Skip to main content

गुलमोहर.!

लेखक अंकुश चव्हाण यांनी गुरुवार, 12/03/2009 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
गुलमोहर.! माझ्या अंतर्बाह्यात सामावलीस तू. दूरवर पसरलेल्या मार्गात माझ्या उभी होतीस तू. अन् मी पुढेच जात राहिलो, गुंग होऊन माझ्या विचारांत. जीवनही गुरफटून गेले त्या अनुत्तरित प्रश्नांत. तुला भेटण्यास दोन शब्द बोलण्यास वेळच कुठे होता? आता... आता तर पर्जन्यधारांसमवेत बरसतेस तू. आणि शेवटी वेळ असताना मजपाशी घाईत आहेस तू. काय सांगू, काय सांगू आपण... अजाणताच म्हणतो - आहे बेमौसम हे शहर. पुन्हा कधीतरी भेटूया... अलविदा - ए - गुलमोहर.!
लेखनविषय:

वाचने 1227
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

छान कविता !!

सुरेख कविता! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}