ओ "स्त्री" रक्षा करना..
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
.
टिपिकल पुरुषी अहंकारातुन स्त्री वर होणारे अत्याचार दर्शविणार्या निघालेल्या चित्रपटांची सूची भरमसाठ निघेल. पण हीच पार्श्वभूमी वापरुन एक हॉरर कॉमेडीशैलीतला चित्रपट बनवणे हे एखाद्याच्या डोक्यात येणे हीच मुळात एक दाद देण्यासारखी गोष्ट आहे. परवाच सौसमवेत "स्त्री" पाहीला.
प्रेक्षकांना गृहीत धरुन बनवलेल्या चित्रपटांच्या पठडीतुन स्त्री चित्रपट वेगळा ठरतो.
संपूर्ण कथा चार दिवसात घडते. चंदेरी नामक गाव आहे तिथे दरवर्षी चार दिवस ग्रामदेवतेची जत्रा भरत असते पण त्याच चार दिवसात रात्री अपरात्री एकट्याने फिरणार्या पुरुषांना एक हडळ केवळ त्यांचे कपडे मागे ठेवुन पळवुन नेत असते. पण तिच्यापासुन संरक्षण करण्याची क्लृप्ती पण गावकर्यांनी शोधली आहे. घराबाहेर एका विशिष्ठ प्रकाराने बनवलेल्या लाल अक्षरातील शाईने " ओ स्त्री कल आना" असे लिहुन ठेवले कि तो आत्मा त्या रात्री त्या घरी येत नाही. (साधारण पण ९० च्या दशकात उठलेल्या हाकामारीचा संदर्भ आहे.)
मुळात चित्रपट पाहावा तो कसलेल्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय पाहण्यासाठी.
उदाहरणार्थ.
स्त्रीला पकडायचे असेल तर पुरुषात चार पाच गुण असणे आवश्यक आहे. त्यातील एक म्हणजे तो तवायफजादा असणे. राजकुमार राव बाकीमध्ये बाकी सगळे गुण आहे पण त्याला स्वतःला ते काम करायचे नाही म्हणुन तो म्हणतो कि सगळे ठिक आहे पण शेवटचा गुण जो तवायफजादा असणे तो कसा काय पुर्ण करु तेव्हा पंकज त्रिपाठीने त्याला तुझी आई अमुक तमुक होती हे पटवुन दिल्याचा केलेल्या प्रसंगात जो अभिनय केला आहे तेव्हा बर्याच दिवसांनंतर खोकल्याची उबळ येऊ पर्यंत हसलो.
दुसर्यात "स्त्री" समोर उभी आहे तिला कसेतरी सापळ्यापर्यंत आणले आहे आणि आता सारे काही राजकुमार राव वर आहे. पुन्हा इथे पंकज त्रिपाठी सूचना देतो " तिच्या डोळ्यात प्रेमाने पाहा" आणि त्यावर राजकुमार रावने केलेला शाहरुखची नक्कल दाद देण्याजोगी.
बरेच चित्रपट डोके बाजुला बघण्याच्या लायकीतले असतात पण हा चित्रपट डोके वापरुन बघण्याच्या कॅटेगिरितला आहे.
उदा. स्त्रीला पकडणारी युक्ती सांगणारे एक पुस्तका लायब्ररीत आहे पण त्यातील महत्वाची पाने फाडली आहेत. मग आता काय करायचे? तर त्याच्या मूळ लेखकालाच भेटावे असे कन्क्लुजन निघते. आता ह्या लेखकाने हे पुस्तक कधी लिहिले आहे तर आणीबाणीच्या काळात. (पुन्हा एका स्त्रीचा संदर्भ वेगळ्य अर्थाने.)
आवडत्या "स्त्री" सोबत चित्रपट हा चित्रपट पाहाणे हा एक चांगला अनुभव ठरु शकतो. ;)
प्रतिक्रिया
(साधारण पण ९० च्या दशकात
हाकामारीबद्दल
हाकामारीच्या तीन फुल्या
शिवाय साप येऊ नये म्हणून
महाराष्ट्रातीलच प्रकार.
आस्तिक आस्तिक म्हणायचे
मनोगतातील एका लेखात आपण
"९० च्या दशकानंतर लुप्त
हाकामारीला तर मोठ्यांची देखील
हाकामारीबद्दल खूप ऐकले आहे
स्केरी मूव्ही आहे का?
नाही. कॉमेडी हॉररपट आहे. व
नाही
पाहिला
बघायचा आहे हा पिक्चर!
पुढे तूनळीवर येईल तेंव्हा बघण्यासारखा आहे.
+१
चित्रपटाचा शेवट आजिबात समजला
स्त्री ची रूपे अनेक ...
शेवट ओपन एन्डेड आहे. बहुदा
आवडलाय!