नवरंग - भोंडला
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
'ताई, तुमच्या मोबाईलमध्ये बघून सांगा ना उद्याचा रंग!' माझ्या कामाच्या मावशींची ही मागणी मी वॉट्स अॅप उघडून पूर्ण केली. त्याचबरोबर मनात विचार आला की खरच,'म. टा. 'नवरंग आणि भोंडला हे मुंबईकर भगिनींच्या रक्तातच भिनलं आहे. अगदी कामवाली पासून ते कॉर्पोरेट जगातील प्रत्येकीला 'नवरंगात'रंगायचं असतं. दुकानदारांची धन करायची, दुसरं काय! इथपासूनं अमूक रंगाची साडी आणली नाही तर नवर्यांचं काही खरं नाही या सारखे वॉट्स अॅप विनोद, घर आणि ऑफिस मधील कामाचा भार या कशाचीही पर्वा न करता या सार्या जणी हौसेने 'नवरंगी नवरात्र'साजरं करतात. कारण हे छोटेछोटे आनंदच त्यांच्या मरगळलेल्या मनाला ताजंतवानं करतात.
'नवरंग'प्रमाणेच 'भोंडला'खेळायला घरी सवड नसली तरी कार्यालयात, लोकलच्या डब्यातही भोंडला रंगतो. खिरापती वाटल्या जातात. मग मी तरी मागे कशी राहू? माझा नवरंग - भोंडला सादर आहे पण 'पेपर क्विलींग'च्या माध्यमातून.......
प्रतिक्रिया
फोटो दिसत नाही.
फोटो दिसत नाहीये, आणि इतकुसच
क्षमस्व
चित्राला पब्लिक अॅक्सेस देऊन
धन्यवाद,
(No subject)
प्रतिसादातला फोटो दिसतोय.
नाही, चित्र दिसत नाही.
चित्र दिसत नाही
नाही, चित्र दिसत नाही.
मला तरी फोटो दिसत आहे...
पेपर क्वीलींग
सुरेख भोंडला :)