दिवाळी अंक २०१८ - आवाहन
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकरहो!
सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या मिपाचा दिवाळी अंक आपण सादर करणार आहोत. आणि सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या भरघोस प्रतिसादाचं आवाहन आम्ही करत आहोत.
गेली दोन वर्षं आपण दिवाळी अंकामध्ये एक विशेष विभाग जोडतो. आत्तापर्यंत 'रहस्यकथा' (२०१६) आणि 'व्यक्तिचित्रं' (२०१७) हे विभाग झाले आहेत. सलग दोन वर्षं हे झाल्यामुळे यंदा बदल म्हणून दिवाळी अंक मूळ स्वरूपात, म्हणजे मुक्त, असावा असं योजलं आहे.
तर दिवाळी अंकाला काही विषय, थीम नाही. 'सकस आणि / किंवा रोचक लिखाण' हे दोनच मापदंड आहेत. कथा, कविता, लेख, प्रवासवर्णन, पाककृती, अर्कचित्रं - सर्वांचं स्वागतच आहे.
...आणि काही नियम/सूचना:
१) तुम्ही पाठवलेलं लेखन तुमची स्वतःची निर्मिती असावी. कशावर आधारित असल्यास तसा स्पष्ट उल्लेख करावा. कोणत्याही प्रकारच्या वाङ्मयचौर्याचा ढका आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाला लागू नये ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे.
२) मिपाचा दिवाळी अंकात आलेलं साहित्य फक्त मिपाच्याच दिवाळी अंकात (एक्सक्ल्युजिवली) वाचायला मिळावं असं आम्हाला वाटतं. म्हणून, अंकासाठी पूर्वप्रकाशित साहित्य पाठवू नये. तसंच, मिपाचा अंक प्रसिद्ध झाल्यावर १५ दिवसांच्या आत ते लेखन ब्लॉग, फेसबुक किंवा अन्य संस्थळांवर / सामाजिक माध्यमांवर प्रकाशित करू नये. (मिपा आपल्या फेसबुक पेजवर प्रसिद्धी करतंच. ती पोस्ट शेअर करायला अर्थातच हरकत नाही. तसंच, मिपाची लिंक व्हॉट्सअॅपवरून पाठवायलाही काहीच हरकत नाही.)
३) मिपाचा दिवाळी अंक दर्जेदार साहित्याने भरलेला असावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे, आणि त्यासाठी आम्ही दिवाळी अंक टीम आटोकाट प्रयत्नही करणार आहोत. आलेल्या साहित्याला नीट निवडून, टिपून, पारखून मगच दिवाळी अंकात स्थान दिलं जाईल. याचाच अर्थ काही साहित्य नाकारावं लागेल. समजा, तुमचं लेखन नाकारलं गेलं तर कृपया नाराज होऊ नका. आपणांला वाटल्यास ते स्वतंत्रपणे मिपावर नक्की प्रकाशित करा.
४) दिवाळी मंगलमय, आनंदाचा सण आहे हे आपण सगळेच जाणतो. तो सण साजरा करायच्या साहित्यिक मेजवानीत बीभत्सपणाचा आंबटरस असू नये. तरी तुम्हाला काही मदत/सल्ला/मार्गदर्शन हवं असल्यास साहित्य संपादकांशी संपर्क साधावा.
--x--
दिवाळी ४ नोव्हेंबर २०१८ ला सुरू होते आहे. तुमचं लेखन आल्यावर ते वाचून, मुद्रितशोधन करून, सजवून चकाचक करायला लागणारा वेळही जमेस धरावा लागेल. म्हणून, आपलं लेखन उशीरात उशीरा १५ ऑक्टोबर २२ ऑक्टोबर २०१८ पर्यंत साहित्य संपादक या आयडीला व्यनीने पाठवा.
त्याआधी किंवा त्यानंतर काही मदत लागल्यास आम्ही आहोतच!
- टीम दिवाळी अंक
वाचने
16598
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
दिवाळी अंक हा नेहमीच मराठी वाचकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.
अंकाच्या प्रतीक्षेत...
"दिवाळी अंक मूळ स्वरूपात, म्हणजे मुक्त, असावा असं योजलं आहे."हा उत्तम निर्णय आहे. दिवाळी अंकाला काही विषय, थीम नसून 'सकस आणि / किंवा रोचक लिखाण' हे दोनच मापदंड असल्याने वाचकांना आपापल्या आवडीनुसार "जो जे वांछील तो ते लाहो" असा प्रत्यय मिळण्याची खात्री असलेल्या ह्या दिवाळी अंकास अगणित शुभेच्छा...
"दिवाळी अंक मूळ स्वरूपात, म्हणजे मुक्त, असावा असं योजलं आहे."
हा उत्तम निर्णय आहे.
असेच म्हणतो.
गणेश लेखमालेत संपादकांच्या विनंती प्रमाणे लिहिता न आल्याची रुखरुख आहे. थीम बंधन नसल्यामुळे दिवाळी अंकात लेख पाठवण्याचा प्रयत्न करीन.
अनेक शुभेच्छा.
अनिंद्य
In reply to "दिवाळी अंक मूळ स्वरूपात, by अनिंद्य
अनिंद्य, नक्की लिहा. आपल्या लेखनाची वाट पाहतोय.
दिवाळी अंक मूळ स्वरूपात, म्हणजे मुक्त, असावा असं योजलं आहे....हे ब्येष्ट ! ...जो जे वांछील , तो ते लिहो...!
अरे वा! नक्की काहीतरी द्यायचा प्रयत्न करेन. मात्र गेली दोन वर्षे आपण audio n video दिवाळी अंक देखील काढला होता. तसा काही विचार आहे का?
छान. मोनालिसाचा पुढला भाग लवकर लिहावा लागणार ....
सर्व मिपाकरांना एक प्रश्न विचारायचा आहे , मिपावर प्रसिद्ध झालेले जुने लेख आणि विशेषांक वाचण्यासाठी त्यांच्या दुव्यांवर टिचकी मारली कि मिपाचे मुखपृष्ठ सामोरे येते, असे का (मी क्रोम ब्राउझर वापरतो) होत असावे ?
अजून कोणाला अशी समस्या येते आहे का? पेज रेडायरेक्शन मध्ये काही गंडलंय का?
उदाहरणासाठी २०१५ आणि २०१६ चे दिवाळी अंक उघडायचा प्रयत्न करून बघावा.
In reply to सर्व मिपाकरांना एक प्रश्न by मेघनाद
केवळ लिंक कॉपी करा. सर्च बॉक्समध्ये पेस्ट केल्यावर युआरएलमध्ये http च्या ऐवजी https असा बदल करून उघडा.
In reply to केवळ लिंक कॉपी करा. सर्च by पुंबा
+१
In reply to सर्व मिपाकरांना एक प्रश्न by मेघनाद
काही दिवसांपूर्वी मिपा सिक्युअर सर्वरवर गेले आहे. त्यामुळे, सर्व अॅड्रेसेस http:// ऐवजी https:// झाले आहेत. तांत्रिक गटाने जुन्या दुव्यांत आवश्यक ते फरक करणे सुरू केले आहे, काही दिवसांत सर्व सुरळीत होईल.
मिपा हे मराठीवर प्रेम असणार्या चालकांनी चालवलेले, खाजगी पण तरीही मुक्त व मोफत संस्थळ आहे. प्रशासनात काम करणारी सर्व मंडळीही, तशाच प्रेमाने, आपापले नोकरी/उद्योग सांभाळून नि:शुल्क काम करत असतात. तेव्हा, एखाद्या कामाला थोडासा उशीर झाला तर मिपाकरही, तेवढ्याच प्रेमाने, समजून घेतात... त्यांनी समजून घ्यावे असा प्रेमाचा आग्रह आहे.
In reply to काही दिवसांपूर्वी मिपा by डॉ सुहास म्हात्रे
How to force SSL with .htaccess
वरील क्लुप्ती वापरून हे काम काही मिनिटांत होणे अपेक्षित आहे. अर्थात जर प्रशासनाने हा प्रयोग करून बघितला नसेल तरच, कारण दुसरेही अनेक प्रकार आहेत ज्याद्वारे डेटाबेस मधील सर्व लिंक्स http मधून https मध्ये रुपांतरीत करता येतात पण ते थोडे किचकट आणि वेळखाऊ आहेत.
Drupal, Joomla, Wordpress अशा वेगवेगळ्या Platform नुसार परिणाम बदलू शकतील, पण केवळ तीन ओळींचा कोड अस्तित्वात असलेल्या पण दृश्य नसलेल्या (hidden) .htaccess फाईल मध्ये पेस्ट करून बघायला काही हरकत नाही. जर नाहीच यशस्वी झाला हा प्रयोग तर तो कोड डिलीट करून टाकता येईल, पण जर यशस्वी झाला तर वेळ आणि परिश्रम वाचतील.
ज्जेबात...!!
काहीतरी लिहायचा नक्कीच प्रयत्न करेन.
लिहिते काहीतरी,विषयाचे बंधन नाही हे बरे झाले.
In reply to लिहिते काहीतरी,विषयाचे बंधन by नूतन सावंत
नूतन सावंत, जरूर लिहा. वाट पाहतोय आम्ही.
दीपावली अंक टीमला लै म्हणजे लै शुभेच्छा...!!!
-दिलीप बिरुटे
च्यायला, परवा परवा तर कव्हर करून दिलो की,
लवकर आली दिवाळी.
.
(बरं झालं आठवण करून दिलाव, पैला दिवाळसण आहे)
In reply to हायला by अभ्या..
मागा चांगली फोर्ड गाडी..
:)))
In reply to मागा चांगली फोर्ड गाडी.. :))) by पुंबा
मागायला काय फोर्ड एंडेव्हर मागू की, ,गेला बाजार फिगो मिळाली तरी बस्स. ;)
सही च ! भरघोस शुभेच्छा .. अंकाच्या प्रतिक्षेत.
वाह..दणदणीत होइल अंक नेहमीप्रमाणेच. शुभेच्छा.
खूप खूप शुभेच्छा
कविता पाठवणार शक्यतो.
झाली का घोषणा अंकाची,
काही लिहून देण्याचा विचार तर आहे नेहमीप्रमाणे..
स्वाती
इ कॉपीअसेल की हार्ड कॉपी?
In reply to इ कॉपी असेल का by डॉ. सुधीर राजा…
अंक ऑनलाईन असेल.
उदा. दिवाळी अंक २०१७ मिसळपाव.कॉम
मिपा दिवाळी विशेषांक २०१६
मी नवीन सदस्य आहे. मिसळपाव दिवाळी अंकासाठी लिखाण कुठे आणि कसे पोस्ट करायचे मार्गदर्शन व्हावे.
In reply to मिसळपाव दिवाळी अंक by असु
वरील आवाहन पूर्ण वाचले आहे का? त्यात लिहिले आहे.
In reply to मिसळपाव दिवाळी अंक by असु
सध्या एका रहस्यकथेच्या शेवटच्या काही भागांचं लिखाण सुरु आहे, त्यामुळे १५ ऑक्टोबरची डेडलाईन पाळणं कठीण दिसतं आहे.
जमल्यास नक्की काहीतरी पाठवेन. बहुतेक क्रिकेटवर!
त्यामुळे १५ ऑक्टोबरची डेडलाईन पाळणं कठीण दिसतं आहे.>>> डेडलाईनपर्यंत झाले तर उत्तम होइल पण दोन चार दिवस डेड लाईनच्या पलीकडे झाले तरी चालेल. जरूर पाठवा.
मी नवीन सदस्य आहे. मला अजून पर्यंत एकही कविता पोस्ट करता आलेली नाही. मला मिसळपाव दिवाळी अंक २०१८ साठी कविता पोस्ट करायच्या आहेत. कृपया मार्गदर्शन करावे.
मी यापूर्वी इथेच आणि ईमेलने पण विचारणा केली होती. पण काहीच उत्तर मिळाले नाही.
In reply to मिसळपाव दिवाळी अंक २०१८ साठी कविता पोस्ट करण्यासाठी मार्गदर्शन by असु
लेखात लिहिल्याप्रमाणे
दिवाळी ४ नोव्हेंबर २०१८ ला सुरू होते आहे. तुमचं लेखन आल्यावर ते वाचून, मुद्रितशोधन करून, सजवून चकाचक करायला लागणारा वेळही जमेस धरावा लागेल. म्हणून, आपलं लेखन उशीरात उशीरा १५ ऑक्टोबर २२ ऑक्टोबर २०१८ पर्यंत साहित्य संपादक या आयडीला व्यनीने पाठवा.
त्याआधी किंवा त्यानंतर काही मदत लागल्यास आम्ही आहोतच!
- टीम दिवाळी अंक
साहित्य संपादक आयडी : https://www.misalpav.com/messages/new/27432?destination=user/27432
In reply to मिसळपाव दिवाळी अंक २०१८ साठी कविता पोस्ट करण्यासाठी मार्गदर्शन by असु
इथेच जिथं विचारणा केली होती तिथेच खाली तुम्हाला उत्तर दिले आहे शिवाय आवाहनामध्येच साहित्य कसे पाठवसायचे ते सांगितलेले आहे.
नमस्कार असु,
इथे https://www.misalpav.com/user/27432 'निरोप' चा पर्याय दिसेल त्यावर आपले लेखन पाठवा.
नमस्कार.
अनेकांकडून विचारणा झाली की वेळ वाढवून मिळेल का? त्याला मान देऊन लेखन देण्याची अंतिम तारीख २२ ऑक्टोबर करत आहोत.
~ सासंतर्फे
दिवाळी अंकासाठी एक कथा पाठवली आहे. दिवाळी अंक केव्हा प्रसिद्ध होणार ? संपादक मंडळाने कथा स्वीकारली आहे कि नाही हे केव्हा समजणार ?
दिवाळी अंकासाठी खूप शुभेच्छा.
दिवाळी अंक केव्हा प्रसिद्ध होणार ? अंकासाठी पाठविलेले लेखन संपादक मंडळाने स्वीकारले आहे की नाही हे केव्हा समजणार ?
लेखन संपादक मंडळाने स्वीकारले आहे की नाही हे केव्हा समजणार ? >>>> +1
लेखन स्वीकृतीविषयी उद्यापासून ते २६ पर्यंत सर्वांना व्यनी करतो. ज्यांचे लेख आधी आले होते त्यांना उद्यापर्यंत नक्की. दिवाळी अंक नरक चतुर्दशी च्या दिवशी प्रकाशित होईल.
दिवाळी अंकासाठी पाठवलेलं काही साहित्य ब्लॉग/फेसबुक/अन्यत्र पूर्वीच प्रकाशित झालंय असं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे हे साहित्य - कितीही चांगलं असलं तरी - अस्वीकृत करावं लागणार आहे. संबंधित लेखकांना तसं कळवण्यात आलं आहे.
मी आज काही लेख आणि कविता पाठवल्या आहेत. उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
आपल्याला व्यनी पाठवलाय योगेश जी.
अंक जाडजुड होणार हे निश्चित.
In reply to अंक जाडजुड होणार हे निश्चित. by कंजूस
लांबलचक!!
जबरदस्त!!!