आदिती मस्तच आहे.
"लेवून तवंग तेलाचा
भाजी होती गुळमट
भरपूर तूप लावूनही
पोळी झाली चामट"
ह्या ओळी वाचुन दोन दिवसापुर्वी झालेली माझी अवस्था आठवली.
खुप छान......
चालू द्या
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
लेखनाबरोबर विडंबनामधे सुद्धा नंबर मारलास..
मस्तच केले आहेस...
तु हे बहुतेक स्वत:च्या किचनमधे काम करत, समोरील राहणार्या काकुंच्या किचनमधे डोकावत विडंबन केले आहेस....:)
ह.घे.
आदिती,
दुसर्याने बनवलेल्या जेवणाचीतर लज्जतच न्यारी.
आमच्या सौ. पण असेच म्हणतात, फक्त जरा आणखी जास्त गुळ लाऊन आणि दुसर्याने च्या ऐवजी 'तू' हा शब्द घालून ;-)
- नाटक्या
दुस-याने बनविलेल्या जेवणाची लज्जतच न्यारी! म्हंजे विडंबनासारखा छानसा सैपाक पण करत असणार तू! मग कधी येऊ तुझ्या हातच जेवायला? [चामट पोळीही चालेल! ]
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
शेवटी नुसतं स्वयंपाक करून, जेवून तरी काय होणार आहे?.. आज मानवाच्या जगात येणार्या पुढच्या पिढीला तरी हा मानव काय सोडून जाणार आहे? ..नुसते जेवण? संपत्ती? अणुबाँब? ए के ४७? नव्हे तर त्याचबरोबरीने पुढच्या पिढीला साहित्य संगीत कला यांचा विशेष वारसा मानवाला द्यायचा आहे... या विडंबिकेतून कवयित्रीने हे खचितच साध्य केले आहे, असेच म्हणावे लागेल... .
क्रीएटिव गोष्टीत बान्धेसूद नियम लावणे मुश्किल असते....कलाकाराला आपली कला एकदम उच्च आहे असेच वाटत असते...माणूस तरी का लिहितो? ..कवि असो की कवयित्री शेवटी माणूसच ना? आजूबाजूला घडणार्या प्रसंगातून,कडू-गोड अनुभवातून कवयित्रीच्या भावना उचंबळून आल्या असणार;त्या भावना योग्य शब्दरूप घेईपर्यंत कवयित्रीची तगमग,तड्फ़ड झाली असणार आणि जसे समुद्रमंथनातून अमृत बाहेर आले तसे तिच्या मनातल्या भावमंथनातून या कवितेचे शब्द उमटले असणार ....झरझर ते कागदावर आले असणार...
इतकी गुंतागुंतीची प्रोसेस आहे गं ही , या समीक्षकांना मात्र हे कळत नाही... ...
..तू लिही गं...कदाचित आज नाही लोकांना या कवितेचे महत्त्व कळणार,नंतर नक्की कळेल.. या प्रक्रियेला कदाचित युगंन् युगं लागतील, पण हे नक्कीच घडेल.. मी आशावादी आहे......कदाचित तुझ्या विडंबिकांच्या वह्या जर्मनीस्थित (!) लोक डोक्यावर घेऊन नाचतील... या विडंबिकांवर लोक नाटकं लिहितील, विक्रमी खपाच्या कादंबर्या तयार होतील, पुरस्कारांची रांग लागेल, एखादं साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद तुला मिळून जाईल...पण त्या वेळी या आस्वादकांना विसरणं तुला शक्य होणार नाही...
या सार्या विडंबनवीरांची छोटीशी आठवण नक्कीच तुझ्या डोळ्यांच्या कडा ओलावून नेईल...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
समीक्षक पंथाच्या अध्वर्यूंकडून अशाच सडेतोड प्रतिसादाची अपेक्षा होती आणि ती तुम्ही हजार टक्के पूर्ण केलीत!
'मास्तर' ही मिपाच्या गुणिजनांनी तुम्हाला दिलेली पदवी अशा रीतीने सार्थ होताना बघून मन हेलावले!! धन्य आहात!!!
__||__ :)
चतुरंग
मास्तर, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत, मन भरून आलं. आता मी नक्कीच पुरणपोळीची रेसिपी, फोटोंसकट टाकेन.
तुमच्या या उस्साह उत्साहवर्धक प्रतिक्रियारूपी समीक्षणाबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
=)) माणसांच्या भाषेत सांगायचं तर, या विडंबनाला ६० प्रतिसाद येतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं!
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
सुरेखं
लेवून तवंग
अदिती मस्तच!
काय ग!!
अरेरे...
"कभी कभी
५०
कधी येऊ जेवायला?
छान गं, मस्त गं...
वा मास्तुरे वा!!
हेच
मास्तर,
Pagination