणे हा एक विक्रम समजला जात आहे !  (टाईम्स ऑफ इंडिया संस्थळावरून साभार)

India jumps 23 spots, now ranks 77 in Ease of Doing Business मा श्री मोदीजीं व सरकारचे अभिनंदन !!

कर्नाटक सरकारला कोर्टाची सणसणीत चपराक !! लाखो हिंदुची कत्तल करणार्या क्रुरकर्मा टिपु सुलतानाची जयंती दर वर्षी साजरी करण्याच काम कर्नाटक सरकार गेली काही वर्षे करत आहे ! कर्नाटकात ल्या जनतेचाच पैसा वापरुन जनतेच्या जुन्या जखमेवर मिठ चोळण्याच अमानुष काम कॉंग्रेस सरकार करत आहे , त्यावर कर्नाटक मधली जनता कोर्टात गेली ! कोर्टाने सरकारला त्यांची बाजु मांडण्यासाठी बोलावल पण सरकारने त्यावर पुर्ण दुर्लक्ष केल म्हणुन कोर्टाने सणसणीत चपराक कर्नाटक सरकारला मारलेली आहे !!

पुर्ण भारतभर हिंदु समाजाच्या जखमेवर मिठ चोळण्याच काम ईमानेएतबारे कॉँंग्रेस करत आलेली आहे !! श्री राम जन्म भुमि सारख्या प्रकरणात सरकारने सत्याची बाजु घेतली नाही त्यामुळे आता हिंदु समाजाने आपल्या दोन लाखाच्या वर उध्वस्त केलेल्या मंदिरांचा हक्क परत घ्यावा ! आता हिंदु समाजाने जाग झाल पाहीजे व अश्या पक्षाच तोंड फोडल पाहिजे !

शक्ती अवतरला ! IIT-Madras creates ‘Shakti’, India’s first microprocessor आयआयटी (मद्रास) ने भारताचा पहिला मायक्रोप्रोसेसर बनवला आहे. या मायक्रोप्रोसेसरमध्ये जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान (cutting edge of technology) वापरलेले नसले (शक्तीचे १८०nm तंत्रज्ञान विरुद्ध अमेरिकेचे 20nm तंत्रज्ञान) तरीही, त्याचे व्यापारी स्तरावर उत्पादन सुरू होऊ शकल्यास तो भारतिय तंत्रज्ञानातील एक महत्वाची पायरी ठरेल, हे मात्र नक्की. त्याच्यामुळे, केवळ मायक्रोप्रोसेसरच्या आयातीची गरज कमी होईल असेच नाही, तर सायबर अ‍ॅटॅक्सवर ताबा ठेवणे सोपे होईल. "शक्ती" असे नामकरण केलेल्या या मायक्रोप्रोसेसरचा दळणवळ व संरक्षण communication and defense sectors) या क्षेत्रांत खास उपयोग होईल असे म्हटले जाते.