युरोपच्या डोंगरवाटा १: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) भाग १
युरोपच्या डोंगरवाटा २: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) उर्वरित भाग
युरोपच्या डोंगरवाटा ३: नॉर्वेतील एक अविस्मरणीय बसप्रवास
युरोपच्या डोंगरवाटा ४: ग्रीसच्या क्रिटी बेटावरील समारिया घळ (Samaria Gorge, Crete)
गेल्या भागात लिहिल्याप्रमाणे समारियाचा ट्रेक करणं शक्य झालं नव्हतं. परंतु वर्षभर खुली असणारी इम्ब्रोसची घळ बघता येणार होती. हिवाळ्यात तर समारिया बंद असतेच, शिवाय इतर वेळीही पाऊस पडल्यास किंवा उष्मा वाढल्यास समारिया बंद ठेवतात. अश्या वेळी टूर कंपन्या समारियाऐवजी इम्ब्रोसला घेऊन जातात. इम्ब्रोसचा ट्रेक समारियापेक्षा छोटा व सोपा आहे. घळीत पाणी क्वचितच असतं. इम्ब्रोसला जाण्यासाठी रस्ता आहे, फेरीची गरज नाही. अश्या अनेक कारणांमुळे क्रिटी बेटावर समारियाखालोखाल लोक इम्ब्रोसचा ट्रेक करतात.
पण याचा अर्थ असा नाही की दुधाची तहान ताकाने भागवायची म्हणून इम्ब्रोसला जायचं! इम्ब्रोसची घळही अतीव सुंदर आहे. त्यात वसंत ऋतूत तर रानफुलांचाही साज बघायला मिळतो.
फ्रांगोकास्टेल्लोहून स्फाकियाला जाताना थोडं अलीकडे कोमिताडेस (Komitades) गावापाशी इम्ब्रोसचं पार्किंग (नकाशातील IMBROS Tawerna) आहे. आदल्या दिवशी स्फाकियाहून परत येताना ही जागा बघून ठेवली होती. तिथून जवळच घळीचं खालचं दक्षिण टोक आहे आणि रस्त्याने गेल्यास १३ किलोमीटर अंतरावर उत्तर टोक आहे. दोन्ही दिशांनी ट्रेक करायचा नसेल तर या १३ किलोमीटरच्या रस्त्यावर खाजगी टॅक्सी आहेत. खरंतर हे पिकअप ट्रक असतात. पुढे बसायला मिळालं तर ठिक, नाही तर मागे मोकळ्या जागेत हवा भरलेल्या गादीवर बसावं लागतं. अर्थात खूप जणांना असा प्रवास आवडतही असेल!
वाचने
7478
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख ट्रेल आहे हा.
छान ट्रेक झाला की. येताना
मग कार सोडून यायची???
In reply to छान ट्रेक झाला की. येताना by यशोधरा
धन्यवाद, यशोधरा! हो,
In reply to छान ट्रेक झाला की. येताना by यशोधरा
छान फोटो + वर्णन.
सुंदर फेरफटकावर्णन आणि फोटो !
आभार!
खूपच छान प्रवास आणि फोटो.
धन्यवाद!
In reply to खूपच छान प्रवास आणि फोटो. by चित्रगुप्त
Aristoúchos !
Efharisto!
In reply to Aristoúchos ! by अनिंद्य
लेख मस्त झालाय इकडच्या प्लस
धन्यवाद!
In reply to लेख मस्त झालाय इकडच्या प्लस by महासंग्राम