✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संत - कुसुमाग्रज (एक विलक्षण अनुभव)

म
मानस यांनी
Tue, 02/12/2008 - 03:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12946 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

न
नंदन Tue, 02/12/2008 - 04:52 नवीन

भेदक

कविता. येथे दिल्याबद्दल अनेक आभार. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 02/12/2008 - 05:53 नवीन

सुंदर कविता

ही कविता इथे दिल्याबद्दल धन्यु! -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 02/12/2008 - 08:05 नवीन

कुसुमाग्रज

आणि ह्या शिरवाडकरांना मुक्तांगणात मित्रमेळाव्याला दिलेले आमंत्रण त्यांनी काहीतरी क्षुल्लक कारणे देऊन नाकारले होते. बाबांविषयी कविता कुणीही लिहू शकतो. मीही साहित्य संमेलनात बाबांवरच्या कवितेवर टाळ्या मिळवलेल्या आहेत. त्यांनी आनंदवनासाठी काय केलंय ते बोला ! कधी एकातरी महारोग्यची झडलेली बोटे हातात धरून दिलासा दिला आहे ? - सर्किट
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 02/12/2008 - 08:30 नवीन

काही उत्तरे.

http://www.kusumagraj.org/pratishathan/vishai.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 02/12/2008 - 08:35 नवीन

ह्म्म्म्म्म्म

उत्तरे स्वतंत्र लोकांकडून मिळाली असती तर अधिक विश्वासार्ह ठरली असती. माझे बाबांच्या जवळिकीतून आरोप, आणि शिरवाडकरांच्या प्रतिश्ठानाकडून मिळालेली "तथ्ये". जरा तिसर्‍या बाजूने संशोधन हवे. नाही का ? - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Tue, 02/12/2008 - 09:02 नवीन

विश्वासार्हता

मी दिलेली उत्तरे मला आंतरजालावरून मिळाली तशी दिली. त्याचा मथळाच "काही उत्तरे" असा होता. हा वकिली युक्तिवाद नव्हे. (तसे करायला जाणे म्हणजे कुसुमाग्रजांकरता थोडे कमीपणाचे ठरेल.) असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 02/12/2008 - 09:28 नवीन

माफ करा

शिरवाडकर हा मोठा माणूस.. बाबा हा देखील मोठा माणूस.. माझ्यासारख्या लहान व्यक्तीने असे आरोप करणे चुकीचे आहे.. पण मोठी माणसे इतर मोठ्या माणसांचे वागणे समजून घेतात.. माझ्यासारखे लहान लोकच अशा छोट्या छोट्या गोष्टी मनात ठसवून घेऊन त्यांचे अवडंबर करतात.. माफ करा.. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
व
विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 10:25 नवीन

निषेध..

आणि ह्या शिरवाडकरांना मुक्तांगणात मित्रमेळाव्याला दिलेले आमंत्रण त्यांनी काहीतरी क्षुल्लक कारणे देऊन नाकारले होते. May be! बाबांविषयी कविता कुणीही लिहू शकतो. ??? माझ्या देहात महारोगाची लस घाला म्हणून आव्हान फेकणारा तू - श्वापदांच्या समूहात सिंहाचा स्वर होणारा सर्पांच्या प्रदेशात गरुडाचं घर होणारा वणव्याच्या समोर घनघोर पाऊस होणारा दु:खाच्या समोर फक्त निर्भेळ माणूस होणारा दुबळ्या दयेच्या चिखलातून माणुसकीला बाहेर काढणारा तू - पृथ्वीवरच्या व्यवहारात ईश्वराचा हात माणसांपर्यंत पोचवणारा तू – आणि तुझ्यासारखे संत ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार निघून जातात गस्त घालीत अंधारात, उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून आसवांच्या दलदलीतून दु:खानं उसवलेल्या दुनियेवर अमृताचं सिंचन करीत. !!! बाबांविषयी अशी कविता कुणीही लिहू शकतो?? May be...!! :) मीही साहित्य संमेलनात बाबांवरच्या कवितेवर टाळ्या मिळवलेल्या आहेत. आपलीही कविता वाचायला आवडेल! त्यांनी आनंदवनासाठी काय केलंय ते बोला ! कधी एकातरी महारोग्यची झडलेली बोटे हातात धरून दिलासा दिला आहे ? प्रत्येकालाच या गोष्टी जमतात असे नव्हे! पण म्हणून काय कुसुमाग्रंजांसारखा कुणी असा एकदम असा नाकाम, नाकर्ता ठरत नाही! असो, सर्कीटराव आपल्या प्रतिसादातून कुसुमांग्रजांविषयी विनाकारण कडवटपणा जाणवतो आहे, नव्हे अनादरही जाणवतो आहे त्याचा मी निषेध करतो! आपला, (कुसुमाग्रजप्रेमी!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 02/12/2008 - 11:15 नवीन

माफ करा

प्रत्येकाालाच या गोष्टी जमतात असे नव्हे! पण म्हणून काय कुसुमाग्रंजांसारखा कुणी असा एकदम असा नाकाम, नाकर्ता ठरत नाही! अगदी बरोबर अहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमतेच असे नाही. शिरवाडकरांचा मीही चाहता अहे, त्यांच्या काव्याच्या गोडीत मीही अशा छोट्या छोट्या बाबी जमेस धरत नाही.. अणि समजा धरल्यात तरी, त्यामुळे त्यांचे कवीत्व कमी होत नाही. ते कवी म्हणून श्रेष्ठच राहतात. असो. - (कुसुमाग्रजांचा चाहता) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 02/12/2008 - 11:17 नवीन

माफ करा

द्विरुक्तीबद्दल क्षमस्व. प्रकाटाआ. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 02/12/2008 - 11:36 नवीन

कुसुमाग्रज आणि बाबा

कडवटपणा आहे, नक्कीच... पण कुसुमाग्रज, एक कवी, ह्यांच्याबदलचे प्रेम त्यामुळे कणानेही कमी होत नाही.. आजवर काय थोड्या कवी, लेखकांनी आपापल्या तुंबड्या भरल्या आहेत, बोटावर मोजण्याइतक्या समाजसेवकांविषयी लिहून ? मुळात बाबा आणि शिरवाडकरांचे विचार जुळले होते. दोघेही नास्तिक, पण आस्तिकतेचा पगडा कधीही गेला नाही.. मर्यादा पुरुषोत्तम रामाला बाबांनी "मर्यादित पुरुषोत्तम" केले.. शिरवाडकरांना ते नकीच भावले असणार.. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 08:19 नवीन

आभार..

मानसराव, कुसुमाग्रजांची कविता इथे स्वतंत्ररित्या दिल्याबद्दल आभार... माझे मित्र श्री. भाऊ मराठे ही कविता अतिशय सुंदर सादर करतात. सहमत आहे. कविता, खास करून कुसुमाग्रजांच्या कविता भाऊ अतिशय सुरेख सादर करतात! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 02/12/2008 - 08:35 नवीन

सुंदर कविता..

इथे दिल्या बद्दल धन्यवाद. - प्राजु
  • Log in or register to post comments
म
मानस Tue, 02/12/2008 - 09:57 नवीन

आभार

सगळ्यांचे मन:पूर्वक आभार. सर्किटराव मला कोणी काय केलं, किंवा काय केलं नाही ह्या बद्दल काही म्हणायचे नाही. कुसुमाग्रज ह्यांच्या विषयी काही बोलायची माझी तरी लायकी नाही. ही कविता देण्यामागे फक्त 'सद्भावना' एवढीच एक इच्छा होती. कुसुमाग्रजांच्या शब्दांची ताकद आणि त्यांचा बाबांवरचा आदर या कवितेत स्पष्ट दिसून येतो. बाबांच्या निधनाची बातमी वाचल्यावर सर्व प्रथम मला हीच कविता आठवली, हे माझं दुर्भाग्य!! दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, असे मनापासुन वाटणार्‍या दोन महान व्यक्ती, एक बाबा व दुसरे कुसुमाग्रज हा विषय मी इथेच संपवत आहे. धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 02/12/2008 - 10:12 नवीन

मानस

मोठ्या लोकांचे मोठे विचारच आपण आजवर लक्षात ठेवत आलो आहोत.. आणि तेच योग्य आहे.. कुसुमाग्रज मोठेच आहेत.. माझ्यासारख्या लहानांनी कितीही अकांडतांडव केले, तरी काय फरक पडतो.. आम्ही लहान लोक फक्त छोट्या छोट्या गोष्टींना महत्व देऊन आपल्या छोट्या विचारांना पुढे आणतो झाले.. बाबा गेल्यावर त्यांच्या विषयीच्या मोठ्या मोठ्या लोकांनी व्यक्त केलेल्या (तेही मटा सारख्या महान दैनिकात) विचारांना आम्ही आमच्या तथ्याने काय बाधा आणणार आहोत ? छे.. पण तरीही.. केचे, पुलं, कुसुमाग्रज, ह्या सगळ्यांनी बाबांच्या कार्याविषयी इतके सुंदर लिहून ठेवले आहे, की त्यांनी प्रत्यक्ष आनंदवनकडे पाठ फिरवली हे नगण्य.. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा