मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काम हे काम असतं!

फुटूवाला · · जनातलं, मनातलं
मागच्या महिन्यात रात्री झोपेत असताना एक काॅल आला मी: हॅलो क्ष: अरे फोटूवाले १७ तारखेला आपल्याला जालनाला जायचंय. मी: ओके चार्जिंग नसल्यानं फोन बंद पडला लगेच. :( काय झालं काय माहित पण काॅल हिस्ट्रीतून नंबरही गायब झाला. ताबडतोबीची नोंद म्हणून मी कॅलेंडर वर नावाऐवजी जालना लिहीलं.कालपर्यंत मला रिकन्फर्मचा काॅल आलाच नाही. आज पहाटे साडेचार वाजता काॅल आला.आवरलं का विचारायला! मी म्हटलं २० मिनीटं आहेत अजून, कुठे येऊ? अजूनही माहित नव्हतं की कोण बोलत आहे.नंबर अननोन. पटापट आवरुन ठरल्या जागी पोहचलो.गाडी आली, गाडीत बसलो आता अर्ध्या तासानंतर मी त्याला विचारलं काय काम आहे? तो माझ्याकडे असा काही आश्चर्यचकित होऊन बघत होता की बस्!!! मी म्हटलं काय झालं? तो : इतका कसा कुल बे तू? अरे सीएम साहेब येत आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं लाईव्ह आहे आपल्याकडे.. मी त्याला अजून एक झटका दिला.. शांतपणे त्याच्याकडे पाहिलं अन् म्हणालो "मग काय त्यात करुन घेऊ की..." :)

वाचने 8743 वाचनखूण प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

In reply to by सतिश गावडे

फुटूवाला 18/09/2018 - 19:35
तुमचा प्रतिसाद डोक्यावरून गेलाय..... बऱ्याच वर्षांपूर्वीच्या विप्र स्टाईलच्या क्रिप्टिक लेख लिंकवाल तर समजून जाईल असे वाटत आहे.. विनंती

In reply to by चांदणे संदीप

फुटूवाला 18/09/2018 - 19:40
असं म्हणाले तर सगळ्यांना सवय असते की कुठ,? काय कार्यक्रम आहे? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत? पण मी एकही प्रश्न ना विचारता कार्यक्रम स्थळाजवळ जाऊन विचारतोय हे त्याला आश्चर्यकारक वाटलं... त्याने बोलूनही दाखवलं की परत तुला बोलवायला आवडेल.. नाहीतर होते असे कि वेळ सांगतात काही अन त्या वेळेत कार्यक्रम संपला नाही तर कुरकुर चालू होते..

In reply to by फुटूवाला

मिपावर वाचनमात्र राहण्याची काळजी घ्या आणि लिहीत राहा. तुमचे अनुभव अनोखे असणार, याबद्दल खात्री आहे.

In reply to by फुटूवाला

सुबोध खरे 22/09/2018 - 10:39
अशा ठिकाणी डोके शांत ठेवणे हाच एक उपाय आहे. कारण बऱ्याच गोष्टी तुमच्या हातात राहत नाहीत आणि भारतात लोकांना सांगितलेली वेळ न पाळणे यात आपण काही गैर करतो आहे असे वाटतच नाही. अशा ढिल्या लोकांकडून गुपचूप दोन पैसे जास्त घेणे हाच एक मानसिक शांतीसाठी उत्तम उपाय आहे. एक आगाऊ सूचना करतो आहे. उद्धट वाटले तर खुशाल केराची टोपली दाखवा. जर एखाद्याचे लग्न किंवा असा मोठा समारंभ असेल तर तुमच्याकडे असलेला एखादा चांगला फोटो मोठा करून त्यांना त्याच्या एक वर्षाच्या वाढदिवशी भेट म्हणून द्या. माणसं आयुष्यभर लक्षात ठेवतात. ५० माणसं हा फोटो दिला आणि त्यातील एकाने जरी परत काम दिले तरी आपले पैसे वसूल होतात.

In reply to by सुबोध खरे

फुटूवाला 23/09/2018 - 00:19
धन्यवाद प्रतिसादाबद्दल.. डोक शांत ठेवतो म्हणूनच तर तो मला कूल बोलून गेला, केराची टोपली तयारच असते पण एक व्यवसाय निवडलेला असल्याने दाखवताना पुन्हा एकदा विचार करावा लागतो.. फोटो फ्रेम बद्दल जे बोललात ते खरच मला आवडलं. वैयक्तीक ते मी करतोच सोबतच चहाचा कप, मुलाचा टिफीन चा डब्बा, आणि एक टेबल कॅलेंडर(ज्यांना जे बरं दिसेल) अशा गिफ्ट मी देतोच ☺️