Skip to main content

थांबला नसतास तू

लेखक आकाश५०८९ यांनी शनिवार, 08/09/2018 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
जशी थांबले मी तसा थांबला नसतास तू तुला घाई मरणाची, थांबला नसतास तू माझे ओथंबणे तुला कधी दिसलेच नाही ठेवून कोरडी मला का असा भिजलास तू पाहिले असतेस डोकावूनी जर या अंतरी असा परक्याप्रमाणे, वागला नसतास तू तुला शोधणे थांबवले आकाश शेवटी बदललास अवघा, हरवला नव्हतास तू आकाश........
लेखनविषय:

वाचने 1854
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

मिपावरील आता पर्यंतच्या आपल्या कविता वाचल्या, रोचक आहेत.