फरसाण किती आहे त्यानुसार जरा प्रमाणं बदलतील. तरी एक परिमाण म्हणून...
- दोन-अडीच मुठी भरून कुठलंही फरसाण
- दोन टोमॅटो
- दोन कांदे
- लाल तिखट
- मीठ
- तेल
- जिरे
- चिमटीभर साखर
- कोथिंबीर वरून घ्यायला
साधारणपणे पावसाळ्याच्या दिवसांत फरसाणादी प्रकार सादळतात आणि मग ते कुणी खात नाही. एकदिवस हा प्रकार करून आणि खाऊन पाहीला; अफलातून चव जमली होती; म्हणून इथे देतोय.
लोखंडी कढई सणसणून तापवून त्यात जरा तेल तापवावं आणि जिरं चांगलं फुलवावं; तसं ते फुललं की मगच बारीक चिरलेला कांदा, कडा लालसर तांबूस होईतो परतून घ्यावा.
यात आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून मसाला तेल सोडेस्तोवर परतावं. यात चवीनुसार मीठ, तिखट घालावं आणि त्याचा कच्चटपणा जाईतो अजून एखादमिनिट परतावं.
नंतर हातानीच जरा कुस्करून फरसाण यात घालावं आणि भाजी छान हलवून घ्यावी. फारच कोरडं वाटत असेल तर जरासा पाण्याचा शिपका देऊन एक दणदणीत वाफ आणावी.
चव पाहावी आधी आणि गरज पडली तरच मीठ आणि टोमॅटो ने फारच आंबटसर झालेली असेल तर पाव चमचा साखर घालून सिजनिंग अॅडजस्ट करावं. वर कोथींबीर घालून गरमगरम भाजी, पोळी, फुलके यांसोबत खावी.
- तिखट, मीठ आणि साखर घालतांना जरा जपून. फरसाणात या तीनही गोष्टी असतातच.
- हवे असतील तर यात थोडे फ्रोजन मटार, मके थॉ करून घालता येतील
- ताज्या फरसाणाचीही अशी भाजी जमेल आणि त्यात कुरकुरीत पणा हवा असेल तर राखता येईल
- ही भाजी जरा चढ्या चवीचीच सुरेख लागेल सो त्यानुसार तिखटाचं प्रमाण ठरवा
- भाकरी, पोळी ऐवजी या भाजीकरता फुलका जास्त चांगला लागतो
वाचने
13229
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त !
भारी पाकृ आहे.
छान कल्पना
फोटू असता तर.....
In reply to छान कल्पना by II श्रीमंत पेशवे II
आवडता प्रकार
कुरडयांची भाजी लै जबरी लागते
In reply to आवडता प्रकार by तुषार काळभोर
कशी करतात ?
In reply to कुरडयांची भाजी लै जबरी लागते by प्रचेतस
अवघड प्रश्न आहे. घरी करतात पण
In reply to कशी करतात ? by सस्नेह
अशीच आहे पाकृ. लगदा झालेला
In reply to अवघड प्रश्न आहे. घरी करतात पण by प्रचेतस
+१
In reply to अशीच आहे पाकृ. लगदा झालेला by रुपी
फार खास नव्हता. गूगल फोटोच्या
In reply to +१ by तुषार काळभोर
भारी आहे. शेवई उपमा सदृश
In reply to अशीच आहे पाकृ. लगदा झालेला by रुपी
ह्येच असते बगा
In reply to भारी आहे. शेवई उपमा सदृश by गवि
मस्तय फोटो. मला ते शेवयांचं
In reply to अशीच आहे पाकृ. लगदा झालेला by रुपी
मस्त व सोपी पाकृ
फोटो असता तर आणखी मजा आली
सहि .....मी आताच केलेली माझी
छान!
भाजी करून बघितली. छान लागते.
तुम्ही आमचीच रेशीपी चोरलीत राव.